Jyoti gosavi

Classics Children

4.0  

Jyoti gosavi

Classics Children

मुले वाढवताना

मुले वाढवताना

5 mins
450


पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने घरात स्त्रियादेखील 5/7 असायच्या. आजे सासू, आत्ते सासू, चुलत सासू, मावस सासू ,एखादी आश्रित म्हणून राहिलेले लाल आलवणवाली स्त्री, त्यामुळे मुलांची जबाबदारी त्यांच्या आयांवर कमी पडायची. 

बहुदा मुले या सार्‍या आजी असणाऱ्या स्त्रियांच्या हातामध्ये लहानाची मोठी व्हायची. मारही खायचे, आणि संस्कारही व्हायचे. 


त्यानंतर जशीजशी न्यूक्लियर फॅमिली होऊ लागली, तसे घरच्या गृहिणीची जबाबदारी वाढली. 

बहुतेक ठिकाणी बापाचा रोल हा घरांमध्ये अर्थार्जन करणे एवढाच राहायचा. पण मुलांच्या शाळा, ट्युशन, अभ्यास, त्यांचे लहानपण, त्यांचे दुखणे, डॉक्टरकडे नेणे, सण समारंभाला नातेवाईकांकडे घेऊन जाणे. सासर माहेर दोन्हीकडची नाती निभावून नेणे, दोन्हीकडच्या नातेवाईकांना एंटरटेन करणे, हे घरातल्या बाईकडे आलं. 


त्यात अजून जेव्हा पासून ती बाई नोकरी करू लागली, तिला नोकरी पण आणि संपूर्ण घराची आघाडी पण, मुलं , मुलांचे संस्कार ,त्यांचे दोन दोन डबे भरणे, एक शाळेचा ,एक क्लासचा, त्यांचे इतर छंद उदाहरणार्थ डान्स क्लास, कराटे क्लास, या सगळ्या गोष्टींच्या वेळा सांभाळणे .

हे घरातली स्त्री नोकरी सांभाळून करू लागली .त्यात तिची दमछाक होऊ लागली. अर्थात पर्यायाने चिडचिड देखील होते ,त्याचा राग मुलांवर निघतो. कारण नवऱ्याला त्याच्या जबाबदाऱ्या सांगणे ,किंवा विभागून देणे त्या काळच्या स्त्रीला शक्य नव्हते.  माझ्या काळात किमान दोन किंवा तीन मुले तरी होती.

 पण आता, एक दहा वर्षांपूर्वीपासून च्या काळात जिथे एकच मूल आहे, ते प्रचंड लाडोबा करून ठेवलेलं असतं. 

त्याला कोणतीही गोष्ट नाही म्हणून ऐकण्याची सवय नसते. तो किंवा ती आपल्या घरातील प्रिन्स असतात. आणि त्यामुळे पुढे या मुलांचे लग्न संबंध टिकत नाहीत


आता मुलांपेक्षा मुलांचे आईबाप पॅनिक झालेले आहेत .

घरात आजीबाईचा बटवा नसल्यामुळे, छोट्या छोट्या आजारपणावर ती घरगुती औषध उपचार माहित नाही. पैसा असतो डॉक्टरांची भर करायची तयारी असते. पण घरगुती उपाय मात्र करायची तयारी नसते, किंवा माहीतच नसतात .


अगदी आत्ता माझ्या डोळ्यापुढे एक उदाहरण आलय, म्हणून मला हा मुद्दा आठवला. 

माझ्याच एका ओळखीच्या बाईची मुलगी, तीन दिवसाच्या बाळाला घेऊन आली. सर्दी झाली म्हणून, बरं !अगदी मामुली सर्दी आहे. पण आली डॉक्टर कडे, डॉक्टर ही नव्या पिढीचा पाईक, तुरंत एवढ्याशा मुलाचा एक्स-रे लिहिला. त्या एवढ्याशा तीन दिवसाच्या मुलाला रेडिएशन ला एक्सपोज केल्यामुळे, मी डॉक्टरला पण ओरडले आणि एक्स-रे वाल्याला पण ओरडले. पण तोपर्यंत एक्स-रे होऊन गेला होता.  खरे तर मुलाला थोडाफार कफ झाला असेल, तर मिठाच्या पुरचुंडीने शेकणे, घरच्या घरी वाफ देणे ,धुरी देणे, या गोष्टी असतात. 

पण आता यांनाच माहीत नाही, तर मुलींना कुठून माहित असणार. 


अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपल्याला मुले होतात, तेव्हा पहिल्यांदाच आपण देखील आई बाप झालेलो असतो. त्यामुळे आई बाप म्हणून ती गोष्ट आपण देखील पहिल्यांदा पाहिलेली असते. तेव्हा आपण तिला पहिल्यांदाच रिऍक्ट होत असतो.  साधारणत ज्यांना दोन मुले आहे त्यांना हा अनुभव असतो ,की पहिल्यांदा मोठ्या मुलाने एखादी चूक केली असता, त्याला शाब्दिक मार किंवा एखादा फटका देखील पडतो .

परंतु तीच चूक जेव्हा दुसऱ्यांदा लहान भावंड करतं, तेव्हा आई-वडिलांची रिएक्शन खूप लाइट असते. कधी कधी तर न्यूट्रल असतात. 

कारण एकदा तीच चूक त्यांच्या डोळ्यासमोर होऊन गेलेली असते ,आणि त्यांना अनुभव असतो ,की मुले अशा गोष्टी करतात. 

अशा वेळी मोठ्या भावंडाची मानसिकता अशी होते की, याच चुकीसाठी मला आई अशी ओरडली होती, किंवा आईने मला मारलं होतं, किंवा बाबा रागावले होते. पण आता आपल्या लहान भावाला मात्र ते काही बोलत नाहीत. म्हणजे माझ्यापेक्षा तो लाडका आहे.

आता हे सारं तरीपण मी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या गोष्टी बोलत आहे. कारण आताच्या जमान्यामध्ये नक्की काय घडतं त्याचा मलाही अनुभव नाही.  परंतु मी जी चाईल्ड सायकॉलॉजी शिकलेली आहे, त्यामध्ये सिबलिंग जेलसी नावाचा प्रकार आहे. 


साधारणता छोटे भावंड घरात येतं ,तेव्हा मोठ्याला ईनसिक्युरिटी ची भावना निर्माण होते. त्यात लहान मुले घरातील सगळ्यांचे अट्रॅक्शन असल्यामुळे, आता माझ्याकडे कोणी पहात नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही, या रागांमध्ये स्वतःकडे अटेन्शन सिकिंग टेंडन्सी असते. 

मग लहान भावंडाला चिमटा काढ, त्याचे कपडे लपव, त्याची दुधाची बाटली लपव ,ते हळूहळू पाऊल टाकायला लागले असेल असेल तर, त्याच्या पायात पाय घालून त्याला पाड, कधीतरी कुठून तरी ढकलून दे .

किंवा कधी कधी स्वतः मध्येच एखादे खोटे से आजारपण डेव्हलप करतो की पोट दुखतंय डोकं दुखतंय डोळे दुखतात त्यांची अशी मानसिकता तयार होते .

अशावेळी मोठ्या ची मानसिकता समजून घ्यावी लागते,  बाळ पोटात असल्यापासून त्याची मानसिक तयारी करावी लागते ,त्याला सांगतानाच हे सांगावे लागते की तुला खेळण्यासाठी अजून एका बाळाला आणत आहोत. तेव्हा कुठे त्या मुलाची हळूहळू मानसिकता तयार होते. 

प्रत्येक व्यक्तीमध्ये इदो(id)  इगो (ego)आणि सुपरइगो असतात. लहान मुलांच्या मध्ये प्रथम इद डेव्हलप असतो.

त्यामध्ये त्याला फक्त इतकेच माहीत असते कि मी खच्चून रडायचे, ओरडायचे, म्हणजे मला ही गोष्ट मिळते.

म्हणजे अगदी पाळण्यातल्या बाळाला सुद्धा ही गोष्ट कळते की, आपण रडलो की आई आपल्याला जवळ घेते. 

त्यामुळे आता मुल पोटात असल्यापासून पोटावर ते हात ठेवून त्याच्याशी गप्पा मारायच्या असतात तेव्हापासून चाइल्ड सायकोलॉजी सुरू होते पूर्वीची भूमिका होती पोर रडले तरच जवळ घ्यायचे, ती सोडून आता मुलांसाठी खास वेळ द्यावा लागतो

******************"**


आताच्या आया जाहिरातीला भुलून, साऱ्या गोष्टी मुलांना देण्याचा प्रयत्न करतात. 

 आईबाप दोघेही आपल्या मुलांना बेस्ट ऑफ बेस्ट देण्यात यावं, याकडे पाहतात .परंतु त्यामुळे ती मुले स्ट्रगल करण्याचे विसरून जात आहेत.


 त्यामुळे मुले वाढवताना प्रत्येक गोष्ट, त्यांच्या तोंडातून शब्द निघाला की त्यांना हजर करू नये. प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक वयात, किंमत कळू द्यावी. 


 कारण तोंडातून मागेल ती वस्तू हजर केल्यानंतर, त्याची त्याला किंमत कळत नाही. 

आताच्या मुलांना वेकेशन हा प्रकारच राहिलेला नाही. ऊठसूट सगळ्या सुट्टी मध्ये एक तर पुढचा अभ्यास, पुढचा अभ्यास, पुढची इयत्ता हे चालू आहे. 

त्यामुळे त्यांना अतिरिक्त टेन्शन असते.

 त्यात मगआईबाप पंधरा दिवस इकडे तिकडे फिरायला घेऊन जातात .

ते बरोबर आहे पण त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकांच्या ओळखी करून द्या. त्यांच्याशी नातेसंबंध करावे ,कसे जपावे, याचे ज्ञान द्या. त्याची गोडी त्यांना लागली पाहिजे. 

कारण आता कित्येक घरात आपण असे पाहतो की, कोणी पाहुणे आले की मुले  आपल्या बेडरूम मध्ये जाऊन बसतात. 

ना आलेल्या पाहुण्यांशी बोलतात, ना कोणत्या संभाषणात भाग घेतात. किंवा हे आपले कोण लागतात तेवढे ही विचारण्याची तसदी घेत नाहीत. 


शहरांमध्ये मुलांचं जग फार सीमित झालेला आहे त्यांना शाळा घर आणि ट्युशन याशिवाय काही माहीत नसतं त्यासाठी त्यांना वेकेशन मध्ये गड किल्ले दाखवा निसर्गात न्या गाव असेल तर गावच्या शेतीवाडी मध्ये घेऊन जा त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि जीके चारी अंगाने फुल्ल पाहिजे नुसता आपलं पुस्तकी किडा बनवू नये


सिंगल पेरेंट

मुले वाढवताना अजून एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे सिंगल पेरेंट्स प्रॉब्लेम. 

या मध्ये बहुतांशी सिंगल पेरेंट मध्ये स्त्री एकटी असते. आणि तिला आई आणि बाप दोन्ही भूमिका कराव्या लागतात. नोकरी सांभाळून सगळं सांभाळताना प्रसंगी तिची चिडचिड होते. 

अशावेळी सगळ्याच गोष्टीला स्वयंसिद्धा न बनता, थोडसं नमतं घ्यावं सासर माहेर कोणाची शक्य असेल त्याची मदत घ्यावी. कारण मुलांना आई आणि वडील दोन्ही हवे असतात. ती फुल्फिल्मेंत करण्यासाठी अजून एखाद्या व्यक्तीची आवश्यकता असते एकट्याच स्त्रीला सगळ्या भूमिका पार पाडता येत नाही किंवा मुलेदेखील हळूहळू सतत तू आणि मी दोघेच या प्रकाराला कंटाळतात असे अजून मुले वाढवताना चे अनेक मुद्दे असतील जे मला आठवले, पटले, ते मी आज सादर करत आहे. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics