Adhyayan Mishra

Drama Romance Action

4.8  

Adhyayan Mishra

Drama Romance Action

मुस्कुराने की वजह तुम हो भाग-२

मुस्कुराने की वजह तुम हो भाग-२

5 mins
362


जिविशा ने बाहेर आल्यावर इकडे तिकडे बघितलं आणि समोर नावाची पाटी धरलेला माणुस तीला दिसला, मग ती मनातल्या मनात म्हणाली,ही तनु पण ना ? मी स्वतः टॅक्सी केली असती पण ही ने आधीच सर्व व्यवस्था करूंन ठेवली आहे ."

गाडीजवळ उभा असलेला माणुस ही त्या बाजुला बघुन हसला आणि नेम प्लेट खाली करत गाडीत बसला.

जिविशा ही दार उघडुन आत बसली, तेव्हांच...?

पलीकडचा दरवाजा उघडला आणि एक माणूस आत बसला आणि दरवाजा बंद केला.

जिविशा ने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले."

त्या व्यक्ती ने जिविशाकडे बघुन चष्मा काढला ?"

ड्रायव्हर ही मागे वळुन पाहु लागला...??"

त्या व्यक्ती ने ड्रायव्हरला गाडी सुरू करण्याचा इशारा केला...? "

ड्रायव्हर ने सरळ बघत गाडी सुरू केली..."

जिविशा आता तिची पर्स शेजारी ठेवत म्हणाली, "प्रॉब्लेम काय आहे तुमचा ? ड्रायव्हर गाडी थांबवा ? त्यांना खाली उतरवा, मगच आपण पुढे जाऊ."

ड्रायव्हर म्हणाला "सॉरी मॅडम पण तुम्ही...?"

त्या व्यक्ती ने ड्रायव्हरचे बोलणे पुर्ण होण्यापुचर्वीच त्याचे बोलणे थांबवत "तो व्यक्ती खिडकीतुन बाहेर बघत म्हणाला." गाडी चालवा? कुणाच्या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक नाही."

जिविशा "मी तुम्हाला फ्लाइट मधुनच पाहत आहे,तुम्ही तर माहिती नाही कुठले सम्राट समज आहात स्वतःला ?"

त्या व्यक्ती ने काहीच उत्तर दिले नाही, फक्त त्याचे रुंद खांदे जिविशाला दिसत होते! नीटनेटके कापलेले स्टायलिश केस, व्यवस्थित इस्त्री केलेली पॅन्ट आणि शर्ट घातलेला, चेहरा अगदी कणखर, निश्चयी माणसासारखा दिसत होता."

तो अतुलनीय मोहक आणि देखणा होता यात शंका नाही, पण तो खूप गर्विष्ठ होता! जणू काही उत्तर न देणे हाच त्याने आपला अभिमान मानला होता. इतकं सगळं असुनही त्याची उपस्थिती जिविशाला अजिबात सुखावणारी नव्हती."

जिविशा पुन्हा म्हणाली ऐका ? मला कोणता ही भांडण नको आहे, मी माझ्या पहिल्या विमान प्रवासाबद्दल खुप उत्साही होतो, पण देवाच्या कृपेने सर्व उत्साह थंडावला आहे, कारण तुमचा सहवास मला मिळाला?पण आता मला शांत मनस्थितीत माझ्या कामावर जायचे आहे, म्हणुन प्लीज या गाडीतुन उतरा. तुम्हाला बघुन,तर तुम्ही श्रीमंत दिसत आहात, वाहनांची कमतरता नाही, तुम्ही जिथे हाक मारराल तिथुनच गाड्यांची लाईन शुरू होईल, मग तुम्ही मला का त्रास देत आहात?जिविशा तिचे शब्द बोलताच गप्प झाली."

 तो व्यक्ती ड्रायव्हरच्या बाजुच्या आरशात पाहिलं आणि मग खिडकीच्या बाहेर पाहु लागला."

ड्रायव्हर ने घसा साफ केला आणि म्हणाला, "मॅडम, तुम्ही चुकीच्या गाडीत चढलात! हे वाहन साहेबांचे आहे आणि मी त्यांचा ड्रायव्हर आहे, नाव प्लेट तुमच्या लक्षात आली नसेल!

आणि साहेबांना जास्त बोलणे आणि हसणे आवडत नाही."

जिविशा लगेच म्हणाली, "नाही! मी नीट पाहिलं होतं, "jiv" लिहिलं होतं मग...?" हे सांगताना जिविशा आता शांत झाली आणि हा सगळा प्रसंग तिच्या मनात चित्रपटासारखा फिरला.

'jiv' लिहिलेला पाहुन तीने जीवशा समजले आणि आता लक्षात आले की तिच्या पुढे तर हा महापुरुष चालत होता, ड्रायव्हरने ह्याला पाहुन हसत हात खालती केला होता.जिविशाचा गैरसमज झाला होता की तो तिला पाहुन हसला."

" हे देवा "? एका दिवसात दोन दोन गैरसमज आणि तेही एकाच व्यक्ती सोबत ? का देवा ?मला त्रास देऊन तुला कंटाळा आला नाही का? तु माझ्यासाठी किती परीक्षांचे नियोजन केले आहेस?" जिविशा मनातल्या मनात म्हणाली ?"आता ती त्या घमंडी कडे पाहत म्हणाली, "मला इथपर्यंत लिफ्ट दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद, खरंतर माझा गैरसमज झाला होता, सॉरी.....?? पण आता चुक लक्षात आल्याने मला गाडीतुन उतरायचे आहे..गाडी थांबवा…?”

त्या व्यक्ती ने आता ड्रायव्हरकडे न बघता आदेश दिला. गाडीची स्पीड वाढवा?"

ड्रायव्हर ने लगेच गाडीची स्पीड वाढवली..."

जिविशा आता त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली, "काय पध्दत आहे ही ? तुम्ही स्पीड वाढवायला कसे सांगु शकता?"

मी म्हणाले गाडी थांबवा? त्या व्यक्तीवर आता पण कोणताही परिणाम नाही झाले जीवशाने चालत्या गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, "गाडी थांबवा नाहीतर मी उडी मारेन?"

त्या व्यक्ती ने लगेच तिचे मनगट पकडले आणि पुढच्याच क्षणी दार बंद झालं, मग त्याने जिविशाचे मनगट सोडले..."

जिविशा आरशावर हात मारत म्हणाली," काय जबरदस्ती आहे ? मला गाडीतुन उतरू दे, नाहीतर मी ओरडेन." "मी? मी...?? मी....?

तो घमंडी व्यक्ती आता गर्जना करत म्हणाला, "मी ? मी...?? मी...? गप्प बस..?"एकदमच चुप्प...?"

जिविशा रागाने लालबुंद चेहऱ्याने त्याच्याकडे पाहु लागली.

तो व्यक्ती ही त्याचा चष्मा काढत त्याच्या राखाडी डोळ्यांनी

जिविशाच्या काळ्याभोर डोळ्यात बघत म्हणाला, " जिथुन या गाडीत तुम्ही ढल्यात तिथुन प्रत्येक अंतरावर मुबलक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ?त्यात हे दिसुन येईल की तुम्ही एका श्रीमंत माणसाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने स्वतः ताच्या गाडीमध्ये आपल्या मर्जीने बसल्या आहात ?आणि जेव्हा तुमचा हेतु पुर्ण झाला नाही, तेव्हा आता तुम्ही ओरडुन त्याला चुकीच्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न करत आहात ? जे करायचे ते करा पण कोणाची बदनामी होईल याचा विचार करा कारण फ्लाइटपासुन आतापर्यंत झालेल्या गैरवर्तनानुसार गाडी थांबणार नाही, मग तुम्ही तुमच्या कामावर पोहोचु किंवा नका पोहोचु...??"

जिविशा तिरस्काराने रक्ताचे घोट पीत म्हणाली, "तुम्ही तुमची मर्यादा ओलांडत आहात, माझ्यावर इतका घृणास्पद आरोप करण्याची हिंमत कशी झाली?"

तो व्यक्ती म्हणाला, 'हेच समजावण्याचा प्रयत्न केला होता मी, की माझ्याशी बोलताना तुमची मर्यादा विसरू नका ? कारण एकदा का तुम्ही तुमच्या मर्यादा विसरलात की तुम्ही माझ्या मर्यादेत याल आणि माझ्या मर्यादेत येणाऱ्यांना मी त्यांची मनमानी करू देत नाही? जीवांश कुलकर्णी नाव आहे माझा ? भविष्यात माझ्या समोर जीभ उघडण्यापुर्वी तिचे नीट वजन करा आणि मग तोंड उघडा."

जिविशा चिडुन त्याच्याकडे पाहत होती...?"

जिवांश ने तिची वैयक्तिक वैशिष्ट्ये नोंदवली, "ती सडपातळ नव्हती, पंजाब्यान सारखा सुंदर पुर्ण शरीर होता, तिच्या गालावर थोडेसे डिंपल्स होते ? त्वचा निष्कलंक आणि चमकदार होती, सुरकुत्या नव्हत्या ? ती खरोखरच एक सुंदर स्त्री होती."

जीवांश ने तिच्यावरू नजर हटवली आणि खिडकीतुन बाहेर बघताना तो त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक मुलीपासुन अलिप्त होता.कारण प्रत्येक मुलगी त्याच्यासमोर घिरट्या घालायची, दिवसाला रात्र म्हणला तरी हा मध्ये हा मिलवत होत्या ? हेच कारण होते की जीवांशला कोणती ही मुलगी तिच्या दिशेने आकर्षित करण्यासाठी यशस्वी होऊ शकली नाही.पण ही मुलगी वेगळी होती, आपल्या तीस वर्षांच्या आयुष्यात त्याला पहिल्यांदाच इतकी मजबुत स्त्री भेटली जी त्याच्यावर प्रभावित झाली नाही, परंतु ताच्यावर टीका करण्याचे धाडस केले. या स्त्रीच्या त्याच्या बद्दलच्या भावना जणु निष्क्रीय होत्या, ती त्याच्यावर प्रभावित झाली नाही, ना व्यक्तिमत्वाने, ना त्याच्या संपत्तीने….??"

जिविशा ने रागाचा घोट घेत पलीकडे खिडकीतुन बाहेर पाहात राहिली.तिच्या हे देखिल लक्षात आलं नाही की फोनाची घण्टी कव्हा पासुन वाजत आहे ?जेव्हा गाडी थांबली तेव्हा ती झटक्याने समोरच्या सीटवर जोरात धडकली. तिचे छोटे नाक

सीटवर आदळल्या मुळे लाल झाले, ती आपला नाकावर हात फिरवत गाडीच्या दाराकडे पाहु लागली."दार उघडल्यावर ती पटकन दरवाज्यातुन बाहेर निघुन अशी पळाली,जसे कोणत्या भुता पासुन पाठलाग सुटला असावा ?

जीवांश ने एक नजर त्या पळत असलेल्या बाईकडे टाकली आणि मग टाय घट्ट करून बाहेर निघुन गेला.

क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama