Pallavi Wagle-Samant

Others

2  

Pallavi Wagle-Samant

Others

आभा-मोलकरणीला आधार

आभा-मोलकरणीला आधार

9 mins
3.4K


वसंतातील पालवी फुटली. कोकिळेचे कुहू कुहू सुरु झाले. फुलपाखरं फुलावर बसून छानसंं कोवळं ऊन घेत होते. चिमण्या तर खिडकीत बसून बंद खिडकीला चोची मारत बसल्या होत्या. जणू काही आजीला ऊठ ऊठ म्हणताहेत. पण आजी काही कमी नाही. "अग ऊठते गं बायांनो. ही शुभी पण अजून निजली आहे. ऊठ गं ऊठ ह्या बघ हाक मारताहेत आधी ती खिडकी उघड". वर पलंगावर झोपलेल्या आजीने खाली बिछाना घातलेल्या शुभीला शेवटी उठवले. शुभी खरा आळस करी लवकर उठण्याचा. कारण सकाळी आजीची मुलगा, सून आणि नात हे सगळे एकदम उठले की आवराआवर त्यांचीच असते. त्यात आजीला उठले की चहा लागतो.

सून अश्विनी, मुलगा आकाश आणि नात आभा असे हे कुटुंब आपल्या विश्वात. आकाश जाता जाता आभाला सोडतो. अश्विनी मागाहून जाते. सकाळचा स्वयंपाक अश्विनी उरकते. संध्याकाळचे शुभीच्या मदतीने ती पूर्ण करते. आभाचे पटकन दूध पिणे कधीच नसते. आशा आजींची मुलगी आकांक्षा लग्न करून इंदोरला गेली. मग लगेच मागाहून दम्याच्या अटॅकने आजोबा गेले. आभा अगदीच तीन वर्षांची होती. पण ती आजी, आजोबांशी छान गप्पा मारी. एकदा टीव्ही वर मालिका पाहताना तो टेरेस फ्लॅट तिने पहिला. " आजु आपण कधी घ्यायचं असा घर ". मग आजोबांनी आकाशला सांगून आपण गावचा एक तुकडा विकून काही रक्कम पुढे करुन उरलेली तू कर्ज फेडून घे नाहीतरी तुला टॅक्ससाठी पूढे मागे लागेलच ना असे सांगून आकाशला सांगितले. आकाश, अश्विनी तयार झाले लगेच. आजी नको म्हणत होती पण आजोबाच म्हणाले हा तुझा संधीवात तुला तिकडे बरं करेल कारण तिकडे छान ऊन, हवा असेल तेव्हा तू मोडता घालू नकोस. शिवाय आपल्या दोघांना तिथे पत्ते खेळता येईल. आजीने लाजून बरं म्हंटलं.

रीतसर सगळी कागदपत्र करून झाले. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर या 'यशोधाम' फ्लॅटमधे सगळे राहायला आले. आकांक्षाही तिच्या सासरच्या मंडळींना घेऊन आली. उत्साहापोटी सगळे गच्चीतच झोपले. टिपूर चांदण्यात आभा अगदी खूष होती. अश्विनी आणि आकाश कामावर जाऊ लागले. आजोबांनी फेरफटका मारून आजूबाजूला दुकान, डॉक्टर, सलून शोधून काढले. कामवाली बाई ही... वॉचमनने आपली बायको रेणू भांडीकाम करते पण फक्त दुपारीच. आजीने तिला ये असे सांगितले. हळूहळू संसाराची गाडी रुळावर आली. बागकामाची जबाबदारी आजोबांनी सोसायटीतील एका मित्राला सांगितले. तसा अशोकही घरी येऊन बागकाम करी. केळी, अळू, जुई, मोगरा, चिनी गुलाब, जास्वंदाचे वेगवेगळे प्रकार, मनी प्लांट, पपई, शेवंती, अबोली अशी बरीच झाडे दोघांनी मिळून लावली. आकाशने आभाच्या वाढदिवसाला मोठा झोपाळा सेट केला. तिथे आजी आजोबा पण बसत. आजी आजोबा स्वतः हीच फुले काढून देवाची पूजा करत. संकष्टीला तर दुर्वांचा हार करी. आभालाही श्लोक शिकवत. आकाश, अश्विनी दोन्ही वेळ उदबत्ती तेवढी लावत. हळू हळू केळ्याचं झाड मोठे होत गेले. मग त्याला केळफूल लागले. अळू, केळफूल, केळ्याची भाजी, केळ्याची कापे अशा विशेष भाज्या आजी आजोबांच्या मदतीने करत आणि सुनेला सरप्राईज देत. आकाशला फार आवडे आजीच्या हाताची केळफुलाची भाजी. आभा तर केळ्याची कापे, वरण भात भुर्र्कत खाई. अश्विनीला फार आधार वाटे.

सहा महिने सगळं सुरळीत चालू राहिलं आणि अचानक अश्विन महिन्यातच आजोबा दम्याने ग्रासले. बरेच डॉक्टर झाले पण काही इलाज होईना. नव्या घरी पहिल्या दिवाळीसाठी आभा फार स्वप्न रंगवत होती. आजोबांनी तिला जमेल तसे हळू हळू मार्गदर्शन केले. इंदूरहून आकांक्षा आली. चार दिवस छान पार पडले. पण पाचव्या दिवशी आभा उठवायला गेली पण आजोबा उठेच ना. तिला तरी कुठे माहिती देवाघरी जाणं म्हणजे काय. आजीचा धीर सुटला. आजी खचून गेली. आकाशला काहीच कळेना आईची, आभाची कशी समजूत काढावी. मला आजुशी बोलायचं .... म्हणजे बोलायचंय.. पण शेवटी तिला झोपवले आणि आजोबांचे क्रियाकर्म सुरु केले. उठल्यावर असंच काहीतरी सांगून तिला शांत केले.

आता आजोबा गेल्यानंतर घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्या कशा द्याव्यात कुणाला हे काहीच कळेना. रेणू काही दिवसभर घरी थांबायला तयार होईना. पण तिने गावची शुभी सुचवली. तिचाही नुकताच नवरा वारला होता. मुलाला बहिणीकडे शिक्षणासाठी पाठवले होते. तिला पैसे पाठवण्यासाठी तिला काहीतरी काम हवेच होते. अश्विनीला इथे कायम राहणारी बाई नको होती. सकाळी येऊन संध्याकाळी जाणारी हवी होती. पण आजीच म्हणाल्या मला रात्री होईल सोबत. राहू देत तिला इकडॆ. अश्विनी आणि आकाशमध्ये मतभेद झाले पण शेवटी शुभीला इथे आसरा मिळाला. तेव्हापासून शुभी मात्र अश्विनीशी मोजकेच बोलते. ती निघाली की मगच आजीचा आणि स्वतःचा चहा पाणी करते. अशी दिनचर्या आता सुरु झाली. म्हणता म्हणता शुभीला वर्ष होत आलं. आजी, आभाचे खूप छान सुरु होतं.

नेहमीप्रमाणे आजही शुभी उठली. आकाश दाराकडे वाट पाहताच होता आभाला घेऊन अश्विनी बाहेर आलीच पण शुभीने पाठमोरी होऊन काहीसे हलवले असे आभाने पाहीले . ती निरागस मुलगी शुभीला म्हणाली अग हळू काम कर नाहीतर हात भाजेल. आजीचे सूर विसरलीस का ? शुभी खरं पाहता बिस्किटे खात होती. तिघेही निघाले. शुभीने आजीला चहा दिला. तिला अंघोळ घातली आणि गच्चीत आणून बसवले. घरातील कचरा, लादी करून बराच वेळ झाला तरीही शुभी आजीकडे गेलीच नाही. थोड्या वेळाने गेली तेव्हा तिच्या बोटाला भाजल्यासारखे दिसले. आजीने विचारताच आपण दूध गरम करत होतो तेव्हा भाजले असे सांगितले. बाराच्या सुमारास आभाची शाळा सुटते. तिची व्हॅन सोसायटीच्या बाहेर येते तिला खाली घ्यायला शुभीच येते. आज नेहमीप्रमाणे शुभी आली आणि तिला पाहून आभा खूप हसली. तिच्या हनुवटीला कुरमुरे चिकटले होते. शुभी थोडी घाबरलीच पण परिस्थिती निभावून घेतली," हे तर इकडून आली तवा एकाने मला टेस्ट कराया दिले. तिचा हात धरून तिला शाळेतील प्रश्नांमध्ये गुंतवले. घरी गेल्या गेल्या ती आजीला जाऊन धडकली आणि शुभी मावशी आत्ता कशी दिसत होती ते सांगू लागली. तेवढ्यात आजीचं म्हणाल्या," फेरीवाल्याना आता हिचीच गाठभेट". सगळं आटपून आभा खेळता खेळता झोपली. शुभीला मनातून भीती वाटत होती. आता रात्री अश्विनी वाहिनीसमोर ही काही बोलणार तर नाही. पण तसे झाले नाही. बहुधा ही विसरली. जेवणं आटपून ती खोलीतून ये जा करत होती. तिला चित्र काढायला दिले होते. ती इकडे तिकडे बघत आपल्या कल्पनेने काढत होती. झाले तेव्हा आजीच्या खोलीत गेली आणि दाखवले. आजी छान छान म्हणून शुभीला बिछाना घालायला पाठव असे म्हणून तिला बाहेर पाठवले. इतक्यात शुभीला बिस्किटे खाताना तिने पहिले." हे काय ही बिस्किटे खायची वेळ आहे का आत्ता तू जेवलीस ना? चल तुला आजी बोलावते. शुभीने आभाला हात धरून जवळ केले आणि गेल्या.

शाळेला सुट्ट्या लागल्या. आता आभा आरामात उठत होती. एके दिवशी सकाळी आजीला तिची अंगठी सापडत नव्हती. आजोबांची आठवण आली म्हणून आभाला जुने फोटो अल्बम दाखवायला म्हणून गेली तिथेच तिची डबी होती. खूप वर खाली केले पण तरीही सापडेना. शुभी स्वतःचे कपडे धुवत होती. ती बाहेर आलीच नाही. आभाला तरी काय कळतंय मोठ्यांच्या गोष्टी म्हणून संध्याकाळी अश्विनी आणि आकाश येईपर्यंत वाट पहिली. ते दोघे आल्यानंतर त्यांनाही विचारले. पण आपणही नाही पहिली असे सांगून ते रविवारी आपण पुन्हा घर झाडूयात असे म्हणून आजीची समजूत काढू लागले. रात्री शुभी भांडी घासत असताना आभा तिकडे गेली हातात माकड टेडी घेऊन. शुभी तिला आता झोपेची वेळ झाली आता जा बरं. आभा गेली आणि पुन्हा आली तेवढ्यात शुभी वाटीत शेव कुरमुरे खाताना दिसली. "हे काय तू खातेस अजून तुझे पोट नाही भरले का"? शुभी तिला मांडीवर घेऊन म्हणाली " असं नाय ग पोरी मला मधुमेह झालाय. माग मी दोन दिवस पोराला भेटाया गेले व्हते तवा समजले”. ते काय असतं. " अग त्यो एक आजार हाय त्यानं सारखी भूक लागते नायतर माणूस चक्कर येऊन पडत”. यावर आभा अगदी मिस्किलपणे तिला म्हणाली," असे होय आई मला किती खायला देते मी थोडं खाऊन थोडं ठेवते मग ते तसंच असतं ते तू खात जा मी देईन तुला आणून". शुभीला मनातून खूप ओशाळल्यासारखे वाटले पण काय करणार अश्विनी वाहिनी ठरवून चार बिस्किटे दुपारचा दोन चपात्या आणि रात्रीचा आहार या व्यतिरिक्त काहीच देत नाहीत. शुभीची भूक भागत नाही. तेवढ्यापुरती मान डोलावून सध्या हे आपल्या दोघांपुरतीच ठेव असे म्हणून दोघी खोलीत गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अश्विनीने नाश्त्याकरिता ठेवले होते पण आभा दूध पूर्ण प्यायली. दोन बिस्किटे आणि अर्धा लाडू शुभीला नेऊन दिला. शुभी डोळ्यातून पाणी काढून तो खाऊ लागली. आजीला आंघोळ घालून दोघी गच्चीत बसल्या. इकडे शुभी दळण आणायला जाते म्हणून बाहेर गेली ती बऱ्याच वेळाने आली. तिथं तिने कुल्फी आणि शेवपुरी खाल्ली. आकाशच्या एका मित्राने तिला त्या रस्त्यावर पहिले. आपण घरी जाणार होतो पण हे पार्सल द्या मी त्याला फोन करतो. तो फिरायला गेला होता कुठे भारताबाहेर. आकाशने त्याला कॅमेरा आणायला सांगितला होता. शुभी घरी घेऊन गेली. रात्री आल्या आल्या आकाशने गिरण तर पाठी आहे तू मेन रोडला का गेलीस असे विचारताच आजीने मधेच अडवले अरे असेल तसे काही तू उघड बरं ते पार्सल असे म्हणून विषय बदलला. रात्री आभा शुभीशी गप्पा मारायला आली तेव्हा शुभी राजगिरा लाडूचे पाकीट फोडत होती. आभाने तिला आपण आता सुट्टी आहे तर फिरायला जाणार असे सांगितले. शुभीला तेवढेच बरे वाटले. " तुम्ही या जाऊन मग मी बी माझ्या पोराला चार दिवस भेटाया जाईन". इकडे आजीच्या खोलीत अश्विनी आणि आकाश शुभीवर नजर ठेवायला हवी यावर चर्चा करत होते. सगळा पगार ती मुलाला पाठवते मग ती बाहेर जाऊन खाते तेव्हा पैसे कोण देत असेल किंवा ती कुठून आणत असेल असे आजीला भांबावून सोडून गेले. पण मनानी खूप चांगली होती. नवऱ्याचं दुःख घेऊन ती आयुष्य जगत होती. कधी कोणती गोष्ट लपवून ठेवत नव्हती. अगदी खालून वर येईपर्यंत सोसायटीचे कोण भेटले ते सुद्धा. आजीला रात्रभर झोपच लागली नाही.

सकाळी पुन्हा आभा चकली आणि बिस्किटे घेऊन आली. शुभीने ती खाल्ली. वारा छान सुटला होता. शुभीने आभाला झोपाळा हलवला. दुपारी आभाला आपल्याला अर्धी पोळीच भरव असे म्हणून अर्धी पोळी शुभीला खाऊ दिली. आजीला पण आभाचा फार अभिमान वाटे. शुभी पण आभाला इसापनीतीच्या गोष्टी सांगत बसे. पण शेवटी तिची भाषा ही आभाला पटकन अशी कळत नसे. म्हणता म्हणता यांचे बाहेर फिरायला जायचा दिवस आला. आजीने तिघांनाही निवांत रहा इथली अजिबात काळजी करू नकात म्हणून सांगितले. पण अश्विनीने निघताना शुभीला चार दिवस कोणते पदार्थ करायचे ते सांगून ठेवले. शुभी पण चार दिवसांनी जाणार होती. तेव्हा आकांक्षा आठवडाभर माहेरपणाला येणार होती. तशी शुभीची काळजी मिटली. अश्विनी काही रजा वाढवून घेणार नव्हती. आभा दिवसभर फिरायची रात्री मात्र तिला आजी आणि शुभीची फार आठवण यायची मग ती फोन करायची. एकदा फोनवर शुभीशी बोलता बोलता म्हणाली ," तू मला मिस करतेस का ? तुझे पोट भरते का"? यावर शुभी थोडी चाचरली. अश्विनीने तिला फोन हातात घेऊन शुभीची विचारपूस केली. " काय ग काय कान भरलेस माझ्या मुलीचे थांब आता तिकडे आले की बघते”. मागून आभा अग तिला आजार आहे सारखा भूक लागण्याचा तिला नको ओरडूस. चार दिवसांनी शुभी निघून गेली ती परत न येण्यासाठीच. आकांक्षाही आली होती. तिघंही घरी परतल्यावर अश्विनीने आजीजवळ आकांडतांडव सुरु केले. आजीने ऐकून ती आली की आपण यावर बोलूत आता फिरून आला आहात ना त्याच्या गमती जमती सांगा. चार दिवस होऊन गेले अजून शुभी परतली नाही. आभा सारखी विचारी आजीला आकांक्षाही परत जाण्याची वेळ आली. एके दिवशी आभा गच्चीत उभी राहून सारखी ," शुभी मावशी पडली तर नसेल ना चक्कर येऊन. तिला खूप भूक लागण्याचा आजार आहे". एकाएकी तिला तापही आला. आजीला थोडी झळ पोहोचली. शुभीचे इकडे पोट भरत नसणार. तिला मधुमेह झाला असणार म्हणूनच तिने अंगठी चोरली असेल आणि त्या पैशात ती बाहेर जाऊन काहीसे खात असेल. कारण ती बाहेर गेली की बराच वेळ येताही नसे. मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायला सांगून आजीने तिच्या डायरीतून शुभीच्या बहिणीचा नंबर मिळवला. आपल्याला सगळे कळले आहे. शुभीला पाठवून द्या उद्याच आमच्याकडे. आभा जीव लावून बसली आहे. सकाळ होताच आभाला आता शुभी मावशी येणार आहे तू लवकर बरी हो असे सांगून आजीने अश्विनी आणि आकाशला बाहेर बोलावून घेतले. " आपली अंगठी शुभीनेच चोरली असणार आणि फक्त अंगठीचा चोरली आहे तिच्या गरजेपुरती. बाकी काहीच नाही. इथून कायमचे जायचे होते तरीही तिने दुसरे काहीच नाही नेले. याचा अर्थ तिला आपले कुठेही नुकसान करायचे नव्हते. फक्त तिचा आत्मा तळमळत ठेवायचा नव्हता. अरे मोजकं खायला घालून तिच्या शरीराची हालअपेष्टा करणं चांगलं का रे. शेवटी ते अन्नच ना. आपल्या घरी कोणी देव आला आहे असे समजून वIढूत ना तिला पोटभर. तिने हा तुमचा राग कधीही आम्हा दोघींवर नाही काढला कधीही आम्हाला सांभाळण्यात कंटाळा नाही केला. फक्त तिने मोकळेपणाने नाही सांगितले एवढेच. उद्या तिला इथे काही झाले असते तर आपली धावपळ झाली असती आणि दोषीही आपणच ठरलो असतो. अरे माणूस हा जन्म आणि माणुसकी हा धर्म. आपल्याला आणखी काय हवे आयुष्यात सगळं तर छान आहे. चिमुकली आभा तिला कितीसं कळतंय तरीही तिच्या भावना पोहोचल्या ना आपल्यापर्यंत. ती येईल तेव्हा तिचेही घरच्यासारखे करायला हवे. मला हे आणि इतकंंच कळतंं". आकाशला कळून चुकले अश्विनीने खूप मोठी चूक केली. आभाला घेऊन येऊन अश्विनीकडे बघितले पण तिने त्याच्या आधीच आभाचे मुके घेतले. आभाही खूप खूष झाली. संध्याकाळी आजी तिला जमत होते तसे झोका देत होती. दाराची बेल वाजली आणि आभा धावत सुटली. खरी शुभी आत येताना ओशाळली, पण तरीही अश्विनीच तिला आत घेऊन आली. वरण भात, कांदा भजी आणि मुगाचे बिरडं स्वयंपाक केला. सगळे पोटभर जेवले. आता आकांक्षांची मात्र निरोप घेण्याची वेळ. सगळं कसं आनंदी आनंद.


Rate this content
Log in