Sangita Tathod

Comedy Others

3  

Sangita Tathod

Comedy Others

लोड शेडींग ची करामत

लोड शेडींग ची करामत

3 mins
221


    रामू खूप हुशार ,अंगात जोश असणारा ,रंगा रूपाने हँडसम ,तडफदार असा तारुण्याचा जोश 

असलेला शेतकरी .काळ्या मातीत राबणारा तिच्यावर माया करणारा .त्याचे लग्न स्वाती शी झाले ,तेव्हाच

त्याने सांगुन टाकले होते , "माझा पहिला जीव माझ्या शेतीवर ,मग उरेलला तुझ्यावर .तुला काय समजायचे ते समज ."


    वाडावडिलांची कोरडवाहू असलेली शेती ,रामूने बागायती केली होती .शेतात बोअर करून घेतली अन M S E B कडून परवानगी घेऊन मीटर बसवून घेतले .पहिल्या वर्षी जास्त अनुभव नसल्याने ,फक्त

एकच पिकं घ्यायचे ठरविले .कांदा पेरला . दिवसरात्र मेहनत करू लागला .मित्र म्हणत,

" रामुचा कांदा झक्कास जमला .पाच सहा लाखाची कमाई करून देतेच समजा ."सदू


"पिकं हाती आल्यावर खरं असते ,आतापासून काही बोलु नाई " रामू


    रामुच्या कष्टाचं चीज होतय अस वाटत असतानाच ,तिचं रुसणं सुरू झालं. रुसुन अशी

बसायची की ,तिच्यापुढे काहीच इलाज नाही सापडायचा - - ! एक वेळ बायको रुसली असती तर

परवडले असते .एखादी साडी किंवा फारतर फार छोटासा दागिना घेऊन दिला असता तर तिचा रुसवा

घालवला असता .पण रामुची बायको स्वाती फारच समजदार - - ! कधीच रुसायची नाही .पण आता

हिचे काय करायचे - -?? रुसवा कसा घालवायचा - -?


    आता ही कोण म्हणून काय विचारता - - ? तिच्याच तर रुसव्यावर अवलंबून होते रामुचे पुढचे

भविष्य - - ! तिची वाट पाहत तो नेहमी रात्रीचा जगायचा - - ! ती आली की किती वेळ थाम्बते याची

गॅरंटी नसायची - - म्हणून तो तेव्हाच मोठा टॉर्च घेऊन शेतात जायचा .त्याचे काम आटोपून यायचा - -

कधी कधी तर भर दुपारी ,तो जेवायला बसायचा अन दोन - चार घास पोटात टाकत नाही तोच ,तिचे बोलावणे यायचे.. रामू तसाच भरल्या तटावरून उठून पाळायचा शेतात .स्वाती तर कंटाळली होती - -

पण तिचे नखरे ,तिचे आठ आठ ,बारा बारा तास रुसुन बसणे काही कमी होत नव्हते .रामू तिच्या

मागे पायाला भवरा लागल्यासारखा फिरायचा .

   

   नाही फिरला असता तर ,कांद्याचे पिकं हातच गेलंच असत म्हणून समजा .पिकं हाती येईपर्यंत तर

तिचे रुसने सहन करणे भागच होते .रामू जितके तिचे लाड पुरवायचा तितके तिचे हक्काने रुसणं आणखी वाढत होते .पण रामू काही कमी जिद्दी नव्हता .तो

तिचे सर्व हट्ट पूर्ण करायचा . असे करता करता दोन तीन महिने निघून गेले .रामुला गावात सगळ्यात जास्त कांदा पिकला .स्वाती म्हणाली,

" माया ,सवतचे लाड पुरवले ,तिचा रुसवा काढला म्हणुन हे पिकं डोळ्याने दिसले ."


 "हो ,पण तिचा रुसवा काढताना ,तू काही आमच्या दोघांच्या आड आली नाहीस, हे बेस केलंस .आता पिकं आलं हाती. आता तिला सोडून तुझ्याच मागे लागतो की ,नाही बघ - " रामू

  रामू असं काही बोलेल अस स्वातीला वाटलं नाही . ती लाजून दूर पाळली .

    

   ओळखलं का रामू कोणाचा रुसवा काढण्यात इतके दिवस पागल झाला होता - - ?


 नाही ओळखलं - -?? 

 

अहो ,लोड शेडिंग ! काही वर्षा आधी या लोड शेडिंग मुळे शेतकऱ्यांचे खुप हाल झाले. शहरात कमी होते

लोड शेडिंग .ठराविक वेळीच वीज (इलेक्ट्रिसिटी ) जात होती .पण खेडे गावात मात्र काहीच बंधन नव्हते.लाईट जास्त वेळ बंद असायचे ,कमी वेळ  चालायचे .बारा तेरा तासांचे लोड शेडिंग असायचे .

लाईट आले की ,शेतकरी शेतात पाळायचे .


  यावर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी सोलर चा प्लॅन घेतला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy