Pallavi Wagle-Samant

Tragedy

4  

Pallavi Wagle-Samant

Tragedy

बहर- जीवनाला आलेला बहर

बहर- जीवनाला आलेला बहर

9 mins
16.3K


आज साक्षीने अगदी कहर केला. अंथरुणातून उठून पार स्वयंपाक घरात गेली ती आज डबा नाही ते सांगायला कारण आज ऑफिसचा ग्रुप बाहेर जेवायला जाणार होते. बाविशीतील साक्षी फारच वेंधळी आणि हसतमुख, सकारात्मक गोरी आणि लांबसडक केस कायम पंजाबी ड्रेस शनिवारी मात्र वेस्टर्न. दर सोमवारी उपवास आणि पांढरे कपडे घालणारी शेंडेफळ असल्यामुळे आई बाबांची फारच लाडकी. तिने लहानपणी चित्रकला , हस्तकला यात प्राविण्य मिळवले. बी. कॉम झाल्यावर मात्र स्वतःच्या पायावर नोकरी करून आपली कला जोपासायची असे ठरवते. आजही आधीच उशिरा कळवल्याने आईची जर नाराजीच होती तिच्यावर. आईच्या नजरेत मुलगी मोठी झाली कि तिने जाणीवपूर्वक सगळी पाऊल उचलली पाहिजेत कारण कितीही मुलगी पुढे गेली तरीही घर तिचेच असते. पण साक्षीचे नेहमीचेच समजुतीचे उत्तर कि बॉस आज बाहेर पार्टी देणार आहे तर रात्री बसून काहीतरी पेंटिंग तयार करत होती. तिच्या अशा उत्तराची सवय आहे आईला म्हणूच तेवढ्यावर थांबून आईने न्याहारीची तयारी केली. साक्षीच्या दादाचे सर्वज्ञचे नुकतेच लग्न झाले होते वाहिनी सुचेता आईच्या सोबत राहून घरच्या रीतीभाती शिकत होती. दादा लगेच कामाला रुजू होणार होता आणि वाहिनी मात्र उशिरा जाणार होती. सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला. सुचेता सगळ्यांना हनिमूनच्या गोष्टी सांगत होती. केरळची महागाई, जेवण, बोटीचे पैसे, एकंदरीत आपली मुंबई दुनिया येवून फिरून जाते तरीही अवाकाच्याबाहेर कोणाचा खर्च होत नाही तर लोक घेऊन आलेले पैसे परत घेवून जाऊ शकतात तिकडे मात्र पुन्हा स्वतःचे पैसे काढावे लागतात इतकच नाही तर नवीन सगळे ऑन लाईन चे ती कौतुक करत होती. बाबांना अगदी बोलून मंत्रमुग्ध करत होती. आता आम्ही तिघेही कमवते आहोत तर तुम्ही नोकरी सोडा असे देखील म्हणाली. यावर "साक्षीचे लग्न झाल्याशिवाय मी काहीच निर्णय घेणार नाही" असे बाबा ठामपने बोलले.

पुन्हा एकदा साक्षीच्या लग्नाचा विषय. साक्षी जर रागावलीच अजून चांगली चार वर्ष मी लग्नाचा विचार करत नसल्याच सांगून आणि टेबलावरून उठली.. सर्वज्ञही उठला बाईक वरून साक्षीला घेवून गेला. बाबाही निघतात आई मात्र सुचेताला आजच माहेरी जाऊन ये मग कामाला जायला लागल्यावर राहील कि राहील. सुचेताही खूष होते आणि तयारीला लागली आई इकडे लग्नाचे अल्बम, रुखवताच्या गोष्टी आवरत बसली अर्ध्या रस्त्यात उतरून साक्षी बस स्थानकाला येते आणि मैत्रीण भेटते तिला ऑफिसची दोघी चढून जातात. आज पार्टी म्हणून नवीन लुक मध्ये दोघीच कौतुक करण्यात वेळ गेला. आज सर गजाली मध्ये पार्टी का देणार आहेत याची काहीच कुजबुज नव्हती कारण दर वेळी सर इकडेच काहीतरी मागवतात. कुतूहलापोटी कोणाला काही सुचतच नव्हते एकदाची दुपार झाली. सरांनी स्वतःची आणि कंपनीची एक गाडी काढून स्टाफ घेवून गेले.तिकडे पो होचल्यावर सगळ्यांचे डोळे विस्फारले. सरांनी आधीच टेबल बुक करून ठेवले होते. खर तर साक्षी हि त्यांची जनरल सेक्रटरी पण तिलाही हा सगळा धक्काच होता. पण कोणालाही ताटकळत न ठेवता कार बंद करून सरांनी सांगितले कि त्यांचे प्रमोशन, लग्न ठरले आणि त्यांनी एक घर बुक केले त्याची आज पार्टी आहे. एकदाचे सगळ्याची उत्कंठा जी ताणली होती ती आता शिधेला पोहोचली. थट्टा मस्करी करत सगळे मस्त जेवले मग काहींनी कुल्फी तर काहींनी कोकमकडी वरच ताव मारला. सर कधीहि भेदभाव करत नसत आणि एक उत्तम माणुसकी सगळ्यांना दाखवत असत. उशिरा का होईना त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला याचा सगळ्यांना आनंद झाला. आणखी विशेष आनंद म्हणजे काय तर पुन्हा ऑफिसला न जाता घरी जा हा आनंद कारण त्यांना घरी काम होते आणि असाही हॉटेल मध्ये बराच वेळ गेला होता फक्त दोनच तास उरले होते. साक्षीने रात्रभर बसून तयार केलेले भेटवस्तू दिले आणि बाहेर पडले. साक्षी फारच खूष होती. पुन्हा एकदा तिला सरांसाठी नवीन काही तरी भेटवस्तूची तयारी करायची होती.

पक्षांचा किलबिलाट, एखाद कुत्रा भुंकत होत आणि आई खिडकीत बसून चहा घेत होती. इतक्यात दारात बेल वाजली. साक्षीची धडक बघताच आई घाबरली कि हि आजारी आहे म्हणून लवकर घरी आली. पण हिचा आनंदी चेहरा आईला काहीतरी वेगळाच सांगून गेला. काही विशेष आहे का ? असे विचारून तिला मुद्द्यावर आणले. साक्षीने सगळ्या गमती जमती सांगितल्या. आईची आजकाल फार छोट्या छोट्या गोष्टीवर काळजी असते हे तिच्या लक्षात आले. ती आत गेली आणि आई स्वयांपाकला लागली. सुचेता रात्री जेवूनच येणार होती. घराच्या कामातही आता साक्षीने लक्ष घातले पाहिजे. आई आता जास्त काळजी करत होती साक्षीची. म्हणता म्हणता नोकरीला लागून दोन वर्ष झाली होती. दुसऱ्या दिवशी साक्षी ऑफिसात पोहोचली आणि तिला विवेक सरांनी लगेच आत बोलावले लवकरच ऑडीट सुरु होणार आहे तर तशा तयारीला लागा. तत्समधित मिटिंग घेणार आहे दुपारी. कारण आता बिझनेस वाढवायचा आहे. ह्या ऑफिसचे ऑडीट आता पर्यंत घेतले नव्हते सुरु झाल्यापासून पण आता काही पर्याय नाही. साक्षीने बाहेर येवून तसा निरोपही दिला. सगळे एकजुटीने कामाला लागले. साक्षीने तसे काही ग्रुप बनवून काम वाटली कारण विवेक सर कामाच्या बाबतीत फार कडक आहेत. आज अगदी मन लावून काम करताना पाहिल्यावर सर पण अगदी त्यांच्याकडे अभिमानाने बघत होते. दुसरे म्हणजे सरांसाठी हे आव्हान होते कारण त्यांच्याकडे असे पहिलेच काम आले. लवकरच बाहेरून सी ए लोक येवून ऑडीट करणार म्हणून साक्षीने त्याच्यासाठी बसण्याची जागा, खुर्ची, मिनरल पाणी, स्टेशनरी आदि वस्तूंची तयारी सुरु केली. छानशी फुलांची परडी सजवली. अखेर तो दिवस आला. दोघ येणार होती एक अनुभवी आणि एक शिकाऊ. सकाळी दहाच्या सुमाराला साक्षी पोहोचते तोच तिचा वर्गमित्र आशिष येताना दिसला. खर तर हा तिचा मित्र आठवीत असताना बाबांची बदली झाली म्हणून मुंबई सोडून गेला होता पनवेलला. एकमेकांची ओळख करत तिघेही आत गेले. साक्षीचा पहिलाच अनुभव एवढा सुरेख आणि टिपणारा होता. सरांना अगदी प्रांजळ मनाने सांगून सगळे आपले काम करू लागले. जाताना मात्र आशिष तिला सांगून गेला आणि आपल्याला इकडचे फारसे माहित नसल्याचे सांगत होता. आता आशिष इकडे कुठे तरी पेइंगेस्त म्हणून जागेत राहत होता कारण त्याला फार लांब पडले असते. साक्षी त्याच्या बरोबर जावून काही रस्ते, बस मार्ग दाखवत होती कारण आता सहा महिने आशिष इथेच राहणार होता. जुन्या आठवणी जाग्या करत साक्षी आणि आशिष चालत गेले. आपल्या रस्त्याकडे येताच आपल्या घरी चल असेही ती म्हणाली पण आशिष तयार नव्हता. कुठेतरी त्याला त्याच्या वरीष्टांचे दडपण होतेच. एकदमच सगळे आज नको म्हणून तिनेही आग्रह नाही केला.

तिन्हीसांजेची वेळ कावळे आपल्या घरी निघाले, पक्षांचा देखील चिवचिव थांबली. आणि साक्षी घरी पोहोचली. मागून दादा आला. आई मात्र साक्षीला टक लावून बघत होती. काहीतरी कामात मदत कर म्हणून तिला स्वयपाक घरात घेवून गेली. साक्षीने आशिषची भेट झाल्याचे सांगितले तशी आई जरा नीर्धावली. खूप दिवसांनी भेटलेल्या मित्राला काहीतरी गिफ्ट करावे म्हणून तिने एक छानसे ग्रीटिंग तयार केले. कधी एकदाची देते असे झाले. सकाळी तुळशीला पाणी घालून तसेच नाश्ता करून निघाली आणि थेट बस स्थानकावर भेटून त्याला गिफ्ट केले. हिच्या कलेला अजूनहि पाय आहेत हे पाहून त्याला आनंद झाला. ऑफिस मध्ये मात्र दोघेही जोमाने काम करत होती. आता हळू हळू ओळखी वाढत गेल्या. आशिष आता तिला मागणी घालणार होता पण तिला काय वाटेल याचा विचार तो करत होता. पण एकदा पनवेलला एक भव्य ग्राहक पेठ भरणार होती. आदिवासी कला कुसरी वरची ती ग्राहक पेठ बघायला आपण रविवारी जाणार आहोत तर तुही चल आणि घरच्यांशी ओळख करून देतो. साक्षी लगेच तयार झाली. घरी पटवून ती तयार झाली. आशिष तिला घेवून सकाळीच निघाला. घरी वेळ घालवला, ओळख करून दिली आणि दुपारी पेठेत गेले. तिला आवडतात त्या सगळ्या पेंटिंग त्याने तिला घेवून दिल्या. निघताना मात्र त्याने तिला विचारले ," आपण लग्न करूया का ? " साक्षी थोडी खड्बडली. काय सांगावे सुचत नव्हते. पूर्ण प्रवास ती गप्पच बसली. उतरताना मात्र आपण विचार करून घरच्यांना विचारात घेवून ठरवूयात. आशिषला आपण कोणतीहि चूक न केल्याचे कळते आणि खुदकन हसून तिला हवा तेवढा वेळ घे असे सांगतो.

बर्यापैकी काळोख पडला होता आणि काजव्यंचाही आवाज येत होता. दारात पोहोचताच कळले कि दाराला कुलूप आणि शेजाऱ्याकडून कळले की बाबांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे खूप हृदयाला भोक पडली आहेत म्हणे. साक्षी थेट निघते आणि तिकडे पोहोचते. सगळा चांगला मूड आता गेला होता. काय सांगावे कसे सांगावे घरी कधी येईल ती संधी सगळा विचार करून साक्षी गोंधळते. आणि सकाळी बाबांचं निधन सगळी आशा संपली. आईच्या तर अगदी कल्पवृक्षाचा आधारच गेला. आपलं प्राक्तन असे कसे आताच कुठे मुलाच लग्न झाले आहे आणि आता त्यालाही बाहेर जाण्याचा योग होता आता माझ्यामुळे तो अडकला. आईचे मन अगदी सुन्न झाले होते. साक्षीने ऑफिसला कळवल्यावर संध्याकाळी सगळे भेटायला आले आणि आशिष हि आला होता. पण काही विषय काढला नाही. किंबहुना त्याला ती वेळच वाटत नव्हती. दादा वाहिनी काय म्हणतील? खरे तर वर्षाच्या आत लग्न केले तर चांगले.आता म्हणता म्हणता सहा महिने होत आले बाबांना आणि अजून साक्षीने विषय काढला नव्हता एकदा वाटले सांगावे पण तिने उगीच आईचा भ्रमनिरास नको म्हणून थांबली त्यात दादा वाहिनिना हि बाहेरगावी आलेली संधी हुकवावी लागली. एकदाचे झाले लग्न तर आईला काळजी नव्हती. पण तिलाच आई सावरल्याशिवाय काही सांगायचे नव्हते. वेळ जमेल तशी काढूत आणि आईलाही साक्षीचा विरह एवढ्यात नकोसा वाटत होता.

ऑफिसमधले ऑडीट संपले होते आशिष दुसरीकडे कुठे जात होता. रोज नाही पण जमेल तशी भेटीगाठी होत होत्या. आई आता सावरली आहे. आता आपले लग्न झाले तर दादा आईला घेवून कुठेतरी जाईल तरी म्हणजे सगळे प्रश्न सुटतील या हिमतीने ती आशिषला होकार द्यायला तयार झाली. पण नियतीच्या मनात दुसरेच काहीतरी एका कारने मागून येवून साक्षीला धडक दिली कि साक्षीला आता कधीच व्हिल्चेअर शिवाय चालता येणार नव्हते. साक्षीने तसे आईकडून कळवले पण आशिष पुन्हा भेटायला देखील नाही आला. आईला तर आता निष्ठुर देवाचे काय करायचे असे एक एक प्रश्न मनात घर करू लागले. आपल्या मुलीच्या आयुष्यात मित्र मैत्रिणी कसे जमतील. ती चार चौन्घासारख कसे जगेल. मुलगा आणि सुनेच्या स्वप्नाच काय? विचाराने आई देखील खंगली. साक्षीने मात्र दादाच्या जीवावर जगण्यापेक्षा घरच्या घरीच दुकानदारन बोलावून पेंटिंग, राखी, पणती, रुखवताचे काही नमुने दाखवून मिळेल तेवढे काम घेतले. आईनेहि तिला चांगलाच आधार दिला. काय हवे नको ते पहिले. पुन्हा एकदा जवान झाली. जड सामान साक्षी घरीच मागवे. वर्षभरात तिने चांगला जम बसवला तरी देखील आपल्या मागून साक्षीचे काय या विचारातच ती खंगून जायची. साक्षी सगळं करण्यात रुमून जायची पण मधेच तिला आशिषची आठवण यायची आपण घरी काही कळवले नव्हते म्हणून बर याचा तिला निश्वास वाटे. नाहीतर घरचे आणखी कोलमडले असते. पण अशाच एका विचारात आईने तिला आशिष बद्दल विचारले. तेव्हा न राहून साक्षी अगदी रडू लागली. आणि सगळा भूतकाळ सांगितला.

दादा वाहिनीचे कुरकुरीचे शब्द आईने एकदा चोरून ऐकले तेव्हा आईने लगेच आपण आहोत तोपर्यंत तुम्ही बाहेर संधी घ्या. आईने एक मुलगी कामाला ठेवली किमया. ती सुदैवाने ती चांगली होती. दिवसभर साक्षीची तर काळजी घ्यायची पण तिला हेवे नको ते सामान आणून दे. सगळे पहायची. जसे जमेल तसे पैसे जमवले आणि घरातच एक क्लास तिने सुरु केला. शिबीर घेवू लागली. काही लोक तिचे अगदी नाव काढायचे. म्हणता म्हणता तिची तिशी आली आणि आता तिला बसून बसून मधुमेह झाला. आईचे आता काय करावे चित्त लागत नव्हते. तरीही किमयाला घेवून ती रुटीन चेकप साठी जायची. वॉकर मध्ये बसून अशीच एकदा चेकपला जाताना तिचा दुसरा वर्गमित्र राहुल जो एम. आर आहे आणि तो काही कामासाठी इथे आला होता. तो तिकडे तिला हाक मारून भेट घेतली. मात्र साक्षीने इकडे नको आपण घरी जाऊन बोलुत. आईनेही आग्रह केला कारण बराच काळ साक्षीला जुन्या आठवणीत कोणी नेले नव्हते. राहुलने तिकडची काम संपवून आपल्याच गाडीतून साक्षीच्या घरी गेला. घरी गेल्यावर सगळी हकीकत कळली. साक्षीचे घर सगळे पेंटिंग ने भरले होते. घरात केलेले आर्ट हाउस पाहून त्याला भन्नाट आनंद झाला कारण त्याची बायको सेल्वी हि क्रिश्चन आणि तिचे स्वतःचे गिफ्ट सेंटर आहे. राहुलने आपण जमेल तेवढी मदत करुत असे सांगितले आणि तिचा निरोप घेतला. दुसऱ्याच दिवशी तो सकाळी सेल्विला घेवून हजर झाला. सेल्वी तर अगदी तिला गतजन्मच्चि ओळख असल्यासारखी बिलगत होती. आणि तिच्या बर्याच गोष्टी नमुना म्हणून घेवून गेली. एक आठवड्यात तिने तिच्या बर्याच गोष्टींचा खप केला. नवनवीन दुकाने, पेठ भरवणे यासार्ख्यातून तिची ओळख वाढवली आणि इथेच ती एक महिला उद्योजिका म्हणून प्रसिद्ध झाली. इतकेच नाही तर सेल्वी ने तिच्यासाठी चर्च मध्ये जाऊन नवीना केला. तिला निरामय आयुष्य जावो म्हणून अनेक मोठ्या डॉक्टरांची ओळख काढली. त्यात सेल्वी राहुल ला मुलगी झाली . युक्ती साक्षीनेच नाव ठेवले.

अचानक आता साक्षीची आईदेखील वारली. आपला कल्पवृक्ष नाही म्हणून साक्षी कोलमडली नाही. तिचे दादा वाहिनी आपल्या मुलासकट परत आले. काही दिवसात किमयाही गेली लग्न ठरले म्हणून. साक्षीला दादा वाहिनीनं आपला ओझ नको म्हणून ती आश्रमात जाऊन आपले सगळे उर्वरित आयुष्याला तिकडेच बहर आणायचं असे ठरवले. राहुल आणि सेल्वी तिच्या मनासारखा करून देतात. हळूहळू साक्षीच्या मुलाखती वाचण्यात, बघण्यात, ऐकण्यात येवू लागल्या. आतापर्यंत आशिषचा संसार सुरु होवून बराच काळ लोटला होता. त्याने साक्षी बद्दल वाचले, पहिले देखील टी व्ही वर. पण त्याला जायचे बळ नव्हते. कारण त्याने दगा दिला होता. साक्षीची साधी चौकशी हि त्याने केली नव्हती. तरीदेखी एकदा राहुलची भेट काढून आपल्याला भेटायचे आहे असे सांगून तो आपल्याच गाडीतून राहुलला घेवून जात असताना एफ एम वर तिचा आवाज ऐकतो , " आपल्याला भूतकाळाशी काही बोलायचे नसून भविष्यात फक्त आयुष्याला बहर आणायचं आहे " एवढेच सांगितले. राहुल खाली उतरून आश्रमाच्या दिशेला जातो आशिषला मात्र मागे गाडी वळवावी लागते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy