Leena Yeola Deshmukh

Tragedy Inspirational

3  

Leena Yeola Deshmukh

Tragedy Inspirational

बैलाचं आत्मकथन

बैलाचं आत्मकथन

1 min
2.1K


श्रावण मास सणांचा राजा म्हणून ओळखला जातो. सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला बैलपोळा महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे साजरा करण्यात येतो.

यास बेंदर असे देखील म्हणतात. 

यानिमित्ताने बैलाचं आत्मकथन.....🐂


तुमचा हक्काचा कामाचा सर्जा राजा |

शेती कामाला माझ्याशिवाय नाही मजा ||


बळीराजाचे दैवत असलेला मी सर्जा राजा.

मी वर्षभर तुमच्यासाठी शेतात काम करत असतो. 


सदैव असतो तत्पर मी कष्ट करावया |

करतो बळी राजा मजवरी अतूट माया ||


अन्नधान्य पिकवण्यासाठी शेतात नांगरणी पेरणी केली जाते. पाऊस पडतो आणि माझे काम चालू होते. सर्व कष्टाची कामे मी करत असतो. पण मी कधी तक्रार करत नाही आणि करणार देखील नाही. 


शिव शंभू यांचे वाहन म्हणून महादेवाच्या मंदिरात माझी पूजा करतात. तुमची इच्छा माझ्या कानात सांगतात जी मला महादेवां पर्यंत पोहचवायची असते.


झिझवतो माझी काया वर्षभर |

पोळ्याला असे आराम दिवस भर ||

सण माझा तुम्ही साजरा करतात |

गोडधोड पुरणपोळी खाऊ घालतात ||


आज तुम्ही माझा सण साजरा करतात. सकाळी उठून मस्त अंघोळ घालतात सजवतात.कोणतेही काम करू देत नाहीत.गावात माझी मिरवणूक काढतात. सवाष्ण माझी पूजा करतात.पुरणपोळी गोडधोड भोजन मला खाऊ घालतात. लहान मुले माझ्या आसपास राहतात सणाचा आनंद लुटतात. आनंदमय वातावरण असते. शेतकऱ्यांसाठी तर पोळा म्हणजे एक सर्वात आनंदाचा, उत्सवाचा दिवस.


खरं सांगायचं तर खूप खूप छान वाटते |

माझ्याविषयी तुमची कृतञता व्यक्त होते ||


आजच्या दिवशी तुम्ही माझ्याप्रती असलेले प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करतात आणि मी मनोमन सुखावतो! दुसऱ्या दिवसापासून परत जोमाने कामाला सुरुवात करतो.


तुमचाच,

सर्जा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy