Leena Yeola Deshmukh

Abstract Others

3  

Leena Yeola Deshmukh

Abstract Others

मला भेटलेली दुर्गा

मला भेटलेली दुर्गा

2 mins
387



आत्तापर्यंत आयुष्याच्या वाटेवर अनेक दुर्गा मला भेटल्या.

गेल्या वर्षात तर जे कोरोना थैमान चालू होते त्या काळात बंदोबस्तातील खाकी वर्दितील दुर्गा,

दवाखाण्यात PPE किट घातलेली दुर्गा, स्वच्छते साठी कचरा उचलणारी दुर्गा,

स्मशाभूमीत प्रेतांना अग्निडाग देणारी दुर्गा अशा अनेक दुर्गांचे दर्शन घडले.


परंतु, आज मी माझ्या आयुष्यात असलेली आणि तिच्यात देवीचे अनेक रूपे बघितलेली, मला भेटलेली दुर्गेची कहाणी सांगतेय!


माझ्या वयाच्या दुसऱ्या वर्षापासून आमचा प्रवास चालू झाला. अर्थातच ती माझ्यापेक्षा वयाने लहान पण कर्तव्य जबाबदारी, समज यात नेहमी मोठी.


सर्वांसारखे आमचे बालपण एकदम मस्त हसत खेळत गेले.दोन बहिणी म्हंटले की तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना ! आलंच...नाही का? असे आमचे चिंचा सारखे आंबटगोड नाते.


सुसंस्कृत घरातील जन्म, आईवडिलांचे संस्कार, प्रत्येक गोष्टीला त्यांचा आशीर्वाद असणे हे तर अहोभाग्यचं!


माझ्या बारावी नंतर आणि तिच्या दहावी नंतर आमचा खरा प्रवास सुरू झाला. शिक्षणासाठी शहरात आलो. नवी माणसं, नवं शहर असे सारे काही नवे. तशी मी थोडी भोळी, घाबरट, मितभाषी त्याविरुद्ध ती बिनधास्त आणि परखड पणे बोलणारी.


तिचे कलाक्षेत्र गायन. तिच्या गायनात मला साक्षात सरस्वती चे दर्शन घडते.


कुटुंबावर कितीही मोठं संकट आले तरी ती त्या संकटाला, प्रसंगाला न डगमगता सामोरे जाते.


संकटांशी दोन हात करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्यात मला ब्रह्मचारिणी दिसते.


घरात अधूनमधून नवनवीन पदार्थ बनवून खाऊ घालते. कुटुंबीयांना बरं वाटत नसल्यास गरम गरम सात्विक आहार देते, काळजी घेते. मग म्हणावेसे वाटते हीच माझी अन्नपूर्णा आणि पार्वती माता.

 

ही तर तिची सौम्य रूपे आणि प्रसंगानुरुप रौद्र रूप सुध्दा दिसतात. 


कुटुंबासाठी लढते तेव्हा ती माता चामुंडा रुपात भासते.


माझ्यावर कोणतंही संकट आले तरी माझ्या सोबत राहून त्यातून मला अलगद बाहेर काढते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त मला सांगावेसे

तिचा जन्म नवरात्रीच्या सप्तमीचा आणि खऱ्या अर्थाने ती आमच्यासाठी कालरात्री ठरली.


सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके |

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||


आयुष्य येतात अनेक चढउतार

तेव्हा वाटतो या दुर्गेचा आधार !


माझी बहिण हीच नेहमी माझ्या सोबत असलेली आणि मला भेटलेली दुर्गा!


मनमोकळे करण्यासाठी

सुख दुःखाची सोबती

स्वतःपेक्षा जास्त जपत

अनपेक्ष प्रेम करणारी

कधीतरी भांडण करणारी

दुर्गा रूपातील भगिनी 

सात जन्म लाभावी !


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract