STORYMIRROR

vaishali Deo

Classics

3  

vaishali Deo

Classics

मोल

मोल

2 mins
180

कार्तिक एक सहावीत शिकणारा मुलगा होता. त्याला वडील नव्हते आणि आई कष्ट करून मोलमजुरी करून उदर निर्वाह करायची. शहरातल्या एका झोपडपट्टीत त्याची एक झोपडी होती. त्यात तो त्याची आई आणि लहान बहिण राहत असतं. कार्तिक एक अतिशय शहाणा मुलगा होता.त्याला आपल्या परिस्थितीची खूप जाण होती.

   त्याला शिकून खूप मोठे व्हायचे होते. त्याची आई पण त्याला शिक्षणाला उत्तेजन देत असे.

एकदा त्याला एका दुकानातला शर्ट खूप आवडला होता. त्याने तसे आईला सांगितले. पण त्या शर्टची किंमत खूप जास्त होती. त्याच्या आईला परवडणारी नव्हती. त्यामुळे ती त्याला नाही म्हणाली. तो कितीही शहाणा असला तरीसुद्धा, त्याला शेवटी काही इच्छा होत्या. त्याच्या आईने नाही म्हटल्यावर तो खूप नाराज झाला. कधीकधी नाही म्हटल्यावर आपल्या इच्छा खूप जास्त जागृत होतात. तसेच त्याचे झाले. आणि तो आईवर खूप रागावला जेवायलाही तयार नव्हता.

रात्री न जेवता झोपला. त्याच्या आईला खूप वाईट वाटले की परिस्थितीमुळे आपण आपल्या मुलाला हवे ते घेऊन देऊ शकत नाही.

शेवटी आई ती आईच.तिने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

पण कार्तिक काहीच समजून घेत नव्हता. त्याला खूप वाईट  वाटत होते आणि रागही आला होता. आपलीच परिस्थिती अशी का आहे? हा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला होता.

दुसऱ्या दिवशी त्याच्या आईने शाळेचा डब्बा तयार केला आणि कार्तिकला उठवले. त्याच्या मनात खूप मळभ साचले होते. तो उठला आणि तसाच शाळेत गेला. काहीही न खाता पिता पिता. त्याने डब्बा घेतला नाही.त्याच्या आईला खूप वाईट वाटले पण ती परिस्थिती समोर हतबल होती.

      शाळेतल्या मधल्या सुट्टीची  वेळ झाली तसा त्याच्या आईने विचार केला आणि डबा घेऊन ती सरळ शाळेत गेली. कार्तिक एका कोपऱ्यात बसून रडत होता. ती डबा घेऊन त्याच्याजवळ सरळ गेली. पहिल्यांदा आईला बघून त्याला  धक्का बसला. पण तो सुखदच होता. पण तसे त्याने दाखवले नाही व तो दूर निघून गेला. पण त्याच्या मागे आई आली आणि त्याला समजावले..त्यावेळी त्याला खूप आनंद झाला. त्याला कळले की शर्टा पेक्षा माझ्या आईचे प्रेम मला महत्त्वाचे आहे.

   त्या निरागस मुलाला हे ही कळले की पुढे जाऊन आपण पैसा तर कमवू शकतो पण आपल्या आईचे प्रेम हे अमोल आहे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics