Jyoti gosavi

Classics

4.5  

Jyoti gosavi

Classics

माझ्या मनातला शालू

माझ्या मनातला शालू

1 min
336


मी साधारण इयत्ता सातवी आठवीत असताना, आमच्या शेजारील एका मोठ्या मुलीचे लग्न झाले. तिच्या अंगावरती मी जसा शालू बघितला तो मला फारच आवडला. मग तो मी पक्का डोक्यात ठेवला होता. त्यानंतर मोठी झाले, कमावती झाले, नोकरीला लागले आणि पुढे पीजी करण्यासाठी बंगलोरला गेले. बंगलोरला गेल्यानंतर तिथलं सिल्क प्रसिद्ध, तिथले खड्यांचे सेट प्रसिद्ध, तोपर्यंत लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे ट्रेनिंग संपून परत येताना थोडीशी खरेदी करण्यासाठी दुकानात गेलो. घरचे लग्नासाठी मागे लागलेले होते. त्यामुळे आता इथून पुढे घरी गेले की आपलं शुभमंगल आहे हे माहीत होतं. मग विचार केला थोडीशी खरेदी लग्नाच्या आधीच करून ठेवावी. त्यात बंगलोरी स्टोनचे बिंदी, झुमके, नेकलेस, बांगड्या हौसेने खरेदी केली. पुढे सहज जाताजाता शोकेसमध्ये तसाच माझ्या स्वप्नातला शालू दिसला. जो मी इयत्ता सातवी पासून डोक्यात ठेवला होता.


मग काय! शिरले दुकानात आणि घेऊन टाकला शालू. नाहीतरी लग्न ठरल्यावर मुलाकडचे कसले मिळतात, आपल्या पसंतीच्या साड्या, कपडे घेतील की नाही कोणाला ठाऊक. तेव्हा काही मुलीला विचारून सासरचे लोक कपडे वगैरे खरेदी करत नव्हते. मग मी विचार केला माझा शालू मीच घेऊन ठेवते आणि जेव्हा खरोखर लग्न ठरले तेव्हा त्यांना मी सांगितले तुमचे कपडे तुम्ही घ्या, आमचे आम्ही घेऊ. फक्त काय मानापानाचे असेल तेवढे पाहू आणि इकडे त्यामुळे आमचे बजेटदेखील कमी झाले.


आहे की नाही मी हुश्शार? किती ग बाई मी हुश्शार! 

😜😜😜


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics