Pallavi Wagle-Samant

Inspirational

2.9  

Pallavi Wagle-Samant

Inspirational

माया-सरोगेट मदर एक नवे वळण

माया-सरोगेट मदर एक नवे वळण

8 mins
16.5K


माया

आज जरा उशिराच झाला मायाला उठायला. रात्रभर कणकणी होती म्हणून या कुशीतून त्या कुशीत उगीच वळवळत बसली होती. कोणाच्या अध्यात ना मध्यात. वयाची पस्तिशी आली तरी लग्नाचा काहीच पत्ता नव्हता.  वडील जाऊन चार वर्ष पूर्ण व्हायला आली. स्नेहा तिची अगदी जवळची मैत्रीण जनीला म्हणजे मोलकारणीकडे वाटेतच निरोप देऊन गेली. "मीना काकू माया ताई निघाली का? नाय म्हंजे स्नेहा ताईंचा निरोप हाय रातच्याला बोलावले हाय घरी. ती काय ती ऍनीव्हर्सी हाय ". माया हातात डबा घेत बाहेर येत म्हणाली," आहे माझ्या लक्षात तू आवर. तो चहा गरम कर आणि तुम्ही दोघीनी घ्या. मी निघते. " संध्याकाळचे कळव काय ते". आईची जपाची माळ संपवून नमस्कार करतानाच मागून धाव. आई जनीला सांगत आत जात, " बघ काल रात्रभर ताप होता तरीही आज ऑफिसला गेली. नसती काळजी हिला दुसऱ्यांची". एकदा का लगीन झालं की समदं ठीक होईल. असं म्हणत म्हणत जनी मागून गेली. कुठं लपलाय तो कोणास ठाऊक. आईचा रडवा सूर यायच्या आधीच जनी कप घेऊन बाहेर आली. एवढ्यात जुने शेजारी प्रभा काकू आल्या. मायाची आई येऊ का आत. आई आतून बाहेर आली तोच कप हातात घेऊन. " अहो या ना.. बऱ्याच दिवसांनी आलात. काय म्हणतायत नवीन घरी रमलात ना छान." अहो कसली रमते. सगळं बंद ही मुलं बारा तास बाहेर. मुक्याहून मूक झाल्यासारखं वाटत". "बरं बोला काय म्हणता. अहो इथेच आले होते सुश्रुत हॉस्पिटल मध्ये अनुजाला घेऊन. अहो मुलं होत नाही म्हणून शंबर डॉक्टर झाले. मध्यंतरी कुठे बंगलोरला पण जाऊन आले. आज पण एक ट्रीटमेंट साठी आले. ती तिथेच थांबली आहे. ते स्पेशालिस्ट कुठे इमर्जन्सी आली म्हणून गेले. मला बसून कंटाळा आला म्हणून मी आले. पण आता अवी म्हणतोय की आता सरोगेट मुलं घ्यायचं त्याला दत्तक नकोय". असं म्हणत थोड्याशा रडवेल्या झाल्या. आईने मधेच थांबून जाऊ देत हा आजचा काळ आजची पिढी. आपण वाहत राहायचं. अलीकडेच आपण रेडिओवर याबद्दल ऐकलं असं म्हणत प्रभा काकूंना धीर दिला. जनी पाणी घेऊन आली.  तिची विचारपूस करून प्रभा काकू निघून गेल्या. जनीही काम आटपून निघाली. आई इकडे काळजीत बसली होती. कोणाचे लग्न होत नाही तर कोणाला मुलं नाही. ही दैवाची परीक्षा बघण्याची वेळ कधी संपणार. तिन्हीसांज झाली. मायाचा अजूनही पत्ता नव्हता. बरे नाही म्हणून डॉक्टर कडे गेली की  स्नेहाकडे गेली कोण जाणो इकडे तिकडे फेऱ्या चालू होत्या. इतक्यात माया दारात उभी. थोडीशी चलबिचल होत आत गेली.  जेवून आपण लगेच झोपुयात आज खूप दगदग झाली. 

अगदी पहाटे दाराची बेल वाजली वरच्या गोडबोले आजी चक्कर येऊन पडल्या. माया उठून गेली. या वयातही आजी उपवास करतात. ती जातानाच लिंबाचे सरबत करून घेऊन गेली. मग आई सुद्धा वरच जाऊन बसली.    जनी येऊन काम करून गेली. थोडा उशीर पण माया सुद्धा ऑफीसला निघून गेली. संध्याकाळी ऑफीसवरून घरी येताच स्नेहा घरात आईशी गप्पा मारत होती. मायाला पाहताच, " एवढी का बिझी होतीस की येणं जमलं नाही". " हो गं जरा उशीरच झाला. " आई , बसा गप्पा मारत मी हा तू आणलेला केक, सकाळी गोडबोले आजींसाठी रव्याची खीर केली होती ती आणते.   आई आत जाताच स्नेहाने मायाला विचारले, " तू काल सर्वोदय अपार्टमेन्ट मध्ये काय करत होतीस. म्हणजे आमची कामवाली तारा तिने तुला तिथे पाहिले अलीकडे तिला तिथे काम मिळाले आहे आणि ती हाक पण नाही मारू शकत होती". यावर माया "काहीच नाही अगदी सहज एक नवीन मैत्रीण झाली आहे." काही बोलू नकोस परवा बस मधून मी तुला पाहिले तू ' सुश्रुत नर्सिंग होम ' मधून बाहेर पडत होतीस. कोणी एक महिलाही होती तुझ्याबरोबर तीच का ही आणि तिला सोबत का हवी तुझी. तिचे कोणी नाही का?"  काय ते सांग तू फार दिवस झाले मला उगीच नाही टाळत आहेस. काहीतरी नक्की आहे. नाही गं नाही असे काही नाही.  मी एक निर्णय घेतलाय.  सरोगेट मदर होण्याचा.  " काय बोलतेस माया हे तुझे तुला भान आहे का?  एवढा मोठा निर्णय तू एकटीनेच कसा घेतलास. सतीशला,मला आणि आईला घ्यायचेस तरी मध्ये ". " अगदी तसे नाही पण आता लग्न तर होत नाही. पण मला आई व्हायचा अनुभव तर घ्यायचा होता. मग का मी माझे मन मारून जगू ? आणि ते काही वावगं नाही जे काही होईल ते कायदेशीर होईल.   यावर स्नेहा थोडी स्तब्धच झाली. "अग पण शेवटी ही रिस्क झाली". एवढ्यात दोघी मागे पाहतात तो आईची धाप.  दोघीनी आईला बसवले आणि शांत केले. " काय करून बसलीस हे माया. मी आणि बाबांनी तुला चांगला आदर्श ठेवला आत्तापर्यंत. एवढी मोठी झालीस की स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागली. कालपर्यंत जाताना फुलं किती आणू, सामान किती आणू हे सुद्धा मलाच विचारायचीस ना ? आयुष्याचा प्रश्न आहे हा. हे वावगं नसलं तरी समाज याला पुरेसा स्विकारायला तयार नाही. प्रभा वाहिनी सकाळी तेच म्हणत होत्या. आमच्या पिढीला ते पटत नाही. कुठून हे खूळ घेतलंस गं डोक्यात”. काकू तुम्ही नका काळजी करूत. सगळं नीट होईल. आता आपल्याला धीराने घ्यायला हवं.  मायाला उत्तम साथीची गरज आहे. स्नेहा गप्प करून निघाली.  आईने पण स्वतःला सावरलं. चिमण्यांच्या चिवचिवाटात आईला जाग आली. माया पण लगेच उठून बसली. आई काहीच न बोलता आत निघून गेली. माया मागून गेली. आई मला तुझे सगळे प्रश्न दिसतायत चेहऱ्यावर असे म्हणून पुढे बोलू लागली.  माझ्या बॉसचे मोठे भाऊच आहेत ते निखिल वाघमारे आणि त्याच्या मिसेस नयन वाघमारे गेली पाच वर्षे त्यांना मूल होत नाही म्हणून त्यांनी हा पर्याय निवडला. ते मला कळले म्हणून मी स्वतःहून सरांकडे गेले आणि बस पुढे आमचे बोलणे अजून सुरूच आहे. मला आई व्हायचा अनुभव घ्यायचा आहे ग. "अगं पण यात आम्हा कुणाला मध्ये घेऊन याची पारदर्शकता ठेवावी असं नाही का गं वाटलं तुला.. पुढे समाज काही म्हणेल याची कल्पना आहे का तुला किंवा तुझ्यावर काय बोट लावेल त्याचे काय त्याहीपेक्षा तुझ्या नोकरीत तुला त्रास नाही का होणार की तुला वरची जागा हवी आहे म्हणून हे केलंस".   "आई या सगळ्याचा विचार मी केला नाही असे वाटतंय का तुला. नवीन सर स्वतः या गोष्टीवर तोडगा काढणार आहेत. म्हणजे एकदा का न्यूज कन्फम झाली की ते मला एक वर्ष भर पगारी रजा परगावी ट्रान्सफर म्हणून देणार आहेत. एकदा का बाळ झाले की मग काही दिवसातच मी पुन्हा पहिल्यासारखी रुजू होईन.  काही काळजी करण्यासारखे नाही. चल हो बरं खूष. सगळे नीट होईल".

आठवड्याभरातच माया तपासणी आणि चिकीत्सा करायला गेली आणि लवकरच बाळाची चाहूल लागली.  नयन वाहिनी आणि निखिल सर आनंदाश्रू गाळू लागले. कोणाला काही सुगावा लागायच्या आधीच माया घरी बसली. नवीन सरांनी तिला जमेल तेवढा पाठिंबा दिला. नयन वाहिनी सतत तिच्या बरोबर असायच्या. सकाळी तिच्यासाठी खाणे पिणे दुपारचे जेवण त्याच मायाच्या आवडीप्रमाणे घेऊन यायच्या. मग तिला घेऊन तपासणीसाठी जायच्या. हळूहळू मायाचे पोट दिसू लागले.इकडे तिकडे जाताना लोकांचे शंभर प्रश्न. मायानेपण कुठेही आपला स्वाभिमान डगमगू दिला नाही. सगळ्यांना सकारात्मक उत्तरे देऊन ती पुढे जाई. पण शेवटी हा समाज. जनी तर सगळ्या सोसायटीची पंचायत राणी. या ब्लॉकमध्ये काय झालं ते कोण सेक्रेटरी झालं सगळं हिला माहित असायलाच हवं. खरं पाहता सरोगेट हा विषय तिला तेवढा ज्ञात नव्हता. मायाच्या आईने सांगितले दुसरे कोणाचे मूल आपण सरोगेट करू शकतो किंवा कोणाला सरोगेट देऊ शकतो. आणि ते वाईट मार्गाचे नसते. मायाच्या बाबतीत कळल्यावर मात्र तिने मायाला खूपस आपुलकीने घेतलं. कधी कुठे चर्चा चालू असली की समोरून काही तोडून बोली आणि मगच वर चढी. रोज सकाळी येताना इकडून तिकडून झाडाला आलेली फुले घेऊन येई. स्वतः जाऊन ती फुलदाणीतून बदलत असे. मायाला अगदी प्रसन्न वाटे. नयन वाहिनी पण तिला आपलंस करून काहीतरी वस्तू, साड्या देत असे. अशीच एकदा स्नेहा आली होती आणि मायाने ओळख करून दिली. नयन वाहिनीशी. " ग्राहक पेठ लागली आहे तू येतेस का? " पण माया नकोच त्या गर्दीत नयन वहिनींकडे बघत म्हणाली. पण आईनेच लहान मुलांचे काही सामान तिकडे छान मिळते ते बघून ठेव मग उद्या जनीला घेऊन मी एक चक्कर टाकीन. नयन वहिनीला थोडे बरे वाटले आईचा हा जीवे लावणारा लळा शेवटी आईलाच माहिती.  

अशाच एकदा प्रभा काकू घरी आल्या. दारात मायाला या अवस्थेत फेऱ्या मारताना पाहिल्यावर प्रभा काकूंना आश्चर्याचा धक्काच बसला. "अगं काय हे. काही कोड आता मला उलगडेल का? माया काही बोलायच्या आधीच आईने त्यांना सगळे समजावले. तरीही त्या नाखूष होऊन बरं आहे आता हा ज्याचा त्याचा प्रश्न असे खवचट बोलून निघून गेल्या.  आज जनीही कामावर अIली नव्हती. आई हळूहळू घर आवरत होती. इतक्यात नयन वाहिनी आल्याच. मायासाठी दुधी हलवा आणि डाळिंबीभात घेऊन आली होती. स्नेहा पण टॅक्सच्या कामासाठी बाहेर गेली होती ती थेट इकडेच आली. सगळ्यांनी जेवून घेतले आणि मग तिघीही संध्याकाळी डॉक्टरकडे गेल्या. सगळे छान आहे म्हणून बाळाची वाढ छान होत चालली आहे. तिघीही आनंदी झाल्या.  नवीन सर प्रत्येक तपासणी नंतर तिला फोन करून चौकशी करत असत. तेवढाच तिला दिलासा मिळे. 

म्हणता म्हणता आठवा महिना लागला. एके दिवशी माया पुस्तक वाचत बसली होती तशा प्रभा काकू आल्या आईने खुशाली विचारत," तुमचा मायावर काही राग नाही ना". यावर प्रभा काकू पिशवी चाचपडत, " छे हो इतकी निर्दयी वाटले का मी हे घ्या मी दशम्या घेऊन आले आहे हिला". यावर दोघी खूष झाल्या. तरीही आईने, "चालायचंच हो आता काळाप्रमाणे आपण बदलायचं आणि अर्थात चांगल्या बाबतीत". बोलून विषय संपवला. प्रभाकाकूनेही आपण अवीलाही यावर हिरवा सिग्नल दिला आहे. हा आता निघते म्हणून दाराकडे जातात. नऊवा महिना लागला आणि माया वेगळीच दिसायला लागली. लवकरच हि प्रसूत होईल असे नयन वहिनीला म्हणालीही. तशा नयन वाहिनी अहोरात्र तिच्याबरोबर थांबायच्या.  एकदाची ती पहाट आली. मायाला कळा सुरु झाल्या. निखिल गाडी घेऊन आला. नयन वाहिनी, आई दोघी तिच्याबरोबर निघाल्या. स्नेहा परस्पर हॉस्पिटलमध्येच आली. नवीन सर नेमकेच दिल्लीला गेले होते. बाळ रडण्याची चाहूल लागली. मुलगी झाली. डॉक्टरांसाठी एक नवा अनुभव जन्माला आला. सगळं कसं छान झालं. मायाला आणि मुलीला घरी सोडले. सगळे घरी जमले कारण बाळाला काही दिवस दूध द्यावे लागणार होतेच त्यामुळे नयन वाहिनी तीन महिने तरी बाळाला घेऊन जाणार नव्हत्या.  तसे नवीन सर थेट तिच्या घरीच गेले ते सुद्धा त्यांचा एकI दिल्ली मधील सहकाऱ्यांसह गिरीश. नवीन सरांनी ओळख करून दिली. हा कित्येक वर्षे दिल्लीमध्येच आहे. त्याचे कुटुंब अंबरनाथला राहते. लग्नाचे काहीच जमत नाही. मायाची सगळी कल्पना दिली आहे. तो मायाशी लग्न करायला तयार आहे. अर्थात त्याचे कुटुंब सहमती देईलच त्यात त्याची आता इथेच बदली झाली आहे. काहीच हरकत नाही असे सगळे मायाच्या आईला सांगू लागला. मायाची आई फक्त आनंदाश्रू काढल्याशिवाय काहीच बोलू शकत नव्हती. पण तरीही नयन वाहिनी म्हणाल्या," दोघांना एकमेकांशी बोलू देत. अगदीच घाई नको".मायाच म्हणाली,"नवीन सर माझं वाईट का बघणार आहेत. आहे मला पसंत बोलावून घ्या यांच्या माणसांना पण लग्न चार पाच महिन्यानंतरच हि चिमुकली मोठी झाल्यानंतर. आई लगेच म्हणाली, " खरंच हो मुलीचा पायगुण चांगला आहे. हीच नाव यशश्री ठेवुयात". यावरही सगळे एकजुटीने हो हो असे म्हणाले. एवढ्यात प्रभा काकू आल्याचं आणि आईने पुन्हा एकदा विचारले," काय हो आता हे पसंत आहे की नाही तुम्हाला नाहीतर पुन्हा काही म्हणाल. पण काकू मध्येच," छे हो काही अहो शेवटी ते नशीब ते जिथे घेऊन जायचं ते जातच. माझे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.

महिन्याभरातच बाळाचे बारसं झाले तसेच काही कागद पत्रही तयार झाले तिला सरोगेट करण्याचे. गिरीश मायाला वरचेवर भेट देई. गिरीशची माणसेही समंजस होती. स्नेहा थोडी थोडी तिच्या लग्नाच्या तयारीची सुरुवात करत होती. हळूहळू मायाने तिला बाहेरच्या दुधाची सवय लावली. यशश्री तिच्या जीवनाला नवा आकार देत गेली आणि मायाच्या आयुष्याला नवे वळण दिले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational