SMITA GAYAKUDE

Drama Inspirational

3.5  

SMITA GAYAKUDE

Drama Inspirational

मीही काही कमी नाही...

मीही काही कमी नाही...

3 mins
564


स्नेहल पदवी पूर्ण करून एका छोट्या कंपनीत अकाऊंट विभागात काम करत होती.. मनाने एकदम निर्मळ आणि नेहमी हसतमुख असायची.. थोड्याच दिवसात तिचे संजयबरोबर लग्न ठरतं.. ती खूप खुश असते.. तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळालेला असतो.. दोघांचंही धूमधडाक्यात लग्न होतं आणि स्नेहल सासरी जाते.. लग्नाच्या दोन महिन्याच्या आतच तिला दिवस जातात.. आणि ती पुरती गोंधळून जाते.. स्वतःला मातृत्वासाठी तयार करत नऊ महिने कसे उडून जातात तिलाच कळत नाही.. आणि ती एका गोंडस मुलीला जन्म देते.. बाळाला सांभाळायला कोणी नसतं म्हणून ती जॉब सोडून मुलीला वेळ द्यायचं ठरवते.. संसाराच्या आणि बाळाच्या जबाबदारीत ती सर्वस्व झोकून देते.. मुलगी हळूहळू मोठी व्हायला लागते..


संजयचा स्वभाव आधीपासूनच अहंकारी असतो.. आता तरी ती घरातच असल्यामुळे तिला तू दिवसभर घरातच तर असते असं नेहमी टोमणा मारत असतो.. काही चुकलं की तुला काही जमतच नाही.. तिने कधी रागाने मोठ्या आवाजात बोलली तर बायको आहेस बायकोसारखंच राहा असं नेहमी सुनावत असतो.. मुलगीही हे सगळं बघतच मोठी झाल्यामुळे तीही आईला अशीच भाषा बोलायला लागते.. ती अभ्यास घेते म्हटल्यावर मम्मा तुला काही येत नाही गं.. मम्मा मला नको असं मोठ्याने बोलू, अशी नेहमी सुर लावून असते.. याचे स्नेहलला खूप वाईट वाटत असतं.. आपल्या घरात राहूनही आपलं असं कोणी नाहीय म्हणून स्वतःचं घरच तिला परकं वाटत असतं.. एके दिवशी ती असंच वर्तमानपत्र वाचत बसलेली असते... तेव्हा एक लेख तिच्या नजरेत पडतो.. "माझ्यातील सकारात्मकता..." त्यात असं लिहिलेलं असतं की तुमच्यावर केलेल्या प्रत्येक टीकेकडे जर सकारात्मक दिशेने पाहिलात तर जीवनात खूप यशस्वी व्हाल.. टीकेला रडत बसण्यापेक्षा यशस्वी होऊन उत्तर द्या..." हे वाचून तिच्यातली पूर्वीची स्नेहल जागी होते..


ती हळूच कपाट उघडते आणि आपली डायरी बाहेर काढते.. तिने लग्नापूर्वी त्या डायरीत एक लेख अर्धवट लिहलेला असतो.. ती तो पूर्ण करायचा ठरवते.. कारण तिला वाचनाची आणि लेखनाची खूप आवड असते.. पण लग्नानंतर जबाबदारीमुळे ती त्याला वेळ देऊ शकत नसते.. दुसऱ्या दिवशी नवरा ऑफिसला आणि मुलगी शाळेला गेल्यावर ती तो लेख पूर्ण करते आणि डायरी परत कपाटात ठेवून टाकते..


असेच काही दिवस जातात.. दुपारी वर्तमानपत्र वाचत असताना तिला एका कोपऱ्यात लेखन स्पर्धा आयोजित केल्याची बातमी दिसते.. विजेत्याला 5000 रुपयाचे बक्षीस आणि सन्मानपत्र मिळणार असतं.. तिच्या मनात येतं मी पाठवू का माझा लेख.. इतका चांगला तरी नाहीय तो.. इतक्यात आईचा कॉल येतो आणि ती आईला याबद्दल सांगते तर आई म्हणते... का नेहमी नकारात्मक विचार करते.. तुझा लेख एकदम उत्तम आहे हे स्वतःला सांग आधी मग बघ लोकांना आपोआपच आवडेल..

स्नेहल दुसऱ्या दिवशी तो लेख दिलेल्या पत्त्यावर पाठवून देते.. आणि परत आपल्या संसारात रममाण होते.. शनिवार असतो.. नवरा आणि मुलगी सुट्टी असल्याने घरीच असतात.. इतक्यात दारावरची बेल वाजते.. नवरा उघडतो तर एक पत्र स्नेहलच्या नावाने आलेलं असतं.. तो बायकोच्या नावावर पत्र बघून आश्चर्यचकित होतो.. उघडून बघतो तर स्नेहलचा लेखनस्पर्धेत पहिला क्रमांक आलेला असतो.. आणि एका प्रकाशन कंपनीकडून पार्ट टाइम जॉबसाठीही विचारलेलं असतं.. हे वाचून संजयला काय बोलावं कळतच नाही.. तो स्नेहलला बोलावतो आणि पत्राबद्दल विचारतो.. स्नेहल सगळी हकीकत सांगते तेव्हा संजय अवाक होतो तो म्हणतो.. "बायको मला कधी बोलली नाहीस तू एक चांगली लेखक आहेस ते..." स्नेहल हसून म्हणते.. "याचं सगळं श्रेय तुम्हालाच जातं..."


संजय म्हणतो.. "ते कसं काय?"


स्नेहल म्हणते.. "तुम्ही उठ सुठ मला टोमणे मारले नसते.. तुला काय येतं.. तुला काही जमतं नाही हे सुनावलं नसतं ना तर मी हे करूच शकले नसते.. म्हणून सगळं श्रेय तुम्हाला..."


संजय, "माफ कर बायको.. चुकलो गं मी तुला नेहमी कमी लेखून.. पण तू तर माझे टोमणे सकारात्मकतेने घेऊन तू काय आहेस हे दाखवून दिलं.. आजपासून मी तुला तुझी ही आवड जोपासायला नक्की मदत करेन."


हे सगळं लांबूनच मुलगी बघत असते.. धावतच ती आईला बिलगते आणि म्हणते.. "मम्मा खूप टॅलेंटेड आहेस गं तू.. आता तुझी अपूर्ण स्वप्ने पूर्ण करायची जबाबदारी माझी..."


आज स्नेहलला पहिल्यांदा ते घर आपलं असल्याचं जाणवतं.. उशिरा का होईना माझ्या सकारात्मक विचाराने मला माझंपण, नवरा आणि मुलगी मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो..


खरंच ना दोस्तहो.. लोकं ही नाव ठेवणारंच तुम्ही काहीही करा.. पण प्रत्येक टीकेला सकारात्मकतेने घेऊन स्वतःमध्ये बदल केले तर नक्कीच नाव ठेवणाऱ्यांचे तोंड तर बंद होतीलच पण तुम्हाला तुमचं स्वतःच खरं अस्तित्वही सापडेल.. सकारात्मकतेत खूप मोठी शक्ती आहे..


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama