SMITA GAYAKUDE

Romance

3  

SMITA GAYAKUDE

Romance

तो मी नव्हेच

तो मी नव्हेच

4 mins
219


"अहो, आज जायचं का डिनर ला बाहेर?"


रेवा ऑफिसला जात असलेल्या राहुलला विचारली तसं नेहमीप्रमाणे त्याचं ठरलेलं उत्तर आलं..


"बघू ऑफिसमधून लवकर आलो तर.." म्हणत राहुल घराबाहेर पडला.


इकडे रेवा आपल्या उत्तराने नाराज झाली आहे ह्याचं सुद्धा त्याला काही वाटलं नाही..


रेवा आणि राहुल ह्यांची जोडी म्हणजे दोन तीरावर दोघे आपण..


राहुल हा खूपच शांत, कमी बोलणारा मुलगा होता..राहुलला वाटायचं, आहे ना माझं प्रेम मग दिखावा कशाला.. रोज डे ला रोज, किस डे ला किस, टेडी डे टेडी असलं काही मला जमणार नाही बाबा.. प्रेम व्यक्त करायला दिवस कशाला हवा..प्रेम ही दोघांमधली गोष्ट आहे.. कशाला जगासमोर दिखावा करायला हवा..


ह्याचा बरोबर उलट रेवाचा स्वभाव..


रेवा बोलकी, सगळ्यासोबत मिळून मिसळून राहणारी मुलगी होती..तिला वाटायचं, आहे ना प्रेम मग कर ना व्यक्त.. जर वॅलेंटाईन डे दिवशी दोघांनी कुठेतरी बाहेर जाऊन एकत्र वेळ घालवला, एकमेकांना गिफ्ट दिलं तर काय चुकीचं आहे..दररोज नाही ना आपण प्रेम व्यक्त करू शकत..


मागच्या वर्षी तर दोघांचा लग्नानंतरचा पहिला वॅलेंटाईन डे होता.. पहिला म्हणल्यावर नवऱ्याकडून खूप काही अपेक्षा असणारच ना.. तिला वाटलं राहुल सुट्टी घेऊन मस्त कुठेतरी फिरायला नेईल.. काहीतरी गिफ्ट देईल पण तो तर नेहमीप्रमाणे तयार होऊन ऑफिसला निघून गेला..


तीच ऑफिसमधून येईपर्यंत त्याचा आवडीचा डिश बनवून छान तयार होऊन बसली होती..


नवीन लग्न झालेल्या आपल्या मैत्रिणींचे नवऱ्याकडून मिळालेल्या गिफ्टचे, बाहेर फिरायला गेलेल्याचे फ़ोटोज बघून तिला खूप वाईट वाटत होतं..


"असा का आहे हा.. त्याला थोडंही वाटत नसेल का कि आपणही बायकोला घेऊन मस्त फिरायला जावं.. काहीतरी गिफ्ट द्यावं..निदान मिठीत घेऊन आय लव्ह यू तरी म्हणावं..."


रेवा राहुलचा विचार करून हळवी झाली होती..इतक्यात मोबाईलची रिंग वाजली.. तिची जवळची मैत्रीण नेहाचा कॉल होता..


"हॅलो डार्लिंग.. काय करतेस..फ्री आहेस ना कि राहुलसोबत बिझी? "


"हॅलो.. काहीही काय ग.. बोल.. फ्रीच आहे. राहुल तर ऑफिसला गेलाय.."


"अग माझाही नवरा गेलाय ऑफिसला.. पण येणार आहे लवकर तो.. कॅण्डल लाईट डिनर ला जाणार आहोत..

अग मला काय गिफ्ट देऊ कळतंच नव्हतं.. मग मस्त एक पर्फ्यूम घेऊन आली आहे..


तुझा काय प्लॅन आहे सांग.."


"काही नाही ग.. आपलं दररोजचंच.."


"अग असं कस.. मस्त काहीतरी प्लॅन कर ना तु.."


"मी करेन ग पण त्याला नाही आवडत ना.."


"अजिबात रोमँटिक नाहीय हं तुझा नवरा.. लग्नाला पंधरा - वीस वर्ष झालेल्या नवऱ्यासारखं वागतो.."


झालं आगीत तेल पडावं तसं नेहाशी बोलून रेवाचा मूड अजून खराब झाला..तिला राहुलचा खूप राग येत होता..


संध्याकाळचे पाच वाजले होते..चहाची वेळ झाली होती.. चहा ठेवायला स्वयंपाक घरात जाणार इतक्यात राहुलचा कॉल आला..


"चहा ठेव मलाही..बरं नाही वाटत आहे, लवकर येतोय घरी.."


"ओके.." रेवाने इतकंच बोलून कॉल कट केला..


पुढच्या वीस मिनिटात राहुल घरी पोहचला..


"काय झालं? "


"काही नाही? का?"


"बरं नाही म्हणालात ना?"


"अरे हो.. विसरलोच होतो खोटं बोललोय.. " राहुल मनातल्या मनात बोलला..


"अग काही नाही..सर्दी झालीय थोडी.. अंग पण दुखत आहे.. चहा झाला का?"


"हो आणते " म्हणत रेवा किचन मध्ये गेली..


सोफ्यावर बसून दोघे चहा पीत होते..रेवा काहीच बोलत नव्हती..बोलायची इच्छाच नव्हती..


"मस्त गरम पाण्याने अंघोळ करून येतो म्हणजे बरं वाटेल..टॉवेल आणून दे नंतर " म्हणत राहुल बाथरूममध्ये घुसला.


रेवा टॉवेल आणायला बेडरूममध्ये गेली तर त्याचा टॉवेल बेडवर पडला होता.. राहुलने कपाटातून आधीच काढलंय वाटतं..


"रेवा.. टॉवेल दे ग.." आवाज दिल्यावर टॉवेल घेऊन जाणार इतक्यात तिला टॉवेल खाली एक पिशवी दिसली..


टॉवेल हातात पकडत तिने ती पिशवी हातात घेतली तर त्यावर एक कागद ठेवलं होतं..


"हा ड्रेस घालून पटकन तयार हो.. बाहेर जायचं ना डिनर ला..?"


रेवाला अजिबात विश्वास बसत नव्हता..


"अग टॉवेल देते ना.." राहुल आवाजावर आवाज देत होता पण हिचे लक्षच नव्हते तिकडे..


"हं आले.." म्हणत ती टॉवेल द्यायला गेली..


बेडरूम मध्ये येऊन तिने त्या पिशवीतील ड्रेस बाहेर काढला.. मस्त रेड कलरचा स्वीटहार्ट लिहलेला टी - शर्ट होता.. तिने घालायचा प्रयत्न केला पण साईझ लहान होत होती..


" नाही येत आहे का टी शर्ट? लहान होतेय?" राहुल केस पुसत आत आला..


"नाही..नवऱ्याचा नवीन अवतार बघून मांस चढला अंगावर..कसं येणार?" रेवा डोळे मिचकावत बोलली..


राहुलने जवळ येत रेवाला मिठीत घेतलं..


" ह्या सगळ्या गोष्टीत खूप कच्चा आहे ग मी..त्यामुळे अशा गोष्टीत पडतच नाही मी.. "


" मग आता का पडावंसं वाटलं? "


राहुलने काहीच न बोलता परत एकदा तिला मिठीत घेतलं आणि एक छान स्माईल करत तिच्याकडे एकटक पाहत राहिला..


"इनको पार्टी, सरप्राईज ये सब पसंद नही..वो बोलते है तुझे जो चाहिये वो लेले.. कुछ मांगा ना तो जरूर लाके देते है, लेकिन बिना बोलें कुछ नही करेंगे..हर आदमी का प्यार इझहार करनेका तरिका अलग होता है ना..काल ऐकलं होतं मी तुझं आणि स्वराच बोलणं.. तु इतकं समजून घेऊ शकतेस तर मीही तुझ्या आनंदासाठी थोडा तरी नक्कीच बदलू शकतो " तिच्याकडे डोळे भरून पाहत मनातल्या मनात राहुल बोलत होता..



"चल घाल दुसरा ड्रेस आणि आवर पटकन.. माझं झालं बघ.."


रेवाने रेड कलर चा पंजाबी ड्रेस घातला..छान तयार होऊन हॉलमध्ये जाताच राहुल बघतच राहिला तिच्याकडे..


तिला माहित होतं हा काही सुंदर दिसतेस म्हणणार नाही.. स्वभाव अजून काय? पण डोळ्याची भाषा कळतेय मला आता..


रेवाने बाहेर पडण्याआधी फ्रिजमध्ये आणून ठेवलेली कॅडबरी बाहेर काढली आणि राहुलला भरवली..


आज दोघांच्या नात्यातील गोडव्यासमोर कॅडबरीचा गोडवा कमीच जाणवत होता..



#वॅलेंटाईन स्पेशल



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance