म्हणून तर तू माझ्याठी..
म्हणून तर तू माझ्याठी..


मी नाही विसरू शकत तुला, माझ्या पहिल्या प्रेमाला ...शेवटचं श्वासापर्यंत जपून ठेवीन मी हृदयाच्या खोल कप्प्यात तू दिलेल्या काही अनमोल क्षणांना.. प्रेमाला आठवते अजूनही माझी ती अवस्था, अस्वस्थतेचे ढग, तुझ्या जाण्याची वेळ जवळ आलेली, तुझ्या नकळत तू माझ्याशी केलेली जवळीक सर्वकाही माझ्या अशा वागण्याला कारणीभूत ठरलं. कदाचित ती वेळ योग्यही नसेल. मी त्याला प्रेमपत्र किंवा तुला काही नसेल. भांबावून गेली असेल किंवा मलाही तुझ्या मानसिकतेचे भान राहील नसेल. त्यानंतर उरलेल्या पेपरला तू माझ्याशी धरलेल्या अबोल्यामुळे मी तर खचलो होतोच पण, तुझी अस्वस्थता मला तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट्पणे जाणवत होती. तू पुन्हा काही तरी सांगणायचा प्रयत्न, केलास तेव्हा मला तुझ्याविषयी का कुणास ठाऊक तुझ्याविषयी काही दिवसांकरिता का होईना पण तिरस्कार निर्माण झाला होता. त्याक्षणी तुला काय बोलावयाचे होते ते मी ऐकावयास हवे होते ते मी तुला बोलू दिले नाही .. पण माझ्या मनाची घालमेल तुला कधी कळलीच नाही, कळणारही नाही असच ..समजून मी मोकळाही झालो होतो . आजही आठवत तुला लिहलेलं प्रेमपत्र अन तू न वाचताच राहू दे म्हटलेलं ..तुझा नकार समजून मी तो स्वीकारलाहि होता पण .. पुन्हा माझ्याशी बोलण्यास आतुर असणं अन तेही इतक्या दिवसानंतर माझ्या आकलनाच्या पलीकडचं होत सार ... तू मला एक मित्र म्हणून विसरणं अवघड जात असेल कदाचित ... म्हणून तू पुन्हा माझ्या माघारी घरी येऊन गेलीस दोन तीनदा, माझी काय करतो, घरात कसा वागतो?. सार सार चौकशी करून गेलीस पुन्हा माझ्या जीवनात डोकावलीस. अडलेल्या अवस्थेतही मदतीस धावून आलीस. तुझी ती ओढ, प्रेम अन हवाहवासा वाटणारा सहवास मला का कुणास ठाऊक? जीवघेणी अस्वस्थता अन तुझ्याविषयी असणारे प्रेम म्हणाव? केवळ सहानुभूती नक्की सांगता येणार नाही. जीवन साथी नाही झालीस तरी मैत्री नाहीच विसरलीस कधी. याचाच अप्रूप वाटत आजही ...मलाही तुझ्याविषयी एक मैत्रीण म्हणून असणारी अनिवार ओढ मात्र आजही कायमच आहे. तुलाही कदाचित तेच हवं असेल त्यावेळी ...मला उमगलं नसेल त्या अजाणते वयात त्यावेळी ..
तू संसारात सुखी पाहून मला खूप बार वाटलं होत. तुझा सुखी संसार, तुझी गोंडस मुलं, तुझा प्रेमळ पती ऐकून खरंच खूप बरं वाटलं होत. तेच तर आपल्यामधील निरागस, निस्वार्थ प्रेमाचं, मैत्रीची पावती असेल कदाचित. अन तू पुन्हा अचानक दिसेनाशी झालीस अन पुन्हा तुझ्याविषयी जे काही कळलं ते सर्व पुन्हा वेदनादायी अन मनाला सैरभैर करून गेलं ... असं आपलं कोणतं नातं? ... तुझा माझ्याविषयी कुठलाच राग, रोष नव्हताच अन नाही हेच मुळात माझ्यासाठी आश्चर्यकारक अन आकलनापलिकलंडच होत. तू रिस्थीतिशी जुळवून घेतलं होत. अन तूच माझं समग्र जीवन व्यापून टाकलं होत ते तुझ्या याच गुणामुळे. तू खऱ्या अर्थानं माझं जीवन समृधद् केलंस .. मी घडलो असेंल बिघडलो असेल ते फक्त तुझ्यामुळेच.. तू माझा पहिले प्रेम होतीस .. तू तुझ्या वागण्यातून बोलण्यातून प्रत्यक्ष, अप्रत्क्ष घडवलं. अन आजही तू माझ्यासाठी प्रेरणा बनून बळ आयुष्यात लढन्यास खंबीरपणा धाडस देतेस तुझ्या नकळत .. मी प्रेरणा घेतो तुझ्या धाडसी बाण्याची .. प्रेमं नाती जपण्याची हातोटी मी आत्मसात करण्याची काळ अवगत करू पाहतोय . एवढं सार जीवनात उलथापालथ, स्थित्यंतरे घडूनदेखील तू मोडून पडली नाहीस .. पुन्हा उभी राहिलीस आपल्या पिलासाठी पुन्हा सर्वकाही दुःख विसरून .. सलाम तुझ्या धीरगंभीर, धाडसी, प्रेमळ, मनमिळावू व्यक्तिमत्वास ... मन मारून जगण्यास अन नियतीपुढं पुरून उरलेल्या तुझ्या लढवय्या व्यक्तिमत्वास सलाम तुझ्या संपूर्ण संघर्षमय जीवनास....
म्हणून तर तू माझ्याठी स्पेशल आहेस माझा पाहिलं प्रेम आहेस . तू माझ्यासाठी ईश्वराने दिलेली अनमोल भेट आहेस . जिथे रक्ताची नाती दुरावली तिथे तू आठवतेस प्रत्येक दुखःच्यावेळी . सुखाच्या क्षणी ...रक्ताच्या त्यापलिकडच . हवंहवंसं ....समर्पित , निस्वार्थ . मंगलमय ,सुंदर ,पवित्र ... सात्विक . ईश्वराप्रति असलेल्या भक्तिसारखं उत्तरोत्तर वाढत जाणार ...