SMITA GAYAKUDE

Others

3  

SMITA GAYAKUDE

Others

जगा आनंदाने एकमेकांची स्पेस जपत

जगा आनंदाने एकमेकांची स्पेस जपत

3 mins
1.2K


समीर आणि मेघाचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती.. आज समीर ऑफिसच्या मित्रांबरोबर पार्टीला जाणार होता.. संध्याकाळी जेव्हा तो पार्टीला गेला तेव्हा मेघा त्याला सारखं कॉल करून विचारात होती कुठे आहेस काय करतो कोण कोण आहे.. कधी येणार... तो तिचे कॉलवर कॉल बघून खूप संतापला.. तो मित्रांसोबत पार्टीही नीट enjoy नाही करू शकला... घरी गेल्यावर त्या दोघांचे भांडण झाले... कधी नाही ते मी मित्रांबरोबर पार्टीला गेलो होतो तर इतकी ही स्पेस तुला देता येत नाही... काय सारखं सारखं कॉल करून डिस्टर्ब करत होतीस..असच एकदा मेघा खूप वेळ मोबाईल वर चॅट करत बसली होती..थोडया वेळाने जेव्हा ती आत गेली तेव्हा समीरने तिचा मोबाईल पहिला तर पासवर्ड ठेवलेला होता... हे बघून समीर खूप चिडला. .मेघा म्हणाली... काय यार तू थोडी ही स्पेस देत नाही... माझ्या बालपणीच्या मैत्रिणीशी खूप दिवसाने बोलून मूड छान झालेला माझा... तू भांडण काढून घालवून टाकला सगळ...


असे प्रसंग नवरा बायको मध्ये नेहमीचेच आहेत.आज कोणत्याही मुलीला विचारलं की तुला कसला नवरा हवाय तर तीच एकच उत्तर असत... “ मला माझी स्पेस देणारा नवरा हवाय”. स्पेस, स्पेस द्यायचं म्हणजे नक्की काय?

स्पेस म्हणजे सुसह्य मोकळीक देणे.


नात्यातील स्पेस जी अतिशय महत्त्वाची आहे. ती प्रत्येकाला हवी असते आणि ती काही प्रमाणात नक्कीच गरजेची असावी पण ती इतकीही नसावी की ज्यामुळे अंतर प्रमाणापेक्षा जास्त वाढतच जाईल. प्रवासाला जाणं, सिनेमाला जाणं, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला/जेवायला जाणं अशा कित्येक गोष्टी दोघांपैकी कोणाच्याही एकाच्या डोक्यातल्या प्रतिमेत बसणाऱ्या नसतील तर मात्र यावर बंधनं घालण्याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे प्रयत्न होतो. म्हणजे, दुसऱ्याच्या निर्णयस्वातंत्र्यावर घाला घालून दुसऱ्याची ‘स्पेस’ कमी करण्याचा प्रयत्न होतो.अर्थातच, स्पेस देण्याचा थेट संबंध विश्वास या गोष्टीशी देखील आहे.


काही गोष्टी नवरा आणि बायको दोघांनीही लक्षात ठेवल्या तर असे प्रसंग टाळता येतील..पहिली गोष्ट म्हणजे नवरा किंवा बायको ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे.. तिला तीच एक स्वतंत्र मतं आहे हे मनापासून स्वीकारणं.. नवऱ्याने असच वागले पाहिजे.. तू बायको आहेस तर असं नाही वागायला हवं अशा चौकटीत राहण्यापेक्षा दोघांनी स्वतःच स्वतंत्र अस्तित्व जपत सहजीवन तयार करायला हवं.. ह्याचा अर्थ असा नाही की मनमानी कारभार करणं... दोघांनीही एकमेकांच्या मतांचा आदर करत मोकळीक देण..त्या मोकळीकतेला काही बंधने असू शकतात... पण ती इतकी असू नये की समोरचा गुदमरून जावा...

दुसरी गोष्ट आहे संवाद.. नवरा बायको दोघांमध्ये संवाद हवा... दोघांची जी स्वतंत्र स्पेस आहे त्यातला काही भाग हा ओव्हरलॅप होईल तर काही स्वतंत्र राहील ह्या बाबदीत स्पष्टता आणि मानसिक तयारी नात्यामध्ये असायला हवी... जी एकमेकांची स्वतंत्र स्पेस आहे ते दोघांनी पूर्णपणे मनापासून स्वीकारणे गरजेचे आहे... त्या स्पेसवर दोघांचा दृढ विश्वास असायला हवा..


तिसरी गोष्ट आहे लवचिकता... वेळोवेळी होणाऱ्या संवादातून एकमेकांबद्दलच्या अपेक्षा, आताची परिस्थिती, आपल्याला काय हवंय आणि कसं हवंय ह्याची स्पष्टता आलेली असू शकते... पण काही वेळेस ह्या स्पष्ट केलेल्या गोष्टींमध्ये बदल करायची गरज पडू शकते..तर त्याचा स्वीकार व्हायला हवा.. तेवढी लवचिकता आपल्याला दाखवता आली पाहिजे...उदाहरणं द्यायचं झालं तर तुम्हाला मैत्रिणीसोबत शॉपिंग ला जायचं आहे आणि आज नवरा low feel करत असल्यामुळे नाही म्हणतोय तर त्या वेळी स्पेसवरून वाद घालण्याऐवजी परिस्थिती समझून घेता आली पाहिजे..

स्पेस मायक्रो असावी अगदी दिसेल न दिसेल अशी. नाहीतर दरी बांधली जाण्यास वेळ लागत नाही. नात्यातील श्वास जीवित राहिला पाहिजे. प्रेम शंभर टक्के हवे असते पण पेरणी करताना स्पेसच्या नावाखाली हातचे राखून ठेवले जाते. स्पेस जपत एकमेकांना उमगून घ्यायचे असते. अन्यथा एकाच दिशेने जाणाऱ्या वाटा अचानक वाट बदलवून घेतात.


पुरेशी ‘स्पेस’ देत आपली नाती फुलवण्याचा, बहरवण्याचा, प्रगल्भ करण्याचा सतत प्रयत्न करणं हेच नवरा बायकोच्या सुखी संसाराचं रहस्य आहे.

चला तर मग जगूया आनंदाने एकमेकांची स्पेस जपत...


Rate this content
Log in