Sangieta Devkar

Drama Others

3.0  

Sangieta Devkar

Drama Others

नवरा नावाचे कवच

नवरा नावाचे कवच

7 mins
627


आज ऑफिसमध्ये खूपच काम होत मुक्ता घरी येईपर्यंत दमून गेली होती. घरी आली तर पाहते काय शंतनु मस्त टिव्ही पहात बसला होता. सोफ्यावरच्या उशा अस्ताव्यस्त होत्या. सकाळपासूनच पेपर टीपॉयवर लोळत होता. तो ही अस्ताव्यस्त. चिप्सचे रिकामे पाकीट तिथेच होते. मुक्ताचे डोके भडकले.

शंतनु अरे किती पसारा हा. घरात बसून तुला साधं घरपण नीट नाही ठेवता येत का?

हे बघ मुक्ता ही बायकांची कामं आहेत ती मला जमणार नाहीत. तू बघ काय ते.

अरे तुला काहीच कसे वाटत नाही. मी घरची काम करून नोकरी करते मी ही दमते रे तू थोडी मदत केलीस तर काय बिघडणार आहे?

मुक्ता उगाच आल्या आल्या डोकं नको खाऊस नसेल झेपत तर दे नोकरी सोडून.

वा नोकरी सोडून देते मग खायचे काय? तू करतो का नोकरी?

मस्त निवांत राहतोस तुला बोलायला काय जाते.

मुक्ता मला नोकरी करायला आवडत नाही. हे तुला माहीत आहे सतत टोमणा मारू नकोस. आणि माझे ट्रेकिंगचे कॅम्प असतात त्यातून मिळतात पैसे. मी कोणाच्या हाताखाली काम नाही करू शकत.

हो कॅम्पमधून भरपूर पैसे कमावतो तू त्यात या घराचे हफ्ते, मीराचं शिक्षण घरखर्च सगळं भागणार आहे नाही का? किती कमवतोस रे असे कॅम्प घेवून? बास मुक्ता खूप बोललीस भले मी तुझ्याइतके नाही कमवत पण म्हणून बोलून दाखवायची गरज नाही समजले. असे बोलून शंतनु बाल्कनीत गेला आणि सिगारेट फुकत राहिला.


हे रोजच होते वाद आणि तणाव बस्स. मुक्ता फ्रेश होऊन आली आणि चहा ठेवला तिने. चहा उकळेपर्यंत तिथंच थांबली. लग्न करताना म्हणाला होता शंतनू मी करेन काहीतरी नोकरी आणि साईड बाय साइड हे कॅम्पपण पाहीन. ट्रेकिंगची आवड त्याची पण म्हणून काहीच काम नाही करायचे नुसतं दिवसभर सिगारेट फुकत नाहीतर मित्रांसोबत टाईमपास इतकंच त्याचं आयुष्य. घरात कसल्या कामात मदत नाही उलट काम वाढवून ठेवायची. चहा झाला दोन कप भरून बाहेर आली त्याचा चहा तिने टीपॉयवर ठेवला. सिगारेट विझवून शंतनु मुक्ताजवळ आला.

मुक्ता अगं समजून घे ना मला नाही जमत ते नोकरी करणं रादर कोणाची गुलामी करणं मी खुश आहे गं माझ्या कामात. आणि असतात ना कॅम्पपण. मिळवतो ना पैसे मी पण.


मुक्ता यावर काही बोलली नाही. चहा घेऊन घर आवरले तिने. रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. मीरा आली क्लासवरून. ती आठवीला होती. तिचा खर्चही आता वाढत जाणार होता पण त्याला काही पडलेले नव्हते कशाचेच!. उलट मुक्तालाच बोलायचा तो उशीर का झाला? कोणासोबत चालली? कारण त्याचा मेल इगो फुकटचा रुबाब करायचा. आपल्यामुळे मीराला त्रास नको ती आता वयात आलेली आहे. आपल्या दोघाच्या भांडणाचा परिणाम तिच्यावर व्हायला नको अभ्यासावर परिणाम होईल म्हणून मुक्ता शक्यतो शांत राहत होती.


रात्री ती दमून बेडवर आली. शंतनु होताच लोळत. तिला बघून त्याने तिला जवळ ओढले. नको शंतनु मला कंटाळा आला आहे. हो का माझा आला असेल कंटाळा नाही का? मी असा बिनाकामाचा यूजलेस. तसे काही नाही उगाच तू उलट अर्थ नको घेऊ मी दमले आहे खूप. मग तो उठून रागात बाहेर गेला. मुक्ता झोपण्याचा प्रयत्न करू लागली. 


मुक्ता आज ते प्रेझेंटेशनचे काम पूर्ण करून जा उद्या सकाळी मला फाईल लागेल. विनीत... मुक्ताचा बॉस म्हणाला.

हो विनीत पूर्ण करूनच जाईन.

विनीत बॉस असला तरी ऑफिस स्टाफशी तो अगदी मोकळेपणाने वागत असे त्यानेच सगळ्यांना त्याला नावानेच बोलायला सांगितले होते. आणि विनीत जेमतेम 35 वर्षाचा होता त्याची ऍड एजन्सी होती. मुक्ताचे काम संपले तेव्हा सात वाजत आले होते विनीतही थांबला होता. मुक्ताने शंतनुला कॉल करून तसे सांगितले. तो काहीच बोलला नाही. मुक्ताने काम संपवून फाईल विनीतला दिली.

मुक्ता कशी जाणार आहेस घरी?

मी कॅबने जाईन आता बसला थांबायला वेळ नाही.

इफ यु डोन्ट माईंड मी सोडतो तुला रात्र ही झाली आहे.

नको विनीत मी जाईन ना.

अगं आता एकटी कुठे जाते चल मी सोडतो.


ओके चल म्हणत मुक्ता तिची पर्स घेऊन आली. विनीतने कार पार्किंगमधून बाहेर आणली. मुक्ता त्याच्या बाजूच्या सीटवर बसली. ती मागे सीटला मान टेकवून बसली.

मुक्ता काही प्रॉब्लेम आहे का विनीतने विचारले.

नाही रे जरा दमलीय बस.

पण तुझा चेहराच सांगतो आहे काही विचार करतेस.

नाही रे विनीत.

ओके म्हणत त्याने एफ एम सुरु केले.


मुक्ता डोळे मिटून बसली होती. तिच्या घराजवळ आल्यावर विनीत बोलला आले घर मुक्ता.

ओके म्हणत तिने डोळे उघडले.

खाली उतरली, थँक यू विनीत.

इट्स ओके मुक्ता खूप दमली आहेस तू टेक रेस्ट.

गुड नाईट विनीत म्हणत मुक्ता लिफ्टकडे आली. शंतनु गॅलरीमध्ये होता त्याने मुक्ताला पाहिले विनीतसोबत येताना. मुक्ता घरात आली.

छान चालले आहे तुझे मुक्ता कामाच्या नावाखाली फिरणं.

शंतनू वाटेल ते बोलू नकोस मी ऑफिसमध्येच होते आणि लेट झाला म्हणून विनीत सोडायला आला.

ओह सगळ्यांना सोडायला जातो का तो?

तू सायको झाला आहेस शंतनु तुझ्याशी वाद घालणे म्हणजे मूर्खपणा आहे.

तसा शंतनु तिच्याजवळ आला तिचे मनगट जोरात पडकले त्याने बोलला, मला मूर्ख समजतेस काय? मला दिसत नाही का तुझे वागणे. माझ्यापेक्षा जास्त कमवतेस त्याचा माज आहे का तुला.

शंतनु सोड माझा हात.

कुठे गेली होतीस सांग मजा करायला. म्हणूनच मला नकार देतेस ना माझा कंटाळा आला आहे तुला.

तिने हिसका देऊन हाथ सोडवून घेतला हो आलाय तुझा कंटाळा. रोज काही न काही वाद उकरून काढतो तू. माझ्यावर संशय घेतोस.

कंटाळा आलाय ना मग जा ना घर सोडून कोणी अडवले आहे तुला.

तशी मुक्ता रागात म्हणाली, तू विसरतो आहेस शंतनु हे घर माज्या नावावर आहे मी घेतले आहे तेव्हा तू निघ बास आता मला सहन होत नाही.

तसा त्याचा इगो हर्ट झाला तुझे घर तुला लखलाभ जातो मी म्हणत तो आत गेला आणि त्याची बॅग घेऊन बाहेर पडला. मुक्ता रडत राहिली एकटीच मीरा आली घरी.

तिला असे रडताना बघून तिने विचारले, आई काय झाले का रडतेस?

काही नाही मीरा.

आई मी लहान नाही आता मला समजते सगळे. बाबाशी भांडण झाले ना परत.

हो मीरा आणि तो गेला आहे घर सोडून आता आपण दोघीच राहायचे.


मीराला ही माहीत होते की शंतनु कसा आहे आणि यांचे वादपण तिने ऐकले होते बऱ्याचदा.

मी आहे ना आई नको काळजी करू म्हणत मीरा मुक्ताच्या कुशीत शिरली.


सकाळी आवरून मुक्ता ऑफिसला आली. तिला वाटले रागाच्या भरात शंतनु गेला आहे तो येईल परत संध्याकाळपर्यंत. तसेही त्यालाही घर नव्हते. अनाथआश्रमात लहानाचा मोठा झाला होता तो. एकटा आहे म्हणून खूप जीव लावला होता मुक्ताने पण त्याचा स्वभाव नडला. संध्याकाळी ती घरी आली पण घर बंदच होते म्हणजे शंतनु आला नाही. मुक्ताने त्याला कॉल लावला पण आऊट ऑफ नेटवर्क येत होते. दुसऱ्या दिवशीही तिने कॉल लावला पण काही संपर्क नाही झाला. असाच आठवडा झाला शंतनुला घरातून जाऊन. सगळ्या सोसायटीला आतापर्यंत समजले होते की शंतनु घर सोडून गेला. मग एकटी बाई म्हणजे सगळ्यांना अवेलेबल असा समज असतो लोकांचा. सोसायटीमधील काही आंबटशौकीन उगाचच मुक्ताकडे यायचे काहीतरी निम्मित काढून आणि काही काम असेल तर सांगा म्हणायचे.


ऑफिसमध्येपण पुरुष सहकारी तिच्याकडे त्याच नजरेने पहायचे लगट करायला बघायचे. बाई एकटी राहते याचा सगळेच फायदा घ्यायला बसलेले असतात. आजही तिला थोडा लेट झाला. घरी कामवाल्या मावशीना मीराजवळ थांबायला तिने सांगितले होते. विनीत आजही तिला सोडायला आला. तिला इतके गप्प बघून म्हणाला, मुक्ता काय झाले बोल का इतकी टेन्शनमध्ये आहेस.

तशी ती रडू लागली विनीत माझे आणि शंतनुचे भांडण झाले आणि तो घर सोडून गेला 15 दिवस झाले त्याचा फोनपण लागत नाही.

ओहह... शंतनुच्या मित्राकडे चौकशी केलीस का?

हो केली कोणा कडे नाही गेला तो.

मुक्ता त्याचा राग कमी झाला की येईल नको काळजी करू.

विनीत पण लोक किती त्रास देतात रे एकटी बाई म्हणजे यांना शिकार करायला सावज असते का? सगळ्यांच्या नजरेत घाणच दिसते.

मुक्ता लोकं अशीच आहेत आणि त्यांच्या नजरा नाही बदलणार. आपणच सांभाळून राहायचे.

म्हणजे बाईला नेहमी नवऱ्याचे सुरक्षाकवच हवेच असते का एकटी बाई नाही जगू शकत.

हो मुक्ता आपला समाज असाच आहे त्यात बदल नाही होणार. आहे हे असे आहे.

नको काळजी करू म्हणत विनीत ने तिचा हात थोपटला. तिने त्याला रडत मिठी मारली.

विनीत तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला, शान्त हो होईल सगळं नीट. काही गरज लागली तर मला सांग.

चल जाऊ घरी मीरा एकटी असेल ना.

हो विनीत चल ती डोळे पुसत म्हणाली.


महिना झाला होता शंतनु चा काहीच पत्ता लागत नव्हता.

मीरा म्हणाली एक दिवस... आई, बाबा नाही येत घरी तर राहू दे उगाच परत तुमची भांडणं, वाद तुला त्रास होतो ना.

नाही गं बाळा उलट बाबा नसेल तर बाहेरची लोक जास्त त्रास देतील. तुला नाही माहीत बाहेरचे जग खूप विचित्र आहे. आपल्या दोघींना बाबाचे कवच हवे तरच आपण सुरक्षित राहू शकतो. नाहीतर बाहेर मोकाट फिरणारे लांडगे आहेतच लपून बसलेले. नावाला का होईना बाईला नवरा हवा आणि मुलीला बाप.


मुक्ताने पुन्हा एकदा शंतनुचा फोन ट्राय केला रिंग होत होती. शंतनुने कॉल उचलला तो ही बाहेर राहून कंटाळला होता आणि त्याचाकडे पैसेही नव्हते. मोठ्या तावात तो बाहेर पडला होता पण निभाव नाही लागला त्याचा. पैसे संपले तसे त्याला मुक्ता आठवली. म्हणून फोन घेतला त्याने.

बोल का फोन केलास

शंतनु माझे चुकले. मी खूप बोलले तुला तू घरी ये परत. तू काही करू नकोस मी काही ही बोलणार नाही पण ये तू घरी.

मुक्ता माझे ही वागणे चुकले गं. मी तुला नाही समजून घेतले मला माफ कर मला माझी चूक समजली. मी मिळेल ती नोकरी करेन पण तुला त्रास देणार नाही. प्लीज माफ कर मला. 

हा शंतनू तुझी चूक समजली ना मग बस यातच सगळं आले. ये तू घरी म्हणत मुक्ताने फोन ठेवला. मुक्ताला माहेरचे कोणी नव्हते. तिला भाऊ असून विचारत नव्हता. आईबाबा एका अपघातात गेले होते. नवरा नावाचे सुरक्षाकवच तिला हवे होते. या समाजापासून स्वतःचं रक्षण करायला..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama