Adhyayan Mishra

Drama Romance

4.9  

Adhyayan Mishra

Drama Romance

मुस्कुराने की वजह तुम हो

मुस्कुराने की वजह तुम हो

1 min
653


छोटासा ट्रेलर...... 

पाच वर्षांच्या मुलाच्या हठ्ठावर त्याचे केस कापण्यासाठी जिविशा पुरुषांच्या सलुनमध्ये बसली होती,अस्वस्थ देखील वाटत होते की पुरूषांच्या सलुनमधे महिला ? हे थोडं विचित्रच होतं ?

आधीच काही ग्राहक होते, त्यामुळे वेळ लागत होता. पुन्हा - पुन्हा तीच्या मनात येते की इथुन निघुन जाऊ का ? रस्त्यावरच्या भैया कडुनच कापुन घेईन ? गडबडी मध्ये पडलेल्या जिविशाला ना बसवत होतं ना उठवत होतं.

त्याचवेळी एक हैंडसम आणि देखण्या व्यक्तीने सलुणच्या आत प्रवेश केला, त्याचा चेहरा मजबूत होता,तरीही तो आकर्षक दिसत होता की कोणाचीही नजर त्याच्याकडे जाईल.

त्याने बसलेल्या लोकांकडे एक नजर टाकली आणि मग आरशात केस ठीक करु लागला.त्याने आरशात मागे खुर्चीवर बसलेल्या जिविशाकडे पाहिले, तेवढ्यात जिविशानेही आरश्या कडे पाहिले.आणि नजर भिडताच असहज जिविशा ने नजर हटवत बाहेरच्या दिशेने पाहु लागली.

तीच्या या कृतीवर, त्या व्यक्तीने पुन्हा तीच्याकडे आरशात पाहिले,जिविशाने नजर उचलली नाही पापण्या मिचकावतच ती बाहेर पाहत होती ! मग थोड्या वेळाने आत बघण्याच्या बहाण्याने आरशावर नजर टाकताना दुसऱ्या बाजुला पाहिले तर जिविशाच्या या कृतीवर तो व्यक्ती हसायला येऊ लागला आणि हसणे थांबवुनही त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी हास्याची रेषा उमटली.

तो बाहेर पडला आणि गाडीत बसताना ड्रायव्हरला म्हणाला,चला जाऊया!"ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केल्यावर मागे बसलेल्या व्यक्तीने मॅगझीन उचलले आणि मग मॅगझिन बाजूला ठेवून खिडकीतून बाहेर बघत स्वतःशीच म्हणाला, "वय २८ च्या आसपास असेल आणि कृती बघा बावीसच्या मुलींची ?? "तो घड्याळ तळहातावर धरून हसला आणि चष्मा आपल्या डोळ्यावर चढवला.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama