AnjalI Butley

Abstract Fantasy Inspirational

4.3  

AnjalI Butley

Abstract Fantasy Inspirational

नात न सग्याचे

नात न सग्याचे

2 mins
407


मॅडम मी तुमच्याकडे रक्ताचे नमुने घ्यायला यायचो, मला आता नक्की घर व नाव आठवत नाही तुमचे पण मी तुमच्याकडे का इथेच कोणा कडे तरी येत होतो.


तरूण मुलगा दारावरची कडी वाजवत आला, सध्या कोणावर ही विश्वास ठेवता येत नाही. बाहेरनच जरा मोठ्या आवाजात त्याला कोण पाहिजे कशासाठी आलात विचारले. मुलगा थोडा घाबरला, नाव सांगितले, मी ह्या पॅथॉलॉजित काम करायचो काही वर्षापूर्वी तेंव्हा तुमच्याकडे सॅम्पल घ्यायला आलो आहे, त्याला मध्येच थांबवत, आता मी बोलवले नाही, तरी का आलात?


आता मी सॅम्पल गोळा करायला नाही आलो, मला सिन्नरला जायचे आहे, माझे पाकिट मारले व माझ्याकडे पैसे नाही मला १०० रूपये हवे आहे मी परत करेल नंतर! 


सकाळी नऊच्या सुमारास आला होता. तसे बघीतलेतर घर बस आगाराजवळ पण नाही, ईकडे कुठे आला होता वैगरे प्रश्न विचारावे वाटले नाही! बोलत बसायची तशी इच्छा नव्हती, इथे नाते न सग्याचे विश्वास ठेवण्या, तर अनोळखी माणसावर कसा विश्वास ठेवणार! पण त्याने मित्राचे नाव घेतले, मित्राला फोन करून खात्री करायची का? जाऊ दे १००रूच मागतोय, असेल खरे. १०० दिले त्या मुलाला, पैसे परत देण्यासाठी परत नको येऊ, काळजी घे व घरी सुखरूप जा! त्याने पैसे घेतले, इच्छा झाली नाही त्याच्या चेहर्याकडे पाहण्याची, खर खोटे त्यालाच माहित, करत परत आपल्या कामाला लागले! 


थोड्या वेळाने मित्राचा फोन आला व धन्यवाद दिले, बर झाले तु त्या मुलाला पैसे दिले आताच तो सिन्नरला पोहचला व मला भेटला , तुझे १००रु मायाकडे देत होता कारण तू परत देऊ नकोस म्हटल्यावर मला देत होता.. त्याला सांगितले ठेव तुझ्याकडे, कोणी अडचणीत असल्यास त्याला दे.. १००रु असलेतरी त्याची किमया खूप मोठी आहे बघ या अजून काही भर घातलीस तर अजून छान, आता जे १००रू ते २००रू होईल. नात्यातला सगा विसरून जाईल १००रू मदत दिलेले पण अनोळखीला दिलेले तो लक्षात ठेवेल व परत कोणत्या न कोणत्या प्रकाराने तो मदत करेलच!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract