कोण होतास
कोण होतास
लहानपण दंगा मस्ती करण्यातच गेले!
शाळेतले मित्र मैत्रिणी, कॉलनीतले मित्र मैत्रिणी यांच्या सोबत खेळण्यात बागडण्यात घालवले! कधी कसली काळजी नाही,
आई-बाबापण काही पाहिजे असेल तर पटकन आणून देणार, एकुलता एक, ऐष होती..
शाळेत जास्त गुण मिळायचे नाही, कारण लक्षच नसायच बाई वर्गात काय शिकवायच्या त्याकडे! सारख बाहेर लक्ष, हुंदडण्यात पहिला नंबर!
सारख्या बाईंच्या तक्रारी आई-बाबांकडे जायच्या!
वर्गमित्र, मी कोण होणार ह्यावर चर्चा करायचे, पण मला त्यात चर्चा करण्यात रसच नसायचा.. खोड्याकरा पण किती ... मुलगा वाया जाईल तुमचा अशी तक्रार आई जवळ गेली, आई शांत होती मुलगा आहे दंगा मस्तीतर करणारच! मोठ्या झाल्यावर बदलतील सवयी, दंगा कमी करेल. घरात मी एकदम आज्ञाधार मुलगा होतो, छान छान सवयी होत्या माझ्या, लवकर उठायचो, आईने सांगितलेले काम करायचो, तीला मदत करायचो!
आईचा विश्वास होता मी चांगला मुलगा बनेल पुढे जाऊन, त्यासाठी ती छान माझ्याशी संवाद साधायची, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायची 'शामच्या आई' सारखी! लहान असतांनाच चांगल्या सवयी लावुन घे, दंगामस्ती कर पण कोणाला त्रास देऊ नको ही तीची शिकवण होती, अभ्यास मन लाऊन कर म्हणजे चांगले मार्क मिळतीलच असा आत्मविश्वास ठेव!
खरच, मी वेळीच तीचे म्हणने ऐकले व अभ्यासात प्रगती करत राहीलो. कोण होतास तु लहानपणी रे पण आईच्या योग्य मार्गदर्शनाने कोण झालास रे! शाब्बास, आईचे म्हणणे कधी विसरू नकोस! मी स्वतःला दिलेले लहानपणीचे वचन विसरणार नाही कधी!
