akshata kurde

Drama Tragedy

4.3  

akshata kurde

Drama Tragedy

मुक्या मुलीची डायरी

मुक्या मुलीची डायरी

6 mins
350


   चिन्मयी.. लहान असताना सगळे तिला चिमु म्हणायचे. पण जस जशी ती मोठी होत गेली, सगळ्यांना कळलं की तिला बोलता येत नाही. हळू हळू करता चिमु ची मुकी कशी झाली हे तिलाच कळाले नाही. ती सुद्धा काय करणार घरातले तिला मुकी, ए मुके अस करत संबोधत पण तिला काही ऐकु नसत मग लोकांचा कसा तिला राग येईल. घरात अठरा विश्व दारिद्र्य आणि बाप दारुडा असल्याने घरावर लक्ष च नसायचं. तरीही चिमु जीवनाच्या खडतर वळणातही आनंदी राहून बागडे. अगदी गोड होती ती. लाल चुटुक ओठ, मोठे डोळे, दाट काळेभोर केस ज्याची ती स्वतःच दोन्ही बाजूने बो बांधून त्यांना लाल रिबिनी लाऊन सजवायची. स्वतःही आनंदी राहायची आणि दुसऱ्यांना पण आनंद द्यायला नेहमी पुढे असायची. पण कोणी कधीच स्वार्थाशिवाय तिच्याशी बोलत नसे. तिला कधी कोणी प्रेमाने हाक सुद्धा मारली नव्हती. थोडा वेळ ती रडत मग पुन्हा सगळ विसरून ती पहिल्या सारखी होत. 


तिची आई तिला जरा आराम करू देत नसत. कपडे धुणे, भांडी घासणे, विहिरीवर जाऊन पाणी भरून आणणे. ती विहिरीवर पाणी भरत असताना तिच्या मैत्रिणी तिची पाठ दिसताच तिच्या बादलीतल पाणी स्वतःच्या बादलीत टाकत. ती मुकी असल्याने काहीच कोणाला बोलू शकत नव्हती. तरीही हातवारे करीत ती बोलण्याचा प्रयत्न केला की त्या सगळ्या मिळून तिच्यावर हसत. संध्याकाळ पर्यंत ती एकटीच विहिरी जवळ राहत. तिला त्या मुद्दाम भुताच्या गोष्टी हातवारे करून तिला सांगून घाबरवत. बिचारी हातवारे करत गयावया करायची तिच्या सोबत थांबण्यासाठी. पण सगळ्या निघून जात. उशिरा आल्याने आई चा मार सहन करावा लागत. त्यात तिच्या आई चं ह्यावर समाधान होत नसे. ती तिला उलातन गरम करून चटके देऊन स्वतःच विकृत समाधान करून घेत. तिला ओरडता ही येत नसे. कधी कधी तिला विचार पडे की नक्की ही माझी सख्खी आई चं असेल ना. पण दुसरी कडे तिची आई तिच्या लहान बहीण चं आणि भावाचं खूप जीव लावून करत. ते बघून तिला खूप एकाकी वाटे. आई अशी वागते म्हणून दोघं भावंड सुद्धा तिला तूच्छतेची वागणूक देत. त्यांना सगळ आयत हातात लागायचं. ते तिला अजिबात मोठी बहीण मान देत नसत. उलट तिचा येता जाता पान उतारा करत, अपमान करत. बिचारी चिमु सगळं निमूटपणे बघत आणि मोठं मन करून सगळ विसरून जात. चिमु आता वीस वर्षांची झाली होती. तिच्या जगण्यात काहीच बदल नव्हता. उलट दिवसेंदिवस तिचे हाल होत. तिच्या लहान बहिणीचे चांगल स्थळ बघून लग्न लावून दिलं. लग्नात तर चिमु नवरी पेक्षा ही सुंदर दिसत होती. तिने लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांची सरबराई केली. तिचं कौतुक कोणी करत तर तिची आई नाक मुरडत तिथून निघून जाई. पाठवणी च्या वेळी तिच्या बहिणीने तिला ढुंकूनही न बघता निघून गेली. तिच्या अश्या वागण्याने ती खूप रडली. काही वर्षांनी तिच्यासाठी स्थळ आलं. मुलगा बारा वर्षांनी मोठा होता. त्याच्याशी काही तिच्या आईला देणं घेणं नव्हतं. लग्नाचा सगळा खर्च आम्हीच करू ह्या बोलण्यावर तिची परवानगी न घेताच परस्पर होकार कळवून टाकला. ती मात्र ह्या वेळी कोलमडून पडली. साध्या पद्धतीत लग्न लागलं. तिला शेवटची आशा होती की आपल्या आयुष्यात ही छान राजकुमार येईल आणि माझं जगणं रंगीबेरंगी करून टाकेल. पण तिने आता तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा लग्नातील अग्नि फेऱ्यात मनातून काढून जाळून टाकल्या. ज्या घरासाठी तिने स्वतःला वाहून घेतलं होतं. ती जात असताना कोणी तिच्यासाठी साधं खोटं सुद्धा रडलं नाही. ती मात्र आता तिच्या पुढच्या आयुष्यासाठी तयार झाली.नवी नवरीचे नव्याचे नऊ दिवस तरी असतात पण तिचं अस्तित्व फक्त रांधा वाढा उष्टी काढा. दिवसभर ती इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक, भांडी, कपडे सगळं तिचं करत होती. घरी आल्यापासून तिच्याशी कोणी प्रेमाने सोडा माणुसकीने सुद्धा दोन शब्द आपुलकीचे बोलले नव्हते. ती सगळ्यांचं हसून पाहत होती. तरी तिला काही मुकी वहिनी मिळाली अस तिला कळेल अस हातवारे करून हिणवत. सगळ्यांना पोटभर खाऊ घालून स्वतः शेवटी बसायची. कधी कधी तिलाही उरत नसत. तिची काहीच तक्रार नसायची. तिचा नवरा सगळ पहायचा पण त्याच्या आई समोर बोलायची त्याची हिंमत नव्हती. त्याच्या घरचे हुंडा मिळाला नाही उलट सगळा लग्नाचा खर्च आपल्याला चं करावा लागला, आणि बदल्यात मुकी मुलगी मिळाली असं सारखं म्हणत.ती रोज रात्री जागून स्वतःला दोष देत अंधारात स्वतःच दुःख लपवायची. ती तिचं सगळं दुःख एका डायरीत लिहून काढायची. तिची डायरी ही जणू तिची मैत्रीण च झाली होती. थोडावेळ का होईना पण तीच मन मोकळं व्हायचं. तिने लहानपणा पासुन ते आतापर्यंत सगळ एक एक करत लिहून काढलं. जस की देवाला सगळ्या गोष्टी सांगून मन मोकळं करत होती. तिला जगण्याची इच्छा नव्हती तरीही ती शांतपणे सगळं सहन करत जगत होती. रविवार च्या दिवशी ती मार्केट मध्ये गेली होती. तिच्या नवऱ्याचं तिच्या उशीखाली असलेल्या डायरी कडे जातं. त्याला सुद्धा खूप दिवसापासून ती काय लिहते हे पाहायचं होतं, पण ते शक्य होत नव्हत. आज त्याने ठरवलं होतं की काहीही करून ती डायरी तिच्या येण्याआधी वाचून काढायची. 


त्याने डायरी उघडली तशी त्यावर चं हेडिंग वाचलं


"मुक्या मुलीची डायरी" 


त्याचा अर्धा जीव तिथेच निघून गेला. त्याने भराभर ती डायरी वाचून काढली. आतापर्यंत तिने किती हाल सहन केले याचा विचार करून ती डायरी त्याच्या हातून नकळत निसटून पडली. त्याच्या अश्या असण्याचा त्याला खूप गिल्ट वाटत होतं. कितीही झालं तरी ती बायको होती ती त्याची. तिचा स्वभाव त्याला खूप आवडतं होता पण त्याने तसं कधी व्यक्त केलं नव्हत पण मनात त्याने काहीतरी निर्धार केला आणि ती येण्याची तो वाट पाहू लागला. ती येताच त्याने तिची आणि स्वतःची बॅग भरू लागला. तिला विचारावेसे वाटत होते की कुठे जायचयं पण तिने सगळ सोडून दिलेय ठरवल्यावर तीही नशीब जस न्हेईल तसं ती जाईल असा विचार करून गप्प त्याच्या मागे जाऊ लागली. हातात बॅग घेऊन मुलगा आणि पाठीमागे सून पाहून त्याच्या आई ने त्याला थांबवलं. तसं तो म्हणाला, 


"आई मी चाललोय ह्या घरातून निघुन. चिन्मयी ला सुद्धा घेऊन जातोय. अजुन मला नाही बघवत तिचे हाल. please आम्हाला अडवू नकोस."

पहिल्यांदा मुलाला अस बोलताना पाहून त्याची आई ओरडली त्याला."अरे हिने कान भरलेत का तुझे? थांब हिला वठणीवर आणते की नाही बघ""आई कान भरवायला तिला बोलता तरी आलं पाहिजे ग. ती तर तुमची मुकी वहिनी आहे बरोबर की नाही.?" असं म्हणत त्याने पाठीमागे असलेल्या घरच्यांवर नजर फिरवली तसे त्यांची मान शरमेने खाली झाली."मोलकरणी सारखं राब राब राबून घेतलं तिला पण कधी तिला काय वाटतं तिचं अस्तित्व आपण जाणून नाही घेतलं. का तर लग्नाचा सगळा खर्च आपल्याला करावा लागला आणि बदल्यात मुकी मुलगी मिळाली. आई पण तू हे पाहिलंस का माझ लग्न ठरत नव्हतं तू आणि बाबांनी किती स्थळ पहिली पण आजकालच्या मुली फार आगाऊ असतात कोणी साधी मुलगी च शोधू जी तोंड वर करून बोलू शकणार नाही. अस तूच म्हणाली होतीस ना मग जर हिच्या जागी जर दुसरी असती तर तिने तरी इतकं सहन करून घेतलं असतं का? तुम्ही सगळे विचारा तुमच्या मनाला.. अरे मी सुद्धा काय विश्वासबोलतोय, खरा मुका तर मी होतो जे डोळ्यांदेखत होऊनही मुका झालो होतो बोलता येत असूनही. चल चिन्मयी आज मी खऱ्या अर्थाने वाचा फोडलीय तुझ्या साठी नाही तर आपल्या साठी. चल इथून क्षणभर सुद्धा नाही राहायचं आपण."

तितक्यात आई पुढे येऊन त्याचा हाथ धरते आणि चिन्मयी समोर हाथ जोडून माफी मागते. चिन्मयी ला लगेच परिस्थितीच गांभीर्य कळतं. ती लगेचच त्यांचे हाथ खाली करून त्यांना मिठी मारते. दोघीही खूप रडतात. सगळ्यांना आपल्या चुकीची जाणीव होते. तिचा दिर स्वतःहून समोर येऊन झाला प्रकार तिच्या भाषेत हातवारे करून सांगतो. तिला च बसत नाही. नवऱ्याकडे पाहून ती आज स्वतःला खुप नशीबवान समजत होती. तिला त्याच खुप कौतुक वाटलं. त्यानंतर सगळे येऊन तिची माफी मागतात. तीही आधीसारखी हसत सगळ्यांना मोठ्या मनाने माफ करून टाकते. सेलिब्रेशन म्हणून त्याने आईस क्रीम आणली असते. आज सगळे हसत एकत्र गप्पा मारत हॉल मध्ये जमलेले होते. गप्पांना उधाण आलं होतं. ती आज साऱ्यांना अस पाहून खळखळून हसत होती. तो तिला असच हसत राह खूप गोड दिसते म्हणून ईशारा करतो. ती लाजून वळते आणि आईस क्रीम साठी चमचे आणायला ती किचन मध्ये जात असतानाच तिचं लक्ष बेडरूम मध्ये खाली पडलेल्या डायरी कडे जातं. तिला सगळ समजून जातं. आज तिच्या डायरी ने खरी मैत्रीची साथ दिली होती. तिच्या स्वप्नांचा राजकुमार तिला मिळवून दिला होता. सोबत आता सुखी संसाराची रंगीबेरंगी उधळण केली आणि तिच्या आयुष्याला वळण मिळाल.काही वेळा बोलता येत असूनही मुके होतो,

ऐकता येत असूनही बहिरे होतो...

मदत करा त्या प्रत्येक व्यक्ती ला,

जो खरचं गरजेचा भुकेला असतो..


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama