लग्नप्रवास
लग्नप्रवास
दुसऱ्या दिवशी प्रीती खूप खुश होती. कारण त्याला कारण हि तसच होत. काल रात्री रोहनने तिला अचानक मोबाईल वर संदेश पाठवला. तू मला खूप आवडतेस. पण तो संदेश काल रात्री न बघता प्रीती झोपून गेली. उठली ती सकाळी पहिला मोबाईल हातात घेतला बघते तर काय. त्यामुळे मॅडम भलत्याच खुश होत्या. आणि आज प्रीती आणि रोहनच्या लग्नाची तारीख ठरणार होती. प्रीतीच्या घरचे आज सर्व खुश होते.
"बाबा आज तुम्ही तुमच्या आणि आईच्या २५ व्या वाढदिवसाला घातलेली सफारी घाला आणि आई पण साडी नेस ग."
हो, नक्की.
सर्वांच्या भेटीने लग्नाची तारीख ठरली. मग प्रीती काय हवेतच. तिच्या मनात खूप प्लांनिंग चालू होत. की आता लग्नाच्या खरेदी निम्मत भेटू तेव्हा काय काय घालायचं. ती खूप त्या दिवसाची उत्सुकतेने वाट बघत होती. तसा रोहन खूप अबोल होता. मोजकंच बोलायचं. आणि त्या उलट प्रीती बोलण्यात नंबर पहिला. प्रीतीच्या वडिलांनी लग्नाची तारीख ठरल्यानंतर रोहनचे आणि त्याच्या आई व वडिलांचे गोड मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या. प्रीती आतल्या खोलीत होती. तेव्हा रोहन ने तिला पटकन बाहेर यायला सांगितले, आणि म्हणाला आपण दोघे जरा समोरच्या गार्डन मध्ये जाऊया का. प्रीती तेव्हा थोडी लाजून मन खाली घातली. पण लगेचच प्रीतीच्या काकीने तिला हो म्हणून सांगितले. तशी प्रीती तयार झाली.
दोघेही गार्डन मध्ये आले. आजूबाजूला लहान मुल खेळत होते.
भाव तुझ्या प्रितीचे…
लिहतो आहे तुझ्यासाठी
गीत ग मी प्रेमाचे
ओतशील ना शब्दात माझ्या
भाव तुझ्या प्रितीचे
शब्द माझे आहेत साधे
नाही ग ते नटले
विसरले ग ते बिचारे
नाही अलंकार ल्याले
शब्द माझे कोरडे
प्रेमासाठी आतुरलेले
देशील ना शब्दांना माझ्या
चुंबन तुझ्या ओठांचे
ओतशील ना शब्दात माझ्या
भाव तुझ्या प्रितीचे
तिचा चेहरा एकदम फुलासारखा फुलला. तिने लगेचच रोहनला विचारले,कि, तू कवी सुभाष सरांचा फॅन आहेस वाटत. काय तुझी गाणी आणि काय तुझ्या गझल. माझं मन ऐकून एकदम तृप्त झालं. मला गझल आणि कविता खूप आवडतात.काही प्रसिद्ध कवीची मी खूप मोठी फॅन आहे. भा.रा. तांबे, सुरेश भट, शांता शेळके. मला ह्यांच्या कविता खूप आवडतात.दोघांनी एक तास ह्या विषयांवर गप्पा मारल्या. दोघेही गप्पामध्ये रमून गेले. तेवढ्यातच प्रीतीची धाकटी बहीण अंकिता त्यांना दोघांना बोलवायला आली.थोड्यावेळाने रोहनची घरची मंडळी निघाली. तेव्हा मात्र सारखी प्रीती हळूच रोहनला इशारा करत होती.
नुकतीच लग्नाची तारीख ठरली होती. तशी दोघेही एकमेकांना अनुरूप. कुठं म्हणून नाव ठेवायला जागा नव्हती.दोन्हीकडची मंडळी खूप खुश होती. इकडे सुनेच्या आगमनाची तयारी आणि तिकडे जावयाच्या खानपानाच्या तयारी. बैठकीत सगळ्याचा मान राखण्यात आला होता.
लग्न म्हणजे काय असत,
दोन जीवाचा मेळ असतो....
राजा राणीचा मांडलेला,
भातुकलीचा खेळ असतो....
म्हणतात मुलीचं घर,
सोडणं तिच्यासाठी खूप अवघड असत....
पण आपल्या जगात दुसऱ्यला आणण,
हे मुलांसाठी पण सोपं नसतं ............
रोहन आणि प्रीती च्या लग्नाची तारीख रविवार असल्याकारणाने हळद शनिवारी न लावता शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम ठरवण्यात आला. दोघांचे घर पाहुण्या मंडळांनी भरले होते. एकीकडे रोहन बरोबर लग्न होत आहे ह्याचा आनंद प्रीतीला होताच, आणि दुसरीकडे हे घर आता कायम परके होणार ह्याच दुःख. अश्या संमिश्र भावना प्रीतीच्या मनात दाटून आल्या होत्या. दुपारी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला. आपल्या हातातील हिरवा चुडा बघून प्रीतीच्या चेहऱयावर एक खट्याळ हसू आले. तिने लगेचच रोहनला फोन केला आणि हिरवा चुडाचा आवाज किणकिण आवाज ऐकवला. रोहनही त्या आवाजाने बहरला. पोरीचं लग्न म्हटलं तर बापाचा दुसरा जन्म होतो. नवरदेवाचे कपडे, पाहपाहण्यारावल्यानं मानपानाची कापड, टोप्या, उपरणे, भांडी कुंडी, सोफा, सुईदोऱ्यापासून सगळं सामान पोरीच्या लग्नात द्यावं लागत. मंडपवाला, आचारी, भटजी, बांबागड्यावाला, सनईवाले या सगळ्याशी बोलणी करून ठरवायचं. रोज एक ना एक काम असल्याच.
रोहन: दोन दिवस थांब प्रीती. मग हा किणकिण आवाज तुझ्या आणि माझ्या अवतीभवती असेल.
प्रीती: हो, खरंच. एकीकडे आनंद आणि दुसरीकडे घर सोडून जाण्याचा आठवणी. ह्या घरात खूप आठवणी आहेत रे माझ्या. आई व वडिलांच्या आठवणीने खूप रडू येत आज मला. प्रथम शाळेत जाताना बाबांचा पकडलेला हात, जो कधी सोडावासा वाटला नाही. आईवरच प्रेम. आजपर्यंत सगळ्या गोष्टी निपुटपणे ऐकणारी माझी आई. आई बाबांची ती माया. ह्या सर्व आठवींनी आल्या कि मला रडू येत राहत.
रोहन: मी तुम्हला नेहमीच साथ देईन. तूला आपल्या घरात कधीच एकटेपणा वाटणार नाही.
आई वडिलांच्या लाडात वाढलेली असली तर प्रीती एक स्वाभिमानी मुलगी होती. शिक्षण झाल्यानंतर तिने लगेचच नोकरी पकडली. तेव्हा तिचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढला. पण एवढं सगळं असून ती आई व वडिलांच्या धाकात होती.तीच आपलं स्वत्रंत जग, स्वप्न, व्यक्तिमत्तव, आणि अस्तित्व होत. आणि विशेष म्हणजे ती स्वतःच्या पायावर व निर्णयावर ठाम असायची.
लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षर नव्हे,
सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध,
आयुष्यतला एक अनोखी मनस्वी प्रसंग,
काही क्षण हृदयाच्या कप्प्यात साठवण्यासाठीच,
तर काही क्षण डोळ्यांच्या पापापण्यावर ओथांबण्यासाठी,
आयुष्यभर जतन करण्यासाठीच आनंदी सोहळे,
साजरे करताना.........
साथ आणि आशीर्वाद हवे तुम्हा सज्जनांचे...................
इकडे दोघांच्या हळदीची तयारी चालू झाली. नाच, गाणी सर्व आनंदांत होते. दोघांना हळद संध्याकाळी लावण्यात आली. दोघांच्या घरात अगदी आनंदाचे वातावरण पसरले होते.
हळूहळू लग्नाची तारीख जवळ येत होती. तिला नवीन घर, नवीन संसार सुरु होणार आणि दुसरीकडे आई व वडिलांनी सोडून जाण्याची घालमेल. खास करून तिच्या भावाला आणि बहिणीला. लग्नाचा दिवस उजाडला. कोण दाराजवळ रांगोळी काढत आहेत. तर कोणी प्रीती लग्नात उठून दिसावी म्हणून तिला सजवत आहेत. सगळीकडे वातावरण एकदम आनंदाचं होत. सर्व पाहुण्यांची माणपणाची सोय सुंदर केली होती.
"विवाह" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे.विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे.व्यक्तिगत दृष्टिकोनातून विवाह हा पति-पत्नींतील मैत्री आणि भागीदारी आहे. वैवाहिक जीवनातून दोघांच्याही सुखासाठी, विकासासाठी आणि पूर्णत्वासाठी आवश्यक सेवा, सहयोगाची, प्रेमाची, निःस्वार्थ त्यागाची व अनेक गुणांची शिकवण मिळते. लग्न आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हा माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. लग्न तिचे किंवा त्याचे नसते ते दोन कुटुंबाचे असते.
पण तू भेटलीस,
सगळं हवंहवंसं वाटायला लागलं,
नातं तुझ्याशी जोडावंसं वाटायला लागलं,
तुझ्या मनाशी माझ्या मनाला,
बांधवांस वाटायला लागलं,
अन सगळं कस छान छान,
वाटायला लागलं.
दुपारी १२ वाजून ३५ मिनटाचा मुहूर्त होता. प्रीतीच्या भावाची सगळयांना अक्षदा वाटायची घाई चाललेली. प्रीतीचे काका जेवण्याची सर्व व्यवस्था बघत होते. भटजी व्यासपीठावर आले. भटजींनी मुहूर्ताच्या १० मिनिटं अगोदर मंगलाष्टका सुरु केल्या. प्रीती पश्चिमेकडच्या राशीवर पूर्वाभिमुख आणि रोहन पूर्वेला राशीवर पश्चिमाभिमुख उभे होते.मंगलाष्टक म्हणजे मंगल वचनांचे अष्टक म्हणजेच आठ श्लोकांचे असावे, मुहूर्ताची घटिका भरेपर्यंत हि गायली जातात, दोन्ही पक्षांकडील नातेवाईक मंडळी हौसेने हि मंगलाष्टके म्हणतात. रोहन पश्चिमेकडे तोंड करून उभा होता.अंतरपाट धरून एखादे मंगलाष्टक झाल्यावर, प्रीतीच्या मामाने प्रीतीच्या हाताला धरून रोहनसमोर आणून प्रीतीला पाटावर उभी केली. अंतरपाट दूर झाल्यावर प्रथम वधूने वराला हार घातला व नंतर वराने वधूला. दोघांनीही एकमेकांना फुलांचा गुच्छ दिला.वराच्या व वधूच्या मागे प्रत्येकी २ करवल्या कलश व दिवा घेऊन उभ्या होत्या.
त्यांनी वर- वधू दोघांच्याही डोळ्यांना कलशातले पाणी लावून दिव्याने औक्षण केले. नंतर उपस्थित ब्रह्मवृंद- गुरुजी मंत्र म्हणत असताना दोघांनीही एकमेकांच्या डोक्यावर अक्षतारोपण केले. विवाहाच्या वेळी वधूची आई गौरीहरापाशी होती. अंतरपाट दूर होऊन वाजंत्री वाजल्यावर तिने दुधात साखर घातली, सुईमध्ये दोरा ओवाला.गौरीहराच्या बोळ्क्यांना हळद-कुंकू लावले. दोन्ही कुटुंबे एकत्र आले. वधूच्या आईने वधू-वराजवळ येऊन दोघांच्या डोक्यावर अक्षता घातल्या. अशाप्रकारे आलेल्या सर्व मंडळींनी रोहन व प्रीतीवर अक्षतांचा वर्षाव केला. आणि हा गोड, सुंदर विवाह सोहळा संपन्न झाला. सगळ्यांनी नवीन जोडपीला भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला. प्रीतीच्या आई व वडिलांनी प्रीतीचे कन्यादान केले.तेव्हा विवाह सर्व अर्थाने सुखी यशस्वी होण्याकरता धर्म, अर्थ, काम यांचा वैवाहिक जीवनात आनंद उपभोग घेताना मर्यादेचे उल्लंघन करणार नाही असा निश्चय / वचन रोहनने दिले. थोड्यावेळाने रोहनने प्रीतीला मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले. मंगळसूत्र हे सौभाग्यचिन्ह विशिष्ट रीतीने गुंफून ते घालायचे व सासर-माहेर दोन्ही कुटुंबे एकत्र करून संसार माळेसारखा बांधून ठेव असा संदेश कन्येला दिला.मंगळसुत्रामुळे विवाहित स्त्रीला प्रतिष्ठा मिळते. नंतर रोहन आणि प्रीती एकत्र सात पाऊले चालले.
पहिले पाऊल :- तू एक पाऊल चाललीस, तुझे माझे सख्य झाले. सुंदर अन्न तयार करणारी अन्नपूर्णा हो. माझ्याशी एकनिष्ठ वाग. आपल्या कुटुंबाचे आपण कल्याण करू.
दुसरे पाऊल :- तू माझ्याबरोबर दोन पाऊले चाललीस, माझे बळ वाढवणारी हो. आपण धैर्य आणि सामर्थ्य ठेऊन कुटुंबातील आनंद संरक्षित ठेऊ.
तिसरे पाऊल :- तू माझ्याबरोबर तीन पाऊले चाललीस, धनप्राप्त करून देणारी हो. आपण दोघे संपत्ती व ज्ञानाची संमृद्धी करू.
चौथे पाऊल :- तू माझ्याबरोबर चार पाऊले चाललीस, तू सुख वाढवणारी हो. आपण दोघेही सुख, आनंद वाढवू.
पाचवे पाऊल :- तू माझ्याबरोबर पाच पाऊले चाललीस, तू संतती वाढवणारी हो. आपण दोघे सद्गुणी संतती निर्माण करू.
सहावे पाऊल :- तू माझ्याबरोबर सहा पाऊले चाललीस, तू सर्व ऋतुमध्ये सुख देणारी हो.
सातवे पाऊल :- तू माझ्याबरोबर सात पाऊले चाललीस तुझे माझ्याशी सख्य दृढ होवो. आपल्या कुटुंबाचे सुख-दु:ख आपण आपल्या हृदयात जतन करू.
अशा पद्धतीने विवाह सोहळा सुंदररित्या पार पडला. शेवटी आई व वडिलांनी सोडून जात असताना मात्र प्रितीने घट्ट आई व वडिलांना मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. तो क्षणच तिच्यासाठी तसा होता. आलेल्या सर्व पाहण्यामंडळींनी प्रीती आणि रोहनच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
एक स्त्री साठी लग्न म्हणजे,
साधी सोपी गोष्ट नसते,
त्यासाठी कित्येक स्वप्न आणि स्वातंत्र्याची,
तिला निमूटपणे आहुती द्यावी लागत असते.
सासरी जाताना तिला बघवत नव्हते. प्रीती खूप बोलकी असल्याकारणाने ती घरात सर्वांची खूप लाडकी होती. अगदी मामा, मामी, काका, आत्या, मावशी सगळेच रडले.पण तिला तिच्या बाबा आणि भावा व्यतिरिक्त कोणीच दिसत नव्हते. आईकडे तर ती बघूच शकत नव्हती.आईला जर बघितलं असत तर तिचा पाय निघालाच नसता कारणही तसेच होते त्याला.
गंध तो रंगीन तिच्या कपाळावर चढला,
मोगरा तो सुंगधी तिच्या केसावर मांडला....
नाचत नाचत पैंजण आले,
हसत हसत बांगड्या आल्या.....
शृंगार तिचा करुनि, तो काजळ डोळ्यात बसला,
ओठावरची लाली खुद्कन हसली......
राखुनी मान सर्वांचे,
साजणा ती साजणी तुझ्यासाठीच सजली........
घरी येण्याच्या आधी दोघांनी मंदिरात गाडी थांबवून सर्वजण पाया पडले.त्यानंतर थेट घरीच आले. त्याच्या स्वागतासाठी दरवाजा रोखून काकी आणि मामी ह्यांनी प्रीतीला उखाणा घेण्यास सांगितला. प्रीतीने उखाणा घेतला आणि काकिने दोघांना ओवाळून प्रीतीला माप ओलांडून यायला सांगितले.मामीने दरवाजा पासून ते देवघर पर्यंत लांबलचक चादर अंधेरलेली होती. दोघेही त्यावरून चालत येऊन पाया पडले. गृहप्रवेश झाल्यावर तिचे स्वागत एकदम आनंदात झाले.सर्वजण थकलेले तरीही दिवसभराच्या आठवणींना उजाळा देण्यात मग्न झालेले.कधी २ तास झाले कळेलच नाही. तितक्यात जेवणाची ऑर्डर आली आणि सर्व जन जेवायला बसले.बेत तसा मस्तच होता.दाल, भात, चपाती, भरली वांगी, मटार कुर्मा.
तिच्या सासू-सासऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. आणि प्रीतीलाही खात्री होती कि आपण सगळं घर जिकूंन घेऊ आणि सर्वाना आपलंस करू.लग्नाचे सर्व सोपस्कार उरकून प्रीती आता संसाराला लागणार होती. तिच्या मनात विचारच सत्रच सुरु होत. सासरी गेल्यावर नवरा सासरे धीर नीट वागतील ना तिच्याशी. आमचा संसार चांगला होईल ना. सासूबद्दल जरब शंका नव्हती तिच्या मनात. तिला सासू आधीच खूप आवडलेली ती जणू प्रीतीची दुसरी आईच होती. घरातील वातावरण खूप चांगलं होत. सर्व खुश होते. प्रीतीला माहेर आणि सासर आता एकच वाटू लागत होते. लग्नचा दिवशी असल्याकारणाने सर्व खूप थकले होते. अशातच रोहनच्या बहिणीने दोघांना उखाणा घ्याला लावला.
प्रीती: हो नाही म्हणता, लग्न जुळले एकदाचे.....
रोहनमुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे........ आणि लगेचच प्रितीने लाजून मान खाली घातली, आणि पाळी होती रोहनची. प्रथम रोहनने नकार दिला पण सगळ्यचा आग्रहातर त्याने पण उखाणा घेतला.
रोहन: मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, प्रितीबरोबर संसार करिन सुखाचा.......
सगळ्यांनी दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. रोहनही स्वभावाने खूप चांगला होता. अगदी आजच्या पिढीचा...... नंतर सर्व कार्यक्रम आटोपल्यावर हळूच प्रीतीच्या जवळ जाऊन तो म्हणाला, की आपण दोघे हनिमूनला कुठं जायचं म्हणून.........प्रीती अगदी लाजत होती. तिला सुचेना काय बोलव, लगेचच ती म्हणली, तू नेशील तिकडे मी यायला तयार आहे.
नाती जन्मो-जन्माची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या,
रेशीम गाठीत बांधलेली,
प्रेमाचे हे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित,
तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची ही वाटचाल,
सुख-दुःखात मजबूत राहिलेली,
एकमेकांची आपसातील आपुलकी,
माया ममता नेहमीच वाढत राहिलेली.........
त्या दोघांचा सुखाचा संसार चाललेला बघून घरातली सर्व मंडळी खूप खुश होती.
रात्री प्रीती थकून गेल्यामुळे लवकरच झोपी गेली. जेव्हा प्रीती सासरी पोचले तिचा विश्वासच बसत नव्हता की, सगळेजण माझ्या स्वागतासाठी उभे आहेत. सर्व विधी पार पडल्यावर घरातील एकेक पाहुणेमंडळी जाऊ लागली आणि घर रिकामं झालं. त्या घरात फक्त सहाच जण राहत होती.जेव्हा प्रीती खोलीत गेले तेव्हा तिने पाहिलं की, रोहन बेडवर झोपला होता .प्रीतीला खूपच भीती वाटत होती. मी जशी खोलीत आले तशी त्यांना जाग आली आणि ते उठून उभे राहिले. तेव्हाच कदाचित पहिल्यांदा त्या दोघांनी एकमेंकाना इतक्या जवळून पाहिलं. रोहन दिसायला एकदम अकुंश चौधरींसारखे होते पण प्रीतीच्या सावळ्या रंगामुळे तिला त्यांच्या नजरेला नजर द्यावीशा वाटत नव्हती. त्याचवेळी तो अचानक प्रीतीच्या जवळ आला आणि मला म्हणाले की, घाबरू नकोस मी काही तुला खाणार नाहीयं. मान्य आहे की, आपलं लग्न खूपच घाईघाईत झालं. पण हळूहळू प्रेमही होईल. आधी आपण एकमेंकाचे चांगले मित्र बनूया, मग प्रेमी आणि मग जोडीदार. तेव्हाच दोघांना एकांत भेटला आणि दोघांनी हनिमूनला कुठे जायचे ठरवलं. प्रीतीचा म्हणणं होत की, आपण सध्या खूप लांब नको जाऊया. महाबळेश्वर पण चालेल. तेव्हा लगेचच रोहनने होकार्थी मान हलवली. लगेचच रोहनने हनिमून ट्रॅव्हल्सला फोन करून ह्या संबंधी सूचना दिली.
लग्नानंतरची प्रीतीची पहिलीच रात्र होती. तसा रोहनही खुप खुश होता. रात्री दोघेही आपल्या खोलीत गेले. तेव्हा रोहनने तिला विचारले, तुला तुझ्या भावी नवऱ्याबद्दल काय अपेक्षा होत्या. तेव्हा लाजूनच प्रितीने उत्तर दिल. माझी अशी अपेक्षा होती, की माझा नवरा समजूतदार, गोरापान, सुंदर असावा. त्याला नात्याची खूप ओढ असावी. आणि नशीब माझं एवढं चांगलं कि, मला खरंच चांगला नवरा आणि घरातली माणसं ही चांगली मिळाली. दोघेही कधी एकदाच घर सोडत आहेत आणि कधी एकदा प्रवासाच्या दिशेने वाटचाल करू असे झालं होत दोघांना. आणि खरंच तेव्हाच दोघांना एकांत मिळणार होता.
दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे रोहन आणि प्रीतीचा उपवास होता. अजुन काही विधी पार पाडायच्या होत्या म्हणून पाहुण्याची ओढ घराकडे येऊ लागली. दोघांना रांगोळी काढलेल्या पाटावर बसून त्या दोघांची हळद उतरवण्याच्या कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर लग्नात दोऱ्याने बांधलेले हळकुंड सोडले.त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात अंगठी सोडण्यात आली आणि ती प्रथम कोण शोधतेय ह्याचा कार्यक्रम पार पडला ह्यात प्रीतीने रोहन वर बाजी मारली. अशाप्रकारे सर्व विधी पार पडल्या.
तिसऱ्या दिवशी दोघेही लागले तयारीला. नेहमीप्रमाणे सकाळी रोहन आणि प्रीती नाश्ता आणि चहा घेऊन बसची वाट बघत होते. तेवढ्यातच रोहनच्या आईने एका डब्यात लाडू दिले आणि म्हणाली बस मध्ये भूक लागली. रोहन आणि प्रीती दोघेही आज खूप आनंदांत होते. महाबळेश्वर ह्यापूर्वी दोघांनाही पहिले नव्हते. प्रीतीची आई व बाबा त्याच्या हनिमूनला तिकडे गेले होते. तेव्हा आईने थोडी फार माहिती ह्याबद्दल प्रीतीला दिली होती. प्रीतीला फिरण्याची खूप आवड होती. लहानपणी ती तिच्या मावशीकडे, आत्याकडे राहायला जात असे. एक वेगळाच आनंदाचा क्षण असायच्या तिच्या आयुष्यात.
अल्लड सांज,
अवखळ वारा,
हात तुझा होती,
जणू रेशमी मोहपिसारा,
अशांत सागर,
उधाण लाट,
प्रेमरंगात सजलेले,
अधरे ललाट...

