vaishali Deo

Inspirational

3.5  

vaishali Deo

Inspirational

ती

ती

2 mins
159


सावनी ने  नेहमीप्रमाणे सकाळी 'वर्तमानपत्र' उघडले. तेवढ्यात फोन वाजला. प्रहार या संस्थेतून तिला महिला सक्षमीकरण करता मिळालेला पुरस्कार जाहीर झाला होता. तसेच वर्तमानपत्र उघडल्याबरोबर समोर तिला तीच बातमी दिसली.

   थोडा वेळ 'खिन्न' मनाने 'ती 'समोर बघत बसली. तिला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे समजले नाही.

    थोडा वेळा करता ती भूतकाळात गेली. लहानपणी अत्यंत गरीब परिस्थितीत वाढली होती. तिचे आई-वडील खेडेगावी शेती करायचे म्हणून शिकण्याकरता तिला शहरात ठेवले होते. शहरांमध्ये तिला काही स्वतःच्या सख्या नातेवाईकांचे खूप वाईट अनुभव आले. तरीही त्याकडे ती 'दुर्लक्ष' करत असे. तिने फक्त शिक्षणाकडे आपले लक्ष केंद्रित केलं होतं. तिला माहिती होतं की शिक्षण घेतल तरच आपलं पुढील आयुष्य आपण चांगल्या प्रकाराने जगू शकू. 'समाजात' अजूनही महिलांना मानाचे स्थान नाही हे तिला समजले.

एकदा दिवाळीच्या दिवशी तर तिच्या सख्ख्या मामे भावाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण नशिबाने ती वाचली.  तिच्या मनातील या कटू आठवणी अजिबात जात नव्हत्या.

कॉलेजमध्ये गेल्यावर तिने नोकरी बरोबर शिक्षण सुरू केले.. लवकरच तिने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. व महिलांकरता ती कायद्याची लढाई लढू लागली. समाज हा निकोप असण्या करता महिलांना आदर देणे फार गरजेचे आहे, हे ती सगळ्यांच्या मनावर बिंबवू लागली.

  तिने समाजाबरोबर आपल्या घरातील लोकांची सुद्धा खूप काळजी घेतली. ती मनाने फार पक्की होती. आपल्या खेड्यातील आई-वडील व भाऊ बहिणींना तिने पूर्णपणे मदत केली. आपल्या बहिणींना सुद्धा शिक्षणात मदत केली व त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.

     याचमुळे तिला एका महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली.. समाजातील जे प्रथितयश लोक आहेत ,ते तिथे येऊन दानशूरतेच्या नावाखाली स्त्रियांचा उपभोग घेतात. या प्रकारामुळे ती खूप खिन्न झाली. स्त्रिया अजूनही उपभोगाचीच गोष्ट आहे का हा? तिच्यासमोर पडलेला मोठा प्रश्न होता तेव्हा तिने  चांगल्या लोकांबरोबर काम करून या वाईट प्रवृत्तीला आळा घालण्याची शपथ घेतली.

  याच दरम्यान स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी तिला परदेशी जाण्याची वेळ आली. तिथे तिने स्त्रियांच्या प्रश्नांवर  अभ्यास केला. तिथले प्रश्न आणि आपल्या देशातील प्रश्न यावर तिने शोध प्रबंध शोध प्रबंध सुद्धा लिहिला. आणि त्याचीच दखल म्हणून आज तिला प्रहार या संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर झाला होता. पण फक्त पुरस्काराच घेणे हे तिचे लक्ष्य नव्हते.

सावनी भूतकाळातून  वर्तमान काळात आली.रेडिओवर गाणे वाजत होते" हम होंगे कामयाब एक दिन". हळूच गालात ती हसली.

        


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational