STORYMIRROR

Manjusha Aparajit

Romance Fantasy

3  

Manjusha Aparajit

Romance Fantasy

संध्याछाया भिवविती हृदया : १

संध्याछाया भिवविती हृदया : १

3 mins
173

अकोल्याची ६ वर्षाची टपोऱ्या डोळ्यांची नयन जोशी आणि ७ वर्षाचा सुखदेव पांडे ह्यांची अगदी बालपणाची पक्की दोस्ती. काही खाताना , पिताना , अभ्यास करताना, मस्ती करताना ही जोडगोळी नेहमीच एकत्र. दोघांच्या आवडीनिवडी सुद्धा सारख्या . सगळ्या मोहल्ल्यात त्यांना नयनसुख म्हणूनच ओळखत होते. 


दोघांचीही एक वाईट खोड होती . ज्याच्या त्याच्याशी पैज लावायची . कुणा तिसर्‍याशी पैज लावली की नयनसुख एका बाजूला असायचे. नयनचे नशीब एव्हडे भारी असायचे की प्रत्येक वेळी ती जिंकायचीच. आणि मग ते दोघे खूप खुश व्हायचे आणि तिसर्‍या व्यक्तीला सळो की पळो करायचे. आजूबाजूचे लोकही लहान मुले म्हणून मजा घ्यायचे. त्यामुळे नकळत पणे हे दोघे बेडर होत होती.


कोणीच नाही मिळाले की ही दोघे एकमेकात पैज लावत . आश्चर्य म्हणजे सुखदेव नेहमीच हरत असे.  स्वभावाने मवाळ असल्यामुळे सुखदेव हसत हसत आपली हार मान्य करत असे.


दिवसामागून दिवस सरत होते . ना त्यांच्या मैत्रीत खंड पडला ना त्यांच्या पैज लावायच्या स्वभावात.  फरक फक्त एकच झाला की त्यांना अजून एक मैत्रीण मिळाली दर्शना. ती नावाप्रमाणेच ह्या दोघांच्या कृत्याची शांत दर्शक होती . सुखदेवशी ती फार कमी बोलत असे. मात्र नयनची ती जिवाभावाची मैत्रीण होती. 

  

आणि एक दिवस बातमी आली सुखदेवच्या बाबांची मुंबईला बदली झाली. दुसर्‍या दिवशी लगेच त्याचे कुटुंब मुंबईला निघून गेले. घाईगर्दीत नयनचा कसाबसा निरोप घेऊन सुखदेव मुंबईकर झाला.


नयनने दर्शनाशी पैज लावली तो नक्की वापस येणार.  


नवे जग, नवे मित्र, करियरचे नव्याने कळलेले महत्व ह्या सगळ्या व्यापात सुखदेव भूतकाळ विसरत चालला होता.  तो इंजिनियर झाला . अमेरिकेत गेला. मोठ्या पगाराची नोकरी . सगळेच मस्त चालले होते. आई बाबांनी त्याला आता भारतात येण्याची गळ घातली . त्याचे लग्नाचे ही वय झाले होते. २८ वर्षांचा झाला होता तो आता . पण त्याच्या मनाजोगी मुलगी त्याला मिळेना.  


आपण नेमके काय शोधतोय हे त्याचे त्यालाच कळेना . एक दिवस आईने त्याच्या टेबल वर एक फोटो ठेवला . त्या फोटोतील मुलीचे टपोरे डोळे त्याला फार भावले . ह्या मुलीला भेटायला तो तयार झाला .  


मुलगी नागपूरला एका सी.ए. कडे नोकरी करत होती . गोबर्‍या गालाची, गोर्‍या रंगाची, केसांची बॉयकट केलेली ती मुलगी त्याच्या मनात रुजली. खूप ओळखीचा चेहरा वाटत होता पण कुठे पाहिले ते आठवत नव्हते.


मुलगी लेडिज होस्टेलला राहत होती.  मुला मुलींचे विचार एकमेकांना पटले तर मोठे लोक दाखवायचा प्रोग्राम करणार होते. 


ठरलेल्या वेळेत एका निवांतशा हॉटेल मध्ये भेटायचे ठरले . नयनने त्याचा फोटो पाहूनच त्याला ओळखले होते आणि मनोमन होकार देऊन ही दिला होता . आता तिला पहायचे होते की हा आपल्याला ओळखतो का ? 


प्रथम दर्शनीच सुखदेवच्या मनाने कौल दिला. येस हीच ती आपल्या मनातली . हिला कुठे तरी पाहिलय ? कुठे ? आठवेना ?


नयन त्याच्या कडे टक लावुन पहात होती. काय हँडसम दिसतोय हा ? 


दोन मिनिटे स्तब्धतेत गेल्यावर , नयननी वेटरला सांगितले , दोन कॉफी, साखर कमी पण मलाई जास्त.


आपली आवड हिला कशी कळली ? तो म्हणाला , तुला काय माहित मी कॉफी घेतो की नाही घेत ते ?


लावतो पैज ? झाले .... आदत से मजबूर ..


सुखदेव एकदम ओरडला , नयन तू ?


"येस मीच ती . तू येशील ह्याची मला पूर्ण खात्री होती . फक्त माझ्याशी लग्नाचा विचार करून तू येशील असे मला वाटले नव्हते." ... इति नयन


अग केव्हढी बदललीस तू . मला तर तीच लहान, दोन घट्ट वेण्या बांधलेली , सतत तोंडात च्युईंगम चघळत राहणारी आणि ज्याच्या त्याच्याशी पैज लावणारी नयन आठवतेय. तू इतकी स्मार्ट राहू शकतेस हा विचारच कधी मनात नाही आला .


उद्या आता दर्शना कडून पार्टी उकळणार मी ... नयन पुटपुटली .


म्हणजे ती पण इथेच आहे नागपूरला ? लग्न नाही केले तिने ?


हा प्रश्न तिला सुखदेव कडून अपेक्षित नव्हता तरी नयनने उत्तर दिले ..


हो .


दर्शना बद्दल त्याने अजून काही विचारू नये म्हणून तिने घाईघाईने विषय बदलला . कारण तिला माहिती होते दर्शना तिच्यापेक्षा रूपाने उजवी, स्वभावाने शांत आहे. ह्याने तिच्यात गुंतू नये. तसेच तिला त्याला गमवायची तयारी नव्हती. म्हणून तिने आपला निर्णय सांगून टाकला....


मला तू पसंत आहेस . तुझे काय म्हणणे आहे ? 


काय वाटते तुम्हाला प्रेक्षक वर्ग ? सुखदेव काय उत्तर देईल ? हां या ना ? किंवा तुम्हीच तुमच्या प्रतिक्रियेत सांगा काय वदवून घेऊ सुखदेव कडून?

त्याप्रमाणे आपली स्टोरी पुढे सरकेल ...


(क्रमशः) 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance