Supriya Devkar

Romance Classics

3.7  

Supriya Devkar

Romance Classics

लग्नगाठ

लग्नगाठ

4 mins
297


रेवा एका मिल्ट्रीमॅनची मुलगी. वडिलांचे पोस्टींग झाले कि ते त्या त्या ठिकाणी सह कुटुंब रहात असत. विचंवाच्या बिर्हाडासारख सगळीकडे फिराव लागत असे रेवाच्या वडिलांना. मिल्ट्री ची लोकं तशी दाडंगी, खाणं पिणं भरपूर तसाच व्यायाम ही असायचा. घोडसवारी,गोल्फ,सायकलिंग,पोहणं कशाची म्हणजे कशाची कमी नाही हे सतत चालायच. मोठ्या हुद्यांवरची मंडळी काहीही कारण असलं की खाण पिणं असायचच.पण रेवा आता काॅलेजला जात असल्याने तिला हे खाणं, पिलेल आवडायचे नाही. पिल्यावर कोणाला शुद्ध रहात नसे आणि तेच तिला आवडत नसे. कोणी कोणाच्या गळ्यात पडत असे. कोणी काही ही बोलत असे अगदी त्यांच्या बायका सुद्धा तोकडे तोकडे कपडे घालून पार्टीला येत असत. प्रत्येक बाई मेकपचा लेप थापून थापून आपण किती सुंदर आहे याचं प्रदर्शन करत असे.

   रेवा खूप हुशार आणि दिसायला सुरेख होती मात्र तिला या सगळ्यात आजिबात रस नव्हता. मात्र ती जितकी हुशार तितकीच चपळ आणि खिलाडू वृत्ती ची होती. रेवाची आई सुद्धा वडिलांसोबत पार्टी ला जात असे. एक दिवस तिच्या वडिलांच्या मेजर साहेबांचा घरी त्यांच्या मुलाच्या मानसच्या वाढदिवसाची पार्टी होती. मानस अमेरिकेत असे वाढदिवसाच्या निमित्ताने तो घरी आला होता आणि म्हणूनच मोठी पार्टी ठेवण्यात आली होती. मानस हुशार होता आणि मॅच्युअर ही होता. सर्वांना बोलवल्यामुळे रेवाला ही जावे लागणार होते. ती अगदी साधेपणाने तयार झाली. बाकीच्या मुली वेस्टर्न कपड्यात नटल्या होत्या. रेवा सर्वांच्याच वेगळी आणि उठून दिसत होती. 

पार्टी सुरू झाली सगळे खाण्यात पिन्यात गुंग होते. रेवा ही एका कोपर्यात बसून सगळे पहात होती. तेवढ्यात एक सुभेदार रेवाजवळ आला त्याने खूप ड्रिंक घेतले होते आणि आता त्याला स्वतः ला सावरता ही येत नव्हते त्याने रेवाच्या पाठीला विचित्र स्पर्श केला अशा अचानक झालेल्या स्पर्शाने रेवा एखाद्या कात टाकलेल्या नागिणी प्रमाणे सळसळता जागेवरून उठली आणि लांब झाली तसा सुभेदार पुन्हा तिच्या कडे बघून हातवारे करून तिला जवळ बोलवू लागला. रेवा मनातून पुरती घाबरली होती पण काय करावे या विचारात असतानाच तिच्या पूढे कोणी तरी भिंती सारखे उभे राहिले होते हे तिच्या ध्यानात आले.ती थोडीशी सावरली. तो मानस होता. मानसने त्या सुभेदाराला लांब नेले आणि तो रेवाकडे परत आला. 

 मानसने तिला पाणी दिले आणि शांत केलं ती अशा अनामिक स्पर्शाने हदरून गेली होती. मानसने घडलेला प्रसंग दूरून पाहिला होता त्याला रेवाची अवस्था समजत होती तो रेवाला धिर देत होता. लवकरच रेवा आई बाबा घरी गेले. घडलेला प्रसंग आईला सांगावा का असे रेवाला सतत वाटत होते पण ती मनातून खूप घाबरली होती. रात्र कशीबशी निघून गेली. 

       सकाळी सकाळीच घराची बेल वाजली आई बाबानी ड्रिंक घेतले असल्याने अजूनही ते उठले नव्हते तर रेवा रात्रभर झोपलीच नव्हती. रेवाने दरवाजा उघडला तर समोर मानस उभा होता. मानस आत आला त्याने घरच्यांची विचारपूस केली आणि लागलीच मुद्द्याला हात घातला. तो म्हणाला "रेवा, तू माझ्याशी लग्न करशील का "?अचानक अशा प्रश्नाने तिच्या डोक्यात पुन्हा काहूर माजले होते काल घडलेला प्रसंग डोळ्यासमोरून जात नव्हता आणि आज काय हे .विचार करून करून ती पुरती भानावर नव्हती.मानस बोलता झाला "कालचा प्रकार मी पाहिला रेवा" ,अग या जगात मी सुद्धा कधी काळी तुझ्या सारखाच वागत होतो पण याच लोकात माझ्या सोबत ही असेच घडले आहे आणि म्हणूनच मी इथून बाहेर पडलो आणि परदेशात शिकायला गेलो मात्र तिकडे हे प्रकार राजरोसपणे चालतात ग ती लोकं घाबरत नाहीत. रेवा फक्त ऐकत होती .तुला पाहताना मला तुझ्यात मी दिसलो.मला तुला गमवायच नाही तुला ही यातून बाहेर काढायचय तु खूप चागंली आहेस तूला या जगाला तोंड देता आलं पाहिजे आणि मी शिकवीन हे सारं तुला. 

          रेवा तरीही शांतच होती तिला आता थोड हलकं वाटू लागलं होतं. ती मानसला काहीच बोलली नाही. मानसने ही तिला कसलाच फोर्स केला नाही. हळूहळू मानसच येणं वाढलं होतं रेवा आता त्याच्या सोबत नाॅर्मल वागू बोलू लागली होती. 

मानसबद्दल तिच मत आता चांगले बनू लागले होते. त्याचा वाढलेला वावर घरच्यांना ही आवडू लागला होता पण महिना उलटून गेला आणि मानसचा परत जायचा दिवस जवळ येऊ लागला अशातच मानस आणि रेवाची कुटुंबांन बाहेर ट्रेकींगला जायचा प्लान केला सगळे तयार झाले तयारी झाली. 

सगळे निघाले मॅप घेऊन सगळे चालू लागले सगळ्यानी एका ठिकाणी भेटायचे ठरले. पण रेवा रस्ता चुकली घनदाट झाडी असल्यामुळे ती काहीशी घाबरली किड्यांचे आवाज किरकिरत होते. तिच्या जवळचे पाणी ही संपले होते आता काय कराव तिला समजत नव्हते. पण पुन्हा एकदा मानसने तिला शोधून काढत तिचा आत्मविश्वास वाढवला होता. घाबरलेली रेवा मानसला पाहून सुखावली. 

     रेवा आता मानसवर विश्वास ठेवू लागली होती. मानसने ट्रेकिग केल्यावर त्याचा परत जायचा दिवस सर्वांना सांगितला मग मात्र रेवा थोडी मलूल झाली. आजवर झालेल्या सर्व घडामोडी ती आठवू लागली .तिला मानसने केलेल्या गोष्टी आठवू लागल्या. तीची चलबिचल वाढली. 

      मानसला तिने एक दिवस कोणी नसताना घरी बोलवले आणि तिच्या भावनांना मोकळे केले. मानसने ही मग एक पाऊल पुढे टाकले आणि घरात आपल्या प्रेमाची कबुली देत लग्नाचा प्रस्ताव रेवाच्या घरी ठेवला. मानसचा स्वभाव सर्वांना आपलेसा वाटनारा असल्याने दोन्ही घरात होकार आला आणि रेवा मानसची लग्नगाठ बाधंली गेली. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance