मज वाटते...
मज वाटते...
मज वाटते सखी, गावी तुझीच गाणी
-ह्द्यात दाटल्या गं जीवघेण्या तुझ्या आठवणी
तू असो कुठेही , शोधेन मी तुला जळी, स्थळी, पाताळी
तू वसतेस साजणी , माझ्या ठायी - ठायी...
तू समोर येता बोलावयाचे काय ठरवून घेतो सर्वकाही
तू समोर असतांना ... असंबंध बोलंत जातो काही बाही
तू नसतांना... वाटतो आसमंत हा सुनासूना...
तू असतांना... नवचैतन्य येई जणु पाना फुला
होकार तुझा असो की, नकार साथ देण्यास
हरकत नसावी , मैत्री आपुली पुढेही टिकण्यास
कधी होशील तू माझी , हीच काळजी अंतरी
तरीही असशील तू माझ्यालेखी अर्धांगिणी
माहिती न मजला प्रीतीच्या खाणाखुणा
प्रेमनगरातील राजकुमार मी गं नवखा
का घेतलास सख्ये, नासमझपणाच बुरखा
राजकुमारी तू गं माझी होट बघ आनंदाने..