संध्याछाया भिवविती हृदया : 3
संध्याछाया भिवविती हृदया : 3
मागच्या भागात काय झाले ....
दर्शना हात पुढे करत म्हणाली , हॅलो सुखदेव .
तिचे ते वाक्य ऐकताच नयन आणि सुखदेव दोघेही अवाक् झाले. कारण नयनने अजून त्याचे नाव सांगितलेच नव्हते .
त्यांना तसेच सोडून तिने वेटर ला आवाज दिला.
काय घडणार पुढे ?
आता पुढे ...
नयन-सुख अजून तसेच स्तब्ध उभे होते. दोघांनाही दर्शनाचे हे रुप नवीन होते.
त्यांना तसेच उभे असलेले पाहून दर्शना हसून म्हणाली , "अरे असे भूत पाहिल्यासारखे काय उभे आहात ? मी सुखदेवचे नाव घेतले म्हणून इतके चमकला का ? मी जर ह्याला एकटा पाहिले असते ना , तर कधीच ओळखले नसते. ते काकूंनी मला फोन केला म्हणून मी ओळखले ह्याला."
"आता तुमची शंका मिटली असेल तर या बसा "
तुमच्या आवडीचे चीज बर्गर आणि मलाईदार कॉफीची ऑर्डर दिली आहे. बरोबर चॉकलेट क्रीम बिस्किटे पण आहेत.
आता दोघेही खुशीत आली आणि बसली .
नयन म्हणाली , " दर्शु , तू ग्रेटच आहेस. मला वाटले तू ओळखलेस सुखला ."
छे ग, इतक्या वर्षानंतर भेटल्यावर कसे ओळखणार ? तू तरी ओळखले का माझ्या जीजूला पाहिल्या क्षणी ? ... दर्शु ने विचारले.
हो , मी तर त्याला फोटो पाहूनच ओळखले होते. आता स्तंभित होण्याची दर्शनाची पाळी होती.
अग, काय सांगतेस ?
दर्शना , आठव मी तुझ्याशी पैज लावली होती , तो येईलच म्हणून . आठवतय का ?
हो आठवतय की. अग मी तर ते गमतीवारी नेले.
त्या दोघींचा वार्तालाप ऐकून सुखदेव थक्क होत होता. म्हणजे नयन आपल्याला कधीच विसरली नाही.
ओ गॉड , मी मात्र गाव सोडले आणि गावातल्या सगळ्या आठवणी , मित्रमैत्रिणींना सोयीस्कररीत्या विसरून गेलो . ही नयन तेंव्हापासून माझ्या प्रेमात होती की काय ?
छे, छे ,ते वय प्रेमात पडण्याचे नव्हतेच.
जर योगायोगाने आपण भेटलो नसतो तर नयनची प्रेमकहाणी " अधुरी एक कहाणी..." म्हणून राहिली असती . विचाराच्या गोंधळात त्याचा स्वतःशीच प्रश्नोत्तरांचा तास सुरू होता .
जर नयनने त्याला हलवून वर्तमानात आणले नसते तर तो अजून किती तरी वेळ असाच विचारांच्या चक्रात गुरफटत राहिला असता.
भानावर येत तो नयनला भारावलेल्या स्वरात म्हणाला , " नयन , सॉरी यार , मी कसा तुला विसरलो ? तू मात्र मला मनात जपून ठेवले."
त्याचा असा भावनिक झालेला स्वर ऐकून नयन नी दर्शना दोघीही आश्चर्यचकित झाल्या .
नयनला तर तोच मस्ती करणारा , आडदांड सुख आठवत होता.
त्यामुळे गडबडून ती त्याला म्हणाली , " ओए, सेंटि व्हायची काही गरज नाही . माझा माझ्यावर पूर्ण विश्वास होता."
आता मुद्द्यावर ये. पुढे काय कसे ठरवायचे ? तुझा भविष्यातील काय प्लॅन आहे ?
इथेच भारतात राहणार की पुन्हा फॉरेनला जायचे ? तिथेच नेहमी साठी राहणार का ?
सावरलेला सुखदेव म्हणाला , " नयन तुला कुठे रहायला आवडेल भारतात की यू. एस. ला ?"
बघ, तुझ्या बरोबर मी कुठेही रहायला तयार आहे. मी फक्त ह्यासाठी विचारते आहे की त्याप्रमाणे मला माझ्या नोकरीच्या ठिकाणी कळवावे लागेल.
मला ना माणसांची एलेर्जी ना जागेची . तुझ्या आईबाबां बरोबर मी सहज जमवून घेईन . तेही त्यांच्या भावना न दुखावता .
फक्त एकच माझ्या आई बाबांची मी एकुलती एक मुलगी आहे. आज नाही तरी पुढे मागे त्यांची जबाबदारी माझ्यावरच असणारं आहे. तेंव्हा मात्र तुला आणि तुझ्या घरच्यांना ऑब्जेक्शन असायला नको.
वेडी आहेस का तू ? अग तुला होकार देऊन मी फक्त तुला स्विकारत नाहीये. उलट तुझ्यासकट तुझे कुटुंब ही माझे होणार आहे. तुला शब्द देतो मी त्यांच्या उतार वयात मी त्यांना कधीही अंतरी देणार नाही.
चला आता तुम्हा दोघींना तुमच्या होस्टेलला सोडतो . बराच उशीर झालाय. बाकीच्या गोष्टी आता मोठ्यांना ठरवू दे. त्यांनाही आपले लग्न एन्जॉय करायची संधी द्यायला हवी.
दर्शना म्हणाली , "नको रे बाबा , मी कबाब मे हड्डी नाही होत . मी माझ्या गाडीने आलीय , माझ्याच गाडीने जाणार. "
जीजु तू हिला मस्त फिरवून आण . गप्पाटप्पा मारा. हव तर डिनर ही बाहेरच होऊ द्या. मी होस्टेलच्या मेसला कळवेन तसे. बाय...... म्हणत आणि हात हालवत दर्शना झोकात निघून ही गेली.
पाहूया पुढच्या भागात ही तोता - मैनेची जोडी काय करते ?

