vaishali Deo

Others

3  

vaishali Deo

Others

संस्कार

संस्कार

1 min
147


"मम्मा, कशी ग तू? तुला एवढेही समजत नाही का? तू माझ्या मनासारखी एकही गोष्ट करत नाहीस."तनया सतरा वर्षांची, नंदिता ची मुलगी तिला असेच काहीसे बोलत होती. नंदिताला ती इतकी चिडचिड का करते? तेच समजत नव्हते. ती सारखी नंदिताला "तुला बाकीच्या मम्मां सारखं राहता येत नाही. घर पण तू खूप छान ठेवत नाहीस. तुला वेगवेगळे नवीन पदार्थ बनवता येत नाही."असे म्हणत असे. नंदिता पण वैतागली होती. तिला तनयाशी कसे वागावे हेच कळत नसे. पण आज तनयाच्या मैत्रिणी घरी आलेल्या होत्या.

 त्यांना तनया सांगताना नंदिता ऐकत होती की,"माझी मम्मा खूप छान आहे. सगळे पदार्थ छान बनवते. ती खूप हुशार आहे. सगळीकडे सामावली जाते." हे ऐकून नंदिताच्या डोळ्यात दोन अश्रू आले. शेवटी आईचं प्रेम आणि संस्कार, आणि विश्वास या गोष्टी मुलं कधीही विसरत नाहीत.


Rate this content
Log in