Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sangieta Devkar

Drama Romance


4  

Sangieta Devkar

Drama Romance


मेरे रंग में रंगनेवाली

मेरे रंग में रंगनेवाली

5 mins 213 5 mins 213

कुठे आहेस कधी येणार आहेस घरी? जान्हवी अग काम बाकी आहे अजुन ऑफिस मध्येच आहे मी. साहिल अरे वर्क ऑवर संपले तरी काम च कर तू तुझा बॉस तुला काही ओव्हर टाईम चे एक्स्ट्रा पैसे नाही देणार आहे. जानू आता मी कामात आहे घरी आल्यावर बोलू म्हणत साहिल ने कॉल कट केला. हम्म याला काही माझी काळजी च नाही उरली . ना पहिल्या सारख प्रेम करतो हा. मला माहित असते ना हा असा बदलनार तर मी लग्न केलेच नसते जान्हवी एकटीच बडबडत काम उरक़त होती.

रात्री उशिरा साहिल आला. जानू जेवन गरम कर ख़ुप भूक लागली आहे तो फ्रेश होऊन डायनिग टेबल जवळ येत बोलला. काही न बोलता जान्हवी ने जेवन गरम केले आणि त्याला वाढले. अग काही तरी बोल मी एकटाच जेवू का मुकयाने? तू जेवली का?

तुला आहे काळजी माझी साहिल? तुला फ़क्त ऑफिस आणि काम या पुढे काहीच दिसत नाही. घरात आपण दोघच आणि भेट आपली कधी तर फ़क्त रात्री ती ही बेडवर.

जानू उगाच चीड़चीड करू नकोस. मी मुद्दाम हुन करत नाही अस. खरच कामाचा लोड आहे. हो तुला काम आहे मला मात्र काहीच काम नाही. मी घर पण बघायचे आणि नोकरी पण करायची. मी जेवू का नको सांग ?आल्या आल्या काय सुरु केलेस हे तू. तू शान्त जेव मी जातेच येथून म्हणत जान्हवी निघुन गेली. जेवन करून साहिल ही बेडरूम मध्ये आला. त्याने झोपलेल्या जानू ला आपल्या जवळ घेतले आय एम सॉरी जान नको ना चिडूस. बस हा एक वीक काम आहे मग मी वेळेत येईन घरी. साहिल तू पहिल्या सारखा नाही राहिलास. प्रेमात होतो आपण तेव्हा किती वेळ द्यायचास मला. आणि आता नवरा झालास तर बदललास एकदम. अरे अस काही नाही. तू विचार कर ना जरा आता काम आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे ना हेच दिवस काम करायचे आहेत. आधी काही जबाबदारी नव्हती आपल्यावर. झोप मला उठायचे लवकर सकाळी म्हणत त्यांच् काही न ऐकता जान्हवी बाजूला झाली . हम्म्म्म.. कीती ही समजूत घाला ऐकेल ती जान्हवी कुठली. एकदम हट्टी मनातच बोलत साहिल ही झोपला.

सकाळी तिने नाष्टा बनवला आणि साहिल ला आवाज दिला. जानू काय हे मला उपमा नाही आवडत तुला माहित आहे ना. का या आधी नाही खाल्लास का? अरे एकाद दिवस ठीक आहे मी सारखे नाही खाणार. साहिल मला वेळ नाही. खायचे तर खा नाहीतर राहु दे. जानव्ही ने दोघाचे टिफिन भरले. नको मला . मी बाहेर खाईन म्हणत साहिल आवरायला गेला. साहिल ला नाष्टाला डोसा,थालीपीठ,वड़ा सांबार, अंडाबुर्जी अस लागायचे तर तिला पोहे, उपमा, शिरा, अप्पे आवडायचे. खान्या वरुन पण वाद व्हायचा. त्याला चहा प्रिय तर ती कॉफ़ी शौकीन! आज कधी नव्हे ते साहिल संध्याकाळी लवकर घरी आला. जानू ही आली. चहा घेत गप्पा मारत बसले . टीव्ही सुरु होता साहिल न्यूज बघत होता.. साहिल बालगंधर्व ला नवीन नाटक आले आहे जावूया ना आपण आता सात चा शो आहे. नको नको मला नाटक अजिबात आवडत नाही यू नो ना. हो का खड़ूस मग लग्ना आधी कसा यायचास माझ्या सोबत नाटका ला? तेव्हाची गोष्ट वेगळी होती तुला पटवायचे होते ना मग काय अडला हरी.. साहिल तू गेलासच आता म्हणत जान्हवी ने रिमोट ने त्याला मारायला सुरवात केली. अग लागतो तो रिमोट ठेव खाली. नाही आज सापडलास तावडीत खा मार खा म्हणत अजुन ती त्याला मारु लागली. तसा साहिल बेडरूम कड़े पळत गेला.

सकाळी जान्हवी चे डोके दुखत होते साहिल अरे ख़ुप डोक दुखते आहे तू थांब ना घरी. बहुतेक एसिडिटी झाली आहे मला. नो नो मला काम आहे एक मीटिंग पण आहे. तू मेडिसिन घे आणि आराम कर. मी खातों कैंटिन ला. कीती खड़ूस आहेस तू साहिल. जानू सकाळी सकाळी वाद नको मला. बाय टेक केयर म्हणत साहिल बाहेर पडला. अरे साहिल एक मिनिट इकडे ये. सोसायटी मधील देसाई काकू नी त्याला आवाज दिला. त्याने पाहिले सोसायटी मधील जेष्ठ महिला एकाच रंगाच्या साडया घालून एकत्र आल्या होत्या. काय काकू काही काम होत का साहिल ने विचारले. अरे हो आमचा एक ग्रुप फोटो काढून दे एका ठिकाणी द्यायचा आहे. बर पण काकू तुम्ही सगळ्यानी ही कोणत्या रंगाची साड़ी घातली आहे. साहिल हा रंग आहे मोरपंखी . ना धड़ निळा ना हिरवा पण सोनेरी झाक आहे याला. फिरता रंग हा मोरपंखी. यात दोन तीन रंग आहेत पण एकमेकांना अजिबात वरचढ़ होऊ न देता बेमालुम पणे एकमेकांत मिक्स झालेत. प्रत्येक रंगाच अस्तित्व वेग् वेगळे पण ते अस्तित्व टिकवून ठेवून एकत्र आलेत म्हणून हा झाला मोरपंखी रंग हिच याची खासियत आहे. साहिल ने त्यांचा छान फोटो काढला आणि ऑफिस ला गेला. त्याला राहुन राहुन काकू चे बोलने आठवत होते.

ऑफिसमधून हाफ डे घेऊन निघाला तसा घरी आला. जानू जानू आवाज देत बेडरूम कड़े गेला जान्हवी झोपलेलीच होती. तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाला,कशी आहेस जान. साहिल तू इतक्या लवकर? हो हे बघ जान आपण आज पासून मोरपंखी रंगा सारखे होऊयात . म्हणजे काय साहिल. हे बघ तू आहेस निळा रंग आणि मी हिरवा . आपल दोघांच अस्तित्व वेगळे आहे. आपण दोघांना एकमेकांच्या गुण दोषा सकट स्वीकारले पाहिजे ना. मगच आपले अस्तित्व एक होईल तू तुझ्या जागी बरोबर मी माझ्या जागी बरोबर पण एकत्र असलो तरच आपले आयुष्य रंगीबेरंगी इन्द्रधनुष्य बनेल ना? साहिल तू ठीक आहेस ना? हो जान मला समजले आहे आणि काही दिवसांनी आपल्याला बाळ होइल त्याने आपल्या आयुष्याला सोनेरी किनार लाभेल मग आपला हा मोरपंखी रंग पूर्ण होईल. साहिल सो स्वीट ऑफ यू म्हणत जानू त्याच्या मिठित शिरली. हे बघ  रात्री साठी मी पनीर आणले आहे तू आराम कर मी तुझ्या आवडीचा पनीर टिक्का मसाला बनवतो आणि जीरा राईस सुद्धा . ओके चालेल साहिल म्हणत जान्हवी आराम करत बसली. थोड्या वेळात साहिल ने तिला आवडते तशी स्ट्रांग कॉफ़ी बनवून दिली. त्याने स्वहता साठी चहा घेतला. जानू शेजारी बसला. तसे तिने टी व्ही चे चैनल बदलून न्यूज चैनल लावले. त्याच्या कुशीत शिरून मस्त कॉफ़ी चा आस्वाद घेत राहिली. हळूहळू निळा आणि हिरवा रंग एकमेकात मिसळत चालले होते.

#रंग बरसे 


समाप्त


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Drama