मैत्री
मैत्री
दोन जिवाचे जुळते मैत्र यातूनच मैत्री हा शब्द आला आहे दोन मनाच्या वेली वरती उमरलेलं फुल म्हणजे मैत्री एकमेकाबद्दल अंतःकरणातून वाटणारा कळवळा म्हणजे मैत्री अशा या मैत्रीची महती किती वर्णावी .
मैत्री हे दोन मनाच्या वेळी वरती उमललेलं फुल आहे त्याच्या पाकळ्या गळू न देण्याची जबाबदारी दोघांचीही असते.
आपल्या फिल्मी जगतामध्ये मैत्री या विषयावरती, अनेक सिनेमे येऊन गेले .
याराना, दोस्ताना, आणि मराठी मध्ये पण मुलींच्या मैत्री वरती "बिनधास्त" नावाचा एक चित्रपट येऊन गेला. दोन मित्र किंवा मैत्रिणी, दोघांचे एकाच मुलावर किंवा मुलीवर प्रेम, मग दुसरा कसा त्याग करतो याचे उदाहरण "संगम" सिनेमात दिले आहे.
"रास्ते प्यार के "मध्ये शबाना आजमी रेखा आणि जितेंद्र साठी त्याग करते.
आणि सगळ्यात मैत्रीचं महान उदाहरण शोले मध्येच दिलेल आहे. अभिताभ दोन्ही बाजूला काटा असलेला असलेल्या नाणे टॉस करतो ,आणि धर्मेंद्र आणि हेमाला तिथून पळून लावतो. आणि स्वतः मात्र कुरबान होतो .
अजून एक मैत्रीची दास्तान सांगणारा पिक्चर आहे. धरमवीर .
एक राजाचा मुलगा, एक साधा गावातला नागरिक, किंवा शिपायाचा, किंवा गावातील लोहाराचा मुलगा, आणि त्यांच्यातील दुश्मनी, आणि एकमेकांसाठी केलेला त्याग .असे अनेक मैत्रीचे किस्से सांगणारे हिंदी सिनेमे झाले
मैत्री फक्त पुरुषांमध्येच शेवटपर्यंत टिकून राहते.,असं नाही तर कॉलेजच्या ग्रुप देखील आज-काल 25 25 वर्षांनी एकत्र येऊन सेलिब्रेशन करतात.
त्यात मित्र-मैत्रिणी सारे असतात.
जिथे हक्काने रडण्यासाठी खांदा मिळतो ,तो खऱ्या मित्राचा खांदा .
"रोये तो यार के कंदे पे
जाये तो यार के कंधे पे" असे एका हिंदी सिनेमात म्हटलेलं आहे, आणि ते बऱ्याच अंशी सत्य आहे.
पण अशी खरी आणि सच्ची मैत्री फार थोड्या प्रमाणात मिळते, आणि टिकते.
नाही तर बहुतेक मैत्री ही वेळ परतत्वे आणि गरजेनुसार निर्माण झालेली असते.
कित्येक वेळा एखादा पैसेवाला मुलगा असला तर त्याच्या आजूबाजूने त्याचा तोंडपुंजेपणा करणारे अनेक मित्र मिळतात.
पण "असतील शिते तर जमतील भुते" या न्यायाने जोपर्यंत स्वार्थ साधत आहे तोपर्यंतच अशी मैत्री राहते. जर त्या मित्राकडून काही मिळणे बंद झाले तर! असे काम चलावू मित्र आपोआप दूर जातात.
कोणीतरी सांगितलेला एक किस्सा अशा मैत्री प्रसंगाने मला आठवला, त्यामध्ये एका मित्राचे घर जळून जाते .त्यावेळी बाहेर दुसरा मित्र उभा असतो ,तो मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असतो. आणि त्याला सांगतो "मेरा सब कुछ जल गया, कुछ भी नही बचा है/
तेव्हा मित्र म्हणतो" यार तू बचा है ,तो सब कुछ बचा है" त्याचा अर्थ "जान है तो जहान है "असा देखील होऊ शकतो.
पण मैत्रीत देखील तो वापरता येतो, मित्र जिवंत आहे ना म्हणजे सगळं काही आहे .बाकीच्या गोष्टी काय पुन्हा उभ्या करता येतील .असा त्याचा अर्थ आहे .
खरा मित्र कधीच त्याच्या मित्रासमोर देखावा करत नाही किंवा खोटा बोलत नाही. खर्या मित्राचा विश्वास हा प्रेमाचा पाया असतो. खरा मित्र नेहमीच त्याच्या मित्राला नेहमीच वाईट आणि वाईट संगतीपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करतो. खरा मित्र कधीही मैत्रीत फसवणूक करत नाही.
एखाद्याला मित्र बनवून सोपं आहे पण ते नातं कायम निभावण फार कठीण आहे.
मैत्री म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्या व्यक्तीचा हितचिंतक असते, म्हणजे एकमेकांच्या हिताची परस्पर इच्छा असणे आणि एकमेकांच्या आनंद, प्रगती आणि समृद्धीसाठी प्रयत्न करणे ही मैत्री होय.
मैत्री फक्त आनंदाच्या क्षणांचे सोबती नसून
दु: खाच्या क्षणातही ढालीच्या रुपात समोर उभे राहणे आणि मित्राच्या संरक्षणासाठी सज्ज असणे.
म्हणजे मैत्री
त्याला किंवा तिला काय वाटेल, अशी शंका मनात निर्माण न होणे. इतक्या मनमोकळे पणाने आपण त्याच्याबरोबर बोलणे, सुख दुःखात साथ न सोडणे, तिलाच खरी मैत्री असे म्हटले जाते. मैत्रीचे नाते हे पाण्यासारखे निर्मळ आणि स्वच्छ असावं. त्यात कोणताही स्वार्थ किंवा अपेक्षा नसाव्यात व्यवहार तर मुळीच नसावा.
मैत्रीला वयाचे, नात्याचे, भाषेचे ,लिंगाचे, कोणतेही बंधन येत नाही. कोणत्या वयोगटात कोणाशीही मैत्री होऊ शकते.
