अक्षता कुरडे

Drama Others

4  

अक्षता कुरडे

Drama Others

निर्णय

निर्णय

2 mins
229


पर्श्या आरची ला घेऊन तळ्याकाठी आला होता. आरची ला पर्श्या सोबत पहिल्यापासून तिच्या घरचे त्याच्या मागावर होते. आरची कशी बशी त्याला भेटायला इथवर आली होती. पर्श्या खुप रडत होता. त्याला काय करावं काहीच समजेना. आरची ला तिच्या घरातल्यांचा स्वभाव चांगलाच माहीत होता. तिला लवकरात लवकर यावर काही उपाय काढावा लागणार होता. तिच्या मनात त्याच्यासोबत पळून जाणं हा एकच मार्ग दिसत होता त्यासाठी तिने घरातून निघताना तिच्याकडे असलेले सगळे पैसे बरोबर आणले होते. अचानक तिला काहीतरी सुचलं. तिच्या चेहऱ्यावर मंद हास्याची लकेर उमटली. आरचि ने ते सगळे पैसे त्याच्या कडे दिले आणि त्याला इथून दूर निघून जाण्यास सांगितले. पर्श्या तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. 


पर्श्या: आरची ह्या पैशाचं मी काय करू..? कसं होईल पुढे मला काय सुचेना. तुझ्या घरच्यांनी मला बघितलं तर माझी काही खैर नाही. 


आरची: पर्श्या तु निघुन जा इथंन. 


पर्श्या: अग तु अशी कशी बोलतेयस. मी कुठे जाऊ..? 


आरची: कुठं बी जा. पण इथून जा. ह्या पैशाने तु तुझ शिक्षण पूर्ण कर. 


पर्श्या: अग पर आरची..


आरची: हे बघ घरच्यांची काय बी काळजी करायची गरज नाही. ते सगळं मी बघेन. पण तु जा इथंन. तुझ सगळ नीट स्थिर झालं की मीच येईन तुझ्याजवळ तुझ्या घरच्यांना घेउन. 


पर्श्या: आरची.. मला विसरणार तर नाहीस ना.


आरची: कधीच नाही.


पर्श्या: खरंच बोलतेयस ना..?


आरची: मराठी मधी सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मधी सांगू..? 


दोघेही भरल्या डोळ्यांनी एकमेकांना निरोप देतात. पर्श्या कायमचं गाव सोडून निघून जातो त्याच्या पुढच्या आयुष्याच्या प्रवासाला. आरची सलीम आणि लंगड्या ची मदत घेत त्याच्या घरच्यांना मदत करत राहते. सलीम आणि लंगड्या त्याची ख्यालीखुशाली अधून मधून आराची ला कळवत राहतात. ह्या सगळ्या प्रकारामुळे सगळे दुखावले गेले असतात. खास करून पार्श्या च्या घरचे. पण आरचि ह्या एका निर्णयाने त्याचा जीव वाचला होता. जरी दुरावले गेले असतील तरी वर्षानुवर्ष त्यांच्या नात्याची वीण अधिकच घट्ट विणत जात होती. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama