Poonam Wankar ( पूरवा )

Romance Inspirational

3.7  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Inspirational

नवरा माझ्या नवऱ्याचा

नवरा माझ्या नवऱ्याचा

40 mins
447


        समिधा खूप अस्वस्थ झाली होती. जणू काही तिच्यावर दुःखाच आभाळच कोसळून पडलं होत. मधुचंद्राच्या रात्रीच तिला असं काही कळेल याची तिला कल्पनाच नव्हती. तिने पाहिलेली स्वप्ने, मनातील नाजूक अश्या भावना.. सगळ्याच एका क्षणात काचेगत फुटून चकणाचूर झाल्या होत्या. तिच्या डोळ्यात असलेली साजन भेटीची ओढ, त्या पहिल्या स्पर्शाला आसूसलेलं तिच मन.... तिच्या डोळ्यातून आसवांच्या रूपात वाहू लागलं होत. त्या क्षणी ढसाढसा राडावं, त्याला शिक्षा करावी की स्वतःला संपवून टाकावं ; तिला काहीच कळतं नव्हतं. गुलाबाच्या फुलांनी सजलेल्या त्या शेजेवर भिंतीशी टेकून, केसात माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्यातील एक एक कळी हाताने कुस्करत ; नुसतीच तिच्या आसवांना वाट मोकळी करून देत होती.

               समिधा तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. दिसायला खूप सुंदर. काळे टपोर डोळे, लांब काळे रेशमी केस, उंच कमनीय बांधा, गोरी काया, नाजूक गुलाबी ओठ अगदी कुणालाही भुरळ पाडेल अशीच होती ती. स्वभावाने शांत, सालस आणि उच्चशिक्षित असलेली समिधा तिच्या आई वडिलांची खूप लाडकी होती. ती दोघेही चांगल्या नोकरीवर असल्यामुळे त्यांनीही त्यांच्या लेकीला कसलीच कमी कधीही पडू दिली नव्हती. तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी तिला जपलं होत. तिच लग्नही मोठया हौशीन, धूमधडाक्यात साजर झालं होतं. तस तर समिधाला खूप चांगली चांगली स्थळे आली होती, पण अनयची बात काही औरचं होती. बायोडाटा मधील त्याचा फोटो बघता क्षणीच समिधा त्याच्या प्रेमातच पडली होती.

               अनय एक सॉफ्टवेअर डेव्हलपर होता. दिसायला देखणा. एखाद्या मुलीलाही लाजवेल इतके बोलके त्याचे डोळे होते. उंच पिळदार यष्टी, गोरा वर्ण आणि क्लीन शेव्ह केल्यामुळे चेहऱ्यावर दिसणारा फिकट हिरवा रंग त्याला अगदीच खुलून दिसत होता. अवघ्या सहा महिन्यातच समिधा आणि अनय लग्नाच्या पवित्र नात्यात बांधले गेले. आज त्या दोघांची लग्नानंतरची पहिलीच रात्र होती. त्यामुळे आता या क्षणाला समिधा खर तर अनयच्या मिठीत असायला हवी होती, नव्या आयुष्याची स्वप्न दोघांनी मिळून एकमेकांच्या पापणीत सजवायला हवी होती. पण तिच्या डोळ्यातील भविष्याच्या स्वप्नांची जागा भूतकाळातल्या आठवणीनी घेतली होती.

( मोबाईलची रिंग वाजते )

विजयराव ( समिधाचे वडील ) : अग विभा..! जरा बघतेस का? कुणाचा फोन आहे ते?

विभा ( आई ) : अहो! तुमचे ते मित्र नाही का? गणेश देशमुख.., त्यांचा फोन येतोय.

विजयराव : बघू..! काय म्हणतोय? हॅलो..!! अरे गणेश, आज कशी काय आठवण झाली या मित्राची?? चुकून तर नाही ना डायल केलास नंबर?? ( मिश्किल पणे )

गणेशराव : काय रे विजू!! तुझी मस्करी करण्याची सवय अजून गेली नाही वाटत?? बोल कसा आहेस..? घरी सगळे कसे आहात? आणि आपली समिधा काय म्हणते??

विजयराव : आम्ही सगळे उत्तम आहोत. समिधा पण मस्त!! कालच तिचा ग्रेड्युएशनचा निकाल आलाय... विद्यापीठात पहिली आली आपली समिधा!!

गणेशराव : अरे वाह!!! फारच आनंदाची बातमी. माझ्या कडून अभिनंदन सांग तिला. विजू खर तर मी तुला वेगळ्याच कारणाकरीता कॉल केला. माहिती नाही तू काय म्हणशील?? पण माझ्या मनात आलं तर लगेच कॉल केला तुला.

विजयराव : काय रे! काय झालंय? काही सिरिअस तर नाही ना?? माझी काही मदत हवी का? काही असेल तर न लाजता लगेच सांगायचं, ओके . बोल काय झालंय??

गणेशराव : अरे नाही रे! असं घाबरण्यासारखं नाही काहीही. खर तर मला समिधा बद्दलच बोलायचं होत.

विजयराव : समिधा बद्दल...??? म्हणजे...! मी समजलो नाही??

गणेशराव : विजू मी माझ्या अनयसाठी तुझ्या मुलीचा हात मागतोय..., म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर??

विजयराव : वाह!! अगदीच माझ्या मनातलं बोललास तू गण्या. आम्ही दोघेही बरेच दिवसापासून हाच विचार करीत होतो. समू चा निकाल येण्याची वाट बघत होतो. पण बरंच झालं..,तू स्वतःहुन विषय काढलास ते! आमच्या दोघांची काहीच हरकत नाही. आम्हाला अनय पसंत आहे. शिवाय तुझ्या आणि वाहिनी सारखे जीव लावणारे नवे आई वडील आमच्या लेकीला भेटतील हे आमचं भाग्यच म्हणावं ना! ( पानावलेल्या डोळ्यांनी )

गणेशराव : अरे हे काय विजू..?? आताच हळवा झालास. या फक्त आपल्या गोष्टी.. आधी समिधाला तर विचार? तिच्या मनात आहे का कोणी? आणि मी अनय चा बायोडाटा तूला पाठवतो तिलाही दाखव. त्यानंतर ठरवूया. काय म्हणतोस??

विजयराव : हो हो!! आम्ही आजच बोलतो समिधाशी. तू दे पाठवून बायोडाटा. भेटूया मग लवकरच. चल.. ठेवतो मग. ( फोन कट करत ) अग विभा! ऐकलंस ना तू? आपल्या समिधा ला मागणी घालतोय गणेश त्याच्या मुलाकरिता.

विभा : (आनंदाने )हो! ऐकलंय मी सगळंच. देवाने ऐकलं माझं. साखर ठेवते त्याच्या पुढे. आलेच मी.

              समिधाला मनासारखं छान स्थळ सांगून आलय याचा समिधाच्या आई वडिलांना फार आनंद झाला होता. तसे तर तिला बरेच चांगले स्थळ आलेले होते. पण गणेश आणि त्यांच कुटुंबं विजय आणि विभाला जवळच वाटत होत. एका चांगल्या , प्रतिष्टीत कुटुंबात आपल्या लेकीच लग्न होणार याच दोघांनाही समाधान वाटत होत.

                           विजय आणि विभा समिधाला हे सगळं सांगण्यासाठी खूप उत्सुक झाले होते. ते दोघेही समिधा बाहेरून येण्याची वाट बघत होते. अनय चा बायोडाटा वाचून दोघांनाही खूप समाधान मिळाले. अनय एका सॉफ्टवेअर कंपनीत मोठया हुद्द्यावर कार्यरत होता. चांगल पॅकेज, दिसायलाही देखणा, शिवाय लोकही पाहणीतले असल्यामुळे दोघेही समिधाच्या भविष्याच्या बाबतीत निश्चिन्त झाले होते.

विजयराव : "अग विभा! ही समू कुठे अडकली जरा बघ ना तिला कॉल करून.., अजून आली कशी नाही ही?"

विभा : "अहो! येईल ती. मी समजू शकतेय तुमची आतुरता. पण जरा थांबा येईल ती ( हसत हसत आत निघून जाते. )"

             विजय उत्सुकतेने आपल्या लेकीची वाट बघत होते. त्यांना आता राहावतच नव्हतं. त्यांनी लगेच समिधाला कॉल केला.

समिधा : "हॅलो..!! हा पप्पा बोला?"

विजय : "बाळा कुठे आहेस? अजून आली कशी नाहीस तू? आम्ही वाट बघतोय??"

समिधा :" पप्पा मला जरा उशिर होईल. आज राज चा वाढदिवस आहे. त्याला सरप्राईज द्यायचंय. मी इशू बरोबर आहे. ती सोडेल मला घरी. तुम्ही वाट बघू नका. आणि आईला सांगा मी बाहेरच खाऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही दोघे जेवण करून घ्याल. ठेवते मी.. बाय..!!! (कॉल कट करत)"

विजय : "(स्वतःशिच पुटपुटत) अरे, अशी कशी ही! आणि... हा राज कोण??"

            विजय, विभाला राज बद्दल विचारणा करतात. मात्र विभाला देखील काहीच माहिती नव्हतं. समिधाच्या तोंडून राजच नाव तिच्या वडिलांनी प्रथमच ऐकलं होतं. यापूर्वी तिने बोलण्यात देखील कधीच त्याच नावं देखील काढलेल नव्हतं. समिधाच्या स्वभावामुळे तिला खूप मित्र मैत्रिणी होते. आणि त्या सर्वांनाच विजय आणि विभा ओळखायचे. ती सर्वांविषयी तिच्या आई वडिलांना सांगत असायची. मग, हा राज असा कोणता मित्र होता? ज्याबद्दल तिच्या आई वडिलांना काहीही माहिती नव्हतं.! आता खर तर दोघांनाही थोडं टेन्शन यायला लागलं होतं. अनय बद्दल समिधा काय म्हणेल? तिला तो आवडेल की नाही? की तिच्या मनात राज आहे?? असे बरेच प्रश्न त्यांना पडले होते.

(दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबल वर....)

               सगळे नाश्ता करायला बसले होते. विजय विभाला डोळ्यांनीच इशारा करत समिधाला राज बद्दल विचारायला सांगतात. मात्र समिधाच आपल्या आई वडिलांकडे लक्ष जात. खोडकर शब्दात ती तिच्या आई वडिलांना म्हणते, "विजू.., विभा..! काय चाललंय तुमचं?? तुमची लेक समोर बसलीये तुमच्या.." ( फिदी फिदी दात काढत )

विभा : "गप ग! काय फाजीलपणा लावलाय??"

समिधा :" अग मी काय केलंय? तुझा विजू बघ न! कसा करतोय ते?? ( हसत हसत )"

विजय : "समू गप बस ग! इकडे आम्हाला टेन्शन आलंय आणि तुझं काय भलतंच सुरु आहे??"

समिधा : "पप्पा काय झालंय? सॉरी.., मी जरा मस्तीच्या मूड मध्ये होते. कसलं टेन्शन आलंय?"

विजय :" समू , ऐक न बाळा..! हा... राज कोण ग?? मित्र आहे का तुझा?? की आणखी काही वाटतंय तूला त्याच्याबद्दल??"

समिधा : "अहो पप्पा..!! असं का विचारत आहात?? तुम्हाला असं काही वाटलं का??"

विभा : "समू जरा स्पष्टच बोलते. तुझ्या प्रत्येक मित्र मैत्रिणींनबद्दल आम्हाला माहिती आहे. पण आज पर्यंत कधीच राज च नावं नाही ऐकलं आम्ही. तूला एक चांगल स्थळ सांगून आलय. त्यामुळे तुझ्या मनात जर दुसरा कोणी असेल तर स्पष्टपणे सांग बेटा."

समिधा : "ए..., एक मिनिट! काय रे तुम्ही दोघे?? असं काहीही नाही.. ओके!! आणि हो.. राज.., इशूच्या डॉगीच नावं आहे. काल त्याचा पहिला वाढदिवस केला आम्ही. आणि परत एक.. मला काही लग्न बिग्न नाही करायचं.. मी कुठेही जाणार नाही तुम्हाला सोडून.. समजलं ना!!( नाक फुगवून समिधा तिथून निघून जाते )"

विभा : "अग ऐक तरी.. नाश्ता तर संपव!!!"

         विभा आणि विजय दोघेही हसायला लागतात. समिधाच्या मनात कोणीही नाही हे ऐकून त्यांना जरा हायसं वाटत. त्यांना वाटणारी काळजी कुठल्या कुठे पळून गेली होती.

         विभा आणि विजय समिधाला समजवायला तिच्या खोलीत जातात. समिधा बाल्कनीत उभी राहून तिच्या आसवांना वाट मोकळी करून देत होती. लग्न ही एक सुखद भावना असली तरीही.. कोणत्याही मुलीला आधी वाईटच वाटत. कारण तिला तिच्या आई वडिलांपासून दूर जाव लागत. ज्याला ओळखतही नाही अश्या व्यक्ती सोबत संपूर्ण आयुष्य काढायच असतं. एक अनामिक भीती सलत असते. या क्षणी तिच भीती समिधाच्या मनात होती. तिचही मन अस्वस्थ झालं होतं. समिधाच्या आई वडिलांना तिच मन कळत होतं. आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन करताना आई वडिलांना ही असंख्य वेदना होतात. पण त्या पेक्षा जास्त तिच्या भविष्याच्या सुखाची नाचरी चाहूल त्यांना सुखावून जाते. विभा समिधाला जवळ घेत समजावते, " अग समू! वेडा बाई..! रडतेस काय अशी? "

समिधा : "आई, पप्पा मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. ( विभाला बिलगून....रडत )"

विजय : "समिधा.., बाळा...! एक न एक दिवस सर्वच मुलींना जावच लागत आई वडिलांच घर सोडून .आणि आम्ही तर कायम असणारच आहोत ना तुझ्या बरोबर . प्रत्येक आई वडिलांच एक स्वप्न असतं. तुझा जन्म झाला तेव्हापासून आमचंही एकच स्वप्न आहे..,आमच पिल्लू शिकून खूप मोठं व्हावं, त्याने आपलं कर्तृत्व सिद्ध कराव , आणि त्याला त्याच्या साजेसा एक छानसा जोडीदार मिळावा. तुझा सुखाचा संसार व्हावा.. अजून काय हवंय ग आम्हाला. ( पाणावलेल्या डोळ्यांनी )"

            समिधा आता तिच्या वडिलांना बिलगून लहान मुलांसारखी रडायला लागली होती.

विभा : "बस बस..!! पुरे झालं आता. आताच रडून घ्याल का सगळं?? अजून जायचीय आपली लेक सासरी. समू, ऐक ना, तिथे ड्रेसिंग टेबल वर आम्ही अनय चा बायोडाटा ठेवलाय. तू बघून घे. बघ तुझ्या लक्ष्यात येतोय का मुलगा. म्हणजे तशी पुढची बोलणी करता येईल. चल तू फ्रेश हो. आणि..' हो ' किंवा 'नाही' ते कळव आम्हला.. ओके!"

                           समिधा आई बाबांचं बोलणं ऐकून शांत झाली होती. खर तर एक वेगळीच तगमग तिच्या मनात सुरु होती. लग्न म्हणजे.. नवं आयुष्यच असतं. अग्निच्या साक्षीने सात जन्माची सात वचणे घेऊन एखाद्याच्या आयुष्यात हळूच प्रवेश करणे.., नवीन नाते, नव्या जबाबदाऱ्या हे सगळं तिच्या साठी एका स्वप्ना प्रमाणेच होतं. ज्याला कधी पाहिलं नाही, ज्याला ओळखत नाही अश्या एखाद्या अनोळख्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवण हे सगळं तिला खूप वेगळं वाटत होतं. पण बाबांनी समाजावल्या प्रमाणे, 'प्रत्येकच मुलीला कधी ना कधी आई वडिलांचं घरं सोडून नवऱ्याच्या घरी जावंच लागत! ही जगाची रितच आहे.' खूप वेळ विचार केल्यानंतर समिधा हळूच ड्रेसिंग टेबल कडे वळते. आईने ठेवलेलं ते इंव्हलप ती उघडते आणि अनयचा बायोडाटा वाचू लागते. त्याची नोकरी, त्याचा हुद्दा, पॅकेज सगळं खूप छान होतं. आता हळूच ती इंव्हलपमध्ये असलेला अनयचा फोटो बाहेर काढते. आणि बस.... एक टक बघतच बसते. त्याचे डोळे इतके बोलके होते की ती त्यांच्याच प्रेमात पडते. खर तर समिधाही खूप सुंदर होती. कॉलेज मध्ये बरीच मुलं तिच्यावर फिदा होती पण तिने कधीच कोणाला भाव दिला नाही. पण आज अनयने मात्र तिचं हृदय चोरून घेतलं होतं. ती सगळं भान विसरून त्याच्यात गुंतून गेली होती. अनयचे डोळे जणू काही तिच्याशी बोलूच लागले होते. तिच्या हृदयाच्या तारा अनयने एका नजरेतच छेडल्या होत्या.

             "समिधा..! ए समिधा...!! अग, कुठे हरवलीस?" आई म्हणाली. पण समिधाकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. एव्हाना आईला ही कळलं होतं की, अनयने तिच्या लेकीच्या हृदयाचे हरण केले होते. आई हे सगळं बघून मनातच हसते आणि समिधाच्या खांद्याना धरून हलवते... आणि समिधाची तंद्री तुटते. ती लगेच भानावर येते. "अग आई!! तू कधी आलीस??" - समिधा

आई : "जेव्हा तुझं ... 'आँखो ही आँखो में' सुरु होतं ना? तेव्हाच..!!!"

समिधा : "काय ग आई तू पण!!" ( आईला मिठी मारत )

आई : " मग काय?? कळवायचं का त्यांना? हो म्हणून? "

           समिधा मानेनेच होकार कळवत आईला घट्ट मिठी मारते. विजय लगेच अनयच्या घरी कळवतात. आणि त्यांना सगळ्यांना घरी आमंत्रित करतात. बघण्याचा कार्यक्रम होतो. दोन्ही फॅमिलीला सगळं पसंत पडतं आणि लगेच एका महिन्यात लग्नाची तारीख सुद्धा काढली जाते. दोन्ही घरी लग्नाची धावपळ सुरु होते. समिधा एकुलती एक असल्याने विजय आणि विभाला तिच्या लग्नात काहीही कमी पडू द्यायच नव्हतं. देण्या-घेण्याचं, मान-पानाचं सगळं त्यांनी खूप छान अरेंज केलेलं होतं. या मधल्या काळात अनय आणि समिधा एक दोन वेळा शॉपिंग च्या निमित्याने एक मेकांना भेटले होते. अगदीच साधा, शांत, लाजऱ्या अनयने तिच्या मनात कायमच घर केलेलं होतं. ती अजून अजून त्याच्या प्रेमात पडत होती. देवा-ब्राम्हणाच्या साक्षीने अनय आणि समिधा लग्नाच्या पवित्र धाग्याने बांधले जातात. डोळ्यात नव्या आयुष्याची नवी स्वप्ने घेऊन समिधाचा अनयच्या आयुष्यात प्रवेश होतो.

               आज अनय समिधाची लग्ना नंतरची पाहिलीच रात्र होती. मधुचंद्राच्या रात्रीची अनेक स्वप्ने तिने मनात जपून ठेवली होती. सान्वी म्हणजेच अनय ची लहान बहीण, समिधाला त्यांच्या बेडरूम परेंत आणून सोडते. सान्वीने तिच्या दादा वाहिनीच्या मधुचंद्राची जय्यत तयारी केली होती. तिने पुर्ण बेडरूम लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलांनी सजवली होती. खाली टाईल्स वर लाल हार्ट शेप चे बलून पसरवलेले होते. गुलाबाच्या पाकळ्यांनी बेड सजवलेला होता. सगळीकडे कॅण्डल चा मंद मंद प्रकाश दिसत होता. त्या प्रकाश्यात समिधाच सौन्दर्यही खुलून दिसत होतं. तिने हिरव्या कंच रंगाची भरजरी साडी नेसली होती. हाताला मंद मंद दरवळनाऱ्या मेहंदीचा गंध होता, केसात मोगऱ्याचे गजरे माळले होते. ओठांवर हलक्या लाल रंगाची लिपस्टिक होती, आणि डोळयांत काजळ. तिची मेहंदी, तिचे गजरे अनयच्या प्रेमाच्या पहिल्या स्पर्शासाठी जणू काही आसूसले होते . ती अनय आत येण्याची आतुरतेने वाट बघू लागली होती.

         

            इतक्यात अनय आत येतो. त्याला बघून समिधाच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात. तो ही हळूच बेड कडे वळतो आणि समिधाच्या शेजारी जाऊन बसतो. तेच समिधा जरा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. तिच्या त्या स्थितीला बघून अनय छोटीशी स्माईल करतो आणि समिधाचा हात हाती घेतो. तिच समिधा अचानक झालेल्या त्याच्या स्पर्शाने मोहरून उठते. तिच्या पापण्या लाजने खाली झुकतात. अनय तिची हनुवटी हाताने हलकेच वर उचलतो आणि म्हणतो, "समिधा, मला तू खूप आवडतेस. आय लव यू समिधा!" असं म्हणत तो हळूच त्याचे ओठ समिधाच्या ओठांवर टेकवतो. आणि दारावर ठक ठक होते. तेच समिधा तिच्या गोड स्वप्नातून जागी होते. आणि " काय ग वेडे समू!!" असं स्वतःशीच म्हणत गालात हसते. आता खरोखरच अनय आत आला होता. समिधाची आणि त्याची नजरानजर होते. तो तिच्या कडे बघून एक स्माईल देतो. समिधाही प्रतिसाद देते. तिच्या डोळयांत बघून अनय ला कळतं की समिधा त्याचीच वाट बघत आहे आणि जणू काही म्हणत आहे, ' ये ना लवकर! किती वाट बघायची? '

            अनय पुढे जातो आणि बेडवर जरा लांब काठावर जाऊन बसतो. परत दोघांची नजरानजर होते. मात्र यावेळी अनयच्या डोळ्यात समिधाला कसली तरी अस्वस्थता जाणवते. या आधीही जेव्हा दोन वेळा त्यांची भेट झाली तेव्हाही हिच अस्वस्थता समिधाला त्याच्या डोळ्यांत दिसली होती. मात्र त्यांच फारसं बोलणं होऊ शकलं नव्हतं. सतत कोणी ना कोणी त्यांच्या अवती भोवती असायचं. मात्र आज ती दोघेच एकमेकांपुढे बसलेली होती. अनय एकदम शांत बसलेला होता. बराच वेळ ती शांतता त्या खोलीत कायम होती. आता मात्र समिधाच न राहवून त्याला विचारते, "काय झालं अनय?"

अनय : "समिधा, मला तूला काही सांगायचं आहे."

                         अनय काय बोलणार? याची उत्सुकता समिधाला लागली होती. खरंतर थोडी भीतीही वाटत होती. कारण अनय चा स्वर खूपच गंभीर होता. कसलं तरी दडपण त्याच्या मनावर असलेलं तिला जाणवत होतं. आता अनय उठून उभा झाला, आणि खोलीतच येरझाऱ्या मारू लागला. तो खूप कसल्यातरी टेन्शन मध्ये दिसत होता.

समिधा : " अनय, अरे काय झालंय? इतका अस्वस्थ का आहेस? "

              समिधा तिच्या जागेवरून उठून अनय जवळ जाते. त्याचा हात धरून त्याला बेड वर बसवते. आणि विचारते, "सांगशील का? काय झालंय? इतका टेन्शन मध्ये का दिसतोय तू?"

अनय : " समिधा, खर तर कस बोलू हेच कळत नाही आहे मला? मला तुला फसवायच नाही ग!!"

समिधा : " अरे, हो!! हो!! शांत हो बर आधी. बघ अनय आज पासून आपल्या नात्याची नवी सुरवात होणार आहे. हो ना?? मग कुठलंही नवं नातं स्वीकारायच्या आधी आपला भूतकाळ आपण मागेच टाकायला हवा तेव्हाच भविष्य आनंदाने जगता येईल नाही का?? "

अनय : " हो अगदी बरोबर आहे तुझं. पण विषय जर वर्तमानाचा असेल तर? "

समिधा : " वर्तमानाचा..? म्हणजे मला कळलं नाही. नीट काय ते सांग? तूला कोणी दुसरं आवडत का? "

अनय: " समिधा, एक विचारू का? "

समिधा : " हो.., बोल ना? आज जे ही असेल मनात ते सगळं बोल."

अनय : " समिधा, प्रेम ठरवून होतं का ग? प्रेम चुकीचं असतं का? "

समिधा : " मुळीच नाही, प्रेम चुकीचं नसत तर त्याच्या कडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगवेगळी. जो तो आपआपल्या नजरेने त्याच्या कडे बघतो, त्याच्या कक्षा ठरवतो. प्रेमाला कुठलंच बंधन नसत रे! "

अनय : " खरच.. तूला असं वाटत! की फक्त बोलत आहेस? "

समिधा :" नाही खर तेच बोलतेय. म्हणूनच तर तूला न भेटताच तुझ्या प्रेमात पडले मी. ( अनय चा हात हाती घेऊन ) अनय.., आय रिअली लव यु!!"

अनय : " ( हात हातातून सोडवत ) नको समिधा, मी तुझ्या लायक नाही. नको पडूस माझ्या प्रेमात. "

समिधा : " असं का बोलतोस? तुझं कुणावर प्रेम आहे का? सांग तरी? "

अनय: " हो!! समिधा माझं कुणावर तरी जीवापाड प्रेम आहे. "

समिधा : " तू वेडा आहेस का?? हे सगळं तू मला आता का सांगतोय?? अरे आधीच सांगायचं ना! ( समिधा रागाने अनयची कॉलर धरते ) अनय...! का..? का..?? फसवलंस मला? अरे हे सगळं आधीच सांगितलं असतं तर मीच नाही म्हटले असते या लग्नाला. आणि काय रे कसलं प्रेम म्हणतोस?? त्याही मुलीला फसवलंस तू.. तूला जराही लाज नाही का रे वाटली?? दोन मुलींची आयुष्ये उध्वस्त केलीस तू?? "

              समिधाच मन आता आकांत करू लागलं होतं. अनयच प्रेम तिच्यावर नाही यापेक्षा जास्त त्रास तिला त्याने हे सगळं आपल्यापासून का लपवून ठेवलं यामुळे होतं होता. तिने रागानेच अनयच्या कानाखाली जोरात वाजवली. अनय मात्र शांतच होता. त्याला कळत होतं समिधा किती दुखावली आहे ते..!

अनय : " ( हात जोडत ) समिधा, मला माफ कर. मला तूला फसवायच नव्हतं ग. मला तूला सगळं आधीच सांगायचं होतं. पण माझ्या घरच्या लोकांमुळे मी नाही ग बोलू शकलो. "

समिधा : " अनय, अरे कुठल्या जगात वावरतोय?? आजकाल लोक करतात लव मॅरेज.. घरी पटत नसेल तर वेगळे राहतात. पण तू... तू काय केलंस?? तर दोन मुलींच्या आयुष्याचा खेळ केलास... आणि वरून माफिही मागतोय. सांग ना... कस माफ करू मी तुला?? बोल ना?? तूच सांग?? "

अनय : " समिधा..., मी नाही ग कोणाचं आयुष्य उध्वस्त केल!! तू समजतेस तस नाही ग माझं प्रेम... मला कोणीच नाही समजून घेऊ शकत. "

समिधा : " काय..? तूला असं बोलताना जराही काहीच वाटत नाही का रे? काय.. काय म्हणालास त्या मुलीच नाव?? "

अनय : " मुलगी नाही ती..! तो एक मुलगा आहे.. अभिनव त्याच नाव!!"

समिधा : " काय?? काय बोलतोस तू?? कळतंय का काही?? "

 : " होय समिधा! होय!! माझं एका मुलावर जीवापाड प्रेम आहे... मी गे आहे!!"

               हे सगळं ऐकून समिधा सुन्न झाली होती. त्या गुलाबाच्या फुलांनी सजलेल्या सेजेवर भिंतीशी टेकून ती नुसतीच शून्यात बघत बसली होती. मधुचंद्राच्या रातीची तिने डोळ्यात सजवलेली स्वप्ने आसवे होऊन डोळयांतून वाहू लागली होती. तिच्या हाताच्या मंद मंद दरावळणाऱ्या मेहंदीचा गंध तिला नकोसा वाटू लागला होता. केसात माळलेल्या मोगऱ्याच्या सुगंधित कळ्या एक एक करत ती गजऱ्यातून ओरबाडून काढत, हाताने कुस्करत फेकून देत होती. मोठ मोठ्याने ओरडाव, त्याला माराव की स्वतःलाच शिक्षा करावी.. तिला काहीच कळत नव्हतं. मधुचंद्राची ती रात्र तिच्या आयुष्याची काळरात्रच झाली होती..!!

                          रात्री समिधाचा डोळा कधी लागला तिच तिलाच कळलं नाही. सकाळी सूर्याची किरणे खिडकीतून थेट तिच्या डोळ्यांवर पडतं होती. त्यामुळे तिला जाग आली. तिने दचकूनच डोळे उघडले. बघते तर बेड वर ती एकटीच होती. आणि अंगावर पांघरूनही घातलेल होतं. तिने लगेच उठून बसत नजर फिरवली, अनय तिथेच समोर सोफ्यावर झोपला होता.

              तो झोपेतही खूप गोड दिसत होता. सूर्याच्या किराणा मुळे त्याच्या डोळ्याची अधे मध्ये हालचाल होतं होती. खिडकीतून येणारी गार वाऱ्याची झुळूक हलकेच त्याचे केसं उडवत होती. कधी सूर्याची किरणे, तर कधी वाऱ्यामुळे डोळ्यांवर येणारे केस... दोघेही त्याला सतावत होते. अनय उंच पुरा असल्याने त्याला त्या सोफ्यावर नीट झोपताही येत नव्हतं. तो लहानश्या बाळासारखा हात पाय पोटाशी घेऊन झोपला होता.

               हे सगळं समिधा दुरूनच बघत होती. त्याच्या कडे बघून तिच्या ओठांवर हळूच हास्य खुललं ; पण अचानकच तिला आठवण झाली. रात्री जे काही घडलं त्यामुळे तिच डोकं जड झालं होतं. ती परत तुटून गेली. तिला कळतच नव्हतं की पुढे काय करावं?? मुळात एका मुलाचं दुसऱ्या मुलावर प्रेम कस असू शकत?? जे फक्त आज पर्यंत कुठेतरी वाचलं होतं ते असं तिच्याच आयुष्यात घडेल याचा कधी विचारही तिच्या मनात आला नाही.

                 समिधा उठून आवरते. रात्री रडल्यामुळे तिचे डोळे लालसर दिसत होते. समिधा किचन मध्ये जाते. समिधाच्या सासूबाई योगिता त्याही स्नान वगैरे आटोपून देवपूजेला बसल्या होत्या. समिधा सगळ्यांसाठी चहा ठेवते. इतक्यात सान्वीच लक्ष समिधा कडे जाते. ती किचन मध्ये जाऊन हळूच मागून समिधाच्या कानात म्हणते, "ए वाहिनी!! काय ग? रात्रभर जागलात की काय?? माझं सरप्राईज कस वाटल?? तूला आवडल की नाही डेकोरेशन??" (हसत हसत)

                    खर तर समिधाला कस रियाक्ट करावं हेच सुचत नव्हतं?? त्याच्या घरी कोणाला माहिती आहे की नाही? हे ही तिला माहिती नव्हतं?? त्यामुळे ती उगाच खोटं लाजत सान्वीला टाळण्याचा प्रयत्न करते..., "गप ग सान्वी!! मला कामं करू दे..! जा पळ तिकडे. " सान्वी हसत हसत बाहेर निघून जाते. थोडयाच वेळात अनय त्याच आवरून खाली येतो. त्याची मात्र आज हिम्मतच होत नव्हती समिधाच्या डोळ्यात बघण्याची. त्याने केलेली चूक, यामुळे समिधाच आयुष्यच उध्वस्त झालं होतं. समिधाही शांत झाली होती.

                   अनय त्याच आवरून ऑफिसला निघून जातो. अनयच हे असं वागणं त्याच्या आईला, बाबांनाही खटकलं होतं.  योगिता तिला विचारतात, " काय ग समिधा, काही झालंय का ?? काही बोलला का हा तुला?? नाही! तस असेल तर सांग? रात्री घरी आला की बघतोच आम्ही त्याला. असा काहीच न बोलता असा कसा निघून जाऊ शकतो हा?? निदान दोन शब्द तर बोलायचे ना!! असा कसा हा?? "

समिधा : " नाही आई, काहीच नाही. काही तरी महत्वाच कामं आलंय म्हणाला. त्यामुळे घाईत निघाला असेल. "

गणेश : " घाई.., कसली घाई?? घाई वगैरे काही नाही. आता तर लग्न झालंय तुमचं. आता तुम्ही दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा. कामं तर काय.. आयुष्यभरच करायची आहेत ना?? तुम्ही काही फिरायला जाण्याचं प्लॅनिंग वगैरे केल की नाही?? "

समिधा : " अ.. नाही... अजून असं काही!"

योगिता : " काय? अग मग ठरवायचं ना. थोडा वेळ द्या एकमेकांना. नीट समजून घ्या.., जाणून घ्या! म्हणजे पुढची वाट चालायला सोपी जाते. "

गणेश : " ते काही नाही! येऊ दे त्याला, बोलतो मी त्याला रात्री."

               खर तर समिधा तिच्यातच होती. पण तिला योगिताची एक गोष्ट पटली होती. ती म्हणजे, 'एकमेकांना वेळ द्यायला हवा, समजून घ्यायला हवं..!' तिच्या मनालाही ते थोडं पटत. असं लगेच आपल्या माहेरी किंवा सासरी काल अनय जे काही बोलला ते सांगायला नको! त्यामुळे ती शांतच राहते. आज दिवसभर ती काल जे काही घडलं त्याचा विचार करत बसली होती. अनय वर तिचं मनापासून प्रेम होतं. त्यामुळे त्याला असंच सोडून जान तिलाही झेपणारं नव्हतं...!! ' मला माझं प्रेम परत कस मिळवता येईल? अनयला या सगळयांतून कस काढता येईल याचाच विचार ती करू लागली होती.

     

                              रात्री जेवणाच्या टेबल वर गणेश अनयच्या हाती एक एनव्हलप देतात. "हे काय आहे बाबा??" अनय म्हणाला.

गणेश: " अरे, आधी उघडून तरी बघ!"

                 अनय समिधाकडे एक नजर बघतो. ती अजूनही उदासच होती. तिचं त्यांच्या कडे लक्षही नव्हतं. ती सगळ्यांची ताट करण्यात व्यस्त होती. अर्थात स्वतःच्याच विचारात राहून. अनय त्याच्या बाबांनी दिलेला लिफाफा उघडतो. बघतो तर त्यात मलेशियाच्या दोन तिकीट्स त्याला दिसतात.

अनय: " हे काय बाबा?? यात तर मलेशियाच्या तिकीट्स आहेत. "

                 आता मात्र समिधाचही त्याच्या कडे लक्ष जात. समिधा आणि अनय एकमेकांशी काही बोलण्या आधीच तिचे सासुसासरे त्यांच्या हनिमूनच आठ दिवसाचं बुकिंग करून देतात. हे दोघांसाठीही धक्का दायकच होतं. आता डायनिंग टेबल वर दोघांनाही हा विषय नको होता. म्हणून दोघेही शांत असतात. जेवण आटोपून अनय रूम मध्ये निघून जातो. समिधाही सगळं आवरून रूम मध्ये येते. अनय एकटाच खिडकीतून बाहेर डोकावत बसलेला होता. " अनय मला बोलायचं आहे जरा.. " समिधाचे स्वर अनयच्या कानावर पडतात. तो लगेच वळून बघतो आणि म्हणतो, " हो हो, समिधा..! यु डोन्ट वरी!! मी बोलतो सकाळी आई बाबांशी. आपण नाही जाणार कुठेही. तू टेन्शन नको घेऊस ओके!"

समिधा: " पण, मी हे बोलणारच नव्हते!"

अनय: "मग, काय बोलणार होतीस? बोल ना?"

समिधा : " हे बघ अनय, माझ्या आईवडिलांची खूप स्वप्न होती रे माझ्या लग्नाबद्दल. त्यामुळे मला त्यांना दुखवायचं नाही. काल जे काही तू मला सांगितलंस, ते मी कोणाशीच नाही बोलू शकत. त्यांना हे सगळं कळलं तर खूप मोठा धक्का बसेल रे! मी त्यांना दुःखी झालेलं नाही बघू शकत. निदान त्यांच्यासाठी तरी आपण जाऊया का? प्लीज!"

अनय: " असं का बोलतेस? समिधा मला माहिती आहे तू खूप तुटली आहेस. पण एक म्हणू? मी नेहमी तुझ्यात एक चांगली मैत्रिण पाहिली. मी तुझा खूप रिस्पेक्ट करतो. मला माहिती आहे मी चुकीचा अहो.., पण मी तुझा खूप चांगला मित्र होऊ इच्छितो.. माझी मैत्रीण होशील का प्लीज? "

               आज अनयच बोलणं ऐकून का.. कोण जाणे?? पण समिधाला त्याचा राग येत नव्हता. तिला उलट असं वाटू लागलं होतं की, कदाचित हिच आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात असावी. अनयवर तर तिचं प्रेम होतंच. पण आज अनय त्यांच्या नात्याला कदाचित नव्याने वेळ द्यायचा प्रयत्न करतोय की काय? असं तिच्या मनात येऊन गेलं.

अनय : " काय झालंय समिधा? कुठे हरवली? बोल ना? "

                समिधा मानेनेच होकार कळवत एक छोटी स्माईल करते. तिला हसताना बघून अनय मात्र खूप जास्त आनंदित होतो. त्याच्या डोळयांच्या कडा थोड्या पानावल्या होत्या. जणू काही खूप मोठा भार त्याचा डोक्यावरून हलका झाला असावा. तो ही हसत हसत तिला थँक्स म्हणतो. आणि तिला आराम करायला सांगून त्याचा लॅपटॉप काढत कामं करत बसतो.

               इकडे समिधाच्या मनात मात्र काही तरी वेगळेच विचार सुरु होते. 'कोणत्याही नात्याची सुरवात ही मैत्रीनेच व्हायला हवी. माझा अनय खूप भोळा आहे. त्याला काही कळत नाही. खूप निरागस आहे तो. माझी मैत्री कधी प्रेमात बदलवेन त्याला त्याच त्यालाही कळणार नाही. तो काल जे काही बोलला, ते सगळं एखाद्या स्वप्ना प्रमाणे विसरायला भाग पाडेल माझं प्रेम त्याला. मी अनयला माझ्या जवळ नक्की आणेल. त्याला या सगळ्यांतून नक्कीच बाहेर काढेल.' असं मनात विचार करता करता ती झोपी जाते.

              इतक्यात अनयच तिच्या कडे लक्ष जात. ती अर्धी बसून आणि अर्धी लेटून अश्या अवस्थेत तशीच झोपून गेली होती. अनय तिला नीट झोपवतो. तिच्या अंगावर पांघरून घालतो. तिच्याकडे एकटक बघत तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हणतो, " समिधा, आय एम सॉरी! मी तुझा गुन्हेगार आहो ग! मला प्लीज माफ करशील. मला माहिती आहे, तुझ्या एक नवरा म्हणून खूप अपेक्षा आहेत माझ्या कडून. पण मी त्या सगळ्या नाही ग पुर्ण करू शकत. एक नवरा म्हणून मी तूला सुख नाही ग देऊ शकणार. पण तुला वचन देतो, एक मित्र म्हणून तुझ्या प्रत्येक सुख दुःखात तुझ्या सोबत उभा राहील! कायम..!"

                             अनय समिधाला त्याची छान मैत्रीण मानू लागला होता तर इकडे समिधा मनातल्या मनात त्याची होऊन बसली होती. समिधा बरोबर हे आठ दिवस अनयला त्यांच्या मैत्रीच नातं घट्ट करायचं होतं, तर समिधाला या आठ दिवसात अनय ला त्याच्या भूतकाळातून परत आणून त्याच्याशी जन्मभराच नवं नातं जोडायचं होतं. दोघांच्याही मनात वेग वेगळ्या भावना फुलू लागल्या होत्या. दोघेही हे आठ दिवस एकमेकांसोबत नव्याने जगण्यासाठी तयार झाले होते.

                   दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही रेडी होतात. अनयचे आईबाबा त्यांना एअरपोर्ट वर सोडायला येतात. आज खर तर दोघेही खूष दिसत होते. कारण दोघांच्याही मनात त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या भावनांची वेल बहरत होती. समिधा आज असं अस्वस्थ दिसत नव्हती त्यामुळे अनय सुद्धा थोडा रिलॅक्स झाला होता. त्याला वाटतं होतं की, कदाचित समिधा त्याला समजू शकत आहे. त्याच्या भावानांचा आदर करीत आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीच दडपण वाटत नव्हतं.

                काही तासातच त्यांच प्लेन लँड होतं. समिधा आणि अनय टॅक्सीने हॉटेलवर पोहचतात. अगदीच बिचला लागून त्यांच ते रिसॉर्ट होतं. अनय समिधा आत पोहचतात. दोघेही फ्रेश होऊन जेवायला जातात. आज दोघेही समिधाच्या आवडीच्या इटालियन डिशेष मागवतात. समिधाही खूप खूष होती. तिथलं वातावरणच इतकं सुंदर होतं की कोणीही उदास राहूच शकणार नव्हतं. समिधाला इतकं खूष बघून अनय सुद्धा आनंदित होतं होता. त्या नंतर दोघेही बिच वर जातात. तिथे बराच वेळ पाण्यात भिजून आणि मावळतीचा सूर्य बघून दोघेही रिसॉर्ट वर परत पोहचतात. ठरल्या प्रमाणेच संध्याकाळी त्यांची रूम एक स्पेशल लुक मध्ये त्यांना मिळणार होती. अर्थात हे त्या दोघांपैकी कोणालाच माहिती नव्हतं. ते एक सरप्राईज असणार होतं त्यांच्यासाठी. दार उघडून दोघेही आत येतात, बघतात की ती रूम जणू काही एखाद्या नवं वधू सारखीच नटलेली होती.

                 मोठा मखमली बेड जो गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला होता. संपूर्ण रूम लाल रंगाच्या थीम नुसार सजवलेली होती. सगळी कडे लाल दिव्यांचा मंद प्रकाश होता. बेड च्या दोन्ही साईडला आकर्षक असे मंद प्रकाश्याचे लॅम्प ठेवले होते. समोर एका काचेच्या टेबल वर गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेल्या होत्या आणि त्यावर एक सुंदर हार्ट शेप चा केक होता. आजू बाजूला कॅण्डल्स होत्या. रूम मध्ये एक मोठी विन्डो आणि त्या पुढे गॅलरी..., त्यातून दिसणारा अथांग निळाशार समुद्र..! त्या समुद्राच्या लटांची गाज रूम मध्येही ऐकू येत होती. त्या शांत रात्री ती गाज एखाद्या सूंदर गाण्याच्या लयी प्रमाणेच भासत होतं. दोघेही ते सगळं बघून खूप चकित आणि खुशही झालेले होते. पण तो सजलेला बेड बघून अनय विचार करतो की समिधाशी बोलून ते सगळं चेंज करून घ्याव. पण दोघेही खूप थकलेले होते. शिवाय बीच वर बराच वेळ घालवल्या मुळे त्यांना आता अंघोळ घेणं महत्वाचं होतं.

अनय: " समिधा, तू फ्रेश होऊन घे. तुझं झालं की मी ही आवरतो. ओके!"

                समिधा अंघोळ करून बाहेर येते. तिचे भिजलेले केस, त्यातून निथळणारं पाणी यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र अनयच तिच्या कडे लक्षही नसत. तो तिच्या कडे न बघताच बाथरूम मध्ये निघून जातो. तो बाहेर येतो आणि बघतो तर काय..? समिधाने लाईट पर्पल कलरचा सुंदर शॉर्ट फ्रॉक घातलेला होता. तिचे केस अजूनही ओलसरच होते. तिचे ते काळे टपोरे डोळे काजळ घातल्याने आणखीनच सुंदर दिसत होते. तिच्या ओठांवर सुंदर तिच्या ड्रेसला साजेसं लिपस्टिक होतं. तिचे ओठ जणू काही गुलाबाच्या पाकळ्यासारखेच दिसत होते. तिने मंद मंद दरवळणार छानस पर्फ्यूम लावलेलं होतं.

                   हे सगळं बघून अनय एकदम शांत उभा होता. समिधाच्या मनातील भावना कदाचित तो समजू शकत होता.

                               समिधाच ते रूप बघून खर तर अनय घाबरला होता. त्याच्या मनात वेगळीच कालवाकालव सुरु झाली होती. तिच बाह्य रूप आणि तिचे हावभाव यावरून तरी ती अनयच्या स्पर्शाला आसूसलेली असल्याची स्पष्ट दिसत होती. अनय मात्र मनातल्या मनात कोचंबत होता. इतक्यात समिधा त्याच्या दिशेने वळते. खरं तर समिधाही इतकी सुंदर दिसत होती, की अनयच्या जागी दुसरा कुणीही असता तर एका क्षणात पिघळला असता. आणि कधीच समिधा संगे प्रेमाच्या हळुवार पावसाच्या सरिमध्ये चिंब भिजून गेला असता.

    

                     समिधा आता हळू हळू अनयच्या जवळ येऊ लागली होती. समिधाच ते रूप बघून अनय मात्र थरथरू लागला होता. त्याला घाम फुटायला लागला होता. त्याला असं बिथरलेलं बघून समिधा मनातच गोड हसते आणि हळूच अनयचा हात हाती घेते. तोच अनयच्या अंगावर काटा फुलतो. अनय तिला काही बोलणार इतक्यात ती त्याच्या तोंडावर हात ठेऊन त्याला गप करते.., आणि इतक्यात हळूच रूमच्या सगळ्या लाईट्स ऑफ होतात. कॅण्डल चा मंद मंद प्रकाश आणि मागे बॅग्राऊंड म्युसिक लागत... आणि समिधा तिच्या मधुर आवाजात गायला लागते....

तेरे लिए पलकों की झालर बुनूँ

कलियों सा गजरे में बाँधे फिरूँ

धूप लगे जहाँ तुझे छाया बनूँ

आजा साजना

तेरे लिए पलकों की...

             अनय तिचे हात त्याच्या गळयांतून सोडवत थोडा दूर जातो. आता समिधा स्वतः ला त्याला सोपवायला पुर्ण तयार झाल्याचं त्याला जाणवलं होतं. त्याला आणखीनच कसतरी व्हायला लागलं होतं. तो तिथून सरळ बाल्कनीत जाऊन उभा राहतो.., असंख्य लाटांनी खळाळून उठणाऱ्या निळ्या सागराकडे बघत. त्या क्षणी त्या सागराला जे ही वाटतं असेल तेच सगळं त्याच्याही मनात सुरु होतं. इतक्यात मागून समिधा त्याला येऊन बिलगते. तो परत बिथरतो...! ती त्याचा हात धरत त्याला आत आणते. त्याला त्या गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेल्या बेड वर बसवत परत गायला सुरु करते.....,

महकी-महकी ये रात है

बहकी-बहकी हर बात है

लाजो मरूँ, झूमे जिया

कैसे ये मैं कहूँ, आजा साजना

हो........ 

तेरे लिए पलकों की झालर बुनूँ

कलियों सा गजरे में बाँधे फिरूँ

धूप लगे जहाँ तुझे छाया बनूँ

आजा साजना

तेरे लिए पलकों की...     

                

              आता समिधा अनयवर झुकायला लागली होती. अनयच्या हृदयाची स्पंदने तीव्र गतीने खालीवर होऊ लागली. त्याने स्वतःचे डोळे घट्ट मिटून घेतले होते. समिधा तिचे ओठ हळू हळू त्याच्या ओठांकडे नेऊ लागली होती. अनयचे उष्ण श्वास तिच्या श्वासांना स्पर्श करू लागले होते, ती अजून जवळ झुकू लागली होती आणि इतक्यात ती अचानक थांबून दूर झाली. अनयने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले होते. त्याच्या डोळयांतून आसवे वाहू लागली होती. समिधा तशीच उठून बाजूला होते. सगळं अचानक थांबल्याने अनय हळूच डोळे उघडतो. बघतो तर समिधा अंगावर शाल ओढून बाजूला उभी असते. ती तिचा एक हात अनय कडे करते. अनय फक्त तिच्या कडे बघतो. ती लगेच म्हणते, "अनय, हा हात तुझ्या मैत्रिणीचा आहे. तू धरु शकतोस."

                अनय तिला हात देतो. त्याला हाताला धरून ती उठवते. त्याची आसवे पुसते. आणि म्हणते, " अनय, मला नाही माहिती तू जे काही सांगितलं तस असतं की नाही. मी फक्त वाचलंय रे. पण खरंच असं असतं हे मला आज जाणवलं. इतकं प्रेम करतोस अभिनववर? तुझ्या जागी दुसरा कुणीही असता तर आज माझा झाला असता. पण तू.. खरंच खूप ग्रेट आहात रे तुम्ही! खरंच खूप लकी आहे अभिनव की त्याला तुझ्या सारखा प्रेम करणार व्यक्ती मिळाला."

अनय : " समिधा, आय एम सॉरी ग!! मी खरंच तूला एक नवरा म्हणून ते सगळं नाही ग देऊ शकत. तुझी कुठलीच अपेक्षा माझ्याकडून नाही ग पुर्ण होऊ शकत आहे. प्रयत्न करूनही मी नाही ग करू शकत आहो. मी काय ग करू?? मला देवानेच तस बनवलंय. मी कोणत्याच मुलीकडे त्या नजरेने नाही ग बघू शकत, किंवा तसा विचारही नाही करू शकत. मी काय ग करू?? माफ कर ग मला.., प्लीज माफ कर..!!!

समिधा: " शुssशूssss.....!! शांत हो अनय!! अगदी शांत हो!! कॉफी घेशील का? ( अनय मानेनेच होकार कळवतो. समिधा दोन कपात कॉफी घेऊन येते. त्याच्या हातात एक कप देत दुसऱ्या हाताने त्याचा हात धरून त्याला बाल्कनीत घेऊन येते. तिथेच चेअरवर दोघेही बसतात.) अनय..? मला सांगशील का तुमच्या बद्दल?? मला आवडेल ऐकायला. एक मैत्रीण म्हणून आज तुझ्या मनातलं सगळं सगळं सांग मला प्लीज...!!

                             अनय आता थोडा रिलॅक्स झाला होता. त्यालाही आज समिधाला सगळं सांगून मोकळ व्हायचं होतं. तो बोलू लागतो...,

                 वयात आलो तेव्हा पासूनच मला माझ्यातला हा बदल जाणवू लागला होता. माझ्या सोबतच्या मित्रांना मुली आवडायच्या. ते मुलींच्या मागे लागायचे. डेट वर जाने, एन्जॉय करणे, व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करणे.. हे सगळं चालायचं. पण मला कधीच कोणत्याही मुलीबद्दल अट्रॅकशन नाही वाटल. तर त्या उलट मी मुलांकडे आकर्षित होतं होतो. मी खूप प्रयत्न केला स्वतः ला बदलवण्याचा पण माझ्या कडून ते झालच नाही. माझे मित्र माझ्यावर हसायचे. त्यांना वाटायचं हा निसर्ग नियमांच्या पुढे जाणारा मुलगा. त्यामुळे हळू हळू सगळे माझ्यापासून लांब जाऊ लागले. खूप एकटा पडलो होतो मी. काही दिवस स्वतःला घरातच कोंडून ठेवलं. समजावलं स्वतःला आपण चुकतोय. पण त्या सगळ्या भावना सहज येत राहिल्या.

                कॉलेज संपवल्या नंतर यु. एस. ला जाण्याचं डिसाईड केलं. भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती यातील फरक तिथे गेल्यावरच जाणवला. एम. बी. ए. च्या पहिल्याच वर्षी माझी ओळख अभिनवशी झाली. खूप साधा, हसतमुख, कोणालाही कधीही मदत करणारा. गोरा पान, उंच, कुरळे केस आणि ब्राऊन डोळे. खूप हँडसम दिसायचा तो. कॉलेजच्या अर्ध्या अधिक मुली त्याच्यावरच फिदा असायच्या. पण अभि खूप वेगळा होता. माझ्याच सारखा. त्यालाही मुलींमध्ये जराही इंटरेस्ट नव्हता.

                   माझ्या आधीच्या अनुभवामुळे मी फारसा कुणाशीही बोलत नव्हतो. हॉस्टेल वर देखील मी माझ्यासाठी जास्त पैसे भरून एक स्पेशल रूम करून घेतली होती. एक दिवस अचानक बाहेर खूप गोंगाट ऐकू येत होता. मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर बरीच मुलं जमलेली दिसत होती. मी खाली आलो, पाहिलं तर अभिला कोणीतरी खूप मारलं होतं. त्याच्या नाका तोंडातून रक्त बाहेर येत होतं. पोटावर बुटाची लाथ बसल्यामुळे तो पोट धरून विव्हळत होता. पण कोणीही त्याची मदत करत नव्हतं. मग मीच पुढे झालो..., "उठ अभिनव, काय झालं? कोणी मारलंय तुला इतकं? चल माझ्या रूम मध्ये जाऊया!! उठ तू..!!"

अभिनव: " थँक्स अनय! प्लीज जरा हात धरशील का माझा? मला उठवत नाहीये!"

मी : " हो हो, ये उठ. "

                 मी त्याला रूम मध्ये घेऊन आलो. फर्स्ट एड केला आणि त्याला हळद घालून गरम दूध प्यायला दिल. आणि आराम करायला सांगितला. अंग दुखी मुळे थोड्याच वेळात त्याला गाढ झोप लागली. मी त्याच्या शेजारीच पुस्तकं वाचत बसलो होतो. संध्यकाळ होतं आली होती. इतक्यात त्याला जाग आली...

अभिनव: " अनय, सॉरी यार! मला कळलंच नाही कधी झोप लागली ते? तूला माझ्या मुळे खूप त्रास झाला, सॉरी यार! वन्स अगेन सॉरी!"

मी : " अरे, सॉरी काय त्यात! मी माझं कर्तव्य केलंय. आपण एकत्र शिकतोय. तुला त्या क्षणी मदतीची गरज होती. मला वाटलं मी करू शकतो, म्हणून मी ही ती केली. तू सॉरी वगैरे नको म्हणूस. ओके! बरं मला सांग तूला कोणी मारलंय इतकं? आणि कशासाठी?"

अभिनव: " अरे काही नाही, एक मुलगी प्रेमात पडली माझ्या. गेली सात आठ दिवस माझ्या मागे लागलेली होती. मला नाही रे आवडत मुली. मी तिला कितीदा समजावून सांगितलं. पण मॅडम काही ऐकेना. मग सरळ सगळं स्पष्ट सांगून दिल.., की 'मला मुलींमध्ये इंटरेस्ट नाही. मला मुलं आवडतात. ' तर तिने कानाखाली लावली. बाजूला तिचे मित्र होते. त्यांना वाटलं मी तिची छेड काढतोय. तर काही न विचारता बेदम मारलं रे मला."

मी: " अरे ए.., वेडा आहेस का तू? असं कसा बोलू शकतो? "

अभिनव : " अरे, त्यात काय एवढं? जे आहे तेच स्पष्टपणे सांगितलं. "

मी: " अरे,हो..!पण असं सांगत का कोणी? वेडा झालास का? "

अभिनव: " अरे, हे यू. एस. आहे. इथे सगळं चालत. "

मी: " म्हणजे?? "

अभिनव: " म्हणजे.. इथे सगळे स्वतंत्र विचार करणारे लोक असतात. कोणाचही कुणावर कुठलही बंधन नाही. "

मी : " जरा स्पष्ट सांगशील का? काय तर? "

अभिनव : " अरे अन्या...! सॉरी हा... म्हणजे तूला अन्या म्हटलेलं चालेल ना? "

मी: " ( एक स्माईल देत ) हो.. म्हणू शकतोस. "

अभिनव: " (हसत) थँक्स! तू ही मला अभिच म्हण. ओके! "

मी: " ओके!!!"

अभिनव: " अन्या, मी गे आहो! मला मुलं आवडतात. मुलींमध्ये मला इंटरेस्ट नाही. हो.. पण माझ्या सारखा कोणी माझ्या आयुष्यात नाही हे ही तितकंच खर आहे. "

मी : " अभि, तुला भीती नाही का रे वाटतं? कोणी काय म्हणेल याची? इतकं सहज कसा बोलू शकतोस तू हे सगळं? "

अभिनव : " भीती..? कसली भीती अनय?? अरे मी जन्मताच असा आहो. मला नाही मुलींबद्दल त्या फीलिंग्स येत, यात माझा काय दोष. देवाने माझी निर्मितीच तशी केली आहे. माझ्यातील हा बदल माझ्या आई बाबांना ही जाणवला. त्यांनी मला मनोवैज्ञानिकाकडेही दाखवलं. पण त्यांनीही सांगितलं की मी चुकीचा नाही. लोकांचा दृष्टिकोन चुकीचा असतो. "

मी: " अभि, तुझे आई बाबा ओरडले असतील न तुला? "

अभिनव : " नाही रे, उलट त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय. लोकांच्या नजरा त्यांनी माझ्या साठी सहन केल्या. मी असा आहो यात माझा काहीच दोष नाही. माझ्यात तेच हार्मोन्स सिक्रिट होतात. निसर्गानेच मला अस बनवलंय. "

मी : " यार!! खूप नशीबवान आहेस तू!! खूप छान आणि समजून घेणारे आहेत तुझे आई वडील...!! नशीब लागत यालाही! खरच ग्रेट आहेत ते!"

अभिनव : " हो.., आहोच मी नशीबवान! पण अनय.., मला एक प्रश्न पडलाय?? तूला आश्चर्य नाही वाटलं माझ्याबद्दल ऐकून? नाही म्हणजे बाकी मुलं दूर पळतात. तू मात्र शांतपणे ऐकून घेतलंस..., छान वाटल तुझ्याशी शेअर करून. चल निघतो मी..! वन्स अगेन थँक्यू सो मच..!! बाय!!"

                            त्या रात्री अभि निघून गेल्यानंतर मी रात्रभर हाच विचार करीत राहिलो, की आपण सुद्धा आपल्या घरी सांगायला हवं होतं का? आई बाबांनी समजून घेतलं असतं का?? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात रेंगाळत होते. रात्री उशिरा कधी डोळा लागला मलाच कळलं नाही. सकाळी आवरून कॉलेजला पोहचलो. अभि कालपेक्षा जरा बरा वाटतं होता...

मी : " हाय!! कसा आहेस आता?? बरं वाटतंय का?? "

अभि : " हो.. आज जरा फ्रेश वाटतंय. "

                  त्या दिवसानंतर आमच्यात मैत्री झाली. आम्ही एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवू लागलो. शेअरिंग वाढली...! एकमेकांशिवाय आम्हला अजिबात करमत नव्हतं. पण अभि कधीही माझ्याशी चुकीचं वागला नाही. त्याचा स्वतः वर पुर्ण कंट्रोल होता. अजून तरी स्वच्छ निर्मळ मैत्री खेरीज आमच्यात काहीही नव्हतं. एक दिवस अचानक रात्री रूमची बेल वाजली. मी दार उघडलं.....

मी : " अरे, अभि...! तू आता इथे कसा काय?? "

अभि : " यार अन्या माझ्या रूमचा फ्युज गेलाय रे! चौकीदार काका म्हणतात, ते सकाळी होईल कामं... आता लाईट येऊ शकत नाही. म्हणून इकडे निघून आलो. "

मी : " ओके ओके!! बरं केलंस इकडेच आलास ते. तुझं जेवण झालंय का? "

अभि : " हो रे, आज लवकर झालंय. तू घे जेवायला तुझं. मी जरा बाथ घेतो. "

मी : " ओके, ये तू फ्रेश होऊन. "

                    अभि अंघोळ करून बाहेर आला. तो खूप सुंदर दिसत होता. त्याच्या अंगावरून पाण्याचे थेंब ओघळत होते. केसातही पाणी होतं. त्याने फक्त टॉवेल गुंडाळालेला होता. एका हाताने केसातील पाणी झटकट त्याने मला डोळा मारला. त्याच क्षणी घायाळ झालो मी. ती त्याची नजर थेट काळजाच्या आरपार निघाली होती. वाटलं आता उठाव आणि घट्ट मिठी मारावी त्याला. आणि सांगावं की, ' अभि, मला तू आवडतोस रे..! मी ही तुझ्याच सारखा आहो.!! माझा होशील का?? तुझ्या आयुष्यात मिळेल का मला जागा?? " पण मी गप्प राहिलो. तो आवरून परत आला. आम्ही बराच वेळ प्रोजेक्ट बद्दल डिस्कस करत राहिलो. खूप उशिर झाला होता. दोघांनाही झोप येऊ लागली होती.

मी : " अभि आता झोपूया आपण. तू इथे बेड वर झोप. मी इकडेच झोपतो. ओके!"

अभि : " अरे, नको अन्या.. तू ही इथेच ये. आपण झोपूया. होईल जागा. "

              तो हात धरून मला घेऊन गेला. रात्री बराच वेळ मला झोपच लागत नव्हती. आणि अभि मस्त गाढ झोपी गेला होता. झोपेत अचानक त्याने त्याचा एक हात माझ्या अंगावर टाकला. तसंच मला शहारा फुलाला. मी अस्वस्थ होऊ लागलो होतो. मी हळूच त्याचा हात माझ्या अंगावरून बाजूला केला. पण कोण जाणे, त्याला कशी जाग आली.. त्याने डोळे उघडून माझ्या कडे पाहिलं. मी घाबरून डोळे मिटून घेतले...,

अभि : " अजून किती लपवणार अन्या..?? वाटल आज तरी तू बोलशील मनातलं?? "

मी : " म्हणजे...?? "

अभि :"कळलं रे मला... तुझ्या बुक मध्ये तू माझ्यासाठी लिहिलेलं... सगळं वाचलंय मी..!!"

              आता माझ्या लाईट्स पेटल्या. आमची मैत्री इतकी घट्ट झाली होती की त्यानंतर माझ्या मनात अभिसाठीच्या प्रेम भावना निर्माण झाल्या होत्या... त्या सगळ्या मी पुस्तकं वाचत असताना त्याच्या मागच्या पानावर उतरवल्या होत्या. आणि नेमक तेच पुस्तकं अभिच्या हाती लागलं....,

"डिअर अभि..,

माहिती नाही, हे काय होतंय.. पण मला तू खूप आवडतोस. आय लव यू..!!"

अभि : " काय मग..?? बोलणार आहात की जाऊ मी परत..!"

मी : " (अभिचा हात धरत)नको अभि..! नको जाऊस..! मला खरंच तू खूप आवडतोस. पण, मी आवडतो का तुलाही?? "

अभि :"हो अन्या.., ज्या दिवशी तू मला पहिल्यांदा तुझ्या रूम वर घेऊन आला होतास न!! त्याच क्षणी तुझ्या प्रेमात पडलो होतो. पण तूला गमावण्याची भीती वाटायची म्हणून नाही बोलू शकलो काहीच..! पण मलाही तू खूप आवडतोस. माझ्या ब्लॅक अँड व्हाईट आयुष्यात तुझ्या प्रेमाचे रंग भरशील का?? "

                    मी अभिला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी आम्ही एकमेकांच्या इतके जवळ आलो की एकमेकांच्या हृदयाची स्पंदनेही आम्हाला जाणवत होती. अभिचे ते नाजूक ओठ कधी माझ्या ओठांवर येऊन टेकले मला कळलंच नाही. त्या दिवशी मनाने आणि देहानेही आम्ही पुर्ण एकमेकांचे झालो होतो. आमचं आयुष्यच त्या दिवसानंतर बदलून गेलं. अभि त्याची रूम सोडून माझ्याच रूमवर शिफ्ट झाला. आता तर आमची प्रत्येक रात्र एकमेकांच्या बाहुपाश्यात जाऊ लागली होती. आता आम्ही देहाने जरी दोन दिसत होतो.., पण मनाने एकच झालो होतो...!!

                  

                               ते चार वर्ष एकमेकांच्या सहवासात कसे गेले काही कळलंच नाही. इंटर्नरशिप संपवून आम्ही भारतात परतलो, जॉबला लागलो. दोघांनाही चांगलेच पॅकेज मिळाले. आता ठरवलं की आयुष्याची पुढली वाट एकमेकांच्या सोबत चालायची... कायम..! त्याने त्याच्या आई वडिलांना माझ्या बद्दल सांगितलं होतं. ते ही खूष होते.., त्यांच्या अभि साठी. प्रश्न होता तो फक्त आणि फक्त माझाच..!!

   

                एकदा विकेंडला आम्ही असेच बाहेर होतो. नेहमीप्रमाणे तो ही दिवस खूप एन्जॉय केला. संपूर्ण दिवस एकमेकांच्या मिठीत. आठ दिवसांचा दुरावा घालवत राहिलो. दिवस मावळत आला होता. आता दूर जाण्याची वेळ आली होती. मी त्याला घट्ट मिठी मारली..!!

अभि : " अरे ए...! काय झालं अन्या?? "

मी :" अभि, मला खूप भीती वाटतेय रे?? माझ्या घरचे लोक आपलं नातं घेतील का रे समजून?? मी तुझ्याशिवाय जगणं आता नाही रे शक्य!! तुझ्यापासून दूर होऊन मी मरून जाईल!"

अभि : " (माझ्या तोंडावर हात ठेवत ) ए.... वेड्या!! अस बोलू नकोस! तूला काही झाल..तर मी तरी कसा जगू शकेन? परत असा कधीही बोलू नकोस.., समजलास ना! ते आपले आई वडील आहेत.. त्यांना त्यांच्या मुलांचं सुख कळत रे वेड्या!! तू एकदा बोल त्यांच्याशी..; आणि मी आहो ना? मी बोलेन त्यांच्याशी, समजावेन त्यांना.. ओके! चल डोळे पूस.. परत असा रडलास तर लक्ष्यात ठेवं!! (माझं नाक धरत )"

                    अभि कायम माझ्या सोबत उभा असायचा. त्याच्या मुळे कधीच एकटं नाही वाटल. खूप भक्कम आधार वाटायचा त्याचा. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांबरोबर चहा घेत बसलो. इतक्यात आई म्हणाली, " काय रे अनय, आता लग्न वगैरे करायचा विचार आहे की नाही. आम्ही मुली शोधतोय आता तुझ्यासाठी. "

मी: " काय...?? "

बाबा: " अरे, असं एकदम ओरडायला काय झालंय?? आता तू छान सेटल झालाय. मग हरकत काय आहे? आणि तीन चार वर्ष गेली की मग सान्वीसाठी चांगला मुलगा बघून तिचही लग्न लावून देऊ. म्हणजे आम्ही दोघे मोकळे..!!"

मी : " पण, मला आताच नाही लग्न वगैरे करायचं..! मी करेल सान्वीच झालं की. "

आई : " अरे, वेडा आहेस का?? झालंय ना आता लग्नाचं वय. मी ही थकले आता. मला मदतीला नको का कोणी?? आम्हालाही नातवं खेळवायची आहेत. आणि आम्ही असं थोडीच म्हणतोय, की आम्ही पसंत केलेल्याच मुलीशी लग्न कर. तुझ्या लक्ष्यात असेल कोणी तर सांग आम्हला आम्ही बोलू तिच्या घरच्यांशी. "

बाबा : " हो अनय, तुझी आई म्हणतेय ते अगदी योग्य आहे. तुझं असेल कोणावर प्रेम तर मन मोकळेपणाने बोल आमच्याशी. शेवटी तुमच्या सुखातच आमचही सुख आहे. "

मी : " खरच बाबा, माझी आवड तुम्हाला आवडेल?? "

आई :" अरे, न आवडायला काय त्यात?? तुम्ही आनंदात असावे, सुखात असावे असच वाटतं आम्हला बाळा!! "

मी : " आई.. बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. माझं कुणावर तरी खूप प्रेम आहे. मला माझं आयुष्य त्याच व्यक्ती सोबत घालवायचं आहे. तुम्ही कराल का स्वीकार?? द्याल का माझी साथ?? "

बाबा : " अरे वेड्या, मग हे आधीच सांगायचं ना? आम्ही का परके आहोत का तुला?? कोण आहे ती? तुझ्या ऑफिसला आहे का?? कुठे राहते?? "

                   आई बाबा फार उत्सुक झाले होते. त्या व्यक्ती बद्दल जाणून घ्यायला. त्यांचे ते धीराचे शब्द ऐकून मलाही जरा बरं वाटलं होतं...,

मी : " ती कोणी मुलगी नाही..!"

आई : " म्हणजे...??? "

मी : " माझं एका मुलावर प्रेम आहे. मला माझं आयुष्य त्याच्याच साथीने घालवायचं आहे. "

बाबा : " (अनयच्या कानाखाली आवाज काढत) काय बोलतोय?? तुझं तूला तरी कळतंय का?? "

आई : " अनय, वेडा झालास का?? काय बोलतोय तू हे?? शुद्धीत आहेस ना?? "

मी : " खर तेच बोलतोय ग!! माझं खरच एका मुलावर प्रेम आहे. मी नाही जगू शकत त्याच्या शिवाय. मी लग्न करेल तर त्याच्याशीच करेल. "

बाबा : " अरे, वेडा झालास का?? परदेशात शिकायला पाठवलं याचा अर्थ असा नाही की तू आपली संस्कृती विसरून त्यांची संस्कृती स्विकारली. "

मी : " अहो बाबा, मी त्यांची संस्कृती नाही स्विकारली, ना मी आपली संस्कृती विसरलो. बाबा मी जन्मताच असा आहो. आधी कधी तुमच्याशी बोलण्याची हिम्मत केली नाही बस.!!"

आई : " हो ना?? मग आज कुठून एवढी हिम्मत आली तुझ्यात?? की हे असलं काहीही बोलत सुटलाय?? "

मी : " आई, काहीही नाही ग हे! मी खर तेच बोलतोय ग. आई मला खरंच मुली नाही आवडत. मला त्यांच्या विषयी त्या भावना येतच नाही ज्या एखाद्या मुलाच्या मनात यायला हव्यात. मला आधी पासूनच, वयात आलो तेव्हा पासूनच मुलांचं आकर्षण वाटत राहील. माझं मनं मुलांना बघून त्यांच्याकडे झुकत राहील. आई मी खरच अभिनव शिवाय नाही ग जगू शकत. तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना ग??"

आई : " ते काही नाही अनय. या असल्या गोष्टीत आम्हला पडायचं नाही. ना आम्ही तूला यात पडू देऊ. समजलास ना?? "

बाबा : " अरे, हे असं प्रेम बीम नसत काहीच. मुळात हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे. आपण समाजात राहतो. समाजाच्या नियमानुसारच आपण चालायला हवं. कळतंय का तूला?? "

आई : " अहो, तुम्ही जे काही दोन चार स्थळ पाहुण ठेवली आहात ना? त्यांच्याशी बोलून घ्या. एकदाच लग्न झालं की येईल याच डोकं ठिकाण्यावर..!!"

मी : " मला कोणाशीही लग्न करायचं नाहीए!! मी लग्न करेल तर फक्त आणि फक्त अभिशीच. "

आई : " मी ही बघतेच मग, तू कसा आमच्या विरोधात जातोय तर!!"

                आई तिथून रागातच निघून गेली. मला समजून घेण्याची कुणाची इच्छाच नव्हती. मी ही सरळ ऑफिसला निघून गेलो. त्या रात्री घरी जायची इच्छाच नव्हती. त्यामुळे मी सरळ अभि कडे निघून गेलो. त्याचे आईवडील काही काम निमित्त बाहेर गावी गेले होते. सगळा घडलेला प्रकार मी त्याला सांगितला.

अभि : " ह्म्म्म..! अन्या, अरे साहजिकच आहे. कोणत्याही आई वडिलांना असंच वाटेल ना? तू असा कसा एक्सेप्ट करतोस की त्यांनी लगेच समजून घ्यावं. अरे त्यांना थोडा वेळ लागेलच ना. हा त्यांच्या साठी खूप मोठा धक्का आहे. आपण त्यांना थोडा वेळ देऊ या. ओके!"

                     इतक्यात मोबाईलची रींग वाजली. बाबांचा कॉल येत होता. मला इच्छा नव्हती उचलण्याची. पण अभिने घ्यायला सांगितला...

मी : " हॅलो....!!"

                    

                     पुढून जे काही ऐकलं, माझ्या हातून फोनच खाली पडला. आईने एक्सेस झोपेच्या गोळया घेतल्याने तिची तब्येत खूप खराब झाली होती. मी आणि अभि लगेच हॉस्पिटल ला पोहचलो. बाबा बाहेरच बसून होते. आईला आत घेतलं होतं . आत नेमक काय चाललंय काही कळत नव्हतं. इतक्यात डॉक्टर बाहेर आले.

मी : " डॉक्टर, आई कशी आहे माझी? काय झालंय तिला? "

डॉक्टर : " शी इज ऑल राईट! थोड्या वेळात येतील शुद्धीवर. काळजीच कारण नाही. "

बाबा : " बघितलंस तुझ्या मुळे काय झालंय ते? आज तुझ्या आईला काही झालं असतं तर काय केल असतं आपण?? स्वतः ला माफ करू शकला असता का?? "

मी : " बाबा प्लीज, असं नका हो बोलू. "

              इतक्यात आईला शुद्ध आली. आम्ही आत गेलो. मी लगेच आईच्या जवळ गेलो, " आई, कशी आहेस तू? "

आई : " एक अक्षरही बोलू नकोस. मला बोलायची इच्छाच नाही तुझ्याशी. "

अभि : " आई , प्लीज असं नका बोलूस तुम्ही. अहो अन्या खूप प्रेम करतो तुमच्यावर.तुमच्या शिवाय नाही राहू शकणार तो."

आई : " तूच का तो अभि? "

अभि : " हो, मीच तो!"

                        " बरं झालंस, तूच आलास तर. आम्हालाही बोलायच होतच तुझ्याशी. " आई बोलू लागली.

मी : " आई, तू शांत हो ना! अग त्रास होईल तूला. तू आराम कर. हवं तर घरी गेल्यावर बोल. "

बाबा : " नाही अनय, आजच बोलायचं आहे आम्हला तुमच्याशी. "

मी : " बाबा, पण...., " ( मला थांबवत )

अभि : " नको अनय, बोलू दे त्यांना. "

आई : " हे बघ अभिनव, आम्ही समाजात राहणारे लोक. आम्हला नाही हे तुमच कळत. आज अनय जर असा वागला तर उद्या सान्वीला तिच्या आयुष्यात त्रास होऊ शकतो. आणि मुळात आम्हलाच हे मान्य नाही. तुमचं नातं आम्ही स्वीकार करू शकत नाही. "

मी : " आई, बाबा.. तुम्ही त्याला का बोलताय? मला बोला ना?? "

आई : " स्पष्टच सांगते. तूम्हाला जर असं काही करायचं असेल तर आधी आम्हला विश देऊन मारून टाका . मग काय हवं ते करा. (अभि पुढे हात जोडत ) प्लीज आमच्या मुलाच्या आयुष्यातून कायमचा निघून जा. हात जोडून विनंती करतो आम्ही तुला. प्लीज आम्हला समाधानाने, शांततेने जगू दे. "

              अभिच्या डोळयातून आसवे गळू लागली होती. तो तिथून निघून बाहेर गेला. मी ही त्याच्या पाठोपाठ बाहेर पडलो.

मी : " थांब अभि, कुठे निघालास? "

अभि : " अन्या, आपल्यामुळे तुझ्या आई बाबांना काही झालं तर मी नाही सहन करू शकणार. अन्या..., तू ऐकायचं त्यांच. "

मी : " अरे, पण...! मी नाही तुझ्याशिवाय जगू शकणार यार..!"

अभि : " जगावच लागेल अन्या. आई बाबांसाठी. त्यांनी जन्म दिला, इतकं सगळं केल आपल्यासाठी, आणि आपण इतकंही नाही करू शकत का त्यांच्यासाठी? ते खूष नसतील तर आपण तरी कसे खूष असणार आहो. अन्या... तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे, आई बाबांना कधीही दुखावू नकोस. माझ्यासाठी त्याचं ऐक. मी जातोय.. काळजी घे!!"

                    त्या दिवशी मी आणि अभि कायमचे दूर झालॊ. मला माहिती आहे तो ही पुर्ण तुटून गेला असेल आतून. खूप हळवा आहे ग तो. त्यानंतर आपलं लग्न जमलं. मी तुलाही सांगण्याचा बरेच वेळा प्रयत्न केला. पण आई बाबांनी मला बोलूच दिल नाही. समिधा मला तुला फसवायच नाही. किंवा खोट्या आश्या दाखवून तुझ्या भावनांशीही खेळायचं नाही. म्हणून मी पहिल्याच रात्री तुला सगळं स्पष्ट सांगितलं. अभि म्हणाला होता.., "तिला सगळं खर सांगशील. कधीही खोटं बोलू नको."

                    अनयच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली होती. समिधाही हे सगळं ऐकून एकदम शांत झाली होती. समिधा उठून अनय जवळ जाते. आणि त्याला जवळ घेते. आज अनय ही तिला बिलगून खूप खूप रडत होता. त्याच्या मनात इतके दिवस साठवलेल्या भावनांना वाट मोकळी करून देत होता.

समिधा : " अनय शांत हो. सॉरी अनय, मी फक्त स्वतःचा विचार करत राहिले. पण माझ्या पेक्षा जास्त त्रास तुला झालाय. खरंच प्रेम काय असतं हे अभि कडूनच शिकायला हवं. खूप ग्रेट आहात तुम्ही. अनय, एक म्हणू? "

अनय : " बोल ना? "

समिधा : " तू आणि अभि फक्त एकमेकांसाठी बनलेले आहात. मी आहे तुमच्या सोबत. अनय आपण उद्याच रिटर्न जाऊया. मला एक खूप महत्वाचं कामं करायचं आहे. "

अनय : " महत्वाचं काम!! कुठलं?? "

समिधा : " ते उद्या पोहचल्यावरच कळेल. आणि हो, तूला आज या सोफ्यावर झोपायची गरज नाही आहे ओके. तू इथेच झोप माझ्या शेजारी. ओके!"

अनय : " नको नको, मी झोपतो इथेच. "

समिधा : " घाबरलास की काय?? अरे, खरच नाही काहीच करणार तुला! ( हसत हसत ) ओके!! चल झोपूया!!"

                  दुसऱ्या दिवशी सकाळीच अनय आणि समिधा परतीच्या प्रवासाला निघतात. समिधा तिच्या आई वडिलांनाही तिच्या घरी बोलावून घेते. अनयच्या आई वडिलांना कळतच नाही की हे दोघे अचानक परत का येत आहे ते?? अनय, समिधा घरी पोहचतात. फ्रेश होऊन सगळ्यांची जेवण आटोपतात. सगळे हॉल मध्ये बसतात.

समिधा : " आई बाबा मला जरा तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे. "

गणेश : " काय झालं समिधा? असे अचानक तुम्ही परत आलात. तुझ्या आई बाबांनाही बोलावून घेतलंस.., सगळं ठीक आहे ना? म्हणजे अनय आणि तुझ्यात काही भांडण वगैरे तर नाही ना झालं? "

विजय : " हो, समू काय झालं? हाच प्रश्न माझ्याही मनाला पडला होता. असं अचानक का बोलावून घेतलंस आम्हला. "

समिधा : " सांगते, सगळं सांगते. अभि... आत ये!"

              अभि ला बघून अनय तसेच त्याचे आई बाबाही शॉक होतात. " हा, हा इथे कसा? " अनयची आई म्हणाली.

समिधा : " आई, मीच बोलावून घेतलंय त्याला. "

योगिता : " पण का समिधा? काय गरज होती त्याची. "

समिधा : " गरज होती आई. म्हणूनच बोलावलं मी त्याला. "

गणेश : " काय गरज होती? अग तुझं आणि अनयच लग्न झालंय. या, या मुलामुळे तुमचा संसार मातीत मिसळेल. "

समिधा : " नाही बाबा, उलट आपण त्यांच्या आयुष्याची माती करायला निघालो होतो. "

विजय : " समिधा, बाळा काय बोलतेस तू? आम्हाला काहीच कळत नाहीये. नेमक काय सुरु आहे हे? "

समिधा : " सांगते बाबा , हा अभि.. अनय आणि अभि एकमेकांवर खूप प्रेम करतात. "

विभा : " काय?? अग काय बोलतेस? काही कळतंय का?? "

समिधा: " हो, आई खर तेच सांगतेय. "

विजय : " अग, पण हे कस शक्य आहे?? "

समिधा : " आई, बाबा... प्रेम असं ठरवून होतं नाही. देवाने प्रत्येकाला वेगळं वेगळं बनवलं आहे. अभि आणि अनय सुद्धा वेगळे आहे. ते आपल्या सारखे नाहीत. पण त्यांच प्रेम खर आहे. आई बाबा, तुम्ही एक आईवडील म्हणून अनय साठी जो विचार केला तो चुकीचा होता असं नाही म्हणत मी, पण अहो तुमच्या या निर्णयामुळे तीन आयुष्ये उध्वस्त झाली असती. अनय अभि सारखीच लाखो मुले, मुली आपल्या आजू बाजूला वावरत असतात. ते ही आपल्याच सारखी असतात. पण काही लोक स्वतः च मन स्पष्ट पणे सांगू शकतात, तर काही आपल्या भावनांचा गळा दाबून मुकाट्याने जे होतय ते सहन करत असतात. "

गणेश : " पण, समिधा हे सगळं चूक आहे बाळा, निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. "

समिधा : " नाही बाबा, निसर्गानेच त्यांना तस घडवलंय. माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक भावना या त्याच्या शरीरातील हार्मोन्स, जीन्सवर अवलंबून असतात. प्रत्येकाची घडणं वेगळी त्यामुळे या हार्मोन्सच, जीन्सच प्रमाण कमी अधिक होतं असतं. त्यामुळे एखाद्या मुलीबद्दल, किंवा मुलाबद्दल वाटाणाऱ्या भावना यासगळयांवर अवलंबून असतात. अभि आणि अनय चुकीचे नाहीत. त्यांचा जन्मच तसा झालंय, यात त्यांची काहीही चूक नाही. उलट आपण त्यांना सपोर्ट करायला हवा. कधी कधी हे लोक आपल्या भावना लोकांपुढे मांडू शकत नाही. त्यातून बरेच मुलं डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्या करतात. कारण हा समाज, त्यांचे आपले लोकच त्यांच्या भावना समजू शकत नाहीत. "

योगिता : " पण समिधा, लोक काय म्हणतील? अग लोक हसतील आपल्यावर!"

समिधा : " आई , लोक काय म्हणतील? यापेक्षा जास्त महत्वाचे अभि आणि अनय आहे. त्यांना काय वाटतंय ते महत्वाचं आहे. आणि आता लोकांची विचार करण्याची पद्धत बऱ्याच प्रमाणात बदलत चालली आहे. त्यामुळे लोकांना काय वाटतं यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आपल्याला काय वाटतं. अभि अनय चुकीचे नाही. या भावना अगदी सहज आहेत. त्यांच्याही भावना असू शकतात. आपण त्या समजून घ्यायला हवं. "

विभा : " समू काय करायचं ठरवलंय तू?? "

समिधा : " आई बाबा, अनय आणि अभि फक्त एकमेकांसाठी बनले आहेत. प्लीज त्यांना असं वेगळं करू नका. ते खरच एकमेकांशिवाय नाही जगू शकतील. फॅमिली म्हणून आपणच त्यांना सपोर्ट करायला हवा ना! प्लीज, तुम्ही एकदा त्यांच्या नजरेतून विचार करा ना! प्रेम कधीच चुकीचं नसत. चुकीचा असतो तो फक्त आणि फक्त त्याच्या कडे बघण्याचा आपला दृष्ठिकोन. "

             समिधाचे आई बाबा समिधाला म्हणतात, " समू तुझा जो ही निर्णय असेल, त्यात आम्ही तुझ्या सोबत आहोत."

योगिता : " अनय, अभि... मला माफ करा मुलांनो, मी खरंच तुम्हला नाही समजून घेऊ शकले. माझ्या मुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. प्लीज माफ करा मला. "

गणेश : " समिधा, बाळा आज तू खरच खूप काही शिकवलंस आम्हाला. आपण खरच आमच्या हातून खूप मोठी चूक झाली. माफ कर तू ही आम्हला. "

समिधा : " बाबा, असं नका बोलूस. तुम्ही फक्त अनय आणि अभिच्या नात्याचा स्वीकार करावा इतकीच इच्छा आहे माझी. "

अभि : " थँक्स समिधा, आज तुझ्यामुळे मी परत माझ्या अन्याच्या आयुष्यात पाऊल ठेवू शकलो. "

अनय : " हो, समिधा खरच थँक्स! तूझ्या मुळे मला माझा अभि परत मिळाला. पण.... सॉरी ग! "

समिधा : " सॉरी नको म्हणूस अनय. जे ही होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुझ्या मुळे मला प्रेमाचा खरा अर्थ कळलाय.., खरंच..!!

             पुढे समिधा, अनयशी डीव्होर्स घेते आणि अनय अभिला लग्नाच्या पवित्र बंधनात बांधते. तिने तिच्या नवऱ्यासाठी खरच नवरा आणला होता...!!!

समाप्त......


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance