Deepali Rao

Drama

3  

Deepali Rao

Drama

मन चिंती ते...

मन चिंती ते...

3 mins
838


संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाताना हायवेला हीsss गर्दी

हळूहळू वाहने पुढे जात होती

अगदीच मुंगीच्या वेगाने

कळायला मार्ग नव्हता काय झालेय ते...

इतक्यात टँsssटँsss आवाज करत मागून अँब्युलन्स

कसंतरी जागा अड्जस्ट करत बाकीच्या वाहनांनी अँब्युलन्सला वाट करून दिली

त्यातही दोघा वाहनांची हलकीशी गळाभेट झाली अन् मग वादावादीला सुरुवात

मला मात्र लहानपणापासूनच रस्त्यावरून ॲम्ब्युलन्स जातांना पाहिली की एक विचित्र दडपण येतं.

सावकाशीने गाड्या पुढे जात होत्या

पुढे गेल्यानंतर कळलं...

एका कारचा आणि ट्रकचा अॅक्सीडेंट झाला होता.

फारच वाईट.. गंभीर परिस्थिती होती.


उशिराने घरी पोहोचले

घरी गेल्या गेल्या पहिलं मिस्टरांना फोन लावला

ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेलेले रात्रीपर्यंत परत.

उगाचच चाचपडण्यासाठी फोन लावला.. निघाले की नाही.. कुठपर्यंत आले

रिंगही जात नव्हती बीप..बीप..

"The number you have dialed is either switched off Or out of coverage area

डायल केलेला नंबर.... "

ठीक आहे

रेंज नसेल

चहा प्यायला आणि थोडावेळ शांत बसले

डोक्यातून अॅक्सीडेंट जाईना

मग परत एकदा फोन ट्राय

परत तेच नुसतच बीप बीप

देवाला दिवा लावून स्वयंपाक उरकला

शेजारी पडलेल्या फोनकडे पाहिलं... लावून बघावा का

नंबर फिरवला

पुन्हा बीप...नो रिंग...नो कनेक्टिविटी..

परत परत फोन ट्राय करत राहिले

उशीरही बराच झालेला

नुसतीच बेचैनी

काय करावं सुचेनाच..

लहानपणी अशी चिंता मनाला कोरू लागली... ठरलेल्या वेळात परतणारं आपलं माणूस आलं नाही...की आजी घराच्या उंबरठ्यावर मीठ टाकून त्यावर फुलपात्र पालथं झाकून ठेवायची

माहित नाही हे सोल्युशन वर्क करतं का नाही... पण तेवढाच दिलासा

सुचत नव्हतं म्हणून मी ही केलं

सार्ं या श्रद्धा.. अंधश्रद्धां पलीकडे पोहोचले होते

माझंही माणूस सापडत नव्हतं न!


टीव्ही लावला..

कार्यक्रम पाहण्यात मन रमेना

चाळाच लागला होता हाताला सारखं फोन फिरवायचा

इतर वेळी नाही इतकं कातर होत मन

पण त्या दिवशी झालेल्या इन्सिडन्समुळे की काय.. कोण जाणे, उगाच मनात कालवाकालव होत होती

जेवायची तर इच्छाच उरली नाही. भूकच मरून गेलेली. डोकं दुखायला लागलं

यांच्या ऑफिसमधल्या मित्राला फोन लावला आणि बरोबर दुसरं कोणी गेलं आहे का त्याची चौकशी केली

हाय रे देवा!

नेमके एकटेच गेलेले

बेचैनी आता भितीत रूपांतरित झाली मनात काहीबाही यायला लागलं.

पोटात गोळा..

माणूस समोर असेल तर जाणवत नाही त्याचं अस्तित्व इतक्या ठळकपणे..

पण आपल्याला हवं तेव्हा नाही कनेक्ट झालं की मात्र जीव जातो

काय करावं..


देवघरात गेले

देव्हाऱ्यातल्या देवाला पाण्यात ठेवावे का?

अरे! आपली श्रद्धा नक्की कुठल्या देवावर

कोण ऐकेल इतकं पोटतिडकीने विनवलेलं.

का म्हणेल देवही..गरज असताना बरे येता माझ्याकडे ..

शेवटी गणपती, शंकराची पिंड आणि बालाजीची छोटी मूर्ती तिन्ही माझ्या साकड्यासाठी ताम्हणातल्या पाण्यात

इथेही मनाच्या कमकुवतपणाची कल्पना आली मला

हे असं कधीपासून हरवत गेले मी स्वतःला

कधीपासून मनाच्या शांतपणासाठी का होईना देवासमोर दोन मिनिटंही स्वस्थ बसले नाही

अशा कुठल्या डेडलाईन्स पार करण्यासाठी धावत राहिले


नाही नाही ते विचार आता मनात येऊ लागले.

आमचं रिलेशन...प्रेम...छोट्या-मोठ्या कुरबुरी...सारं सारं काही... उगाच आठवायला लागलं आणि डोळ्यातून पाझरायला लागलं

एकीकडे सतत फोन फिरवणं चालूच

कधीकाळी वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या.. सगळ्या वाईट्ट बातम्यांचा मनाभोवती पिंगा

मन चिंती ते वैरी न चिंती

सगळं..सगळं..हातातून उगाचंच निसटतंय की काय असं वाटत असताना बेल वाजली

झटकन जाऊन दार उघडलं तर दारात 'हे'

माझा अवतार पाहून म्हणाले,

"आजारी आहेस का? बरं वाटत नाही?

अग फोनच्या सिमची काहीतरी गडबड झाली आहे सकाळपासूनच. माझी केवढी पंचाईत झाली. कधीची उगाचच चिडचिड होतेय माझी. ना कोणाला फोन करता आला... ना कोणाचे घेता आले. कोण कोण शिव्या घालत असतील मला देव जाणे वैताग नुसता.

हो! पण तुला काय झालंय?

तू का अशी दिसतेयस? "


आता यांना काय सांगू

कप्पाळ!!!

मन चिंती ते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama