Leena Yeola Deshmukh

Inspirational Others

2  

Leena Yeola Deshmukh

Inspirational Others

नकारातील सकारात्मक दृष्टीकोन

नकारातील सकारात्मक दृष्टीकोन

2 mins
214


सृष्टीची निर्मिती झाली तेव्हाच प्रत्येक गोष्ट एकमेकांशी निगडीत अथवा परस्परसंबंधीत असणार हे ठरलेलं असेल. सजीव आणि निर्जीव दोन्ही सृष्टीत घटक एकमेकांवर अवलंबून असणारे आहेत. आपल्या कानावर अनेक वाक्य पडतात त्या पैकी एक म्हणजे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. जसे दिवस म्हंटला की रात्र येते त्याच प्रमाणे आयुष्य म्हंटले की होकार नकार येणारचं!


"आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला पर्याय दोनच असतात....ते म्हणजे *स्वीकारणं किंवा नाकरणं*.... हे दोन पर्याय सोडून जे काही उरते ते म्हणजे *गुदमरणं*. भले त्या गुदमरण्याला तडजोडीचे नाव दिले तरी तडजोडीत *सामधान कमी आणि कुरकुरच जास्त* असते असे व.पू. काळे म्हणतात."


जीवन जगायचं तर असतंच मग कुरकूर करत जगण्यापेक्षा आनंदात जगावं!


बालपणापासूनच आपण हो किंवा नाही ऐकत असतो, हे करायचं ते नाही करायचं अशा सूचना ऐकतो. समजा एखादी व्यक्ती हट्टी असेल म्हणजे तिला नकार पचविण्याची क्षमता नसते. परंतु, अपयश असो वा नकार ते स्वीकारण्याची तयारी आपल्यात असावी.


मी इंजिनीअरिंगमध्येच्या शेवटच्या वर्षाला होती तेव्हा कॉलेजला कॅम्पस येत होते. मल्टी नॅशनल कंपन्यांचा पात्रता निकष ठरलेला असतो. तिथे मला अर्ज करायचा होता. मला इंजिनिअरिंग ला 


डिस्टिंक्शन मिळाले होते पण बारावीला कमी गुण असल्यामुळे मी त्यात पात्र नव्हते म्हणजेच मला नकार मिळाला. अर्थातच, थोडे वाईट वाटलेच की बारावीला अभ्यास करायला हवा होता असं. पण, भूतकाळावर भाष्य करुन गोष्टी निष्पन्न होणार नाही आता भविष्याचा विचार करून वर्तमानात कृती करायची असे ठरवले. मी या नकारातून खचून न जाता मास्टर्स करून चांगले करिअर करायचे ठरविले आणि *दृष्टीकोन सकारात्मक* ठेवला. आज मी चांगल्या कंपनी मध्ये कार्यरत आहे याचा मला *आनंद आणि समाधान* आहे.असा माझा अनुभव. 


असो, प्रत्येकाचा आपापल्या आयुष्यातली अनुभव निराळाचं! माझा अनुभव हेच सांगतो की, आयुष्यात तुम्ही जितके नकार ऐकणार तितके तुम्ही यशाच्या शिखराच्या जवळ जाणार. परंतू, त्यासाठी हवा तो सकारात्मक दृष्टीकोन.


"निंदकाचे घर असावे शेजारी" या उक्ती प्रमाणे आपल्याला कमी लेखणारे, टीका करणारे अनेक माणसे भेटतात ज्यामुळे आपण नकारात्मक होतो. याउलट आपण त्या टिकांना चोखपणे प्रत्युत्तर दिले तर तो आपला विजय ठरतो.


"टीकेचं रूपांतर प्रगतीत करा."


जगात अनेक थोर व्यक्तिमत्त्व होऊन गेले आणि आहेत. त्यांचा जीवनपट अभ्यासला तर एक गोष्ट लक्षात येते की, नकारांचा स्वीकार करत जिद्दीने, बुध्दीने, सकारात्मकतेने आयुष्यात चांगले कार्य केले आणि जीवन सत्कर्मी लावले.


भगवान श्री कृष्ण सांगतातचं, जे होते ते चांगल्यासाठीचं ! म्हणून नकार मिळाला तरी त्यातून चांगलेच होणार ही मानसिकता, दृष्टी खूप महत्वाची!


शेवटी एकच म्हणावेसे वाटते,


आयुष्यात मिळतात

होकार आणि नकार !

सकारात्मकतेने देवू

जीवनास नवीन आकार...!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational