STORYMIRROR

Rahul Maghade

Drama Romance Fantasy

3  

Rahul Maghade

Drama Romance Fantasy

कितीदा नव्याने तुला आठवावे

कितीदा नव्याने तुला आठवावे

24 mins
297

Present Day.....

आज पुन्हा तिची आठवण आली. कशी असेल ती ....?काय करत असेल ती .....?

भविष्यात कधी गेट टू गेदर ठरलाच तर, ती येईल का ? आणि आलीच तर तो तिला फेस करू शकेल का ? खरतर हा खूप मोठा प्रश्न आहे पण हयाच उत्तर हे तिच्याकडेही नसेल..!!!


२०१० -२०११ चा काळ { Flashback }

" प्रेम " खूप गोड, निरागस असत ना. किती छान असते पहिल्या प्रेमाची भावना. त्या गोड आठवणी, ते हसणं - खेळणं, रुसणं - मनावन. 

खरच पहिलं प्रेम अगदी पहिल्या पाऊसा सारख असत. जसा पहिला थेंब पडतो आणि मातीचा मस्त असा सुगंध चोहीकडे दरवळतो, अगदी तसच पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर प्रेमाचा सुगंध हा त्या दोघांच्या मनामध्ये दरवळतो.


ते दोघे मित्र तर होतेच पण ती त्याला मित्रापेक्षा ही जवळचा मानायची. तो मात्र मैत्रीच्या धाग्यात अडकून बसला होता. लोक म्हणतात ना मुलांपेक्षा मुली लवकर ( matured ) समजूतदार होतात, खर आहे ते. तिचं त्याच्यावर प्रेम आहे हे कळायला सुद्धा त्याला २ वर्ष लागले, आहे की नाही गंमत....

तिचं प्रेम तर शाळेपासूनच (२००८) होत, फक्त पुढाकार घेत नव्हती. कदाचित मैत्रीतून होणारं प्रेम सांगायला मन लवकर तयार होत नसेल तिचं, कारण समोरुन ही तसा प्रतिसाद मिळेल की नाही याची शंका तिला सुद्धा असेलच ना...


खरतर एकेमकांसाठी भेटवस्तू घेणं, रात्ररात्रभर गुलुगुलु बोलत बसणं, दिवसातून सतरा वेळा लव्ह यू- मिस यू मेसेजेस पाठवणं, घरात खोटं बोलून दूर फिरायला निघून जाणं, एवढंच म्हणजे प्रेम असतं का ? नाही खरतर ह्यांच्या नशिबात ह्यापेक्षाही खूप वेगळंच लिहिलं होतं...

१२ वी मध्ये असताना तिच्याच एका खास मैत्रिणीने त्याच्यासमोर तिच्या भावना व्यक्त केल्या. आणि खऱ्या अर्थाने प्रेमाला सुरुवात झाली.खरतर त्यांनी प्रेम नाही,एकमेकांना जीव लावला. एवढा की 


" दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे, जग दोघांचे असे रचु की, स्वर्ग त्यापुढे फिके पडे".

( शाळा, कॉलेजाच प्रेम खूपच वेगळं असत ! नाही का ? उगाचच काहीना काही बहाणा करून तिच्याशी बोलायच, विषय नसेल तर कोणताही विषय काढायचा आणि तो विषय उगीचच तानायचा. कसलाच ताळमेळ नसतो. फक्त एक आनंद असतो की पूर्ण दिवस ती आपल्यासोबत आहे. आणि ही फिलिंगच स्वप्न पूर्ण झाल्यासारखी आहे.)


बरं असो ! तर खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमाची सुरुवात ही कॉलेज पासून झाली, पण भावना तर शाळेपासूनच जोडल्या गेलेल्या होत्या. कॉलेज जीवनात खुप सारे प्रसंग त्यांनी सोबत घालवलेत, त्यापेक्षा सोबत जगलेत म्हणलं तर जास्त आनंददायी वाटेल. त्यातला त्यात एक खास प्रसंग म्हणजे तिला केलेला प्रोपोस. हा प्रोपोस होता साधाच पण ज्यापध्दतीने केला त्यावर तिने हसावं का त्याला प्रेमाने होकार द्यावा हाच प्रश्न तिच्या समोर पडला.


तर झालं असं होतं की, ती संध्याकाळी ८ ते ८.३० ह्या दरम्यान भाजी घेण्यासाठी जायची. तिचा हा नेहमीचाच ठरलेला वेळ होता आणि अर्थात त्याला माहित नसेल हे कसं शक्य आहे. नेहमीसारखी दोघांची भेट झाली, तो त्याच्या एका मित्रांसोबत कॉलेज ने दिलेल्या प्रोजेक्ट साठी लागणार साहित्य घ्यायला आला होता. तसही त्याच सकाळी कॉलेजमध्ये ठरलंच होत की आज हिला विचारायचंच. 


आता प्रश्न हा होता की विचारायचं कसं ? साध्या सोप्या भाषेत बोलू " I love you " की "माझं तुझ्यावर प्रेम आहे" असं बोलु. पार गोंधळून गेला बिचारा. कधी नव्हे तिला ही आज घरी जायची जरा जास्तच घाई झाली होती. इथे तो पार बिथरून गेला होता. बरं जिथे ते दोघे उभे होते, तिथे एक पिंपळाच झाड होत आणि खाली काही झाडाची पानं पडलेली होती. त्याची नजर त्या पानांवर पडली अन एक पान उचलून त्यावर तो लिहू लागला. पण त्याच्या ह्या वागण्यावर तिने त्याच्या हातावर झटका मारून ते पानं फेकून दिल आणि नाक मुरडून म्हणाली, " घाण आहे ते, काही ही काय उचलतोस, आणि तुला काय बोलायचयं ते पटकन बोल मला घरी जायचंय ". तिच्या त्या स्पर्शाने तो एका वेगळ्याच आभासी दुनियेत येऊन पोहचला. किंचितसा स्वतःला सावरून त्याच स्वतःच्या हाताकडे लक्ष गेलं. त्याच्या हातात एक पेपर होता आता त्याने क्षणांचाही विलंब न करता त्यावर लिहायला सुरुवात केली, " प्रेम करतो मी तुझ्यावर". आणि तो कागद तिच्या स्वाधीन केला. व जाताना हळूच म्हणाला की, "घरी जायच्या आधी वाचून फेकून दे". ती एक स्मितहास्य देऊन निघून गेली. 


पण त्याच्या मनातली घालमेळ काही संपेना, तो तिच्या मागे मागे निघाला, हे बघायला की तिने अजून वाचलं की नाही. तीच घर जवळ येत होतं अन तिने अजून काय तो कागद ( पहिल्या प्रेमाच लव्ह लेटर) वाचला नव्हतं. आता मात्र तो ही थोडा घाबरला होता कारण तीच घर जवळ येत होतं अन त्यात तिने तो कागद अजूनही वाचला नव्हता, दोन पावलं पुढे टाकत तो तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याने तिला विचारलं, "वाचलस का ". त्याला अस अचानक समोर पाहून ती आश्चर्य चकित झाली अन उत्तरली, "नाही अजून पण घरी जाऊन वाचेल". तो हसून स्वतःशीच पुटपुटला " लव्ह लेटर कोणी घरी जाऊन वाचत का ?".☺️ असो "आन इकडे तो कागद, काही नाही त्यात". आणि कागद घेऊन तो तिथून निघाला, ती ही जास्त काही बोलू शकत नव्हती कारण ती तिच्या अगदीच घराजवळच पोहचली होती.


शेवटी स्वतःच्या मित्राला भाजीमार्केटमध्ये सोडून आलेला तो, मित्राकडे पोहचला आणि त्याला सर्व हकीकत सांगितली, मित्र ही हसू लागला. प्रोजेक्टसाठी घेतलेलं सर्व सामान मित्राकडे देऊन तो निघू लागला पण त्यात असलेला प्रोजेक्ट पेपर त्याला फाटलेला दिसला. नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण प्रोपोस करण्यासाठी जो कागद वापरला तो प्रोजेक्ट पेपरचा होता.😢


तर अशी गंमत झाली होती प्रोपोस करताना.पण त्या दिवशी तिला कळलं होतं की त्याला काय बोलायचं. कारण तिने नंतर त्याला सांगितलं होत, " जेव्हा तू कागदावर लिहत होतास ना, तेव्हाच मी पाहिलं होतं की तू काय लिहितोयस". आणि हा बिचारा ह्यामुळे नाराज राहिला की तिला कळलंच नाही आपल्याला काय बोलायचं ते.


कदाचित हेच आवडलं होत वाटतं तिला..! त्याचा खरेपणा.

पुढे कॉलेज संपल्यानंतर डिग्रीसाठी दोघांचेही कॉलेज वेगळे झाले. त्यामुळे झालं असं की भेटणं कमी होऊ लागल. पण सहवास आणि त्यातून निर्माण झालेलं त्यांच प्रेम हे खूप जवळ आणि अतूट झालं होतं. 


मुंबईचे बीचेस त्यांच आवडत ठिकाण. एक मस्त प्रसंग आहे. ती समुद्राच्या किनाऱ्यावर हळूच रेतीवर दोघांचं नाव लिहिण्यात गुंग होती आणि हा तिच्या त्या अल्लडश्या निरागस रुपाला न्याहाळत होता. एखाद्या सिनेमाच्या प्रसंगाला सुद्धा लाजवेल असा प्रसंग होता तो. 


Present Day 

आज रविवार असल्यामुळे सगळे जण घरी होते त्यामुळे तो घरातील साफ सफाई करत होता. कपाटपासून ते स्वतःच्या खिश्यातल्या पाकीटा पर्यंत सगळंच साफ करायला घेतलं. खिश्यातल्या पाकीटात जुनी पेट्रोलची बिल, एटीम मधून काढलेल्या पैश्याची स्लिप तो फेकून देत होता. त्यातल्या त्यात एक कागद त्याच्या हातात आला व्यवस्थित घडी घातलेला. कागद जुनाच वाटत होता उघडून पाहिला अन त्यात जे काही लिहिलं होतं ते पाहून त्याचे डोळे नकळत पाणावले. 

त्यात अस लिहिलं होतं, " प्रेम करतो मी तुझ्यावर " २००९.


फ्लॅशबॅक

घर बदललं, दोघे वेगळे झाले पण दोघांनी बांधलेला प्रेमाचा पुल हा एका मजबुत धाग्यासारखा अतूट होता. पूर्वीसारख्या भेटी कमी होऊ लागल्या पण फोनवरचं बोलणं हे दररोज सुरूच होत. असा एकही दिवस नव्हता की त्यांची सकाळ गुड मॉर्निंग मेसेज ने सुरू होत नव्हती. आणि रात्री बोलणं झाल्याशिवाय त्यांना झोप येत नव्हती. दिवसंदिवस त्यांचं प्रेम हे वाढतच जात होत ते एखाद्या गुलमोहोरच्या फुलांप्रमाणेच.


दोघेही कॉलेज आणि जॉब सांभाळून स्वतःच नातं एखाद्या रंगबिरंगी फुलपाखराप्रमाणे जपू लागले. भेटी तर किंचितच कधीतरी ठरवून होत होती अनं त्यात पण त्यांनी फिरून अख्खी मुंबई पिंजून काढली होती. मग ते जीवदानी मंदिर असो, जुहू बीच, गेटवे ऑफ इंडिया,रिसोर्ट किंवा माथेरान अस एकही ठिकाण नव्हतं जिथे ते फिरले नाही. काही ठिकाणी ते एकटेच जायचे तर काही ठिकाणी त्यांच्या मित्रांची गॅंग सोबतीला असायची. त्याला तिच्यासोबतचा सहवास खुप हवाहवासा वाटायचा.


एकमेकांमध्ये दोघेही खुप गुंतून गेले होते. एव्हाना एकमेकांच्या आवडीनिवडी सुद्धा कळल्या होत्या. त्याला पाऊस आवडत नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही. तिला हे चांगलाच माहीत आहे. पण का कुणास ठाऊक. ? एकदा जुहू बीचवर तिच्यासोबत पाऊसात भिजताना त्यानेही पावसाचा मनसोक्त आनंद लुटला होता. हेच तर प्रेम असतं ना. प्रेमात समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी सुद्धा आपल्याला आवडू लागतात. 

 हा पाऊस मजला भिजवुन जातो,आणतो गाणे ओठी,हा पाऊस माझ्या म्हणी रुजवतो,पहिल्या वहिल्या भेटी,झर झर येतो, सरसर येतो, करतो मला दिवाना,नकळत येतो, ठरवून येतो,भिजतो तुझा बहाणा,रिमझिम येतो, रुणझुण येतो,गातो नवा तराणा..❤️

।। हा पाऊस मजला भिजवुन जातो,आणतो गाणे ओठी,हा पाऊस माझ्या म्हणी रुजवतो,पहिल्या वहिल्या भेटी ।।


तिला पाऊस आणि आईस्क्रीम खूप आवडायची. अनं त्याला पाऊसात भिजताना ती. तिच्यासोबत राहून त्यालासुद्धा आईस्क्रीम आवडायला लागली. एखाद्या प्रियकर आणि प्रियसी ने कस जगलं पाहिजे, ह्याच उत्तम अस उदाहरण होते ते. सोपं नाहीये आयुष्याचे दहा - अकरा वर्ष एकाच व्यक्तीवर आपलं सर्वस्व अर्पण करून जीवापाड प्रेम करायचं. 


आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो प्रेम म्हणजे काय ? त्यात काही लोक प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगत बसतात अन नंतर तेच लोक, त्याच प्रेमाला एका विशिष्ट व्याख्येत बसवून प्रेम बंदीस्त करून टाकतात. खरतर प्रेम म्हणजे काय ? ह्याच उत्तर कोणाकडून ऐकण्यापेक्षा किंवा कुठेतरी वाचण्यापेक्षा ते स्वतः अनुभवायचं, तेव्हा कळेल प्रेमाची खरी व्याख्या. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यासाठी प्रेमाचा जेव्हा पण विषय निघेल तेव्हा त्याला फक्त तिचाच चेहरा दिसेल.असू शकत का ह्यापेक्षा सुखद प्रेम.❤️


दोन वर्षानंतर ( २०१४ ). 

तिच्या घरी जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल पहिल्यांदा कळलं, तेव्हाची परिस्थिती खूपच भयानक होती. सरळ शब्दात सांगायला जावं तर तिच्या घरातुन सरळ आदेशच आला होता. तिच्या बाजूने एकजण आला होता त्याच्याशी बोलायला. भेटायचं ठरलं, भेटही झाली, समोरच्याने तीस मिनिटांचा वेळ मागितला होता पण बोलण्याचा नादात तीन तास निघून गेले.त्याने सगळं काही सांगितलं त्यांच्या नात्याबद्दल, किती वर्षांपासून सोबत आहे इथंपासूूून ते एकमेकांना किती चांगल्या प्रकारे ओळखता इथंपर्यंत. 


समोरच्या व्यक्तीने त्याच सगळं ऐकून घेतलं आणि तिच्याबद्दल खोट्या अन वाईट गोष्टी त्याला सांगू लागला जेणेकरून तो स्वतःच तिला सोडून देईल. पण हे असं इतरांचं बोलणं ऐकून स्वतःच्या प्रेमाला गालबोट लावणे हे त्याला मान्यच नव्हते. सगळं बोलून झाल्यावर शेवटी निघताना,

तो व्यक्ती :- ह्यापुढे तुम्ही दोघांनी कसलाच संबंध ठेवायचा नाही, अगदी मैत्रि सुद्धा नाही.( रागातच ) 

तो :- निःशब्द .... ( एवढं समजावून सांगून ही,ती व्यक्ती काही ऐकायला तयार नव्हती ) 


त्याने तिला फोन करून सगळं सांगायचं ठरवलं पण हे असं झाल्यामुळे तिच्याकडून तिच्या घरच्यांनी तिचा मोबाईल काढून घेतला होता अन तिचा जॉब सुद्धा बंद केला होता.तिच्या घरी काय स्थिती आहे हे त्याला कळणं महत्त्वाच होत, तो स्वतः फोन करून विचारू शकणार नव्हता अन तिच्या बाजूने फोन येणं म्हणजे अशक्यच म्हणून त्याने दोघांची कॉमन असलेल्या मैत्रिणीला फोन करायला सांगून तिची विचारपूस करायला सांगितलं. 


अखेर दोन ते तीन दिवसांनी त्यांचं बोलणं झालं पण ते ही तिच्या एका जवळच्या मैत्रिणीच्या मोबाईल वरून. कालची झालेली सगळी हकीकत त्याने तिला सांगितली अन एक निष्कर्ष काढला की काही दिवस आपण एकमेकांशी बोलायच नाही. पण ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी ठरलंच तिने स्वतःच्या मोबाईलहुन फोन करायचा नाही आणि तिने त्याच नाव ही कॉन्टॅक्ट लिस्ट मधून चेंज करून दुसऱ्या नावाने सेव्ह केलं. एवढ्या सोप्यात तुटेल ते प्रेमच काय..!


Present days

नेहमीसारखी आजही सकाळची रात्र होते,पण मोबाईलमध्ये तिचे मेसेज येत नाहीत.सतत काहीतरी कुजबुज होते कानातकदाचित हा तिच्याच आवाजाचा नाही ना भास सवयच झाली आहे मजला तिच्या,त्या आभासाची, आणि तिच्या त्याउबदार अश्या प्रेमळ सावलीची.. ❤️ 


घरी कळल्यापासून ते दोघे जरा जास्तच सावध झाले होते. भेटण ही फारस होत नव्हतं. पण वेळेनुसार सर्व काही निभावुन गेलं. आता त्यांच्या नात्याला ही बरीच वर्षे लोटली होती. त्यांच्या बद्दल तिच्या घरी माहीत असल्यामुळे दर रविवारी तिच्या घरी हा बघण्याचा कार्यक्रम सुरूच राहायचा. अन ह्याच गोष्टीची तिला जास्त धास्ती होती की बघण्याच्या कार्यक्रमात जर समोरून उत्तर होकारार्थी आलं तर पुढे काय अन कस करायचं. कारण आपण जाणतोच समाजाचा आणि प्रेमाचा हा छत्तीसचा आकडा. तर अश्या ह्या निर्दयी समाजासमोर त्यांच्या नाजूक प्रेमाचा निभाव कसा लागणार. त्याच मुळे ती सतत त्याच्या मागे लागायची की, आपण आपल्या नात्या बद्दल घरी सांगुया पण हा कारण देऊन वेळ मारून न्यायचा, लग्न ह्याला ही तिच्याशीच करायचं होतं पण त्याच्या घरी वेगळाच प्रॉब्लेम होता ज्याची जाणीव तिलाही होती.


पण बोलतात ना प्रेमात जर अडचण येत असेल तर प्रेमच ती अडचण सोडवण्यासाठी मार्ग दाखवतो. एक संधी त्याला भेटली त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगायची. त्याचा वाढदिवस जवळ येणार होता आणि त्याने ठरवल की ह्यावर्षी घरच्यांकडून वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून दोघांच्या नात्याबद्दल सांगुन होकार मिळवायचा". 


वाढदिवसाच्या दोन दिवस आधीचा दिवस

रात्रीचे ११ वाजले होते आणि त्याने त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगायला सुरुवात केली. समोरून प्रश्न आली, ती काय करते ? राहते कुठे ? कधीपासून एकमेकांना ओळखता ? अशी बरीच प्रश्नांची जुगलबंदी सुरू झाली. समोरून साफ नकार आला, त्याने समजवण्याचा खुप प्रयत्न केला पण त्याचा तिळमात्र उपयोग झाला नाही. 


दुसऱ्या दिवशी झालेला सर्व प्रकार हा त्याने तिला सांगितला अन त्यावर ते दोघेही समर्पक उत्तर शोधु लागले की घरच्यांना कोणत्या प्रकारे समजवून सांगायचं की जेणेकरुन ते लग्नाला तयार होतील.

२०१८ हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात भयानक होत.आता कुठे तो आयुष्यात सेटल होणार होता, अन शेवटी जे नाही झालं पाहिजे तेच झालं.


वर्ष २०१८

तिच्या घरच्यांनी तीच लग्न ठरवलं. ह्या दोघांनी एकमेकांच्या घरी पुन्हा एकदा प्रेमाबद्दल सांगून पाहिलं. पहिलं तिच्या घरी सांगायची वेळ आली, तिच्या घरी सगळं सांगितल पण ह्यावेळेस नियतीचा डाव वेगळा होता. तिच्या घरच्यांना ही कळून चुकलं होत की इतके वर्ष सोबत राहिलेले, एकमेकांची सवय असलेले हे दोघे ह्यांना एवढ्या सहजा - सहजी वेगळं करण अशक्यच आहे. समजावुन सांगुन देखील ऐकणार नाहीत म्हणून तिच्या घरच्यांनी त्या दोघांमध्ये एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण करून त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू लागले. घरात तिला अस भासवत होते की ते तयार होतील लग्नाला पण तोच समोर येत नाहीये हे नातं निभवायला. पण त्यांना हे माहीत नव्हतं की घरी सांगायचं जेव्हा त्या दोघांचं ठरलं होतं तेव्हा त्यांच्यात हे ही बोलणं झालं होतं की जोपर्यंत आपण एकमेकांकडून, प्रत्यक्ष काही ऐकणार नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवायचा नाही अगदी त्यांच्या असलेल्या जवळच्या मित्रांवर सुद्धा अन कुठलाही निर्णय तातडीने घ्यायचा नाही. 


तिथे हा त्याच्या घरी सगळी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होता. वारंवार त्याच्या घरच्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता, हीच ती वेळ होती जिथे कोणाला कसल्याच बाबतीत चुकायचं नव्हतं. कारण इथे काही चूक झाली तर माफी मागुन देखील ती चूक भरून निघणार नव्हती म्हणून तो प्रत्येक पाऊल खूप सावधगिरीने टाकत होता. वेळोवेळी ते दोघे एकमेकांशी फोनवर बोलून दोन्ही बाजूचा आढावा घेतच होते अन त्यालाच अनुसरून बाजी मारत होते. 


तिच्या घरी तर बहुरूपी खेळच सुरू होता, तिच्या घरच्यांना त्याच्याशी नाही तर त्याच्या घरच्यांशी बोलायच होत कारण त्यांचं अस म्हणणं होतं की तुम्ही (तो अन् ती) दोघे वेस्ट waste आहात, तुमच्यावर आम्हाला विश्वास नाही, त्यामुळे आता तुमच्याशी बोलून काहीच अर्थ नाही.जे काही उत्तर असेल ते डायरेक्ट त्याच्या घरच्यांकडुन येऊ दे. 


तिथे त्याच्या घरी होकार नकार हा प्रकार सुरू होता, रात्रभर त्याला त्याच्या घरचे ( अस नको करुस ) म्हणून समजावून सांगायचे अन तो तात्पुरता त्यांच्या बाजूने बोलून झोपून जायचा पण सकाळी पुन्हा स्वतःच्या घरच्यांकडून होकार मिळवण्यासाठी खटपट करायचा. हे असं दोन दिवस सुरू होत.अक्षरशः त्याचा जीव रडकुंडीला आला होता. स्वतःच्या मुलाची झालेली दूरवस्था बघुन अखेर त्याच्या घरच्यांनी होकार दर्शविला आणि तिच्या घरी फोन करून उत्तर कळवले.


Present Day 

हा जुहूचा शांत किनारा,तुझ्या नसण्याची चाहूल देतो,समुद्र एकटा मला पाहूनी,माझ्यावर हसुनी जातो.❤️

स्वतःच्या मुलाची झालेली दुरवस्था बघुन अखेर त्याच्या घरच्यांनी होकार दर्शविला आणि तिच्या घरी फोन करून उत्तर कळवले.

पण त्याआधी जेव्हा त्याच्या घरच्यांनी होकार दर्शविला त्याने लगेचच घराबाहेर जाऊन सर्वात आधी तिला फोन करून झालेली सर्व घटना सांगितली.कारण त्यांच आधीच ठरलं होतं की, "काहीही झालं तरी एकमेकांशी सवांद साधल्याशिवाय कोणतही पाऊल उचलायचा नाही". 

घरात घडलेला प्रकार ऐकून तिला ही खूप आनंद झाला, दोघेही खूप खुश झाले. तिने घाईघाईने त्याला सांगितलं की," माझ्या घरी आधी फोन करून सांग आपण बोलू नंतर ठेवते मी".


दोन्ही घरातील प्रमुख व्यक्तींच एकमेकांशी बोलणं झालं.

त्याच्या घरचे :- आम्ही लग्नाला तयार आहोत.

तिच्या घरचे : - ओके..! पण तुम्ही आधी तयार नव्हता अन आता अचानक कसे काय तयार झालात.

त्याच्या घरचे :- हो नव्हतो तयार पण मुलासाठी आम्ही तयार आहोत.

तिच्या घरचे :- अहो पण आमच्या चालीरीती वेगळ्या, तुमच्या परंपरा वेगळ्या, तुमच्या साईडला लग्नात हुंडा घेतात म्हणे.

त्याच्या घरचे :- तुमच्याच रितिरिवाजाने होऊ द्या, नका देऊ हुंडा चालेल आम्हाला.

तिच्या घरचे :- बरं ठीक आहे आम्हाला दहा मिनिटं द्या विचार करायला आम्ही तुम्हाला कळवतो.

त्याच्या घरचे : - बर ठीक आहे वाट बघतो तुमच्या फोन ची.


हा सगळा आनंद गगनात मावणार नाही एवढा होता. क्षणांचाही विलंब न करता त्याने त्याच्या खास मित्राला फोन करून बोलवून घेतलं आणि कमीत कमी अर्धा तास भविष्यात घडणारा प्रसंग तो जगु लागला.

(हळद लागेल, मस्त ती स्टेजवर येईल नवरीच्या वेशात, भूतकाळात पाहिलेली सगळी स्वप्न आता पूर्ण होणार, तिच्या हातावर त्याच्या नावाची मेहंदी असणार, तिचा तो शृंगार, त्याच्या नावाचं लाल कुंकू, हिरव्या बांगड्या आणि त्यांच्या प्रेमाच प्रतीक म्हणून मंगळसूत्र घालून ती त्याच्या घरात वावरणार, त्याचे मित्र वहिनी म्हणून तिला हाक देणार.) 

अस बऱ्याच काही विषयांवर त्या दोघा मित्राचं बोलणं झालं. 

फोनची रिंग वाजली, तिचाचं फोन होता.

ती : - माझ्या घरच्यांची काही हरकत नाहीये लग्नासाठी पण मलाच तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. प्लिज ह्यापुढे मला फोन करू नको. ( हुदके देत )

तो :- अगं पण अस अचानक झालंय काय. सगळे तर तयार होते आता लगेच काय झालं. ( हादरून ) 

ती पुन्हा तेच उच्चारली,

ती : - हो , घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये पण मलाच लग्न नाही करायचं.

फोन कट....😢


अगदी थोड्यावेळापुर्वी तो स्वप्नांच्या सुंदर सफरीवर गेला होता अन अचानक एका झटक्यात ते सुंदर स्वप्न तुटून ह्या कडू सत्याला सामोरे आला. पण त्याने क्षणांचा ही विलंब न करता तिच्या घरी फोन केला.

तो :- काय झालंय तिथे काही प्रॉब्लेम आहे का ? तिचा फोन आला होता आता ती मला बोलली की लग्न नाही करायचं.

तिच्या घरातले : - तुझ्या घरच्यांशी बोलणं झाल्यावर आम्ही तिला शेवटचं पुन्हा एकदा विचारल तर तिला नाही करायचं लग्न अस बोलतेय मग आम्ही जबरदस्तीने नाही लावू शकता तीच लग्न.

ती : - पण तुम्हाला चांगलंच माहीत आहे तीच माझ्यावर प्रेम आहे कालपर्यंत नाही अगदी आतापर्यंत ती रेडी होती आता मध्येच काय झालं. आणि जरी काही झालंच असेल तर ती फक्त गोंधळली असेल प्लिज तिला समजावून सांगा ती नक्की ऐकेल.

तिच्या घरातले : - हे बघ आम्ही तिला शेवटचं विचारलंय अन तिने तिचा निर्णय सांगितलाय त्यामुळे ह्याच्या पुढे तू तिला भेटायचं नाही आणि काहीच नात ठेवायचं नाही.


फोन ठेवला तिच्या घरचे ही काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते. आणि बरोबरच आहे का ऐकतील किंवा का तिला समजावून सांगितलं एकप्रकारे त्यांच्याही मनासारखंच होतंय ना. पुरता हादरून गेला होता तो, त्याला माहित होतं पाणी कुठेतरी मुरतयं, तिच्या घरच्यांनी तिला जबरदस्ती किंवा भावनिक आणि मानसिक ताण देऊन तिचा निर्णय बदलवून घेतला असेल. 


"पण यार ठरलं होतं रे आपलं आधीच की जोपर्यंत आपण एकमेकांकडून, प्रत्यक्ष काही ऐकणार नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवायचा नाही अगदी त्यांच्या असलेल्या जवळच्या मित्रांवर सुद्धा अन कुठलाही निर्णय तातडीने घ्यायचा नाही". तो बिचारा स्वतःच्याचं मनाशी पुटपुटला.

त्याच्या मित्राला तो अगदी हतबल होऊन व्यथा ऐकवू लागला की, "ठीक आहे झाला असेल तिच्या घरी काही प्रॉब्लेम, तिला भावनिक पण केलं असेल आणि अश्या वेळेस घरातले करतातच, नसेल जमलं तिला ते सगळं सांभाळायला पण आमचं ठरलं होतं ना रे की, काहीही झालं तरी कुठलाही निर्णय तातडीने घ्यायचा नाही. फक्त आजची एक रात्र जाऊ द्यायची होती उद्या फोनवर झालच असत ना आमचं बोलणं तेव्हा एकमेकांशी बोलून काय तो निर्णय घेतलाच असता ना".


त्याच्या मित्राला तर तिच्या घरच्यांचा प्रचंड राग आला होता कारण तो एकमेव असा होता की ज्याला त्यांच्या नात्याबद्दल आणि ह्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रसंगाबद्दलची जाणीव होती. आणि अजून एक कारण होत, स्वतः त्याने सुद्धा एका मुलीवर प्रेम केलं होत पण काही कारणांमुळे त्याच्या ही नशिबात ते सार्थक नाही झालं. म्हणून त्याची अगदी मनापासून इच्छा होती की, " माझ नाही झालं पण तुमचं लग्न झालं पाहिजे तेव्हा माझ्या मनाला समाधान भेटेल".


पण सगळं काही मातीत गेलं. दहा - बारा वर्षांचं त्यांचं नातं फक्त तीन दिवसात तिच्या घरच्यांनी तोडलं ते ही भावनिक खेळी खेळुन. त्याला स्वतःला काही सुचत नव्हतं आता कारण घरी जाऊन तो सांगणार काय, कशाप्रकारे सगळी परिस्थिती हाताळेल. कारण दहा मिनिटांनी उत्तर कळवतो म्हणून तिच्या घरच्यांनी वेळ घेतला होता. अन आता एवढं सगळं होऊन बसलंय, 


घरी जर सांगितलं तर घरचे कसा प्रतिसाद देतील ? घरी हे कश्याप्रकारे सांगायचं ? जेणेकरून तिच्या चारित्र्यावर कोणी बोट उचलल नाही पाहिजे.

हे सगळं सांभाळायच होत आणि त्याला खरच कळत नव्हतं. मित्राला निरोप देऊन घरी जाता जाता तो विचार करू लागला. घरी पोहचताच त्याच्या घरच्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.

घरचे : - काय रे..! अजून काही उत्तर नाही आलं त्यांच्याकडून.

तो : - ( पार बिथरला होता ) उशीर झालाय आता उद्या करतील आणि तुम्ही सुद्धा स्वतःहून नका करू फोन त्यांनाच करू द्या. कशीतरी त्याने आजची रात्र पुढे ढकलली.

घरचे : - ठीक आहे, चल जेवुन घेऊया आम्ही सर्वजण तुझ्यासाठीच थांबलोय.

तिच्या घरच्यांशी फोन वर झालेल्या संभाषणाने पार हालवून टाकलं होतं मग कसली भूक लागणार पण फक्त घरच्यांसाठी दोन घास खाऊन तो झोपला ह्या विचाराने की उद्याच्या दिवसात आपल्याला समोर आता काय वाढून ठेवलं असेल.

बस एक हाँ के इंतजार मैं रात यूँ ही निकल जायेगीउलझन है साथ मेरेनींद कहा आएगी ।।

सुबह की किरण ना जानेकौन सा संदेसा लाएगीरिमझिम सी गुणगुणाएगीया प्यास अधूरी रेह जाएगी। 🥺

सकाळीच तिचा फोन आला, काल घडलेला सगळा प्रकार तिने त्याला सांगितला. घरच्यांनी तिच्यावर दबाब आणून तिला भावनिक शब्दात बांधुन स्वतःच्या बाजूने केले, हे दिसून आलं.


चार दिवसांनी तिचा साखरपुडा होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याने तिच्या घरी सांगण्याचा प्रयत्न केला पण घरचे काहिच ऐकून घ्यायला तयार नव्हते. शेवटी परिवाराच्या खोट्या अब्रुसाठी तिने स्वतःच्या स्वप्नांची राखरांगोळी केली.(आपल्या गोष्टीतला मुलगा खुप हळवा आणि आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे ,अश्या स्वभावाचा होता.)


आता प्रश्न होता, तो त्याच्या घरचा. कारण समोरून दहा मिनिटांचा मागितलेला वेळ हा आता एक आठवड्यापर्यंत येऊन पोहचला होता.त्याच्या घरी रोज रोज त्याला त्याबद्दल विचारायचे आणि तो वेळ मारून न्यायचा दुसरा काही पर्यायचं नव्हता. आता त्यालाच योग्य ते पाऊल उचलुन उत्तर द्यावे लागेल, जेणेकरून त्याच्या घरच्यांनी तिच्या चारित्र्यावर बोट उचलता कामा नये आणि कुठेही त्यांच्या मनात प्रेमाबद्दल तिळमात्र सुद्धा तिरस्कार निर्माण होऊ नये.


सकाळची वेळ : - त्याच्या घरी..

घरातील मंडळी तिच्या घरी जाण्यासाठी तयारी करत होते. त्यांनी ठरवलचं होत की, "आज काय ती बोलणी करून जमेल तसं लग्नाची तारीख काढुन एकदाच ठरवुन येऊ". त्याने कसंबसं त्यांना संध्याकाळपर्यंत थांबवलं. त्याने ठरवलं होतं की आज संध्याकाळी घडलेला सगळा प्रकार घरी सांगायचा. 


संध्याकाळची वेळ

तिच्याशी फोनवरच बोलणं झाल्यावर तो घरी आला आणि फक्त एवढंच बोलला,

तो : - माझं तिच्याशी बोलणं झालंय, ती लग्नाला तयार नाहीये.

एवढं बोलुन तो त्यामागचं कारण सांगणारच होता की तितक्यात.

घरातले : - तिच्याबद्दल कसला गैरसमज करून घेऊ नकोस, तिच्या घरच्यांनी तिच्यावर दबाब आणला असेल म्हणून ती तस बोलली असेल नाहीतर एवढे दिवस सोबत असलेली ती शेवटच्या क्षणाला अस अर्ध्यावर सोडून जाणार नाही. आता आमच ऐक, तुझ्यामुळे तिला त्रास होईल असं काही करू नकोस आणि आमच्यासाठी तरी आता स्वतःची काळजी घे तुझ्या व्यतिरिक्त आहे तरी कोण आमचं.

घरच्यांच्या शब्दांमागच्या भावना त्याला ही जाणवु लागल्या अन नकळत त्याच्या डोळ्यातुन पाण्याचा थेंब जमिनीवर ओघळला आणि सोबतच पाहिलेले असंख्य स्वप्नही त्या डोळ्यातल्या पाण्यासोबत वाहुन गेले.


तिथे तिचा साखरपुडा झाला. तिच्या लग्नापर्यंत तिचा वेळ त्याला हवा होता कारण लग्नानंतर तो तिच्या आयुष्यात कधीच डोकावणार नव्हता, हे त्याने तिला ही सांगितले होते. एकदा तिच्या मोबाईल मधले मेसेज तिच्या घरातल्यानी पाहिले अन थेट तिच्या घरचे त्याला भेटायला आले. 


तिच्या घरचे : - तीच लग्न ठरलंय माहितीये ना 

तो : - ( थोडाही न डगमगता ) हो माहितीये

तिच्या घरचे : - ( @#$% शिवी देऊन ) मग कशाला बोलता.

तो : - आम्ही तुमचं ऐकलंय, आम्हाला थोडा वेळ द्या, आम्हाला एकमेकांची सवय आहे अन ती सवय एवढ्या लवकर सुटणार नाही. आम्ही बोलणं हळू हळू बंद करणारच आहोत. हवं तर विनंती करतो पण आम्हाला समजुन घ्या.

तिच्या घरचे : - आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये आणि तु कशाला बोलतोस तिच्याशी, तु लग्नाला तयार होतास ना तिनेच ऐन वेळेला पलटी मारली, तुझी काहीच चूक नाही ह्यात. ती तुझ्याशी अस वागली ह्याच्या तुला राग नाही येत का ? 

तो शांतपणे ऐकून घेतो एव्हाना त्यालाही कळलं होतं की तीन वर्षाआधी जे काही तिच्याबद्दल खोट्या अन वाईट गोष्टी त्याला सांगितल्या होत्या त्याचीच पुनरावृत्ती होतेय.

तो : - ठीक आहे, मी नाही बोलणार तिच्याशी कधीच पण तिला ह्यावेळेस माफ करा, तिच्यावर घरी गेल्यावर हात उचलू नका, समजावून सांगा नक्कीच ऐकेल ती.

काही दिवसांनी,

कोण म्हणतं मन फक्तशब्दांनीच दुखवलं जात,कधी कधी तुझं गप्प राहणं पण डोळ्यात पाणी आणत.


तो तिच्या फोनची, मेसेजची वाट बघत होता, तो स्वतःहून फोन करू शकत नाही किंवा मेसेज ही नाही, त्यामुळे वाट पाहण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. साधारण एक ते दीड महिना झाला पण तिच्या फोनचा काही पत्ता नव्हता. त्याचा जीव अगदी कासावीस झाला होता, हेच तर काही क्षण होते जे तो आयुष्यभरासाठी कैद करून ठेवणार होता. 


साधारण एक ते दोन महिने निघुन गेले पण तिचा काही फोन नाही. तिच्या अश्या अचानक सोडून गेल्याने त्याला झालेल्या वेदना ह्या असहनीय होत्या. खरतर जवळ असून सुद्धा त्यावेळेस तिने स्वतःहूनच त्याच्यापासून दूर राहण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. परिस्थिति असेल ही तशी पण तिने सांगायला हव होत, कदाचित तिच्या सांगण्याने त्याला होणारा त्रास कुठेतरी कमी झाला असता.पण तरीही तिच्याबद्दल काही माहीत नसताना सुद्धा त्याने तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी होईल तस सांभाळूनही घेतलं, पण ती खूप पटकन बदलली होती, वागणं बदलेलं, हे सर्व पचवायला फार अवघड होतं त्याच्यासाठी. पण आधीच मनाने पुर्णपणे तुटलेला तो, त्यालाही आधाराची गरज होतीच ना..!


पण त्याच ठरलं होतं स्वतःमुळे तिला काही त्रास होईल असं वागायचं नाही. तिकडे ति नवनवीन कारण शोधत होती त्याच्यापासून दूर राहण्याचे, का ? तर तो तिच्यात गुतूंन राहील, तिच्या आठवणीतच (Move on) राहील, त्यामुळे तिने बोलणंच बंद केलं, खरतर त्याने मनाची तयारी केली होती, की आता ही आपली नाही,हीच लग्न ठरलंय, पण तीच हे असं अचानक त्याच्या आयुष्यातून निघून जाण, हे त्याच्यासाठी धक्कादायक होत. अन हे तिला माहीत असून सुद्धा तिला एकदाही वाटलं नसावं का ? त्याला स्वतःहून जाऊन बोलावं अन भेेेटाव ते ही शेवटचं.


लग्नाची तारीख ठरली, त्याला तारीख माहीत नव्हती पण कोणत्या महिन्यात लग्न आहे हे माहीत होतं. शेवटच्या दोन आठवड्यामध्ये तीन तीन दिवसांचे अंतर ठेऊन तिचे फोन येऊ लागले, तिच्यासोबत फोन वर बोलताना त्याला विश्वासच बसत नव्हता की, ही तीच आहे जिच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं होतं. पुर्वीची हसत, खेळत, मस्ती करत बोलणारी, हक्क गाजवणारी, आज फक्त हो/ नाही असे प्रश्न उत्तरांचे खेळ खेळत होती, जणू काही तिला कोणी जबरदस्तीनेच सांगितलं होतं त्याच्याशी फोनवर बोलायला. त्यालाही कळलं होतं हे फक्त शब्दांचे खेळ आहेत. 

दुसऱ्या दिवशी त्याच्या खास मित्राचा त्याला फोन येतो.

मित्र : - हे बघ मी तिच्याशी बोललोय तिने जर तुला शेवटचं भेटायला बोलावलं किंवा मेसेज केला तर जा आणि रागाने किंवा भांडण केल्यासारखं बोलू नकोस, कदाचित शेवटची भेट असेल ही तुझ्यासाठी.

तो : - नक्कीच, शेवटचीचं भेट असेल ही.

त्याच्या मित्राने खूप कठीण परिस्थितीत तिला कसतरी समजावुन शेवटचं भेटण्यासाठी तिला तयार केलेलं होत. तिचा फोन आला भेटायचं ठरलं त्याने ही होकारार्थी उत्तर दिलं.

शेवटची भेट


ती त्याला शेवटचं भेटण्यासाठी आली. त्याने तिचा हात हातात घेतला त्याचबरोबर दोघांच्याही हृदयाची स्पंदने जोरजोरात धडधडु लागली. त्याला भूतकाळातली त्याची ती आठवू लागली, मस्तीखोर, भांडखोर, हक्क गाजवणारी. 


डोळ्यातल्या अश्रूंना रोखून तो बोलू लागला, की यापुढे मी तुझा हा हात कधीच माझ्या हातात नाही घेऊ शकणार, तुझं हसणं बोलणं मी कधीच नाही पाहू शकणार, तुला कधी भेटू ही नाही शकणार. कारण आता तिच्यावर तो अधिकारच राहणार नव्हता. ती आता एका नव्या नात्यात अडकणार होती....कायमची


तिच्यासोबतच्या शेवटच्या भेटीत तो फक्त तिच्याशी चांगलंच बोलला, ना भांडला, ना तिने आतापर्यंत वागलेल्या गोष्टींची दाद मागू लागला. एका शब्दानेही तिला विचारलं नाही की होतीस कुठे एवढे दिवस, फोन का नाही केलास. फक्त शेवटचं तिला डोळे भरून एकटक तिच्या डोळ्यात पाहत होता. त्याने स्वतःहून त्याच्या फोनमधील चॅटिंग, फोटोज, कॉटँक्ट नंबर सगळं काही डिलीट करून टाकलं. फक्त रेकॉर्डिंग ( फोनवरच आतापर्यंत संभाषण ) डिलीट करण्याची हिंमत नाही झाली त्याला, त्याने गाडीला किक मारली आणि तिला ऑफिसला सोडून निघून गेला.


जाताना ती फक्त एवढंच बोलली, "स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नकोस जरी आपलं लग्न नाही झालं, तरी माझं प्रेम मात्र तुझ्यावरच असेन." खरतर ह्या शब्दांना काही अर्थ नव्हता कारण हेच जर अगोदरच्या कठीण प्रसंगी तीने सोबत राहून त्याला आधार दिला असता तर आज त्यांची शेवटची भेट वेगळीच झाली असती. कदाचित त्यांनी इतके वर्ष केलेल्या प्रेमाला तरी निदान ती शोभली असती.


"माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे आणि यापुढेही असणार, माझं पहिलं प्रेम तूच आहेस, माझ शरीर फक्त लग्न करू जाणार आहे पण मन मात्र तुझ्याकडेच असेल, मी फक्त तुझीच आहे". हे असे कितीतरी ब्रीदवाक्य आहेत, जे प्रेमात पडलेल्यानी आणि नंतर काही कारणांमुळे लग्न होऊ शकत नसलेल्यानी ऐकली असणार. नंतर नंतर हेच सगळं कानात सतत ऐकू येतात, तो त्रास हा एखाद्या गरम लाव्हारस कानात ओतल्यावर जेव्हढा होईल त्यापेक्षा दुप्पटीने वाटु लागतो. ही सगळी वाक्य ऐकायला आणि वाचायला चांगली वाटतात पण अनुभवायला त्रासदायक. आता काहीजण म्हणतील की, ही वाक्य बोलण्यापुरती आहेत, असुही शकतं पण त्यामागच्या एखाद्याच्या भावना तर नेहमीच लाखमोलाच्या असतील. ज्याप्रमाणे एखाद्या कवितेत शब्दांपेक्षा जास्त भावनांना महत्व दिल जात, तसंच काही जणांना अशी वाक्य बोलल्याने प्रेम व्यक्त करता येत असेल तर कुठे बिघडलं. कारण प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत ही सारखीच असु शकत नाही ना.


तीन महिने जेव्हा तो एकटाच होता, तेव्हा त्याला सगळ्यात जास्त गरज ही फक्त तिच्या आधाराची होती. पण जर ती शेवटी येऊन हेच ब्रीदवाक्य बोलणार होती तर ते एकप्रकारे त्यांच्या प्रेमावर हसल्यासारखचं झालं ना. कारण मधल्या काळात तर ती कुठेच नव्हती अचानकच गायब झालेली. हो त्याला मान्य आहे तिला तिच्या आईच्या शपथने बांधुन ठेवलं होतं पण नंतर ती शपथ कुठेय ..? शेवटच्या भेटीत तिला ती शपथ आठवली नसेल का...? 

एरवी आपण शपथ मानत नाही, स्वप्नाच्या दुनियेत वावरत नाही, परिस्थितीला नीट समजावून वागण्याचा आव आणणारी ती आज त्याच गोष्टीत गुरफटून गेली होती. त्याचा परिणाम पुढे असा झाला की जे काही उरलेले त्यांच्या आयुष्यातले नाजूक आणि शेवटचे क्षण होते जे तो आयुष्यभरासाठी कैद करून ठेवणार होता ते तर शेवटी त्याच्या हातातून निसटुनचं गेले...!


तिचं लग्न 

किती तरी वेदना झाल्यात मला,माझ्यापासुन तुला दूर करताना,जाणीव त्याची असु दे..ग,हे आयुष्य तु, तुझे जगताना..

त्याला तारीख नाही तर महिना माहीत होता. जास्तीत जास्त लग्न हे रविवार पकडूनच पार पाडले जातात आणि येणारे रविवार ढकलण्यासाठी त्याच्या अंगात आता तेवढं सामर्थ्य उरलं नव्हतं. पर्याय म्हणुन थोडं मूर्खपणा दाखवत त्याने महिन्याच्या प्रत्येक रविवारी झोपेची गोळी खायला सुरुवात केली, जेणेकरून पुर्ण रविवार तो दिवसभर फक्त झोपुन काढायचा आणि खोट का होईना मनाला समाधानी ठेवायचा. अखेर तीच लग्न झालं, मनात असंख्य प्रश्नांची उत्तरं ही मनातच राहिली.


तिच्या लग्नामुळे तो खूपच खचला होता, त्याची मनाने तयारी झालेली होती तरीही हृदय. हृदयाला कस समजवणार.

तिने लग्नानंतर त्याला बरेच फोन - मेसेजस केले, पण त्याचा काहीच अर्थ उरला नव्हता, कारण ति त्याला जे काही कारण देऊन गेली होती, ते त्याला तिच्या प्रत्येक फोन वर आठवत असायचे. 


तरीही ती सतत त्याला फोन करत होती, ह्या आशेने की तो आज तरी तिचा फोन उचलेल आणि तिच्या मनातलं जे काही आहे ते त्याला सांगेन. पण तिथे त्याच्या मनात फक्त एकच विचार यायचा की लग्नाआधीच तिने दुरावा निर्माण करायला नको होतं.


काही दिवसांनी तिने पुन्हा एकदिवस स्वतःहून त्याला व्हाट्सएपवर मेसेज करण्याचा विचार केला, खूप मेसेजेस नंतर त्याला ही वाटलं की एकदा हिच्याशी बोलावं, कदाचित ती आता तरी स्वतःच मन मोकळं करेल म्हणुन त्याने ह्यावेळेस तिला तीच मत मांडण्याची संधी दिली पण त्याला आश्चर्य आणि वाईट दोन्ही वाटलं. वाईट ह्यासाठी वाटलं, कारण वर्ष झालं तरी ती अजून तशीच राहिली. 


आणि आश्चर्य ह्यासाठी वाटलं, तिला संधी मिळाली बोलायची त्यात सुद्धा ती फक्त शांतच होती. तिला अजूनही त्याच्याचकडून अपेक्षा होती की त्याने समजून घेऊन तिला माफ करावं. आणि तो बिचारा त्या मनःस्थिती मध्ये होता की हिने मेसेज केलाय तर ती विचारपूस करेन, जून सर्व विसरून त्याला समजावून स्वतः त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करेल. कारण आता वेळ होती ती, तिने समजून घेण्याची. पण सर्व व्यर्थ !

एका क्षणी त्याला वाटलं की तिला समजावून सांगावं पण त्याने तसं करणं टाळलं. नातं तोडून ती स्वतः दुसऱ्या नात्यात गेलेली. त्या नात्यातील आनंद तिने मनसोक्त उपभोगला आहे, तेव्हा ती काहीच न सांगता त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती, अन ती आता फक्त कारण देऊन पुन्हा येत होती.पण त्याला तिच्याकडून अपेक्षित उत्तर काही भेटत नव्हतं. किती दिवस ती प्रॉब्लेम्स पासून लांब पळणार, फेस तर करायलाच हवं.


एक वर्षांनंतर

वर्षभरानंतर पुन्हा तिने मेसेज केला, ह्यावेळेस आता त्यालाही तिच्याशी बोलावसं वाटलं किती दिवस तो तिला दुर्लक्ष करणार म्हणुन तिच्याशी बोलला, तिची विचारपूस केली. आई झाली होती ती, एका निरागस,गोड मुलीची आई, काळ किती सहज लोटला गेला होता. आतापर्यंत ती कोणाची मुलगी होती आता ती स्वतः आईची भूमिका बजावणार होती. खरतर आता तिच्या आयुष्यातला तिसरा व्यक्ती तो स्वतःहा झाला होता. त्याने स्वतःच्याच मनाशी पक्का निर्धार केला आणि कुठेतरी स्वतःच्या मनाला सावरून स्वतःच्या मर्यादेची रेष ओढून घेतली...😢

"आज त्याने घेतलेल्या त्या निर्णयामुळे ती एक आदर्श गृहिणी होईल, त्याने जर तिथे स्वतःच स्वार्थ पाहिला असता, तर आज परिस्थिती काही वेगळीच असती".


खरंच प्रेम हे त्यागात असत, स्वार्थात नसत. खऱ्या प्रेमाला शारीरिक आकर्षणाची ओढ नसते, तर ते फक्त निखळ व निस्वार्थ प्रेमाचं भुकेल असत, कारण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचा अधिकार आपल्याला नाही. जर तुम्ही खरच मनापासून प्रेम करता तर कुठलीही अपेक्षा न बाळगता फक्त प्रेम करा. मग ते प्रेम तुम्हाला मिळो अथवा न मिळो, कारण प्रेम भोगत नाही तर त्यागात आहे. आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीच जीवन उध्वस्त तर होणार नाही ना याची काळजी घ्या, यालाच तर खर प्रेम बोलतात. मनाशी जुळलेलं नात कधीच तुटत नाही, ते अगदी मरेपर्यंत कायम राहत.


त्या दोघांच्या शेवटच्या भेटी नंतर ते कधीच एकमेकांना भेटले नाही. तो आजही तिच्यावर तितकच प्रेम करतो, ते ही तिला न भेटता. कारण जे समोर आहे आणि जे दिसतंय आपण त्याच्यावरच प्रेम करावं असं काही नियम नाही, म्हणून त्यांनी केलेलं प्रेम हे त्यांच्यापुरत तरी शाश्वत होत.


Present day

तो सकाळी लवकर उठुन ऑफिसला जाण्याची तयारी करत होता, स्वयंपाक घरात आई त्याच्यासाठी टिफिन बनवत होती, आणि तेवढ्यात त्याच्या कानावर काही शब्द पडतात. त्याची नजर टीव्हीकडे वळते.

"पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही, प्रत्येकाला पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या मुलीसोबत संसार करता येईल अस नाही, पण तरीही ती व्यक्ती कायमची तुमची झाली नाही तरी काय बिघडल, ती तुमच्या आयुष्यात आहे, खूप छान मैत्रीण म्हणून आणि हे काय कमी ग्रेट फीलिंग नाहीये".

त्याला लिहायची आवड असल्यामुळे लगेचचं बॅगमध्ये हात घालून वही आणि पेन बाहेर काढतो आणि तेच वाक्य पूर्ण करण्यासाठी लिहायला बसतो.

"जरी ती तुमच्या आयुष्यात एक मैत्रीण म्हणून नसेल ही तरी काय हरकत आहे तुम्ही एकमेकांसोबत जगलेल्या आठवणी, ते केविलवाणे प्रेमाचे क्षण नेहमीच तुमच्याशी आयुष्यभरासाठी तुमच्याही नकळत जोडलेले गेलेले आहेत".


लिहित असताना त्याला थोडा वेळासाठी का होईना पुन्हा तिची आठवण आली आणि तिच्यासाठी तो कविता लिहू लागला, त्या प्रेमासाठी जे कधी त्यांचं होत. फक्त त्यांचं... शाळेतलं, कॉलेजचं, आयुष्याच्या सुख - दुःखातलं...


काय करू मी ह्या आठवणींचं

हृदयात किती काळ साठवू

सरता सरेना, संपता संपेना

पहाटची तर आठवणच न्यारी

स्वप्नाची तर बातच निराळी

तू तुझ्या विश्वात रमते

मी माझ्या जगात नसतो

शेवटी स्वप्नाच्या ह्या दुनियेत

एकमेकांना भेटतो..


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama