नाते जन्मा जन्मांतरीचे भाग १०
नाते जन्मा जन्मांतरीचे भाग १०
सकाळी सकाळी रमा आणि अक्षय तैयार होऊन आले. दोघांचे हसरे चेहरे पाहून वासंतीने समाधानाचा सुस्कारा सोडला.
आता अक्षय ने दुसरा आश्चर्याचा धक्का दिला . आईच्या हातात मर्सिडीज कारची किल्ली दिली .
आई आणि रमाच्या चेहर्यावर आनंद आणि आश्चर्य असे भाव पाहून अक्षय चे पोट भरले.
"अरे हे काय ?" वासंती म्हणाली.
आई, तू आयुष्य भर नुसतेच कष्ट केले . मला ते खरच पाहवत नव्हते ग. मी जमेल तेंव्हा जमेल ते काम करत राहिलो. पैसे जमवत राहिलो . मनातल्या मनात सगळे प्लॅनिंग करत राहिलो. ते आत्ता सत्यात उतरू लागले आहे. आता तू फक्त सुखात रहा.
आई, दोन दिवसांनी आपल्या पुण्याच्या हॉटेलचे उद्घाटन आहे. आपण आजच रात्री तुझ्या नव्या कारने चलो आहे. तयारीला लागा.
मी आणि रमा जरा देवळात जाऊन येतो. असे म्हणून त्या दोघांनी वासंती ला वाकून नमस्कार केला.
वासंतीला आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे झाले .
त्यानंतर अक्षयच्या प्रगतीची गाडी कुठेच थांबली नाही. रमा सारखी समंजस बायको , आईचा आशीर्वाद आणि त्याचे मधाळ वागणे ह्यामुळे उन्नतीचा रथ अग्रेसर होत राहिला.
ह्या सगळ्या प्रगतीत त्याने राधालाही स्वयंपूर्ण बनविले . तिच्या योग्य सालस मुलगा पाहून तिचे ही लग्न करून दिले. ती आपल्या संसारात सुखी होती.
रमा च्या बहिणींना ही त्याने योग्य मार्गदर्शन करून त्यांनाही उद्योगाला लावले.
होमली- होमली चे नाव सगळीकडे दुमदुमत होते. पहिले पुणे, मग हैदराबाद , त्यानंतर कलकत्ता आणि आता भारताची आर्थिक राजधानी मुंबईत त्याने पाऊल रोवले होते. एव्हडे यश मिळवून ही अक्षय गर्वाने फुलला नव्हता.
गरजूंना मदत करण्यात तो पहिल्या नंबर वर होता.
रमाचे आईवडील, वासंती , रमा, अक्षय आणि आता येणारा नवा पाहुणा ह्यांच्यासाठी अक्षय ने मोठा बंगला बांधला. प्रत्येकाच्या सुख सोयीं कडे तो जातीने लक्ष देत असे.
वासंती च्या एका योग्य निर्णयामुळे एक अनोखी प्रेमगाथा साकार झाली होती.
............. समाप्त

