Pallavi Wagle-Samant

Drama Inspirational

3  

Pallavi Wagle-Samant

Drama Inspirational

माझिया प्रिया - स्त्रीचा त्याग

माझिया प्रिया - स्त्रीचा त्याग

8 mins
17.3K


झपझप पाऊल टाकत निशा घरी एकदाची पोहोचली. दिनेशला ताप आला होता. तो घरी येऊन गरम पाणी आणि औषध घेऊन झोपला होता. अलीकडेच लग्न होऊन दार्जिलिंग फिरायला गेले होते. निशा नुकतीच कामाला जायला लागली होती. दिनेशचा स्वतःचा कॅटरिंग बिझनेस होता. आज तसे बाजार भाव काढायला म्हणून गेला होता. निशाला पाहिल्यावर त्याला थोडं बरं वाटलं. दोघंही डॉक्टरकडे जायला निघाले. शेजारच्या अंजलीने हाक मारली तशी निशा सांगून खाली उतरली. जवळच डॉक्टर सबनीस राहतात असे अंजलीने सांगितले होते. ते शोधत शोधत गेले. लग्नानंतर थेट हे दोघे इथेच राहायला आले होते. दिनेशचे आईवडील आणि भाऊ भावजय ही पालघरला राहत असत. दिनेश कामासाठी आणि काही मित्र राहत होते. हळूहळू काम वाढल्यावर त्याने ही जागा घेतली. ठाण्याच्या एका मैदानावर निशाची जवळची मैत्रीण रश्मी हिचे लग्न होते तेव्हा तिला तेथील स्वयपांक आवडला म्हणून ती कॅटरिंग कोणाचे याची चौकशी करायला गेली. तिथे दिनेशची भेट झाली. त्यानंतर निशा ऑफिसमधून घरी येताना पुन्हा एकदा दिनेश घाऊक बाजाराची चौकशी करून रिक्षा पकडत होता तेव्हा निशानेच हाक मारली. असे बरेचदा योगायोग घडत गेले मग हे लग्न जमले. निशाचे आई वडील आधी नको म्हणत होते कारण एक तर जुन्या मतांप्रमाणे जात आडवी येत होती. मग जावई हा नोकरी करणारा हवा. अशा बऱ्याच अडीअडचणी आल्या. शेवटी दिनेशने आपण कष्ट करुत पण तुमच्या मुलीला कधीच दुःख पोहोचू देणार नाही याचे वचन दिले.

हा फ्लॅट घेताना कर्ज काढावे लागले म्हणून निशाने जॉब सुरु ठेवला. कारण एकाचे पूर्ण पैसे घरात येतील. दिनेशला काम येईल तसे पैसे मिळणार हे तिला पूर्ण माहित होते. शेजारची अंजली तिला पूर्णपणे सहकार्य करत होती. तिने तिच्या नवऱ्याला आशिषला येताना गाडी वळवून डॉक्टर सबनीसांच्या तिकडून येण्यासाठी फोन केला. तसा आशिष तिकडे थांबून त्या दोघांना घेऊन आला. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा आलाप खिडकीत बसून वाट पाहत होता कधी एकदाचा बाबा येतोय. गाडीचा आवाज आल्यावर तो आणि अंजली दारातच उभे. अंजलीच्या हातात खिचडीचे पातेलं आणि तुपाची वाटी होती. आशिष दिनेशला हात धरून उभा राहिला तोपर्यंत निशाने दार उघडले. आलापचे प्रश्न सुरूच झाले," काकू काका जेवला नाही म्हणून डॉक्टरनी बोलावले ? मग त्याला टुचुक पण केले ? काकाला आता कडूकडू औषध दिलंय?" अंजलीने मध्येच थांबवले आणि आत जा सांगितले. ओट्यावर ठेवून आता दोघांनी आराम करा असे सांगितले आणि निघाली. निशालाही तेवढे काही बोलायला सुचत नव्हते. तिने बरं म्हणून दार लावून घेतले. अंजली पहाटे रियाज करायची. दुपारी ती गाण्याची शिकवणी घ्यायची. नेहमीप्रमाणे उठली दिनेश, निशालाही जाग आली. नारळाचं झाड वाकून वाकून सूर्यकिरणं आत येऊ लागली. चिमण्यांचा चिवचिवाट सुरु झाला. दिनेशला थोडं बरं वाटत होत. दोघंही शांतपणे अंजलीचा रियाज ऐकत झोपले होते. निशाने उठून डबा केला आणि ऑफिसला गेली. दिनेश घरीच थांबला आराम करायला. निशा अर्ध्या दिवसात परत आली. आलापला आणि दिनेशला घेऊन गच्चीत गेली. मोकळ्या हवेत दिनेशला थोडं बरं वाटलं. आलापही लगोरी म्हणजे काय ? आंधळी कोशिंबीर म्हणजे काय ? किती प्रश्न ? मग दिनेश त्याला एक एक दाखवत होता. निशालाही आपण लहान झाल्यासारखे वाटले. आलापबरोबर राहून राहून आता आपल्याला मूल हवंय असे दोघांना वाटू लागले.

वर्ष झाले आणि निशाला दिवस राहिले. चवथा महिना लागला तसे सासू सासरे इकडे येऊन राहिले. निशाची काळजी घ्यायला तिची आईही मधे मधे यायची. अंजली तर तिला काही करेल ते तिला आणून द्यायची. प्रसूतीनंतर आईकडे जाऊन राहणे मग दिनेश इकडे एकटाच राहणार याचे तिला दडपण होते. पण अंजली तिला तू बिनधास्त जा असे धीर देत म्हणाली. गच्चीतच मांडव घालून निशाचे डोहाळे जेवण झाले. तिने एक रुपया काढला आणि सगळे तिला चिडवायला लागले आता मुलगा होणार. ती सगळे आटोपून माहेरी गेली. नववा महिना लागला त्याच दिवशी निशा बाळंत झाली. तिला मुलगा झाला. वजन कमी असल्यामुळे डॉक्टरांंनी त्याला काचेच्या पेटीत ठेवले. निशा अस्वस्थ झाली. दिनेशलाही पहिलीच वेळ त्यामुळे काही समजत नव्हते. अंजली आली तिने तिला समजावले. हा कोवळा जीव आता काही ना काही तब्येतीच्या तक्रारी घेता मोठा होणार. यात आपण निर्भीड राहावे मग मुलंही तितकेच निर्भीड बनते. बाळाला घेऊन घरी आले. त्याची पाचवी पुजली त्याचे बारसे झाले. बाळाचे नाव नील ठेवले. आलापला तर बाळ कधी एकदाचे येते असे झाले होते. निशाला परत पाठवताना आईला खूप गहिवरून आले होते. दिनेशच्या आईला मणक्याचा आजार झाला म्हणून सांभाळणार कोण याचे दडपण आले होते. अंजलीने आलापबरोबर हाही मोठा होईल म्हणून नीलची जबाबदारी आपल्यावर घेतली. निशा, दिनेशलाही हे पटले. इथे तिथे ठेवण्यापेक्षा आपल्याच माणसाकडे ठेवलेले जास्त बरे. सगळे कसे सुरळीत झाले. अंजलीकडे नील चांगला रमत होता. दिनेश मधेमधे घरी असला की त्याच्यासाठी ज्युस, सूप बनवून द्यायचा. चांदोबा भागलास का ? सांग सांग भोलानाथ अशी गाणी लागली की डोळे मिचकावे, हसून दाखवे आलापला तर शाळेतून आल्याआल्या नीलशी गप्पा करायला आवडत. म्हणता म्हणता नील वर्षाचा झाला. त्याचा पहिला वाढदिवस गच्चीतच केला. दिनेशने आपल्याच माणसांकडून केक, कटलेट, पाव भाजी, रसमलाई यांचा बेत आखला होता. दिनेश निशाचा चांगला संसार पाहून दोघांचे आई बाबा एकदम खुश झाले. नील अंजली आलापबरोबर राहून गाण्यात रस घ्यायला लागला. त्यांचे हातवारे बघून तोही तसाच काहीसे करी. दिनेशला मात्र आपला मुलगा आपल्यापेक्षा वेगळं काही शिकेल तर आनंदच होता. निशापण नीलसाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन त्याचे आकलन, त्याचे निरीक्षण याचा पडताळा घेई. हा दोन वर्षांचा मुलगा किती लवकर मोठा झाला. हे निशाला जाणवत होते. बाबा कसा हिशोब करतोय तसे तो ही पाटी पेन्सिल घेऊन काहीतरी गिरवत बसे. मग हळूहळू आकडे शिकायला लागला. पण आईची नजर लागू नये असे सारखे तिला वाटू लागले.

नील पाच वर्षांचा होता होता त्याला कुलदेवतेच दर्शन घडवून आणायला म्हणून दोघे गाडी करून कोकणात जायला निघाले. पण दर्शन करून येताना कशेडी घाटाकडे गाडीला अपघात झाला. जनसमुदायाने तिघांना एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नीलला एका दिवसात जाग आली. आपला पत्ता, शाळेचे नाव, अंजली काकू, आलाप दादा यांचे नाव त्याला सांगता आले. निशाच्या पर्समध्ये तिचे ऑफीसचे आय कार्ड आणि मतदानाचे कार्ड सापडले. यावरून या दोघांना मुंबई येथे आणण्यात आले. नीलने अंजली काकूला फोन केला. तशी अंजली आशिष आले. दोघांच्या घरी कळवले. निशा पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होती. दिनेशला हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. अंजली येईपर्यंत नील अगदी गुपचूप बाबांकडे बसून होता. बाबा झोपलेल्या अवस्थेत त्याला जमेल तसे त्याच्याशी बोलायचे. पोलिसांनी फक्त बिस्किटे देऊन नीलची भूक भागवली होती. अंजलीला पाहिले तसे दिनेश सुखावला मग नीलने पण पटकन काकूकडे धाव घेतली. आशिष दिनेशजवळ बसला. अंजली नीलला बाहेर घेऊन गेली आणि त्याला सॅन्डविच खाऊ घातले. दोन दिवस बाळ किती शहाण्यासारखे बसलं होतं. दोघांचे आई वडील आले आणि त्याला जवळ घेतले. आशिष थोडी रक्कम भरून निघाला. नीलची शाळा कशाला बुडवायची म्हणून त्याला आजी आजोबा घेऊन गेले. त्याची तयारी करून ते आले की मग निशाचे आई वडील निघत. अंजली मधे मधे येऊन जाई पण तिच्याही शिकवणी असत. दिनेश आता थोडा थोडा चालू लागला. निशाला डोक्यात मार लागला होता. आठ दिवस झाले तरीही ती शुद्धीत आली नाही. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दहा दिवसांनी तिचे अवयव हलू लागले. नील आई शिवाय दहा दिवस राहणे म्हणजे तेवढे सोपे नव्हते. पण या समंजस बालकाने अगदी नाव कोरले. निशाला पूर्णपणे जाग आली. डॉक्टर तिला घेऊन चालवत होते. तेवढ्यात नीलला अंजली घेऊन आली. नीलचे हास्य पाहून निशाला खूप हळवी झाली. काय करत होता. काय खात होता. कसा राहत होता किती प्रश्न तिला पडले. पण नीलचे," आई मी बरा आहे आणि मजेत आहे". निशा आणि दिनेश घरी आले. दोघांचे आई बाबा पण आले. निशाने ऑफीसला एक आठवडा वाढवून मागितली. दिनेशच्या पायाची दुखापत इतक्यात बरी होणार नव्हती. दोघेही घरीच नील बरोबर खेळायचे. निशा बरी झाली तशी ती ऑफीसला जायला लागली. आई बाबाही निघाले. नीलला आता आलाप दादाच खेळायला. दिनेश घरीच व्यायाम करून पायाला आराम देई. निशाला ऑफीसमध्ये खूप सांभाळून घेतले. तशी ती आता वरिष्ठ झाली होती. ऑफीस घर मग नीलचा अभ्यास याचा तिला थोडा ताण पडत गेला. मग आलाप बरोबर यालाही क्लासला घातले. दोघेही एकत्र जायचे यायचे.

नील हुशार होता पण तो लहान वयातच कर्तबगार झाला. तो दहावीत गेला आणि मग निशाची कंपनी बंद पडली. निशाचा हिशोब मिळाला आणि तिने घराचे राहिलेले थोडे कर्ज फेडले. दिनेशचे पैसे येतील तसे तो पॉलिसीमध्ये गुंतवत होताच. नीलचे पुढील शिक्षण महत्वाचे होते. अशाच एका दसऱ्याचे दिनेशला काम होते म्हणून तो बाजारात सामानाची यादी द्यायला गेला. येताना तो नीलला शाळेजवळ भेटून दसऱ्याचे घरासाठी लागणारे नारळ, हार, तोरण आणि नीलला जे काही घ्यायचे असेल ते आणायला म्हणून गेला. दिनेशची आणि नीलची शाळेजवळ भेट झाली. त्याला २१ प्रश्न संच घेऊन झाल्यावर, हार, तोरण घेतले तिथेच तो घामाने अस्वस्थ झाला. मग नील हात धरून कसेबसे घेऊन आला. थोडा आराम केला. दिनेश रात्रभर झोपला नव्हता. तळमळत होता. नीलची काळजी होतीच. निशाचे आईवडील खूप थकले होते. आपले आई वडील थकलेत. सकाळी उठून त्याने आवरले. निशाने नीलला हाक मारली. तोही उठला. निशाची बाहेर रांगोळी काढून झाली. तसे दोघांनी तोरण लावायला घेतले. अंजली, आलाप, आशिष पण बाहेरच होते. " आज मी घरीच श्रीखंड करणार आहे तर तुम्ही साधे खीर किंवा पुरण करा आणि मी तुम्हाला देईन त्यातच तुम्ही तुमचा पदार्थ घालून द्या". निशा बरं म्हणत आत गेली. इतक्यात दिनेश चक्कर येऊन हलू लागला. नील आणि आलापचे लक्ष जाताच धरलं आणि खाली उतरवलं जिन्यातच तो बेशुद्ध पडला. मग आशिषने पण हात धरून आत सोफ्यावर झोपवले. निशाने लिंबू सरबत केले. पाणी शिंपडले. बोलेना हलेना. शेवटी दोन तासाने हॉस्पिटलमध्ये नेले. नीलचा अभ्यास म्हणून नील नाही आला. अंजली, आशिष बरोबर होतेच. दिवस संपत आला तरीही दिनेशने अंग हलवले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी सगळ्या चाचण्या करून घेतल्या. निदान लागले आणि निशाचे पाय भिरभिरले. दिनेशच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. दिनेशने आपल्याला होणारा त्रास सांगितला नाही का अचानक झाले असेल. किती प्रश्न पडले बिचारीला पण उत्तर द्यायला तो शुद्धीतच नव्हता. सतरा वर्षाच्या संसारात वादळ ते किती यावं. डॉक्टरांनी डायलिसिसवर ठेवले तसा तो हळूहळू शुद्धीत आला. आता आपण असेच येत राहूत.

घरी आल्यावर आता नवीन किडनी कोण देणार. निशाचे आई वडील म्हणाले आमची घ्या आम्हाला काय आयुष्य घेऊन करायचंय. पण शेवटी ती दिनेश बरोबर जुळत नव्हती. निशाने आपलीही तपासणी करून घेतली तेव्हा ती जुळत होती. नील अजून सज्ञान झाला नाही. तेव्हा निशाने असा निर्णय घेणे दिनेशला मान्य नव्हते. निशाने ऐकले नाही. ऑपरेशनसाठी एवढे पैसे जमा करायचे होते. दोघांनाही मेडिक्लेम मिळाले. थोडे त्याने बँकेतून काढले. आता नीलची परीक्षा संपण्याची वाट बघत होते. तोवर उन्हाळा सुरु झाला होता. डायलिसिसवर पैसे जाण्यापेक्षा आत्ताच केलेले बरे. नीलची परीक्षा आटोपली आणि दुसऱ्याच दिवशी निशा दिनेश अॅडमिट झाले. दोघांनाही यश आले. माझ्या प्रियकराला मी आपल्यात सामावून घेतलं यातच निशाला आनंद झाला. नीलला पण आईचा अभिमान वाटला घरी आल्यावर नीलने बाबांच्या सगळ्या कामाची जबाबदारी घेतली. दिनेश घरातून ऑर्डर घेई. माणसं घरी बोलावून तो काम वाटून देई. नील बाजारातून जाऊन सामानाची नोंद करून येई. केव्हा केव्हा तो बाबांना घेऊन जाई. निशाही अधूनमधून जाई. निकालाचा दिवस आला. ८२ टक्के मिळवून नीलने घराला घरपण आणले. नीलला हॉटेल मॅनेजमेंट करायचे होते. बाबांचे काम त्याला मोठे करायचे होते. तेवढे पैसे जमा करण्यासाठी त्याने खूप ठिकाणी जाऊन आपल्या कामाची जाहिरात केली. त्यातूनही तो शिकत गेला. एक असा सोनेरी दिवस आला की त्याने स्वतःचे हॉटेल सुरु केले. हॉटेलला नाव दिले 'निदिनी लाईफ' निशा, दिनेश आणि नील यांचे हॉटेल हा केवढा कौतुकास्पद होता. उदघाटनाची वेळ झाली. तेव्हा निशाने आपले मत व्यक्त केले," असा सोनेरी दिवस आमच्या आयुष्यात येणार याची मला खात्री होतीच पण तो एकट्याने बघण्यात मला जमले नसते. आम्हा दोघांना हा आनंद मिळावा आणि आम्ही तो डोळे भरून पहावा म्हणूनच मी दिनेशला माझ्या प्रियकराला किडनी दिली. आजचा हा सोहळा आमच्या नशिबी होता आणि अनेक सोहळे आम्ही बघुत". शेवटी तिने अंजली, आशिष, आलाप यांचेही विशेष आभार मानले. त्यांचीही पाठ थोपटली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama