Pallavi Wagle-Samant

Others

4  

Pallavi Wagle-Samant

Others

सुखाची सावली - गांजलेली स्त्री

सुखाची सावली - गांजलेली स्त्री

7 mins
16.4K


डोळे चोळत चोळत आज्ञा उठली. सुचित्रा गाणं गुणगुणत तयारी करत होती. आवाज गोड तिचा म्हणूनच एफ एमवर कामावर लागली. आज तिची सकाळची ड्युटी होती. डोळे चोळत चोळत आज्ञा उठली. सुचित्रा गाणं गुणगुणत तयारी करत होती. आज्ञाला शाळेला सुट्टी लागली होती म्हणून सुचित्राची धाकटी बहीण सुमिता तिला माहेरपणाला घेऊन आली होती. हि तीन वर्षांची चिमुरडी बोलते किती गोड," माऊ आज संडे आहे मग तू कुठे चाललीस कामाला. आई तर नाही जात. बघ अजून झोपली आहे". तिचे उत्तर देणे सुचित्राला अवघड होते पण तिने त्यातल्या त्यात जमवले. काही ऑफीसला आज सुट्टी असते काही ऑफीसला वेनस्डे असते. कसेबसे तिला पटवून ती बाहेर पडली. जाताना सुमिताला हाक मारली हि जागी आहे म्हणून. तसे तिचे आजी आजोबा म्हणजे या दोघींचे आई वडील उठले होतेच. सुचित्राला आंबोळी चटणी डब्यात दिली.बाबा खरे पाहता सत्तरीला आले पण सकाळचे झाडलोट तेच करत. मला वरून टाटा करायचाय म्हणून आज्ञाला बालकनीत घेऊन बसले. मग इकडचे तिकडचे पक्षी आणि प्राणी दाखवता दाखवता तिला झोप लागली. सुमिताने तिला थोपटून पुन्हा बिछान्यावर आणले. आई बाबांच्या डोळ्यातील काळजी तिला दिसत होतीच. ताईने दुसरा एखादा जॉब अथवा कोर्स असे काही तरी केले तर नाही का चालणार आता तिची पस्तिशी येईल. तिचे लग्न तिच्या या डूटीमुळे जमत नाही. आधीच लोकांचे एवढे प्रश्न. समाज किती शिकला तरीही त्याचा स्वार्थ काही जात नाही. आईला या मुलीला सांगून मी थकले. व्हायचं तेव्हा होईल असं म्हणते आणि मला सावरते. बाबाही तिला धीर देतात ज्याचं जस लिहिलंय ते घडतच.

खरं पाहता सुचित्राचे आधीचे जमलेले लग्न मोडले. मयूर हा तिच्या आयुष्यात आलेला पहिला जोडीदार बाबांच्या ओळखीतून हा सांगून आला होता. इंजिनिअर होता. मयूर हा पाहताच सुचित्राला सुस्वभावी वाटला. लग्न ठरले तेव्हा दोघेही फोनवर गप्पा करत. तिच्या डूटीच्या वेळेनुसार तोही तिला घरी भेटायला येई. किंवा ती त्याला भेटायला जाई. आता दिवाळीनंतरच मुहूर्त आहेत म्हणून सुचित्राला तेवढा वेळही होता. मेडियामध्ये असल्यामुळे तिला सतत बाहेरच्या भेटीगाठी, मुलाखती अशी कामे करावी लागत. त्यामुळे मयूरच्या वेळा ती नाकारत असे. मयूरला दर शनिवार, रविवार सुट्टी असे. दोन दोन आठवडे वेळ नाही देत तशीच दोघांमध्ये भांडण सुरु झाली. तरीही सुचित्रा त्याला समजवी. मयूरची आई खूपच चांगली होती. स्त्रीला समजून घेण्यात ती तत्पर होती. मयूरला दम भरी. ती बाहेर आपले नाव कमावते आहे. याचा अभिमान वाटे तिला. एक दिवस थिएटर बाहेर नाटक संपल्यानंतर एकजण तिला बाहेर भेटणार होते म्हणून ती बाहेर वाट बघत होती. ते मयूरने पाहिले. त्यावर तिने त्याला सगळे स्पष्टीकरण दिले. मग घरी जाताच सुचित्राला ताप भरला. मयूरची आई स्वतः घरी येऊन भेटून गेली. तिला साखरपुडा उरकून घेऊया हे खरे म्हणायचे होते. पण काहीच शक्य वाटत नव्हते. मयूरला शनिवार रविवार खूप कंटाळा येई. मग कुणा तरी मित्र मैत्रिणीबरोबर हा फिरायला जाई. कधी कधी आयत्यावेळी तिची ड्युटी बदले कारण कोणाचे अचानक गैरहजर राहणे. मयूरला या सगळ्याचा खूप कंटाळा आला. शेवटी त्यांच्या आयुष्याची घडी विस्कटलीच. हा आपल्याला आत्ताच सांभाळून घेत नाही तर नंतर काय होईल म्हणून तिनेच त्याला नकार दिला. मयुरलाही तेच हवे होते. मयूरच्या आईला मात्र खूप दुःख झाले. हे सुचित्राने डोळ्यात पाहिले होते.

हे कोमेजलेले आयुष्य घेऊन सुचित्रा अजूनपर्यंत जगत होती. आता पहिले असे झाले आहे हा इतिहास सुचित्रा पुढे आलेल्या प्रत्येक स्थळाला सांगे. त्यामुळे लोकांचे शंभर प्रश्न कुठे फिरला होतात का? तर कोणाला शिफ्ट ड्युटीच पटत नव्हती. आपल्या मुलाच्या आयुष्यात पण शिफ्ट डूटीमुळे अडथळा नको. काही तरी कारण सांगून तिला नकार येत असे. तिच्या कामाशी ती अगदी प्रामाणिक होती. कोणी लग्नाचा विषय काढला तरीही ती अतिशय नम्रपणे आपला भूतकाळ सांगे. तिला सहानुभूती मिळवायची नव्हती पण आपला अनुभव हा जगाला काहीतरी शिकवून जातो हेच तिला उमटवायचे होते. वेळ असला तर नाटक, सिनेमा आपल्याच आई बाबांबरोबर जाई. कधीतरी एखादी सहल ती मात्र तिला फार आवडे. सुमिता आणि आज्ञाची ती आतुरतेने वाट पाही. सुमिताचा नवरा अमोघ हाही स्वभावाला चांगला होता. सुचित्रा मोठी बहीण आहे म्हणून तिच्याशी तो अगदी धाकट्यासारखाच होता. आयुष्य खूप सुंदर आपल्यामुळेच होत असे सांगून तो तिला धीर देई.

एके दिवशी सिनिऑरिटीप्रमाणे तिला एक कार्यक्रमाची निर्मिती करायला सांगितली की आपला श्रोतावर्ग वाढेल. कार्यक्रम करायचा तर त्याचे प्रायोजित, आयोजन, कलाकार या सगळ्याचा विचार येतो आणि अर्थात हा कार्यक्रम सकाळी सादर करायचा आहे म्हणजे तेवढा छान झालाच पाहिजे. विषय हा निवडण्यात आला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सामाजिक पातळीवर हा विषय खूप गाजवायचा होता. आपल्याला आता मन रमवण्यासाठी हि छान संधी मिळाली आहे. सुचित्रा काम आटपून ग्रंथालयातून पुस्तके घेऊन येऊ लागली. जमेल तेवढे घरी आणि कामामध्ये आता तिला दिवसाचे तीन तास असेच मिळत मग तो वेळ ती कार्यक्रमाचे वेळ मर्यादा आणि तेवढे संवाद त्यामध्ये लागणारी संगीत इतर वाद्य यांचा आराखडा ती करू लागली. आता मुख्य प्रश्न तिच्यापुढे राहिला तो म्हणजे आंबेडकरांच्या ठोस भूमिकेत कोणाचा आवाज द्यायचा यावर तिने तिच्या वरिष्ठांबरोबर चर्चा केली. लवकरच आपण कलाकार शोधून काढूत. एकदा ग्रंथालयातून बाहेर पडताना समोरच्या मैदानावर कवी कैवल्य चिटणीस याचे " सूर माझे ओंजळीतले" या स्वरचित काव्यसंग्रहाचे बॅनर वाचले. हा फक्त कवी नाही. याचा आवाज भारदस्त आहे. याने अनेक ऐतिहासिक कार्यक्रमात अभिवाचन केले आहे. घरी उशीर होण्याचे कळवून ती या कार्यक्रमात शिरली. कार्यक्रम संपल्यानंतर तिने त्याची भेट घेतली. त्यालाही जुजबी पाहिल्यासारखी ती आठवली. मग सुचित्राने ओळख पटवली. तिने आधी त्यांची मुलाखत घेतली होती. लगेच आपण एका कार्यक्रम करण्यात रस घेणार का? असे विचारताच त्याने आपले पुढील सहा महिन्याचे शेड्युल तिला सांगितले आपण आठवड्यातील एवढे दिवस देऊ शकतो. तत्सबंधी आपण वरिष्ठांशी बोलून ठरवतो असे सांगून सुचित्रा निघाली. पण दोघांचेही रस्ते वेगळे म्हणून कैवल्यने तिला आपल्या गाडीतून घरी जा आपण कोणी टॅक्सी करून जाऊत. सुचित्रा एवढ्यातच धन्य झाली आणि तिने नको आपल्याला रिक्षेत बसवून द्या ती थेट आमच्या इमारती खाली थांबते. आणि तिला त्याने रिक्षा करून दिली. सुचित्राला रात्रभर झोप लागली नाही. आपल्याला एक कवी एवढा मान देऊन गेला. दुसऱ्या दिवशी तिने चर्चा करून कार्यक्रम ठरवला. कैवल्यला फोन करून तिने बोलावून घेतले. बाबासाहेबांचे काही संवाद त्याने सादर केले आणि तो त्यात यशस्वी ठरला. सुचित्रा दिवसेंदिवस खूप खूष दिसत होती. " जागा आहे मी अजून" कार्यक्रमाचे संवाद, निवेदन, संगीत यांचे ताळमेळ जुळवून तिने आठवड्याचे दोन दिवस रेकॉर्डिंग सुरु केले. बाकीचे दिवस ती आपल्याला संकलन आणि सादरीकरण यासाठी ठेवून दिले. कार्यक्रमाला छान प्रतिसाद मिळाला. सुचित्राने याचे श्रेय कैवल्यला दिले. सुचित्राचे रसिक वर्ग वाढत गेले. मयूरची आई हा कार्यक्रम नियमित ऐकत असे. आता यांचे लग्न मोडून सात वर्ष झाली होती. मयूरने दुसरे लग्न लगेच ठरले देखील आणि त्याला आता पाच वर्षाची मुलगी मानवी देखील होती. तरी देखील वेळ जावा म्हणून ती हा सकाळचा एफ एम लावत असे. मयूर अजिबात ऐकत नसे. त्याने मानवीला यातले काही न सांगण्याचे ठरवले होतेच. सहा महिने म्हणता म्हणता उरकले. कार्यक्रम प्रकल्प संपला. आता आपली भेट खूप कमी होईल याचे तिला दुःख झाले होते. कैवल्यला देखील सुचित्रा एक हरहुन्नरी मुलगी वाटली. खरा तो जळगावचा त्याचेही नुकतेच आई वडील गेले होते. चाळिशीला आला होता. त्याच्या या अशा कामामुळे त्याचे अनेक मित्र झाले होते. त्यांनाही हा कार्यक्रम फार आवडला. त्याचे एक स्वप्न म्हणजे समुद्रासमोर घर. उठले की समोर समुद्र दिसायला हवा आणि त्याने शेवटी मुबंईत एक घर घेतलेच. आता तो तिथे एकटाच राहत होता. घरी बोलावूत तर सुचित्रा काही येणार नाही. पुन्हा असाच काही कार्यक्रम बसव आणि माझी ओळख ठेव असे सांगून त्याने तिचा निरोप घेतला.

दोन महिन्यातच जळगावचे सुप्रसिद्ध कवी योगेश जमदाडे हे मुंबईला आले. त्याने कैवल्यची भेट घेतली आणि तुम्ही दोघे एक उत्तम जोडीदार व्हा असे म्हणून मध्यस्थी करून हे लग्न जमवले. सुचित्राच्या आई बाबांची भेट घेतली. पण दोघांच्या भेटी फार कमी होतील. कैवल्य हा सतत दौऱ्यावर असेल तर आपली मुलगी शिफ्ट ड्युटी करते अशा अनेक अडचणी खऱ्या पाहता तिघांसमोर होत्या. पण शेवटी गाठ ही बांधली असते आपण फक्त निमित्त असतो. अशी समजूत काढून शेवटी सुपारी फोडली. एका महिन्यातच रजिस्टर लग्न करून छानशी पार्टी दिली. अनेक दिग्गज कलावंत आले होते. कवी मैफील जमली. सुचित्राला कधीच वाटले नव्हते की एवढा छान योग आपल्या नशिबात लिहिला आहे. सुमिता, आज्ञा सगळेच खूष होते. माउचं लग्न म्हणून आज्ञाने छोट्या साडीत खूप छान दिसत होती. सुचित्रा आता खूप महान कलाकाराची पत्नी म्हणून ओळखली जाणार याच आई बाबांना खूप कौतुक वाटत होत. एवढ्या कळमट ऊन्हामागे मागे हि सुखाची सावली आहे यानेच त्यांना भरभरून आले. दोघांच्या आयुष्यात हा बऱ्याच अवधीने आलेला क्षण त्यांनी खूप ठिकाणी फिरून एकांतात घालवला. आता अर्थात सुचित्राची कामाचे ठिकाण एकच पण कैवल्य मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपली मान उंचावणारा. दोघंही आपल्या आपल्या कामात रुजू झाले. आता सुचित्राची आज सकाळची ड्युटी आणि एकदम पहिल्याच आवाजात नमस्कार सुप्रभात मी सुचित्रा कैवल्य आजच्या स्वानंदी सकाळमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत करते. अनेक श्रोते भारावून गेले. सुचित्राचा आवाज मयूरच्या आईनेही ऐकला आणि डोळ्यातून टिपे गाळण्याशिवाय तिने काहीच केले नाही. शेवटी सुचित्राला सुखाच्या सावलीचा सूत्रधार मिळाला यातच गहिवरून गेली. दुरून आशिर्वाद देण्यापलीकडे तिच्याकडे काहीच नव्हते.


Rate this content
Log in