Sangieta Devkar

Drama Romance

3.8  

Sangieta Devkar

Drama Romance

ना उम्र की सीमा हो.. (भाग 1)

ना उम्र की सीमा हो.. (भाग 1)

12 mins
588


राहुल कधी येतोय तुझा एक्टर आदित्य? स्मिता ने विचारले, दोघ राहुल च्या केबिन मध्ये बसले होते. राहुल ची प्रोडक्शन कंपनी होती आणि स्मिता रायटर होती एक मराठी सिनेमा करायचा अस त्या दोघांनी ठरवले होते. अर्थात कथा स्मिता ची आणि दिग्दर्शन राहुल चे ,सो राहुल च्या ओळखीचा कोणी आदित्य होता त्याला एक्टिंग ची आवड़ होती म्हणून तो आज यांना भेटणार होता. तसे राहुल ने त्याला जज केले होते हीरो च्या कैरेक्टर साठी तो परफेक्ट होता आता फक्त स्मिता ने त्याला चूज करावे असे राहुल ला वाटत होते. सॉरी सॉरी मला थोड़ा लेट झाला म्हणत आदित्य राहुल च्या केबिन मध्ये आला. स्मिता ने पहिले साधारण सहा फुट उंच ,गोरा,उभा चेहरा,कपाळ च्या बाजूला काहीतरी जख्म झालेली जूनी खुण,हसरा हैंडसम लुक आणि स्ट्रीम असलेली दाढी असा आदित्य आत आला. हो हो स्मिता ने इतके निरीक्षण केले सेकंदात ..ऐस राइटर आहे ना ती !! राहुल म्हणाला, आदित्य हॅव अ सीट अँड मिट आवर रायटर स्मिता . त्याने स्मिताला शेकहैंड केला हैंलो मैंम. हैलो आदित्य ती बोलली. राहुल म्हणाला,स्मिता तुला काही आदित्य ला विचारायचे असेल तर विचार, टेस्ट घे हवी तर. हो मैम तुम्ही ऑडीशन ही घेऊ शकता, मि कॉलेज मध्ये आणि बाहेर ही काही नाटका मध्ये काम केले आहे. नाही राहुल ने निवडले तुला म्हणजे योग्यच असणार ना . ओके राहुल म्हणाला. स्मिता म्हणाली, आपण तिकडे स्टुडियो मध्ये जावू तिथे प्रीति आणि विक्रम पन आहेत मग एकत्र सर्वाना स्टोरी सांगता येईल. ओके मैम अँड थैंक यू. आदित्य हसुन म्हणाला. तो खुप बोलका आणि मनमिळाऊ असा होता. स्मिता ही शांत आणि कायम उत्साही अशी ,एक प्रकारचा आत्मविश्वास तिच्या कडे पहाताच जाणवायचा हे आदित्य ने नोटीस केले. हे तिघे स्टुडिओ कडे आले तिथे विक्रम प्रीती होते. सर्वांना एकमेकांची ओळख करून दिली आणि राहुल ने ऑफिस बॉय ला कॉफी आणायला सांगितले. राहुल म्हणाला,सकाळी आल्या आल्या सर्वांनी इथे एकत्र जमायचे आणि आधी कॉफी किंवा चहा जे आवडेल ते घ्यायच आणि कामाला सुरुवात करायची तुम्ही तिघे इथेच तुमची स्क्रिप्ट पाठ करायची आणि एका वीक साठी जितके पाठांतर असेल ते दर सोमवारी रिहर्सल करून दाखवायची. आदित्य विक्रम प्रीती तिघांनी ओके सर एका सुरात म्हणाले.

स्मिता कडे पाहून राहुल बोल म्हणाला, ती म्हणाली, आपण हा पहिला प्रयत्न करत आहोत त्यासाठी आपल्याला कष्ट ही तेवढेच घ्यावे लागणार आहेत. चांगल्या दर्जाचा सिनेमा करण्याचा आपला कल असेल .तर या सिनेमाचे नाव आहे " तुझ्याविना " ही कथा आहे एका सेन्सेटिव्ह ,अत्यन्त भावूक अशा लेखकाची . मी थोडक्यात सांगते या सिनेमात लेखक म्हणजे मेन हीरो मितेश आहे त्याची गर्लफ्रेंड आहे आर्या ,आणि मितेश चा फ्रेन्ड आहे निखिल. मितेश ला प्रेमात वेड लावून आर्या त्याच्या जीवनातून निघून जाते,ती जाते तसे मितेश चे लिखाण पण सम्पते आणि तो डीप्रेशन मधये जातो.अशी साधारण कथा आहे. स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला डिटेल समजेलच. मितेश चा रोल आदित्य करणार आहे, प्रीती आर्या असेल आणि निखिल अर्थातच विक्रम. कोणाला काही अडचण आली तर मला येऊन भेटा. सर्वांनी कॉफी घेतली. राहुल आणि स्मिता आप आपल्या केबीन मधये आले. पराग तिथे एडिटिंग आणि डबिंग चे काम पाहायचा,त्याने या तिघांना स्क्रिप्ट च्या कॉपी दिल्या.

गेली चार वर्षे स्मिता राहुल कडे काम करत होती. राहुल तिचा कलासमेंट होता. स्मिता चा हजबंड एक्सपायर झाला होता आणि तिला एक मुलगी होती जी दहावी ला होती . स्मिताला नोकरी ची गरज होती. तिचे लिखाण छान होते तिने मास कम्युनिकेशन केले होते वर्तमानपत्र आणि इतर मॅगेझिन मध्ये तिचे लिखाण असायचे सो राहुल ने तिला आपल्याच कँपनीत नोकरी दिली होती. खूप स्ट्रगल तिने आयुष्यात केला होता,आणि दुःख ही सहन केले होते पण गेली चार वर्षे ती जणू पूनर्मजन्म झालया सारखा सगळं मागे सोडून एका नव्या उमेदी ने काम करत होती आणि हे काम तिच्या आवडीचे सुद्धा होते. भूतकाळाचा आता विचार ही ती मनात आणत न्हवती. अगदी आनंदात जगत होती. स्टुडिओ च्या समोरच तिची केबिन होती त्यामुळे आदित्य चे लक्ष नकळत पणे समोर गेले तरी अचानक त्याची आणि स्मिता ची नजरानजर व्हायची मग दोघ एकमेकांना स्मितहास्य द्यायचे. स्मिता काम करत होती लॅपटॉप वर लिखाण चालू होतं. मध्येच तिने आदित्य चे फेसबुक प्रोफाइल ओपन केले आणि त्याचे फोटोज पहात राहिली. खूप वेगवेगळ्या पोज मध्ये आणि जिम मधले त्याचे सुंदर फोटो होते काही व्हिडीओ होते काही नाटका मधील सीन होते तिला समजले की आदित्य हे कॅरेक्टर चांगल्या पद्धतीने करू शकेल.तिने काही त्याच्या फोटोना लाईक ही केले. आदित्य खूप बडबड करायचा, दंगा मस्ती मध्ये त्यांची प्रॅक्टिस सुरू होती. रिहर्सल करताना अचानक कोणी हसायचं कोणी डायलॉग विसरायचं अस मस्त चाललं होतं रुटीन. आज स्मिता ने लेमन कलर चा चुडीदार घातला होता छान दिसत होती ती. आदित्य म्हणाला, मैम छान दिसत आहात पण अजून डार्क कलर तुम्हाला उठून दिसेल. ओहह थँक्स आदित्य ती म्हणाली. आदित्य कळत नकळत तिला ओबझर्व करतो हे तिला समजले होते. एफ बी वर तिचे पिक्स लाईक करणं, कमेन्ट देणं,आदित्य च चालू होतं. तीच तिच्या लिखानाच कौतुक करणं कुठे तरी स्मिता ला ही हवंहवंसं वाटू लागलं होतं. कारण अस कौतुक, आपलेपणा प्रेम तिला कधीच तिच्या नवऱ्या कडून मिळालं न्हवत,मिळाली ती फक्त वेदना आणि उपेक्षाच. नवऱ्याचं संशयी वागणं,सतत तिचे फोन चेक करणं,तिला बाहेर जाऊ न देणं,सतत टोमणे मारणं इतकंच सहन केले तिनं. त्यामुळे आदित्य च वागणं तिला त्याच्या कडे अट्रॅक्ट करत होत. आणि आदित्य ही नकळत पणे स्मिता मध्ये गुंतत चालला होता. पण स्मिताला याच भान नक्की होत की ती विधवा आहे आणि एका मुलीची आई सुद्धा! त्यामुळे तिने मनावर संयम ठेवला होता. पण आदित्य मना पासून स्मिताला लाईक करत होता. आज आदित्य राहुल आणि स्मिताला म्हणाला की त्याला दोघांना थँक्स म्हणायचे आहे सो मी आज पार्टी देणार आहे रात्री डिनर ला यायचे . राहुल म्हणाला, ओके येतो आम्ही. रात्री एका छान हॉटेल मध्ये आदित्य राहुल आणि स्मिता आले होते. स्मिताने डार्क पिंक टॉप घातला होता आणि व्हाईट प्लाझो ती छानच दिसत होती. स्मिता योगा करायची सो वेल मेन्टेन होती .तिला पाहून कोणाला विश्वास बसणार नाही की तिला मोठी मुलगी आहे. आदित्य म्हणाला सुद्धा मैम लूकिंग व्हेरी ब्युटीफुल! ती फक्त हसली. आदित्य ही ब्लू टीशर्ट आणि जीन्स मध्ये आला होता,जिमची त्याची कसदार शरीरयष्टी त्यातून उठून दिसत होती . पण यात उठावदार दिसायचं ते त्याच हसणं, खूप मोहक हसु होत त्याच किंचित त्याच्या गालाला खळी पडायची. तिघांनी डिनर केले आदित्य ने त्यांचे फोटो काढले. निघताना राहुल आदित्यला म्हणाला, आदित्य तू स्मिताला ड्रॉप करून जाशील का? अरे राहुल नको मी जाईन कॅब ने.ती बोलली. नको मैम रात्र झालीय कॅब ने एकट्या कुठे जाणार मी सोडतो डोन्ट माईंड. बर चल ती म्हणाली. मग राहुल ने त्या दोघांचा निरोप घेतला उद्या ऑफिस ला भेटू म्हणाला.

आदित्य आणि स्मिता त्याच्या कार मध्ये बसले आदित्य ने रेडिओ सुरू केला आदित्य ने लावलेला परफ्युइम मस्त होता त्याचा मंद सुवास मन भरून घ्यावा असा. तिने विचारले आदित्य तुला कोणती गाणी आवडतात जुनी की नवीन ? तो म्हणाला,एकदम जुनी पन नाही 1990 ची गाणी आणि आताची थोडी फार.. आणि तुम्हाला जास्त करून जगजीत ची आणि गुरू ठाकूर ची गाणी आवडतात आय एम राईट मॅम. ओहह बराच अभ्यास केला आहेस माझ्या बद्दल. हो ना तुमचे एफ बी अकॉंउंट असे म्हणत तो हसला. ती म्हणाली हो आणि सिंगर अरजीत आवडतो. पुढे नॅचरल आईसक्रिम चे दुकान होते तसे आदित्य म्हणाला,मॅम आईस्क्रीम खाऊयात का? ओके ती म्हणाली. त्याने कार बाजूला पार्क केली. दोघे दुकाना जवळ गेले त्याने विचारले कोणता फ्लेवर ? ती म्हणाली,केशर पिस्ता तो एक केशर पिस्ता आणि त्याला चॉकलेट आईस्क्रीम घेऊन आला. म्हणाला,मला चॉकलेट खूप आवडत माझ्या कार मधये डेअरी मिल्क कायम असते.तुम्हाला आवडत का मैम . हो मला सुद्धा डेअरी मिल्क आवडत. दोघे गप्पा मारत आईस्क्रीम खात होते. खाऊन झाल्यावर ते निघाले तिथे थोडा अंधार होता त्यामुळे एका दगडाला स्मिताच्या अंगठ्याची जोरात ठेच लागली ती वेदनेने कळवळली आई ग असे म्हणत तिने आदित्यच्या दंडाला घट्ट पकडले. मैम काय झाले आर यु ओके त्याने विचारले. ती म्हणाली आदित्य बहुतेक पायाला ठेच लागली आहे. तिच्या लक्षात आले की तिने त्याचा दंड पकडुन ठेवला आहे ती सॉरी म्हणत बाजूला झाली. इट्स ओके मॅम म्हणत त्याने तिचा हात पकडला आणि कार कडे नेले.तिला त्याने कारच्या मागच्या सीट वर बसायला सांगितले आणि त्याने समोर ड्रॉवर मधून फर्स्ट एड बॉक्स आणला.तिच्या अंगठयाला जोरात लागले होते रक्त ही येत होते तो म्हणाला, मैम थोडेसे चुनचून होईल मी रक्त साफ करून बँडेज बांधतो. हा ती म्हणाली. आदित्य मेडिसिन घेऊन जखम साफ करू लागला तसे न राहून तिने त्याचा हात घट्ट पकडला तिला ते चुनचूनने सहन झाले नाही तसा आदित्य बोलला,डोन्ट वरी मैम आता नाही दुखणार असे म्हणत त्याने बँडेज बांधले. थँक्यू आदित्य ती म्हणाली. तो फक्त हसला.त्याचा तो परफ्युम वातावरण हलकं करत होता हवाहवासा सुगंध होता . तिला खूप आवडला ती म्हणाली आदित्य छान आहे तुजा परफ्युम .अहो मॅम तुम्हाला लागलं आहे ना मग मधून कुठे हे परफ्युम आले. काही नाही असंच.. ती म्हणाली आणि दोघे निघाले.स्मिता च्या घरा जवळ ते आले तशी स्मिता म्हणाली आदित्य चल ना घरी कॉफ़ी घेऊ. नको आता खूप लेट झाला आहे,पुन्हा कधी तरी बाय द वे तुम्ही उद्या सुट्टी घ्या आणि रेस्ट घ्या. नाही रे इतकं कुठे लागलं आहे बरी आहे मी ती म्हणाली. ओके देन बाय गूड नाईट टेक केयर मॅम. असे म्हणत आदित्य तिथून निघाला. ती घरी आली आणि बेड वर पडून आदित्य सोबत घालवलेला वेळ आठवू लागली ठेच लागली तेव्हा तिने त्याला दंडाला पकडले परत औषध लावताना त्याचा हात पकडला हे आता आठवून तिला आपल्या वेधळेपणाचें हासू येत होते पण आदित्य च्या सहवासात तिला सेक्युर वाटत होते आपली काळजी घेणार कोणी आहे ही भावना मनाला सुखावत होती कारण या भावना ती कधी जगलीच न्हवती. पण दुसरे मन म्हणत होते हे चुकीचे आहे,मी आदित्य चे आयुष्य का बरबाद करू त्याला त्याच्या वयाची कोणीही मुलगी भेटेल पण तो ही मला बहुतेक लाईक करतो त्याच्या डोळ्यात तस दिसत आणि स्त्रीला तर ते लगेच जाणवत. पण नको हा विचार मनातून काढून टाकू आणि त्याला ही समजावू की हे ठीक नाही. मला नाही आहेत कोणत्या भावना तुझ्या बद्दल आदी,,,आणि स्मिता चे डोळे भरून वाहू लागले हे सुख या आधी ही न्हवत आणि आता ही नाही असे वाटून ती रडत राहिली पण नजरे समोरून आदित्य चा चेहरा काही केल्या जात न्हवता. ती रडत रडत केव्हा तरी झोपी गेली. सकाळी आवरून स्मिता ऑफिस ला आली. आदित्य आला होता तिच्या अगोदरच त्याने विचारले मॅम पाय बरा आहे का आता. हो ,ती इतकच म्हणाली आणि केबिन कडे गेली. आदित्य ला जाणवले की स्मिता आज नेहमी सारखी नाही वाटत गुड मॉर्निंग सुद्धा नाही बोलली. असू दे कदाचित बरे वाटत नसेल असा त्याने विचार केला. तो प्रॅक्टिस करत बसला होता पण त्याच मन स्मिताकडेच होते त्याच सारख लक्ष तिच्या कडे जात होते पण स्मिता कामात होती पण ती मुद्दामच आदित्य कडे दुर्लक्ष करत होती हे फ़क्त तिला माहीत होते.

दुपारी जेवायला सगळे एकत्रच बसायचे,सगळे आले पण अजून स्मिता आली न्हवती. राहुल म्हणाला, आदि जरा बघून ये स्मिता का नाही आली. हा म्हणत तो तिच्या केबिन कडे गेला तर स्मिता दोन्ही हातावर आपलं डोकं ठेवून झोपली होती ,तिला ताप आला होता ,डोकं ही दुखत होते सो ती मान टेकवून पडली होती. आदित्य ने आवाज दिला मॅम काय झाले बरे वाटत नाही का? पण तिने उत्तर नाही दिले मग आदित्य ने तिच्या हाताला टच करून हलवले त्याला तिचा हात गरम लागला. तो पुन्हा म्हणाला मॅम तुम्हाला ताप आला आहे उठा बघू . मग स्मिता ने मान वर करून पाहिले तर तिचे डोळे ही लाल झाले होते. आदित्य म्हणाला मी बोललो होतो नका येऊ आज तरी आलात त्या जखमे मुळे ताप आला आहे. हे बोलत असताना राहुल तिथे आला होता हे पाहायला की या दोघांना वेळ का लागतो आहे. आदित्य म्हणाला,राहुल सर मॅमना ताप आला आहे आणि काल तिच्या पायाला लागलेले ही त्याने सांगितले. राहुल म्हणाला स्मिताला डॉ कडे न्यावे लागेल आता 2 वाजत आले कोण डॉ भेटेल? तसा आदि म्हणाला,डोन्ट वरी सर माझा मित्र आहे डॉक्टर इथे जवळच आहे तो असेल आता मी नेतो मॅम ना. ओके राहुल म्हणाला. स्मिता त्याला म्हणाली राहुल अरे बरे वाटेल मला इतकं काही नाही झालं. असू दे तरी ही जा तू आदित्य सोबत राहुल बोलला. मग आदी आणि स्मिता डॉ कडे आले तिला नवीन बॅडेज बांधले आणि इंजेक्शन औषधे दिली. आदि बाहेर होता तेव्हा त्याला राहुल चा फोन आला राहुल म्हणाला,आदी स्मिताला ऑसिडीटी चा त्रास होतो ,जेवणाची वेळ निघून गेली तर डोकं दुखते तिचे तेव्हा दोघ काहितरी खा मग या इकडे . बर चालेल आदित्य म्हणाला. स्मिता बाहेर आली आणि आदित्यला पैसे देऊ लागली तसा तो म्हणाला मॅम डॉ अजिंक्य माझा मित्र आहे तो आपल्या कडून पैसे नाही घेणार.दोघे कार मध्ये बसले स्मिता त्याला म्हणाली आदित्य थँक्यू सो मच . इट्स ओके मॅम. त्याने कार एका हॉटेल पाशी थांबवली. चला मॅम आधी खाऊन घेऊ मग ऑफिस. नको आदित्य मला भूक नाही तू खाऊन घे.ती म्हणाली. मॅडम तुम्हाला मेडिसिन ही घ्यायच आहे आणि जेवला नाहीत तर अँसीडीटी होईल हो ना? हे कोणी सांगितले तुला स्मिता बोलली. राहुल सर असे म्हणत आदी हसला. त्याची स्माईल म्हणजे मिलियन डॉलर स्माईल होती. ती चल म्हणत हॉटेलमध्ये गेली. दोघांनी खाऊन घेतलं तिथेच आदित्य ने तिला औषधे घ्यायला लावली. तसा आदी म्हणाला,मॅम आता कशाला तुम्ही ऑफिस ला येता,मी घरी सोडतो तुम्हाला आणि राहुल सर काही बोलणार ही नाहीत. तुम्ही विश्रांती घ्या. चालेल स्मिता म्हणाली तिला गरज होती विश्रांती ची. आदित्य तिला सोडून ऑफिस ला आला. त्याच लक्ष मात्र स्मिता कडेच होत.

संध्याकाळी आदित्य घरी निघाला तेव्हा राहुलने त्याला आवाज दिला . तो केबिनमध्ये गेला. राहुल म्हणाला,आदित्य मला थोड बोलायचे होते,राहुल ला थोडी शंका आली होती. बोला ना सर आदी म्हणाला. राहुल बोलू लागला,हे बघ आदी मला थोडा डाऊट आहे बट आय एम नॉट शुअर. तुला स्मिता आवडते का? तुला तिच्या बद्दल किती से माहीत आहे आणि तुझा खरच तिच्यात इंटरेस्ट आहे का जस्ट टाईमपास आणि टाईमपास करत असशील तर प्लिज तिने खूप दुःख भोगले आहे उगाच तिला नवी स्वप्न नको दाखवू. सर मी हे तुमच्याशी बोलणारच होतो,हो सर आय रियली लाईक हर आणि मी लग्न ही करायला तयार आहे मी मनापासून प्रेम करतो त्यांच्या वर! अस असेल तर मी तुझ्या सोबत आहे आदित्य. तिच्या नवऱ्याने खूप त्रास दिला आहे ती फक्त मुलीसाठी जगत होती,प्रेम जिव्हाळा तिच्या आसपास पण भटकत नवहता. खूप सोसले आहे तिने तुझं खरच प्रेम आहे म्हणतोस तर ती खूप लकी असेल . हो सर मी स्मिता मॅम ना जरा ही दुःख देणार नाही त्याचं आयुष्य सुखाचे असेल आणि त्यांच्या मुली सह मी त्यांचा स्वीकार करायला तयार आहे.ईट्स ग्रेट आदित्य,मला तुझ्या कडून हीच अपेक्षा होती. मग कधी प्रपोज करतो राहुल ने विचारले. लवकरच,,बाय सर अँड थँक्यु म्हणत आदी बाहेर पडला. आता लवकरच स्मिता मॅम शी बोलायच असे त्याने ठरवले. दुसऱ्या दिवशी स्मिता ऑफिस ला आली सर्वांनी तिची चौकशी केली. आदित्य ने विचारले मॅम हाऊ यु फील नाऊ. फाईन आदी नकळतपणे तिच्या तोंडुन आदी बाहेर आलं तशी ती सॉरी आदित्य म्हणाली . तो म्हणाला मला आदी च म्हणा आवडेल मला. आणि तिच्या कडे पहात हसत गेला. आज स्मिता शी बोलायचे असे त्याने ठरवले होते. ऑफिस सुटल्यावर आदी स्मिताला म्हणाला,मॅम मी सोडतो तुम्हाला घरी. चालेल ती म्हणाली.दोघे कार मधून निघाले रेडिओ सुरु होता कार मध्ये . आर जे संग्राम ट्रॅफिक चे अपडेटस देत छान छान गाणी ही ऐकवत होता. वातावरण मस्त झाले होते सूर्य केशरी रंगाची उधळण करत अस्ताला चालला होता. स्मिता ही छान गाणी ऐकण्याच्या मूड मध्ये होती. आदी म्हणाला,मॅम मला थोडं बोलायचे होते. मग बोल ना परमिशन कशाला मागतो. आपण कार एका बाजूला थांबवू आणि बोलूयात चालेल का कारण हॉटेल ला आता गर्दी असेल आदी म्हणाला. ओके चालेल स्मिता म्हणाली. जरा दूर आणि शांत ठिकाणी आदित्य ने कार थांबवली. तो म्हणाला मैम मी सरळ सरळ मुद्यावर येतो माझे तुमच्या वर जीवापाड प्रेम आहे मला तुम्ही खूप आवडता आणि तुम्ही म्हणाल तेव्हा लग्न करायला मी तयार आहे. माझा स्वतंत्र एक फ्लॅट आहे आणि बिझनेस ही आहे. घरी आई वडील आणि मोठा भाऊ आहे.घरचे सगळे आधुनिक विचारसरणी चे आहेत त्यामुळे आपल्या लग्नाला काही प्रॉब्लेम नसेल. स्मिता म्हणाली आदित्य माझ्या बद्दल काय माहिती आहे तुला? मला काही जाणून ही घ्यायचे नाही आहे,तुम्ही मला आवडता इतकं मला पुरेसे आहे तो म्हणाला. तरीही मला तुला सांगायचे आहे आदित्य हे शक्य नाही मूळात मी तुझ्या पेक्षा वयाने मोठी आहे .


क्रमशः......



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama