मी उगाचंच...
मी उगाचंच...


मी उगाचंच बघत बसतो तुझी प्रतिमा
किती तरी वेळ तासनतास ...
का कुणास ठाऊक होतात मला भास
तुझ्या असण्याचे ,नि तुझ्या हसण्याचे ....
मी आठवत बसतो उगाचंच...
ते मंतरलेले दिवस , ते हळवे क्षण
ते रुसवे - फुगवे , अन आनंदी जगणे
मन आजही मागते अजूनही ते अशक्य मागणे
मन असतेच स्वप्नात रमणारे ...
असह्य काल्पनिक विश्वात विहरणारे
मन असते चंचल , सैरभैर करणारे
कधी त्या सोनेरी क्षणांना उजाळा देणारे
कोण समजावणार या वेड्या मनाला...
गेलेले दिवस ,व्यक्ती उरतात फक्त आठवणींच्या रूपात
तुझ्याइतकं चांगलं कोणाला माहित असेल माझा मन ,
तेच मला पुन्हा- पुन्हा सांगत तू येणार म्हणून ...