Nilesh Kawade

Drama Romance Fantasy

4.0  

Nilesh Kawade

Drama Romance Fantasy

कवितेचं मोरपीस...

कवितेचं मोरपीस...

6 mins
497


फेसबूकवरील स्क्रीन स्क्रोल करत असताना 'पीपल यु मे नो' मध्ये स्वप्निल ला एका ओळखीच्या जुन्या मुलीचा फोटो आणि नाव दिसले. स्वप्निल ने ती 'प्रोफाइल' लगेच ओपन केली आणि त्या प्रोफाइल ला 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठवली. ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या पासून स्वप्निल भूतकाळात रमू लागला होता. स्वप्निल कवी आणि चांगला लेखक असल्यामुळे महाविद्यालयाच्या दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर त्याची निवड झाली होती. स्वप्निल कडे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या कविता जमा करण्याची जबाबदारी संबंधित प्राध्यापकांनी दिली होती. एक दिवस एका मुलीने कवितेचा घडी केलेला कागद स्वप्निल कडे प्रत्यक्ष येऊन दिला होता. त्या मुलीला पाहताच स्वप्निल क्षणभर तिच्यात हरवून गेला. तिने दिलेली कविता वाचण्यासाठी त्याने कवितेचा कागद जसा उघडला तसा त्यात त्याला एक मोरपीस दिसले. एका हातात मोरपीस आणि एका हातात कवितेचा कागद घेऊन तो तिची कविता वाचू लागला... मोरपिसावरच्या कवितेने त्याच्या काळजावर खरंच मोरपीस फिरवले होते. मोरपीस फिरवणारी ती कविता होती भावना नावाच्या एका मुलीची. 


कॉलेजमध्ये असताना मोरपिसाच्या कवितेने भावना आणि स्वप्निल एकमेकांच्या संपर्कात आले होते. हळूहळू संपर्क वाढल्यावर त्यांच्यात मैत्री झाली होती. अभ्यासाच्या नोट्स मागण्याच्या निमित्ताने ते एकमेकांना आवर्जून भेटत असतं. आता खूप दिवसांनी ती भावना स्वप्निल ला ऑनलाइन सापडली होती. भावनाने जणू कवितेचे मोरपीस घेऊन पुन्हा स्वप्निल च्या काळजाचे दार ठोठावले आहे असेच त्याला वाटू लागले होते. स्वप्निलची हरवलेल्या कवितांची वही घेऊन भावना आली आहे की काय असे त्याला वाटू लागले होते. त्याला हरवलेल्या वहीतल्या कविता आठवू लागल्या होत्या. 


भावना फ्रेंड रिक्वेस्ट केव्हा स्वीकारेल याची स्वप्निल चातकासारखी वाट पाहू लागला. स्वप्निल हल्ली फेसबूकचे नोटिफिकेशन दिवसभर वारंवार चेक करत राहायचा. "भावना ला माझी फ्रेंड रिक्वेस्ट इतक्या दिवसानंतर पाहून काय वाटले असेल" असे नाना प्रश्न त्याला सतावू लागले होते. एक दिवस त्याच्या ध्यानी मनी नसताना त्याने फेसबूक उघडले, त्याला एक नोटिफिकेशन दिसले, "भावना हॅड एक्सेप्ट युअर फ्रेंड रिक्वेस्ट"


भावनाने फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यामुळे स्वप्निलला पुन्हा एकदा जुन्या स्वप्निलचा 'फील' येऊ लागला होता. फेसबुकवर 'फ्रेंड' झाल्यामुळे स्वप्निल भावनाच्या प्रत्येक पोस्टवर प्रतिसाद देऊ लागला. हळूहळू स्वप्निलच्या कवितांवर सुद्धा भावनाचे 'रिप्लाय' येऊ लागले होते. मेसेंजरवर दोघांचे बोलणे सुरु झाले होते. मेसेंजर वर बोलताना अडचणी येत असल्यामुळे त्याने तिला व्हॉट्सऍप नंबर मागितला. नंबरची आदान प्रदान झाल्यामुळे दोघेही एकमेकांचे व्हॉट्सऍपवरील स्टेटस पाहू लागले होते. एकमेकांच्या कवितांवर दोघे ही भरभरून बोलत होते. दररोज काही ना काही ते बोलायचे. त्यांचे व्हाट्सएपवर बोलणे झाले नाही असे एकही दिवस होत नव्हते.


हळूहळू दोघांच्या कवितांचे विषय आता बदलले होते. स्वप्निल भावनाला केंद्रस्थानी मानून कविता रचू लागला होता. तर भावना सुद्धा आजवरच्या तिच्या अव्यक्त भावना कवितेमधून मांडू लागली होती. स्वप्निल च्या कवितांचा रोख भावनांच्या दिशेने थेट असायचा. ही गोष्ट तिलाही समजत होती मात्र ती कविता खूप सुंदर लिहली वगैरे अशी दाद देऊन मोकळी व्हायची. नाजूक वयात सावरलेली भावना भावनेच्या ओघात वाहून जाऊ नये याची काळजी घेत होती. स्वप्निल मात्र काळजीपूर्वक त्याच्या काळजातील भाव व्यक्त करत होता. स्वप्निल सोबत बोलल्यामुळे भावनाच्या मनाला फार हलके वाटायचे. भावनालाही तिला समजून घेणारे कुणी मिळाले असल्याने ती ही 'सिक्रेट फ्रेंडशिप' जपू लागली होती. एरवी तिला केवळ नवऱ्याला आणि त्यांच्या मुलांनाच समजून घ्यावे लागायचे. मात्र स्वप्निल तिला नुसते समजूनच नाही घ्यायचा तर तिला भावनिक आधार देऊन सांभाळत होता. त्यामुळे ती त्याच्या सोबत बोलताना मोकळ्या मनाने बोलायची. 


काही दिवसांनी कॉलेजच्या आठवणींवर व्हाट्सअप वर चॅट करताना तो त्याने भावनाच्या वाचलेल्या पहिल्या कवितेविषयी विचारू लागला, "कॉलेज मॅगझिनसाठी कविता देताना तू कवितेच्या कागदामध्ये मोरपीस का ठेवले होते"

"अरे बापरे! ते मोरपीस त्या कवितेच्या कागदात आले होते"

"होय"

"मी किती शोधले होते त्या हरवलेल्या मोरपिसाला?"

"ते मोरपीस तेव्हापासून मी माझ्याजवळच जपून ठेवले आहे"

"खरंच का"

"होय, आणि तो कवितेचा कागद सुद्धा"

"अरे पण का?

"कारण माझं प्रेम होतं तुझ्यावर"

"पण तू इतक्या दिवसांनंतर हे मला आज का सांगतोय?"

"सॉरी मला तेव्हा नाही सांगता आलं"

"तुला नाही वाटत तू फार उशीर केला आहेस"

"नाही"

"अरे आता माझं लग्न झालेलं आहे तरीही तू मला हे सांगतोय"

"मग काय झालं?"

"माझ्या मनावर याचा काय परिणाम होईल याचा विचार केला आहेस का तू?"

"असा कोणता परिणाम होणार आहे?"

भावना रागाने टाईप करते... "स्वप्निल...!"

"बरं बरं सॉरी! मी सांगायला नको होतो. पण सांगितलं आहेच तर तेव्हा तुझं उत्तर काय असतं?

"उत्तर...?"

"होय सांग ना प्लिज!"

"तुला काय वाटतं मी हो म्हटलं असतं?"

"हे मी कसं सांगू शकतो?"

"मी काहीच उत्तर दिले नसते"

"पण का भावना?"

"अरे तू मला हे तेव्हा विचारलं कुठे होतं? तू तर मला आता फक्त सांगितलं ना... नुसतं सांगितल्यावर मी उत्तर कसं देऊ?"

"म्हणजे मी प्रपोज करायला हवे होते तर..!"

"होय म्हणजे मी उत्तर दिले असते ना"

"बरं! आय लव्ह यू"

"आता हे काय?"

"प्रश्न विचारतोय तुला सांग नं डू यू लव्ह मी?"

बराच वेळ भावना रिप्लाय करत नाही... मग स्वप्निलच पुन्हा मेसेज करतो.

"अगं काय झालं दे ना उत्तर?"

बराच वेळ स्वप्निल च्या मोबाईल स्क्रीनवर 'भावना इज टायपिंग' दिसत राहते. इकडे स्वप्निल विचार करतो की, 

"भावनाच्या मनात काय चालले असेल... खरंच ती मला आता हो म्हणेल का वगैरे वगैरे...."

तिकडे भावनाच्या मनातही घालमेल सुरू असते तिच्या मनात स्वतःशीच एक प्रकारचे द्वंद्व सुरू झालेले असते खूप विचार करून ती उत्तर देते...

"हा प्रश्न तू मला कॉलेजच्या वेळी विचारला असता तर मी उत्तर नक्की दिले असते आता नाही देऊ शकत सॉरी" 

"अगं पण का?"

"स्वप्निल माझं लग्न झालेलं आहे तुला याची जाणीव नाही का"

" लग्न झालेलं आहे याचा आणि उत्तराचा काय संबंध"

"लग्न झालेल्या मुलीला असं प्रपोज कुणी करत का?

"तुला काय म्हणायचं की माझ्या मनात तसलं काही आहे म्हणून मी तुला प्रपोज केलं?"

"अरे मी असं काही म्हटलं का?"

"भावना माझ्या मनात तसलं काही असतं तर मी तेव्हाच तुला प्रपोज करून मोकळा झालो असतो आणि..."

"आणि काय स्वप्निल?"

"आणि तुझं मोरपीस जपलं असतं का?"

"मग आता तू उत्तर ऐकून काय करणार आहेस?"

स्वप्निल भावनिक होऊन उत्तर देतो,

"त्या मोरपिसावर लिहलेली कविता मी जगणार होतो"

"स्वप्निल मोरपिसावर लिहलेली कविता तर तू आजवर जगत आला आहेस अगदी माझे उत्तर देखिल न मिळता सुद्धा?"

"म्हणजे" 

"माझ्या कवितेतलं मोरपीसच माझ्या कवितेचं मोरपीस अजूनही जगतो आहे"

भावनाने मघाशी न दिलेल्या प्रश्नाचे उत्तरच जणू स्वप्निल ला या वाक्यात दिसत होते. त्याला आता जुने नाते नव्याने उलगडले होते. भावनाविभोर झालेला स्वप्निल भावनाला विचारतो,

"मग तू काय जगते आहेस भावना"


कॉलेजमध्ये असताना भावनाने स्वप्निलला मागितलेल्या नोट्सच्या वह्यांमध्ये चुकून स्वप्निलने तिच्यावर लिहिलेल्या कवितांची वही आली होती. ती तिने त्याला परत न करता जपून ठेवली होती. स्वप्निलच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी भावना ने स्वप्निलच्या कवितांच्या वहीचा फोटो मोबाईल ने काढून पाठवला आणि लिहले, "कळलं का मी काय जगते?

हरवलेल्या 'कवितांची वही' सापडल्यामुळे स्वप्निलच्या डोळ्यात आज कवितेचं मोरपीस भिजलं होतं... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama