नाते तुझे अन् माझे
नाते तुझे अन् माझे
पराग नुसताच कार ड्राइव करत चालला होता कुठे जातोय याच त्याला ही भान नवहते. डोक्यात विचारांची गर्दी झाली होती त्याला काही सुचत नवहते. तो कुठे आला हे ही त्याला समजत नवहते. सकाळ पासून काही खाल्ले नवहते आता त्याला भूकेची जाणीव झाली होती. रस्त्या च्या बाजूला त्याला एक चहा ची टपरी दिसली. त्याने कार त्या बाजूला घेतली. खाली उतरला. टपरी वाला तिथे गरम गरम वडा आणि भजी तळत होता. रेडिओ वर गाणं सुरू होत."
सच मेरे यार हैं बस वही प्यार हैं
जिसके बदले में
कोई तो प्यार दे
बाकी बेकार है यार मेरे
हो यार मेरे
जिस हाथ में इक हाथ हैं
उस हाथ की क्या बात हैं
क्या फ़ासले क्या मंज़िले
इक हमसफ़र गर साथ हैं
जिसकी किस्मत कोई यूँ
संवार दे वो ही दिलदार है
यार मेरे हो यार मेरे...
हे गाणं परागच्या मनाला अजुनच दुःखी करत होते. मिता चा विचार मनात येत होता तिला काय आणि कसे सांगावे या विचारात तो होता. ऑपरेशन करूनदेखील मिता बरी नाही झाली तर ? त्याने एक भजी आणि एक वडा पाव ची ऑर्डर दिली. पॅन्ट च्या पॉकेट मधून सिगरेट पाकीट काढले आणि एक सिगारेट त्याने पेटवली. सिगरेट ओढत त्याने फोन चेक केला मिताचे चार मिस कॉल होते. त्याने मिताला कॉल लावला. थोड्या वेळात येतो असे सांगून कॉल कट केला. त्याचे डोळे भरून आले होते. अस खचून जायचे नाही नाहीतर मिताला कोण सांभाळनार असा विचार करत त्याने स्वहताला सावरले. साहेब हे घ्या म्हणत टपरी वालाने एक प्लेट पराग समोर ठेवली. पराग ने सिगारेट खाली फेकली पायाने विझवली. तिथेच बाकड्यावर बसून त्याने भजी आणि वडा खाल्ला. एक स्पेशल चहा मागवला आणि पुन्हा सिगारेट ओढत चहा घेऊ लागला. मिताला आवडत न्हवते त्याचे सिगरेट पिणे पण कधीतरी जास्तच कामाचा ताण असेल तर तो सिगरेट घ्यायचा हे तिला माहीत होते. मिताला काही ही होणार नाही मी आहे ना . डॉक्टर म्हणाले पण की हे ऑपरेशन झाले तर कॅन्सर चा प्रभाव शरीराच्या इतर भागांवर होणार नाही. मग आपण का निगेटिव्ह विचार करत आहोत. पराग घरी आला . मुलं शाळेत गेली होती. मिता ने त्याला घरात येताच विचारले अहो काय म्हणाले डॉक्टर? रिपोर्ट काय आला आहे. मिता तू बस निवांत आधी म्हणत त्याने तीला सोफ्यावर बसवले. सॉरी मी तुम्हाला पाणी पण नाही दिले आणि जेवून घ्या तुम्ही आधी मिता बोलली. नको आता मला काही पण मी सांगतो ते तू नीट ऐक आणि टेन्शन घेऊ नकोस. पराग बोलला. त्याने मिताचा हात हातात घेतला म्हणाला,मितु तुझ्या ब्रेस्ट मधये जी गाठ आहे ती कन्सर ची आहे. पण त्यावर इलाज आहे तुझे ऑपरेशन करावे लागेल. अहो पण हे असे कसे झाले आणि ऑपरेशन होऊन सुद्धा मी नाही वाचले तर मिताचे डोळे भरून आलेले. अस काही ही नाही होणार मितु तू पूर्ण पणे बरी होणार आहेस. आणि तुला बरे व्हावेच लागेल माज्या साठी आपल्या मुलांसाठी. त्याने तिचे डोळे पुसले रडायचे नाही मितु मी आहे ना तुज्या सोबत तुला काही ही होऊ देणार नाही. सगळ्या प्राथमिक तपासण्या झाल्या आणि आज मिताचे ऑपरेशन होते. तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता त्यामुळे लेफ्ट ब्रेस्ट पूर्ण काढून टाकणार होते. मिता स्वहताचे आवरत होती आरशा समोर उभी राहून केस ठीक करत होती. वयाच्या 38 व्या वयात ही मिता छान दिसत होती. मोठे टपोरे डोळे,लांब काळेभोर केस ,मध्यम बांधा मग तिचे लक्ष छातीवर गेले तिने हातांनी आपले ब्रेस्ट स्पर्श केले . आज हा एक ब्रेस्ट कायमचा ती गमवणार होती. स्त्री सौन्दर्याचा मापदंड असणारे तिचे सुंदर स्तन ! कसे दिसेल आपले रूप जेव्हा एक स्तन आपला काढून टाकला जाईल? पराग ला मग मी पहिल्या सारखीच आवडेन का? त्याच माझ्या वरच प्रेम कमी तर नाही ना होणार? असे प्रश्न तिला पडले.
मितु आवरले का तुझे म्हणत पराग आत आला. त्याने पाहिले मिताचे डोळे भरून वाहत होते. मितु अरे अस खचून का जातेस ? उलट देवाचे आभार मान की तो कॅन्सर तेवढयाच भागात आहे त्यामुळे तू बरी होणार आहेस. त्याने तिला जवळ घेतले तिचे अश्रू पुसले. अहो,पण मी कशी दिसेन ऑपरेशन नंतर? माझं सौन्दर्य तर संपणार ना मग तुमचे प्रेम माझ्या बद्दल असच राहणार का? कारण मला एक ब्रेस्ट नसणार आहे. मितु वेड्या सारख बोलू नकोस आणि मला काही ही फरक नाही पडणार की तू सुंदर दिसतेस की नाहीस याचा. माझं प्रेम आता आहे तसेच इथुन पुढे ही कायम असेल. तू माझी अर्धांगिनी आहेस आणि मला सांग माझ्या बाबतीत अस काही घडले असते तर तू मला सोडून गेली असतीस का? किंवा तुझं माझ्या वरच प्रेम संपले असते का? नाही पराग कोणत्याही परिस्थितीत मी तुमची साथ सोडली नसती मिता म्हणाली. मग मी ही कसा बदलेन सांग? नको काही विचार करू चल उशीर होतोय आपल्याला आणि हे लक्षात ठेव की काही ही झाले तरी आपल्यालातले जे नाते आहे ते कायम आहे तसेच राहणार आहे. मिता आणि पराग ने देवाला नमस्कार केला आणि हॉस्पिटल ला निघाले. मिताचे ऑपरेशन दोन तास सुरू होते. मिताला बाहेर आणले पण अजून ती शुद्धी वर आली नवहती. तिच्या डोक्यावर हात फिरवत पराग म्हणाला मितु तू जशी आहेस तशी मला आवडतेस. माझं प्रेम कधीही कमी होणार नाही. शरीराचा एक भाग नसला म्हणून काय नात्यांत दुरावा निर्माण होतो का? थोड्या वेळात मिता शुद्धीत आली. मितु ऑपरेशन छान पार पडले आता काही काळजी करण्या सारख नाही. मिता फक्त त्याच्या कडे पाहत हसली आणि तिने आपल्या छातीवर हात फिरवला. पराग ने तिचा हात हातात घेतला म्हणाला, मितु तू सुंदर आहेस आणि माझे तुज्यावर खूप प्रेम आहे. त्याने तिच्या हातावर आपले ओठ ठेवले.
