माझी वाट पाहात असेल
माझी वाट पाहात असेल
अखेर जेनिफर मौन तोडून म्हणाली, “हरेंद्र, आय लव्ह यु.”
हरेंद्र दचकून म्हणाला, “पण माझं लग्न तर झाल आहे.”
जेनिफर मक्कमतेनी म्हणाली, “तर काय झालं? तुझ्या बायकोला डिवोर्स देऊन तू माझ्याशी लग्न करू शकतोस न?”
हरेंद्र ठामपणे म्हणाला, “ते शक्य नाही.”
जेनिफर, “का शक्य नाही? मी तुझ्या पत्नीला ती म्हणेल तेवढी रक्कम देईन. हरेंद्र, आपण लग्नानंतर अमेरिकेला सेटल होऊ. एका राजासारखा मी तुला ठेवीन. बोल तुला या व्यतिरिक्त दुसरं काय पाहिजे?”
हरेंद्र, “तुला कोणीही दुसरा पुरुष आरामात भेटेल.”
जेनिफर विनवणी करून म्हणाली, “पण तू नाही भेटणार न... तुझा स्वभाव, तुझी राहण्याची ढब... तुझी पोशाख घालण्याची स्टाईल... मला फार आवडते. हरेंद्र तू दिसायला फार सुंदर आहेस रे... म्हणून मला तू फार आवडतोस.”
हरेंद्र, “जेनिफर, मी अनाथ होतो. अस्ताव्यस्त कपडे घालून मवाल्यासारखा फिरायचो परंतु अचानक माझ्या जीवनात बदल आला... दोन टाईम गरमागरम जेवण भेटायला लागलं ज्या मुळे माझ्या त्वचेला कांती आली... प्रेम मिळायला लागलं जेणेकरून माझे वाणी-वर्तन सुधरले.. स्वच्छ कपडे घालायला भेटता मी जंगलीपासून हिरो सारखा दिसायला लागलो. आज मी तुला आवडलो परंतु तुला आवडतील असे बदलाव माझ्यामध्ये कोणी आणले आहेत ते माहित आहे का? माझ्या पत्नी सुमनने... आणि आज तिला दगा देऊन मी तुझा हाथ धरू? जिने स्वत:च्या स्वास्थ्याची काळजी न घेता दिवसरात माझा विचार केला आज मी तिला सोडून जाऊ... नाही.. नाही... कधीच नाही.... जेनिफर, मला माफ कर... मला खूप उशीर झाला आहे... आता मी निघतो... कारण दरवाजावर उभी राहून तातडीने माझी पत्नी सुमन माझी वाट पहात असेल.”