नात्यांची मजा
नात्यांची मजा
ती 1: त्याला पण माझी 'तेवढीच' आठवण येत असेल का गं ?
ती 2: माहीत नाही..
ती 1: हो, येत असेल असं म्हण ना..
ती 2: त्याला तुझी आठवण यावी, म्हणून तू प्रेम करतेस का त्याच्यावर ?
ती 1: बहुतेक!
ती 2: मग तू "त्याच्यावर" प्रेमच करत नाहीस! "कोणीतरी आपल्यावर प्रेम करतंय" हा feel घेण्यासाठी तू प्रेम करतेस, की तुला खरंच "तो" आवडतो, म्हणून तू त्याच्यावर प्रेम करतेस?
ती 1: दोन्हीसाठी !
ती 2: मग त्यातली पहिली अपेक्षा थोडी बाजूला ठेवून, फक्त "तो" आवडतो, म्हणून त्याच्यावर प्रेम करुन बघ. आयुष्य खूप सोप्पं होईल. "तुला वाटतंय" म्हणून त्याच्यावर प्रेम कर, "तो तुझ्याकडे यावा" म्हणून नाही! ओढून ताणून काही करायला जाऊ नको..
नात्यांची मजा ही हळुवार उलगडण्यातंच असते!