मिस्टर इंडिया अगेन
मिस्टर इंडिया अगेन
शहरात चाललेल चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत होतं. लोक लुटले जात होते. कडक बंदोबस्त असतानाही चोर मात्र मोकाट लुटत होते. पोलीस आपल्या परीने लढत होते पण हे चोर चतुर होते. डोळ्यादेखत आपले काम फत्ते करत दररोज पेपरमध्ये लुटपाटीच्या बातम्यांनी थेमान घातला होता वातावरण भयभीत बनत होतं.
"काय चाललंय ह्या शहरात एवढी हिम्मत यांची की कोणाची म्हणून भीती नाही अश्याने गुन्हेगारी अधिक वाढेल कुठेतरी हे थांबवलं पाहिजे मलाच काहीतरी करायला पाहिजे पण याचे धागेदोरे कसे मिळणार बाहेर एक चक्कर मारून येऊ बघू काय सापडत तर." मिस्टर इंडिया घराबाहेर पडला. समोरून भरधाव वेगाने मोटारसायकल त्याला त्याच्या दिशेने येताना दिसली लगेच त्याने आकाशात झेप घेतली व स्वतःला सावरलं.
"काय माणूस आहे एवढया वेगाने गाडी चालवतो मी होतो म्हूणन वाचलो नाहीतर अपघात झाला असता." जमिनीवर उतरून तो रस्त्यावर चालू लागतो पुढे पोहचता खूप गर्दी त्याला दिसली पोलीसही होते गर्दीतले लोक बोलत होते.
"दिवसा ढवळ्या खून करून लूट केली गेली काय चालू आहे जगणं मुश्किल झालं आहे." पोलीस पंचनामा करत होते एका व्यपाऱ्याचा खून करून लूट केली होती वातावरण ताणलं गेलं होत मिस्टर इंडियाचा राग अनावर झाला.
"ह्यांना धडा शिकवायलाच हवा." पोलीस लोकांची चौकशी करत होते गर्दीमधून एकटा समोर आला
"साहेब मोटारसायकलवर होते ते चार जण या बाजूने गेले आणि एकटा या बाजूनी डोक्यावर हेल्मेट घातलेलं म्हूणन चेहरा पाहू शकलो नाही."
"मग आणि काय सांगू शकतो हे बघ भिऊ नकोस जे पहिले ते सांग."
"साहेब नंबर नाही पाहिला गाडीचा पण एकाच्या हातावर गिटारचा टॅटू होता आणि तो ह्या दिशने गेला."
"बरं"
"टॅटू काय"
मिस्टर इंडिया तिथून निघतो आणि मगाशी मोटरसायकलवाला गेला त्या दिशेने चालू लागतो सगळयांच्या हातावर त्याची नजर खिळली होती बरेच फिरल्या नंतर तो एका फूटपाथवर येऊन थांबतो तिथे एक माणूस खेळणी विकत बसला होता त्यांनी आपल्या हाताला कपड्याने बांधले होते पण कापड पातळ असल्याने त्यामागे टॅटू असल्यासारखे दिसत होते मिस्टर इंडिया तिथेच उभा राहिला आपल्या तोंडाने त्याने वाऱ्याची झुळूक आणली तसा तो कापड जरासा उडाला आणि त्यामागे टॅटूच आहे हे पक्के झाले
"ह्याच्यावर नजर ठेवली पाहिजे."
एवढ्यात तो माणूस आपले सामान बांधू लागला सामान बांधून फूटपाथच्या कडेला ठेवले आणि आलेल्या मोटारसायकलवर बसून तो निघून गेला मिस्टर इंडियाने ही त्याचा पाठलाग केला मोटारसायकल बऱ्याच अंतर कापल्यानंतर मोटारसायकल एका रहिवाशी बिल्डिंगमध्ये शिरली. ते दोघे बिल्डिंगमध्ये शिरले आणि एका फ्लॅटच्या दरवाजावरची बेल वाजली. मिस्टर इंडियाही त्याच्या मागोमाग होता. दरवाजा उघडला ते आत गेले आणि पटकन दरवाजा बंद केला गेला. आतल्या खोलीत चार जण बसलेले. त्यात एक माणूस प्रतिष्ठीत होता.
"वेल डन तुम्ही चांगले काम केले आता वाटे ह्या आणि दोन महिण्यासाठी कुठेतरी पसार व्हा."
"यस बॉस"
"बॉस हा ह्याच्या बॉस शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती समाजसेवक म्हणून मान आणि हाच लोकांच्या पाठीत खंजीर खुपसतो दोन महिने काय तुम्हाला तर खडी फोडायला पाठवतो."
मिस्टर इंडियाने मोबाईलवर लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. लोकेशनही अॅड केले. क्षणात व्हिडिओ व्हायरल झाला. बाहेर येऊन दरवाजा लॉक केला पोलीस आणि काही लोकही तिथे पोहोचले. पोलीस येताच बंद दरवाजा आपणच उघडला. सगळेच अवाक झाले. पोलीस आत गेले आणि सगळ्यांना सरसकट खेचत बाहेर आणले. त्या प्रतिष्ठीत माणसाचा चेहऱ्यवरचा मुखवटाही उतरला होता.
"हेच आत होते तर व्हिडिओ कोणी केला. आपणच बंद दरवाजा कोणी उघडला," असे अनेक प्रश्न तिथे उपस्थित असलेले लोक करत होते. कोण म्हणत होते की देवाने शिक्षा दिली तर कोण व्यापाऱ्याच्या भूताने... मिस्टर इंडिया मात्र हसत होता त्याचे काम फत्ते झाले होते. मिस्टर इंडिया घरी पोहोचला. गुन्हेगार जेलमध्ये पोहोचलेले टीव्हीवर पोलिसाची मुलाखत चालू होती.
"कोणी व्हिडिओ अपलोड केला हे समजलं नाही. आमचे सायबर सेलवाले यावर काम करत आहेत. पण ज्या कोणी हा व्हिडिओ उपलोड केला. त्याने पुढे यावे ओळख गुपित ठेवण्यात येईल. पण खरंच आभार आज गुन्हेगाराला चपराक बसली."
"माझी ओळख मी कधीच सांगणार नाही. पण हा गुन्हेगारीला संपवण्यासाठी मिस्टर इंडिया अगेन अगेन मात्र येणार."
