संध्याछाया भिवविती हृदया : ४
संध्याछाया भिवविती हृदया : ४
मागच्या भागाचा शेवट....
जीजु तू हिला मस्त फिरवून आण . गप्पाटप्पा मारा. हव तर डिनर ही बाहेरच होऊ द्या. मी होस्टेलच्या मेसला कळवेन तसे. बाय...... म्हणत आणि हात हालवत दर्शना झोकात निघून ही गेली.
पाहूया पुढच्या भागात ही तोता - मैनेची जोडी काय करते ?
आता पुढे ....
दर्शना निघून गेली .
सुखदेव नयनला म्हणाला , " हं, बोला मॅडम, काय प्लॅन करायचा ? "
चल लाँग ड्राइव वर जाऊ मग एखाद्या मस्त हॉटेल मध्ये डिनरला जाऊ. चालेल तुला सुख ?
अग हो. न चालायला काय झाले ?
फक्त मला रात्री ९.३० च्या आधी होस्टेलवर सोड. नियम आहे तसा तिथला .
जो हुक्म मेरे आँका .
त्याच्या ह्या नाटकावर खळाळून हसत नयन उठली आणि त्याच्या हातात हात अडकवून चालू लागली.
त्याच्या नव्या कोऱ्या आलिशान कारचा दरवाजा उघडून आणि तिच्यासमोर झुकून त्याने तिला बसायची खूण केली . हसतमुखाने ती आत जाऊन बसली. तिच्या बाजूचा दरवाजा बंद करत तो ड्रायव्हरच्या सीट वर जाऊन बसला आणि त्याने गाडी चालू केली .
काही तासात नयनच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली होती. त्यामुळे ती काहीशी गोंधळलेली , खूपशी खुष होती. मनाजोगता नवरा, ऐश्वर्य , गाडी , मुंबई सारख्या ठिकाणी स्वतंत्र बंगला . अजून काय हवय ?
तिला अस आपल्यातच गुंग झालेल पाहून सुखदेवला काय बोलावे ते सुचेना. त्याने हळूच तिला साद घातली , नैना.
हे नविनच नाव ऐकून नयन त्याच्यावर जाम खुश झाली.
ती म्हणाली, " सुख , आपण दोघे असताना तू मला ह्याच नावाने हाक मारत जा."
अग आता सांग तरी कुठे वळवू गाडी .
चल सेमिनरी हिल्स नाहीतर फुटाळा. नाही तर चल नुसतेच वर्धा रोडने फिरायला.
ती सांगत होती त्याप्रमाणे तो ड्राईव्ह करत होता . थंडीचे दिवस होते . बाहेर अंधारून आले होते . सुखदेवने हळूच साऊंड सिस्टीम सुरू केली.
तेरे मेरे सपने अब एक रंग है
तू जहां भी ले जाये हम संग है ......
स्मितहास्य करत ती म्हणाली, "सुख, मला गाणी ऐकायला आवडतात . पण ह्या घटकेला आपण गप्पाच मारू ."
सुखदेवने पटकन सिस्टम बंद केली. खर म्हणजे त्याला ही तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या.
सुख, तू इथून गेला त्यानंतर खरच काही दिवस मला काही सुचत नव्हते, करमत नव्हते . दर्शना नसती तर तुला स्मृती आड करणे शक्यच नव्हते.
किती तरी दिवस मी कोणाशीच पैज ही नाही लावली. पण माझा मूळ स्वभाव रडण्याचा नव्हताच . त्यामुळे मी मला वेगवेगळया स्पर्धांमध्ये गुंतवत गेली. खरे म्हणजे ह्या सगळ्यामुळे मी स्वतःला घडवत गेली.
हळूहळू शिक्षणाचे महत्व समजत गेले. पुढे जाण्याच्या अट्टाहासापायी पैज स्वतःशीच लावण्याची सवय लागली मला . आणि काही करून पैज जिंकायची. म्हणून खूप मेहनत पण करायची सवय लागली. माझ्या यशाने आई बाबा खुप आनंदी झाले होते.
बी. कॉम., एम. कॉम, कॉम्प्युटर कोर्सेस सगळ्यात अव्वल स्थानावर राहत गेले.
मग नोकरीचा ध्यास लागला . बाबांना फारसे पटले नाही . पण त्यांच्याच मित्राच्या मुलाने ऑफर दिली म्हणून ते तयार झाले .
त्याने नागपूरला मोठ्ठे ऑफिस चालू केले आणि माझीही बदली मग नागपूरला झाली .
लहान गावातून आलेली म्हणून मी पहिल्यांदा जरा गावंढळच होती. आपल्याला प्रेझेंटेबल रहायला हवे हे माझ्या ऑफिस मधल्या मैत्रिणींनी शिकवले.
मी परक्या मुलांसोबत बोलताना बुजत होती. पण माझ्या ह्याच मैत्रिणींनी माझा आत्मविश्वास जागवला.
एक दिवस मला ब्युटीपार्लर घेऊन गेल्या आणि माझा असा मेकओव्हर करून घेऊन आल्या.
माझ्या ह्या रूपावर मीच खुष झाले.
खूप पगार नाहीये माझा. पण मी माझ्यापुरता भागवून दर महिन्यात बर्यापैकी बाकी टाकू शकते.
गेल्या तीन वर्षांपासून मी नोकरी करतेय. बाबा आता रिटायर झाले आहे. आईही कष्ट करून थकली. मला मोठे करताना , माझे हट्ट पुरवताना त्यांनी मला कधीही कुठल्याच गोष्टीची झळ लागु दिली नाही.
आता त्यांना माझ्या लग्नाचा ध्यास लागलाय. माझ्यापुढे जेंव्हा त्यांनी हा प्रस्ताव मांडला , तेंव्हा मनाच्या खोल कप्प्यात दडून बसलेला तू, पुन्हा उसळी मारून वर आला. मी तिथून गुपचूप उठली आणि आपल्या खोलीत जाऊन दर्शनाला फोन लावला .
"दर्शु, तुला सुखदेव आठवतोय का ग ? "
ती गोंधळली .
"अग, कोण सुखदेव?"
मग मी तिला आपल्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी सांगितल्या. शांतपणे सगळे ऐकून घेतल्यावर ती म्हणाली , " हं, पण आत्ता मधेच का आठवला तो तुला ?"
मग मी तिला मी आई बाबांचा लग्नाचा प्रस्ताव ही सांगितला.
त्यानंतर ती मला जवळपास रागावलीच.
" नयू , तुला काय म्हणायचेय? आता तुला सुखदेव बरोबर लग्न करायचेय? अग तो इथून गेल्यापासून त्याचा काहीही ठावठिकाणा नाही . त्याने कधी साधी चौकशीही केली नाही. "
"कुठे शोधणार आहेस तू त्याला ? चुपचाप एखादे चांगले स्थळ शोध आणि सुखाने संसार कर. उगाच काका काकूंच्या डोक्याला ताप देऊ नकोस ."
त्यानंतर मी शांत झाले. तिच्या म्हणण्याचा मी विचार केला . ती जे म्हणत होती ते प्रॅक्टिकली बरोबरच होते. पण मन अजूनही कुठेतरी तुझ्या भोवती फिरतच होते . आई बाबांना सांगितले मला थोडा वेळ हवाय.
"तुमच्या परीने तुम्ही प्रयत्न चालू करा . पण मी अगदी लगेचच लग्न करणार नाहीये "
"सुख, त्यानंतर मी माझ्या नशिबाशीच पैज लावली आणि सुख , मी पुन्हा एकदा जिंकले. "
सुखदेव मंत्रमुग्ध होऊन तिचे बोलणे ऐकत होता. ती बोलायची थांबल्यावर, तो भानावर आला आणि म्हणाला , " नैना , तुस्सी ग्रेट हो . आय रिअली लव यू. "
चल , तुला आता मस्त हॉटेलात पार्टी देतो .
"सुख , तू तुझ्याबद्दल काहीच नाही सांगणार ? "
मजेत शीळ वाजवत तो म्हणाला , " मॅडम , घड्याळ पहा. भूक पण लागलीय . उद्याची सकाळ फक्त तुझी आणि माझी . उद्या सुट्टी टाक . सकाळी ७.३० वाजता येतो तुला घ्यायला. तेंव्हा बोलुया . १२-१२.३० पर्यंत मी निघेन मुंबईला जायला . माझेही आई बाबा वाट पहात असतील ."
त्याच्या बोलण्यावर सम्मती दर्शवत ती खुदकन हसली.
