क्षण आला भाग्याचा
क्षण आला भाग्याचा


एके दिवशी दुपारीच यजमान घरी आले. ड्राइवर गाडी होतीच .बोलले कपडे पॅक कर .फिरायला जायचे आहे .मला समजेना .काही प्लॅन नाही .सकाळी जातानाही काही बोलले नाहीत .आधी कॅलेंडर पहिले .एप्रिल फुल किंवा फुल्स डे नाही ना ?आज स्वारी एवढी कशी खुशीत ?ऑफिसमध्ये प्रोमोशन झालेय का तेही आडून विचारले तर तेही नाही .मग लागले बॅग भरायला .कुठे नि किती दिवसासाठी ते तरी सांगावे !पण बोलायलाच मागेनात .
भरले तीन दिवसाचे कपडे .गाडीत तर ठेवायचेत .निघालो फिरायला .रस्त्यात विचारले आता तरी सांगा कुठे जायचे तर बोलले गाडीतून फिरत राहायचे रात्र होईल तिथे राहायचे .आता मात्र माझे कुतूहल वाढले .चला दोघे एकत्र फिरतोय तर कशाला काळजी .प्रवासात सायंकाळ झाली कर्नाळा गेले नि छान एक हॉटेल दिसले .रूम बुक केली .फ्रेश झालो .ड्रायव्हरला आराम करायला सांगून दोघेच मस्त भटकत राहिलो .मी विचारले इथे यायचे होते तर एवढे गुपित का ?तर उत्तरले आपले सेकंड हनिमून तुला सरप्राइझ द्यायचे होते .सांगितले असते तर तुला इतके कुतूहल वाटले असते का ?
त्या जंगलातली रम्य सायंकाळ सख्याचा हातात हात .अजब एकांत एखाद्याच्याच वाट्याला आला असेल .धुंद होऊनच उशिराने दोघे हॉटेलवर परतलो .चालत नव्हे तर अलगद उडत
" तुझ्या पंखावरूनियां मला तू दूर नेशील का
तुझ्या भावसुमनांचा मला तू गंध देशील का"
अशी अवस्था झाली होती