Rutuja Thakur

Drama Inspirational

4.5  

Rutuja Thakur

Drama Inspirational

मालतीची सोबती- एक सुंदर परी

मालतीची सोबती- एक सुंदर परी

7 mins
23.1K


मालती ही अतिशय हुशार आणि मेहनती मुलगी होती. ती अगदी २ वर्षांची असताना तिचे आई वडील देवाघरी गेले. मालती खूपच लहान होती, आता ती पोरकी झाली होती. अशावेळेस मालतीची आजीने मालतीला सांभाळलं. लहानपणा पासूनच तिला नवीन गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा असायची. आजी काबाड कष्ट करून मालतीला वाढवत होती. ते एका छोट्याश्या झोपडीत राहत होते. मालती ही आता १४ वर्षांची झाली होती. पण तिची आजी मात्र म्हातारी झाल्याने सारखी आजारी असायची. तीच्याने बसवेना अन् उठवेना....,

अशावेळेस मालती आणि आजीला खाण्या- पिण्याचे हाल होत होते. मग मालतीला एक कल्पना सुचली. ज्या घरात तिची आणि कामासाठी जात होती आता तिथे मालती जाणार असे तिने ठरवले. आजी तिला म्हणाली, बाळा नको अजुन तू लहान आहेस तुझ्याने ते काम नाही होणार, मालती म्हणाली तू काही काळजी करू नकोस मी करून घेईन मी येतेच जाऊन तू आराम कर.....,

मालती रस्त्याने जात असताना ती विचार करत होती की मला ते कामावर ठेवतील का??? तिकडे पोचल्यावर तीने घराचे दार वाजवले, घराची जी मालकीण होती रमा तीने दार उघडले, दार उघडताच रमाने विचारले कोण ग तू?????

मालती म्हणाली - मी मालती माझी आजी तुमच्या इथे कामाला येते. मग रमा म्हणाली हा तर मग???

मालती उत्तरली, की आजीची तब्येत खराब आहे तिच्या ऐवजी मी काम केलं तर चालेल का??? रमा तीला नाही म्हणाली, रमा म्हणाली तू लहान आहेस तुझ्याने घरातली कामं नाही होणार, मालती म्हणाली तुम्ही काही काळजी करू नका मी सगळं काही करून घेईल, फक्त मला सांगा काय काय करायचं आहे. रमा तीला आत घेते आणि काम समजावते. मालतीला आनंद होतो की आता आम्ही भुके राहणार नाही म्हणून, मालती झाडू घेऊन घर झाडायला घेते. झाडता झाडता ती मधूच्या खोलीत गेली ( मधू म्हणजे रमा ची मुलगी ).

मालती मधूकडे बघतच राहिली. मधू ही मालती 7एवढीच होती. मधूचा ड्रेस खूप छान होता लाल रंगाचा. मधू एकदम सुंदर तयार झालेली होती, एकदम परीसारखी. आणि तिचा रूम खूप सुंदर सजवलेला होता, तिच्याजवळ खूप खेळणी देखील होत्या. छान छान पक्वान तिच्यापुढे ठेवलेले होते. हे सगळं बघून मालती अगदी चकित होऊन गेली. दिवसभर काम करून संध्याकाळी ती आपल्या घरी जायला निघाली, तेव्हा रमाने तीला दुपारचं उरलेलं जेवण दिले. मालती जेवण सोबत घेऊन निघाली. मालती खूप खुश होती कारण तिला जेवण मिळालेलं होतं, पण आतून दुखी पण होती, कारण जे मधूकडे होतं ते तिच्याकडे नव्हतं. आपल्या छोट्याश्या झोपडीत येऊन तिने छान पैकी आजीला आपल्या हाताने जेवण भरवले. आजीला खूप आनंद झाला. जेवण झाल्यावर मालतीने आजीला मधूबद्दल सांगितले. आजीने तिला समजावून सांगितले, की ज्याचं त्याचं नशीब असतं. दुखी व्हायचं नाही.

त्या दिवशी रात्री मालतीला झोप देखील येत नव्हती ती सारखी रडतच होती आणि देवाला विचारत होती, असं का देवा मधूला छान छान कपडे आहेत घालायला, छान छान पकवान आहेत खायला, मस्त बंगला आहे राहायला. मग मीच झोपडीत का??? मला का नाही असे कपडे, खायला पकवान, राहायला बंगला, मधू पण तर माझ्या एवढीच आहे ना... मग असं का???? आणि खूप रडायला लागली. आणि रडून रडून झोपी गेली. रात्री झोपेत तिला एक परी दिसली. ती परी तिला उठवत होती, उठ बाळा.... मालती.

मालती उठून बसली आणि परीला विचारलं तू कोण??? तुला माझं नाव कसं माहिती?? परी म्हणाली, मला तू तुझी मैत्रीण समज आणि सांग मला की तू इतकी उदास का आहेस??? काय झालंय???

मालतीने रडून परिला सगळं सांगितलं, परी हसली आणि मालतीला म्हणाली, त्यात रडायचं काय वेडाबाई.......!!

तुला तसा ड्रेस हवाय का?? मालती म्हणाली हो मला तसा ड्रेस, तसे पकवान... हवं आहे. परी म्हणाली बरं ठीक आहे सकाळी जेव्हा तू उठशिल तेव्हा तुला तुझा लाल रंगाचा ड्रेस आणि छान छान खायला असेल आता झोप आणि काही लागलं तर मला आठवत जा मी येत जाईल, तुला कधीही मदत लागली माझी मी करत जाईल पण एक अट असेल मला कधीही वाटलं की तू चुकीच्या मार्गावर जाते आहेस मी सगळे परत घेऊन टाकेल, मालती म्हणाली चालेल मी ह्या गोष्टीची काळजी घेईल. एवढं बोलून परी गायब झाली. सकाळी जेव्हां मालती उठली... बघते तर काय???? .... चक्क लाल रंगाचा ड्रेस समोर होता, आणि छान पकवान खायला होते. ते सगळं बघून मालतीला खूप आनंद झाला तिला पडलेलं स्वप्न खरं ठरलं. तिने आजीला स्वप्नात काय झालं ते सगळं सांगितलं, आजीला जरा आश्चर्य वाटलं पण त्या दिवशी दोघेही खुश होते. दोघांनी छान छान पकवान खाल्ले. मालतीने तो ड्रेस ही घातला.

मालती आता खूप आनंदी होती, तिने आजीला सांगितलं की आणि आजी आता कामावर जायची काही गरज नाही. माझी स्वप्नातली मैत्रीण आहे ना.... ती सगळं देईल आपल्याला आपण जे मागू ते. आजी ने मालतीला समजावले की बाळा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो परिणाम वाईट होतात. पण आनंदाच्या भरात मालतीने आजीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. त्यादिवसपासून मालती कामावर गेली नाही, खाऊन झाल्यावर तिने परीची आठवण केली. परी आली, परीने विचारले काय झालं मालती??? तुला काही हवं आहे का??? मालती उत्तरली हो मला छानसा एक बंगला दे, जो की ह्या गावात कोणाचाही नसेल. परी म्हणाली ठिक आहे परी मालतीला म्हणाली तुम्ही दोघी बाहेर जा... मालती आजीला घेऊन बाहेर येताच झोपडीच्या जागी एक सुंदर असा बंगला तयार होता... मालती आणि आजी त्या बंगल्याकडे बघतच राहिले. मालतीच्या आनंदाला थारा नव्हता. बंगला येताच परी पुन्हा गायब झाली. मालती आणि आजी दोघेही आत गेले. मालती खूपच खुश होती तिला काही सुचेनासे झाले. पूर्ण बंगल्यात ती फिरू लागली. आजीला हे सुख क्षणिक आहे असे जाणवत होते. त्यादिवशी आजीची तब्येत अचानक बिघडली, आजी आजारी पडली पण मालती वेगळ्याच दुनियेत असल्या कारणाने आजीकडे तीचं लक्षच नव्हते. आजी तिला सारखी आवाज देत होती मालती बंगल्यात वर असल्याने तिला आजीचा आवाज ऐकू येत नव्हता. थोड्या वेळाने मालती खाली आली आणि आजीला सांगू लागली की मी आज खूप आनंदी आहे, वाटलं ही नव्हतं की आपण कधी इतक्या मोठ्या बंगल्यात राहू. पण आजी मात्र काहीच बोलत नव्हती. मालतीने आजीला जोरात हलवले तर आजीने मान टाकली होती. आजी मालतीला सोडून देवाघरी गेली होती. मालतीला खूप दुःख झाले ती रडू लागली. कारण लहानपणाासून आजीनेच तिचा सांभाळ केला होता. मालती ला आजी गेल्यानंतर खूप एकटं एकटं वाटू लागलं. काही वर्षे असेच निघून गेले. मालती आता मोठी झाली होती. त्याच बंगल्यात राहत होती आणि मजेत राहत होती. परीमुळे तिला सर्व काही सुख सुविधा मिळत होत्या. तिला कोणाची गरज नव्हती. पण तिला एकटीला एवढ्या मोठ्या बंगल्यात खूप एकटं वाटत होते. तिने परिची आठवण केली परी प्रकटली, ती परीला म्हणाली, की मी खूप आनंदी आहे पण मला ह्या बंगल्यात खूप एकटं वाटतयं. मला ना तू बंगल्यात काम करायला नोकर चाकर दे. म्हणजे मला एकटं वाटणार नाही. परी म्हणाली ठिक आहे, तिने ५/६ नोकर बंगल्यात दिले. ते सगळे आपापली काम करू लागले. आता मात्र मालती तिच्या मैत्रीणीना बंगल्यात बोलवत असे , त्यांची दिवसभर खूप मज्जा असायची, नेहमी असे होऊ लागले मालतीला आता गर्व आलेला तिच्या गोष्टींचा. ती पदोपदी नोकर चाकरांचा अपमान करू लागली, त्यांना काहीही बोलू लागली. इतकंच नाही तर आता गावात सगळ्यात श्रीमंत मालतीच असल्याने ती गावात कोणालाही काहीही बोलत असे. मोठ्यांचा अपमान करत असे, त्यावेळी मालती लहानपणी जिथे कामाला जायची मधुच्या घरी. ती मधू आता मालती झाली होती आणि मालती मधू. मधू मालतीला येऊन भेटली आणि म्हणाली काही काम असेल तर देशील का??? आमचे खाण्याचे हाल होत आहेत, मालतीला तिच्यावर हसू आले. मालतीने तिला बंगल्यात कामासाठी ये म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवसापासून मधू कामाला येऊ लागली. मालती तिचा ही पदोपदी अपमान करू लागली.

एकेदिवशी तर मालतीने हद्दच पार केली, तिचा सोन्याचा हार मिळत नव्हता तिने मधूवर चोरीचा आळ लावला. आणि मधूला खूप मारले. मधू रडून तिथून निघून गेली. मालतीला परीने जे काही सांगितलं होते ते सगळं मालती तिच्या श्रीमंती मुळे विसरून गेली होती. मधूने घरी येऊन आईला सगळं सांगितलं, आई म्हणाली मधू बाळा काळजी करू नकोस हेही दिवस जातील. असं सांगून गप्प केलं. हे सर्व काही परी बघत होती. मालतीने लोकांवर केलेले अन्याय, नोकर चाकरांसोबत तिचा असलेला व्यवहार, आता मधुसोबत हे असं वागणं. परीने त्या दिवशी मालती झोपली असताना जे जे काही मालतीला दिले होते ते सगळे हिरावून घेतले. मालती जेव्हा झोपेतून उठली तेव्हा पुन्हा ती त्याच तिच्या लहानपणी असलेल्या छोट्याश्या झोपडीत होती. तिच्यापासून परीने सर्वकाही हिरावून घेतले होते. आता ती पुन्हा एक गरीब मुलगी मालतीच होती. तेच फाटके कपडे, खायला काही नाही, पुन्हा तीच परिस्थिती....!!!

मालतिला तिची चूक लक्षात आली, जेव्हा तिच्याकडे सर्वकाही होते त्यावेळेस तिला श्रीमंतीचा गर्व झाला होता. तिची वागणूक बदलून गेली होती. म्हणून परीने आपल्याकडून सगळे हिरावून घेतले. आज आजीने जे सांगितलं होत... क्षणिक सुख ती गोष्ट प्रत्यक्षात खरी ठरली होती. मालतिला आजीची खूप आठवण येत होती ती रडून अजीची क्षमा मागत होती. तिने शेवटी एकदा पुन्हा परीची आठवण केली, परी आली आणि मालतीने त्या परीची ही माफी मागितली. मालती परीला म्हणाली, मला माफ कर, तू मला इतकं सगळं दिलं होतं तरी माझी गरज ही संपतच नव्हती. मी जे जे मागितलं तू ते सर्वकाही मला दिलं. पण त्या सगळ्यात तू सांगितलेली गोष्ट मी विसरून गेली. आणि म्हणूनच आज माझ ही दशा आहे....,

मी तुझी माफी ही मागते, आणि तुझे आभार ही मानते... कारण तुझ्यामुळे खरं तर मला जीवनात कसं जगावं हे आज कळाल. जीवनात फक्त पैसाच महत्वाचा नसतो तर त्याहीपेक्षा आपली माणसं महत्वाची असतात हे तू मला शिकवलंस. ह्यापुढे मला तुझ्याकडून काहीही नको फक्त तुझी साथ माझ्यासोबत असुदे, कारण मी तुला माझी एक चांगली मैत्रीण मानलं आहे, आता मी पुन्हा कष्ट करेल आणि माझ्याकडून कोणालाही त्रास होणार नाही असं वागेल. हे सर्व ऐकून परीला खूप आनंद झाला. तिने मालतीला वचन दिले की तुझ्या कठीण प्रसंगी कधीही तुला माझी मदत लागली तर नक्कीच मी तुझी मदत करेल आणि नेहमी तुझ्यासोबत असेल. असे वचन देऊन परी निघून गेली. आज मात्र मालतीला तिच्या आजीची खूप आठवण येते होती.....!!!!!!



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama