Pallavi Wagle-Samant

Others

1.9  

Pallavi Wagle-Samant

Others

एक अवचित पाऊस

एक अवचित पाऊस

10 mins
16.2K


अनघा उठली तसा पाऊस रिमझिम पडत होता. स्वयंपाक झाला तशी ती अश्विनला उठवायला गेली. पण दारावर बेल वाजली दूधवाला आला म्हणून ती दरवाज्याकडे गेली. परत येउन कपाटातून ड्रेस काढला आणि तयारी करायला घेतली. डबा भरून घेतला पण अश्विन काही उठला नाही. शेवटी बेडरूम मध्ये जाऊन अश्विनला हाक मारली त्याला हात लाऊन जर उशिरा जाईन ऍसिडिटी वाटते आहे. यावर अनघा बर मी निघते, कच्चे दुध आहे ते पिउन घ्या असे सांगत निघते. तिशीतली हि जोडी सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले. अनघा साधी, अबोल आणि अश्विन महाबिलंदर पण तितकाच समंजस. अनघावर जीवापाड प्रेम करतो. अनघा थांबली असती घरी पण महिना अखेर. ती एच. आर मध्ये असल्याने तिला पगाराचे काम होते. खाली येउन तिथे बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हसत येते म्हणते. पाऊस रिमझिम पडत होता ट्रेन चुकू नये म्हणून तिने चाल जर भरभर केली. जाता जाता निघताना तिने कुंडीतले चीनी गुलाब देऊळात वाहिले. ट्रेन मधून उतरून रस्ता क्रॉस करून ऑफिसच्या दिशेला निघाली. आज तिच्याकडे मसूरची भाजी होती अश्विनला आवडते म्हणून ती नेहमी करते पण तिने जाताना कोपऱ्यावरच्या भैयाकडे केळी विचारते तोच राजेश सर म्हणजे अनघाच्या ऑफिसमधील सी ई ओ. खरे पाहता दोघांत प्रचंड दुमत कारण त्याने हेड ऑफिसमध्ये काही गोष्टी ढवळून वर्षभरापूर्वी इकडे ट्रान्स्फर करून घेतली. तो तिला पास करून गेला. अनघा तशी सिनिअर पण त्याच्याशी कामापुरती बोलते. एकदाची पोहोचली ऑफिसला. नेहा तिची जवळची मैत्रीण आणि त्यात ती सहा महिने गरोदर सफरचंद खात बसली होती. ईशाही येउन संगणकाच्या स्क्रीन वर डोळे मिचकावत बघत होती. तशी ती फ्रेशर लहान तशीच बालिश. सुप्रभा पण आली. तसेच रमेश, सुहास, अवधूत सगळी हुश करत आत आले. "राजेश सर आल्यापासून दहा मिनिटच लेट मार्क." शिव्या घालत बसले. दहाच्या सुमाराला गणेश चहा कॉफी घेऊन आला. सतत 'राम भगवंता' त्याच्या तोंडात. नेहा पर्स मधून बिस्कीटचा पुडा काढून अनघाकडे गेली.

" आता पाच दिवस पगार होई पर्यंत तुझे काही खरे नाही त्यात तू सकाळचे काही खात नाही. दोघी बसून चहा घेऊन आणि कामाला जुंपली. इशाकडे फोन खणखणतो आणि तिचे वेडेवाकडे हावभाव राजेश सरांचा असेल त्याला हिटलर म्हणते. ती नुकतीच राजेशची सेक्रेटरी म्हणून जॉईन झाली होती. सगळे तिला मिस्कीलपणे हसत घेतात. पण फोन कोणी आय. टी मधून होता. राजेशला लाईन ट्रान्स्फर करत "शेंबडी operator आज आली नाही वाटत हिला सगळ्या ऋतूंच त्रास". एकदाचा हसा उडाला आणि सगळे बराच वेळ कामात गुंग होते. बाराच्या सुमारास गणेश फॅक्सपेपर घेऊन आला. सुप्रभाकडे बघत आज पावसाची झिम्मड मजा आहे लवकर निघण्याचं चान्स मिळतो का ते बघा असे सांगून निघाला. सुप्रभा सगळ्या पुरुषांकडे बघते आणि पुन्हा कामात व्यत्यय पण अनघा कामातच मग्न होती. हातातले काम पुरे करून फाईल घेऊन राजेश कडे गेली. तो तिला एखाद वर्ष सिनिअर. फाईल देत " आज लवकर सोड शक्यतो पाऊस खूप आहे". राजेश तिच्याकडे न बघता "म्ह.. दोन वाजता येउन आढावा दे". अनघा तेजस्वी होऊन बाहेर आली. सगळे न बोलताच समजतात. एकच्या सुमारास लंच घ्यायला निघाले. नेहमीप्रमाणे अनघाने अश्विनला फोन केला आणि तिला आज तो पोष्टाचे काम संपवून डॉक्टर कडे जाऊन घरीच आला याचे कळल्यावर आणि प्रफ्फुलीत झाली. "आराम करा "..

दोनच्या सुमाराला राजेश हेड ऑफिस मधून सोडून देण्याचा निरोप घेऊन मिळाला. गणेश तिकडेच होता तो सगळ्यांना आवरायला मदत करत होता पण सगळे पुरुष जर रेल्वेचे वेळापत्रक बघून निघतो असे म्हणून नेहा कडे पाहिले. राजेशने माझ्याबरोबर चल असे म्हणत नेहाला आग्रह केला पण नेहा अनघाकडे पाहते. यावर राजेश "तेवढी माणुसकी मी दाखवूं शकतो". सुप्रभाही थोडी थांबणार होती . पुरुष मंडळी निघा वेळ दवडू नका. इशा तर आधीच उठली. नेहाला हात देत तिला उठवले आणि तिघी निघाल्या. इशा पुढेच बसली तीच फुगल्यासारखी आणि उग्र. तिच्या बालिश पणाकडे अनघा कधीच लक्ष देत नव्हती. पाऊसाचा वेग वाढत चालला होता. राजेशने एफ एम लावला पण खरखर आवाज येत होता. गाडीही हळूहळू चालवत होता पण त्या टपोऱ्या थेंबात त्याला काही उमगत नव्हते. ऑफिस एरिया बाहेर आले तोच समोर गाड्या थांबल्या. प्रत्येक गाडी आपल्या मागच्या गाडीला संदेश देत होती की " पुढे मोठाले झाड पडले आहे तसेच पाणीही खूप जमले आहे जवळ जवळ कंबर भर." एकाने नेहाची अवस्था बघून अशावेळी ऑफिसमध्येच सुरक्षीत राहाल जा परत. राजेश जरा उग्र झाला खर पण त्याला तेच करावे असे बहुधा वाटले त्याने तिघींना "तुम्हीं उतरून पुढे व्हा, मला जमेल तसे रिव्हर्स घेवून येतो. तिघींना ते पटले आणि बाहेर आल्या. चंचल इशाला हळू हळू चालायला जमले नसते. ती चालत सुटली. अनघा मात्र नेहाला झाड आणि पाण्याचा त्रास होणार नाही अशा ठिकाणाहून चालत घेवून गेली. तिथेच एका कार्यकर्त्यांची एक गाडी काही बिस्कीट पुडे, पाणी वाटत होते. अनघा नेहाला एका कडेला उभे करून पुढे होवून त्यांच्याकडून बोट दाखवून घेतले दोन पुडे. तिथेच एक लहानगे मुल आपल्या गर्भार आईकडे बोट दाखवून तिला पण घे आपण त्यांना दिसू शकत नाही. अनघाने आपल्या हातातील पुडे देवून स्वतःसाठी नवीन घेतले. या इंडस्ट्रीच्या पलीकडे झोपडी वजा घरे आणि इमारतीही आहेत तिथेच कॉलेजची मुले " सांभाळून डबलडेकर उभी आहे" असे म्हणत पाणी उडवत चालले होते. अनघाने एकाच्या मुस्कटात वाजवली चांगलीच. स्त्रीद्वेशेष्टेच्या बाबतीत ती कडक होती. मुले पुढे निघून गेली. नेहाला बिस्किट्स खायला देऊन दोघी तिकडून चालू लागल्या. नेहाला अनघाचा हा अनुभव बरेचदा आला होता. तिला फार अभिमान वाटे तिचा. वाटेत कुत्र्याचे पिल्लू तडफडत होते. कचरा कुंडी कडे सगळा कचरा बाहेर पडून विशेषतः प्लास्टिक बाटल्या तरंगू लागले. एक चहाची टपरी तर अगदी छप्पर उडून तसेच उघडे पडले होते. पावसाचे थेंब जोरात पडत असल्याने आता दोघीच्या गालावर चटके लागल्यासारखे झाले होते. एकदाच्या ऑफिसला पोहोचल्या दोघी. कोणीच उठले नव्हते. दोघींना पुन्हा बघून पुरुष मंडळी आनंदात बरे झाले आलात ते. अनघा तर अशी पहिल्यांदाच भिजली होती. नाहीतर पावसाळा तिला फक्त सहली पुरताच आवडतो.

विधाता सगळे संकट देतो पण काही सुखाचेही देतो. भिजलेले पाहिल्यावर गार्ड संपत हा मुळचा बुलधाण्याचा पण इकडेच खाली एक झोपडे बांधून राहतो त्याने त्याच्या बायको साठी दोन नायलॉनच्या साड्या घेतल्या होत्या ते घेवून आणि टॉवेल तसेच जुने हाल्फ शर्ट बरोबर होते. हसत हसत या नेसा. अगदी भावासारखा आलास आम्ही तुला चांगल्या साड्या घेवून देवूत असे म्हणत नेहा पुढे झाली. ईशाला विचारले असता ती आधीच नको असे म्हणाली. दोघी कोरड्या झाल्या ड्रेस खुर्चीवर वाळत ठेवले तिकडे राजेश वाट काढत केबिन मध्ये येउन बसला होता. ईशाने निलगिरी लावली होती. छान बरे वाटत होते. सगळे बाहेर बसून आता गंभीरपणे पुढील समस्या, महागाई, बेकारी, यावर चर्चा करत होती. अनघाने नेहाला बसवून गणेशला चहा आणायला सांगितले. मनात अश्विनची आठवण. फोन बंदच होते. थोडे आपणही निलगिरी लावावी म्हणून इशाकडे मागितले. पण इशा उठून बाहेरच्या दिशेला जात घ्या पर्सेमधून. अनघा नेमकी मागच्या कप्प्यात हात घालते. तोच हाताला कंडोमचे पाकीट लागले. अनघाला धस्स होते. इशा एवढी पोचलेली आहे का तिला कोणी बॉयफ्रेंड आहे आणि तिला लग्नाआधीच अधीर व्हायचे आहे. तसे तिला वाटच कारण ती गाडीत थोडी घुस्शातच होती. तिला आता बहुधा लक्षात आले नसावे नाहीतर तिने पर्सला हात लावायला दिला नसता. अनघा एच आर मध्ये असल्याने तिला गोपनीयता ठेवावी लागते. विचार करत ती बाहेर आली आणि तिकडे गणेशने गच्चीत चला सगळा प्रदेश बघायला मिळेल असा म्हणत निघाला.

खरं पाहता प्रत्येक पावसाळ्यात पत्र्याचे शेड टाकून ऑफिस पाणी हार्वेस्टिंग होते. त्यामुळे वर जायला काहीच हरकत नव्हती. साडीचा पदर अनघा सावरून तिने चारही बाजूनी क्षण टिपले. सब वे कडे एक जडी बुटीवाला आपले सामान बांधत होता पण पाऊस त्याला काही करून देईल तर ना. ढोपरभर पाण्यात एक हातगाडीवाला गाडी खेचत होता तिकडून एक छक्का त्याला वेडावत होता. त्यातच तो त्या पाण्यात थुंकला गाडीवाला चीडूनही काही बोलू शकत नव्हता. बस स्टॉप वर एक तरुण तरुणी वीज कडकडली तसे एकमेकांना मिठी मारत होते. समोरच्या एका शानदार हॉटेल मधून एक तरुणी वेगाने निघत होती पण एक तरुण तिला आज इथेच थांबुयात असे म्हणत तिला ओढत होता ती विरोध करते तरीही तो घेवून गेला. तिथेच वर एक परदेशी जोडपे एकमेकांना किसिंग करत सगळे दृश्य कॅमेऱ्यात टिपत होते. आपल्या देशाची अवस्था असे कुणी येवून टिपते अनघाला जर तिडीकच गेली. एक भिकारी तर अगदी पाण्यात हात घालून बायको पोरांवर पाणी उडवत होता बायको जरा दुखी दिसत होती . प्रसंगाचे काही गांभीर्यच नव्हते. पण एकीकडे मात्र फारच विलक्षण घडत होते. एन. एस.एस. ची काही पथके दोऱ्या बांधून लोकांना बाजूला करत होते. कुठे कुठे पाण्याचा ओघ जास्त आहे त्याचे रीतसर मार्गदर्शन करत होते. एक रुग्णवाहिका पाण्यात अडकली होती. पण त्यात वाव शोधत होते. एकाच्या तर डोक्यावर पत्र्याची पाटी पडली. बिचारा कळवला असेल पण सेवा महत्त्वाची . आता या पावसात सारे जग काहीना काही शिकणार होते.

अंधार पडत आला तसे सगळे खाली आले . आता जेवणाचे काय? गणेश उत्तरला बाहेर काहीच सोय नाही जे होईल ते इथेच. राजेश आत काय करत होता का त्याला फिकीर नव्हती. एवढ्यात संपत चार पातेल्या, हातात अर्धा किलोचा तांदळाचा डबा, बिसलरी बाटलीत तेल, मीठ, बेसन पीठ घेवून वर चढला. सगळे हसत चेष्टा करत आपण पिठलं भात करूया पण भांडी लहान आहेत. पण नेहा म्हणाली दोनदा करूयात. कँटीन मध्ये जावून पुरुषांनी काही प्लास्टिक डिश, चमचे काढले . अनघा आधी बाहेर येवून दुपारी उरलेल्यातील दोन केळी खायला दिली.. अनघा बरोबर असली की नेहाला कसली काळजी नसे. दोघी अगदी बहिणीसाख्या राहतात. तिकडे कँटीनमध्ये संपत गणेशला आपल्याला बायकोची फार आठवण येते असा पाऊस असला की. अनघा लक्ष देत नाही सुप्रभा आणि अनघा दोघे मिळून स्वयंपाक केला. एवढ्यात दिवेही गेले. गणेश येवून जनरेटर लावून गेला. जाताना राजेशला पिठलं भात खावा लागेल असे सांगून गेला. बाहेर रमेशने एक पुस्तक बाहेर काढले ते चुकून यावर सगळ्यांची खिल्ली उडवायला सुरुवात झाली.. लायब्ररी लावलीस का ते सुद्धा अशा पुस्तकांसाठी. रमेश लाजत, " मुले आता मोठी झाली आहेत. आपला अभ्यास आपण करतात तेवढाच आता निवांत वेळ असतो म्हणून जरा.." लगेच सुहासची पण प्रतिक्रिया " मग काय म्हणून तर मी वेगळा झालो एकमेकांच्या आवडी निवडी मध्ये कामवाली आधीच भांड्यांचा ढिगारा बघून सोडून जाते. बायकोला अंथरुणावर यायला रात्रीचे बारा. आता वेगळा झालो तसा बघ कसा दहा वाजता बिछान्यावर". मग अवदुतही म्हणाला " घरी सुट्टी घेवून थांबायचे तर बायकोची संध्याकाळची एक वाहिनी, दुपारची एक वाहिनी.. आमच्या वाहिनीला बुच त्यापेक्षा रात्र बरी." अनघा काहीतरी बाहेर शोधांच्या निमित्ताने येते आणि सगळे ऐकते. बाहेर पूर आणि मनात प्रेमाचा उर अनघा विचारात पडली. डिशमध्ये राजेश चे जेवण आतच पाठवले आणि सगळे बाहेर जेवायला बसले. नेहा पोटभर जेवली की मग जेवूयात असेही म्हणताच पण नेहा आपले बस एवढेच म्हणून सगळे आस्वाद घेतात. गणेश, संपतही वरच आले तेच ब्लंकेट घेवून. रमेश अनघाला आणि नेहाला रेस्ट रूम मध्ये जा असे सांगितले तिथे निवांत झोप लागेल. दोघी हात धुवून गेले. नेहा म्हणाली कि आता आपले डोहाळे जेवण आहे तर आता मी नंतरच येईन पावसाचे नकोच. पण आपण डिलिव्हरी नंतर आलो कि तू चान्स घे म्हणजे आपण तुझी सेवा करू. अनघा जाऊ दे ग थट्टा नको.. आणि बाहेर येउन गणेशला राजेशच्या केबिन मध्ये पाठवले काही हवे का विचारायला. अनघा आत जाऊन झोपली.

सुमारे तीनला अनघाला बाथरूम साठी हाक मारली. अनघाला चांगलीच झोप लागली होती. डोळे चोळत उठली. बाजूलाच टॉयलेट होते तिथेच तिच्या बरोबर जाऊन बाहेर उभी होती. इतक्यात बाहेरच्या राजेशच्या केबिन मध्ये खी.. खी.. आवाज झाला. आणि काचेवर सावली पडली कि राजेश काही तरी चाळे करत आहे...अनघाने पाठ फिरवली पण तिने कानोसा घेतला हा आवाज ईशाचा होता. "सकाळपासून एकदाही हाक नाही मारलीत आणि पाकीट मला का आणायला सांगितले आणि गाडीतही काही बोलले नाहीत?" राजेशने यावर एका वाक्यात उत्तरे दिली. सकाळच्या त्या आय टी वाल्याकडून काही नाईट सीन बघत होतो तेवढीच स्फूर्ती .. सकाळी बायको भरते ना सगळे .... आणि गाडीत त्या होत्या ना वाघाच्या मावशा. अनघाला चांगलीच तिडीक गेली... इशा नुकतीच आत गेली असणार. राजेश तिला निलगिरीचा वास छान येतो आहे असे सांगत सुरुवात करतो. इशा मधेच बोलते डोळे, ओठ रोजचे आहे आज जरा ... राजेश हो हो.. गुड रिस्पोन्स. "सर झिम्मड मजा करा. फक्त दोनच तास आहेत चार वेळा तरी...." राजेश आता फक्त राजू सर नको... इशा एवढी पोचली होती पुढचे काही एकवेना म्हणून अनघा दाराकडे येवून नेहाला घेवून गेली. पाण्याची बाटली घेवून पुन्हा वळते तोच कुत्र्यांचा भूक्ण्याचा आवाज बाहेर पाहतो तोच बाजूच्या ऑफिस मधील एक अधिकारी गाडीत बसून एक तरुणीशी काही चाळे करत बसला होता. राजेश ने पण खालीच जायचे ना हो पण त्याला सगळेच करायचे होते ना. पुन्हा सोफ्यावर येवून पडली तोच तिला स्वत:च्या वैवाहिक आयुष्याचा विचार करत. आपण अश्विनला फार औपचारिक पणे घेतो तिला तिचे लग्न झाल्यापासूनचे दिवस आठवतात. अश्विन समंजस होता याबाबतीत सगळा निर्णय त्याने तिच्यावर ठेवला होता. इशा एवढी चाप्टर असेल असे वाटले नव्हते कारण बाहेर ती वेगळी असते. कधी एकदा अश्विनला भेटते असे झाले.

सहा वाजले तशी उठली. चूळ भरली आणि साडी सोडून ड्रेस घातला. नेहासाठी चिट्ठी ठेवली बाहेर येवून बघते तर इशा लाजत झोपली होती.. सुप्रभा पण छातीला कवटाळून रजिस्टर घेवून झोपली होती. रमेश, सुहास मांडीत रजिस्टर घेवून झोपला होता. .. संपतला थँक्स म्हणून ती निघाली. हायवे च्या दिशेने ..रिक्षेत गIळ साचला होता. रस्त्यावर मांजर, कावळे, कुत्रे मारून पडले होते. झाडे पडली होती. अनघा चालतच सुटली.. एक म्हातारी डोक्याला हात लाऊन नातवाला मांडीवर घेवून बसली होती.. त्या झोपड्यांचे तंबू पूर्ण उठले होते. काही पन्नासच्या नोटा काढून दिल्या आणि ती पुढे निघाली. इमारतीच्या गेट कडे येउन दिसेल त्याला हसत आत शिरली. दाराची बेल वाजविलीअश्विन मांडीत उशी घेऊन झोपला होता तो तसाच बाहेर आला आणि दरवाजा उघडताच अनघाने त्याला मिठी मारली. बेड रूम मध्ये शिरली पण पुन्हा दार वाजले तिने अश्विनला उठू देत नाही.. तो लगेच बाजूला असणारं एअर फ्रेशनर ने रूम सुंगधीत केले. हा पूर अश्विनला हव होते ते देवून गेला. तिच्या कोमल स्पर्शातून अश्विन सुखावला गेला.

दोन तीन तासांनी दोघेही उठले. मग तिने सगळी हकीकत अश्विनला सांगितली. आणि फ्रेश होऊन घरातील जुने कपडे, भांडी, धान्य, औषध घेऊन हायवे च्या दिशेने गेले. हा अवचित पाऊस मनाला सुखावून गेला आणि जगाला दुःख देऊन गेला.


Rate this content
Log in