STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Children Stories

2  

AnjalI Butley

Abstract Children Stories

खुराक

खुराक

2 mins
174

एवढी महागाची औषधे?

कसली आहे ती?

डी-३ व्हिटामीन..

डॉक्टरांनी लिहुन दिली, करोना पासुन बचाव होण्यासाठी..

अरे पण इथे गावात तु खुप कष्ट करतोस, सुर्यप्रकाश तुला मिळतो, ताजी हवा मिळते, भरपुर झाडे आहे इथे. 

अरे मी शहरातुन इकडे आलो न काल, आयसोलेशन का काय म्हणतात न ते करायच आहे व सोबत ही औषधे!

काय चालले आहे काही कळतच नाही..

बघता बघता गावात शहरातुन आलेल्याकडून करोनाची बाधा झालीच.. घरातल्या एका सोबत पूर्ण घर, कोणी दुसरे बघायला नाही

मग गावकरी एकत्र आले काय करता येईल ते ठरवले!

ज्या घरातील लोकांना करोना झाला त्यांना पहिले जेवण, पाणी, मानसिक आधार द्यायचे ठरवले व काम वाटून घेतले!

गावातल्या मिटिंगा पिंपळपारावरच भरायच्या, करोना झालेल्यांना शेतावरच्या निसर्ग रम्य वातावरणातील झोपडी वजा घरात करायला पाठवले, सूर्यप्रकाशात आपला दिवस आनंदी घालवा सांगितले. तुळस, पिंपळ, वडाची झाडे होती आजुबाजूला, बघता बघता करोनातुन बरे झाले लोक १०-१५ दिवसात.

महागड्या औषधापासून बचाव झाला, गावकर्यांच्या सहकार्याने!

सूर्य उगवला , आनंद झाला

दिवस मज्जेत घालवत करोनावर मात केली आम्ही गावकर्यांनी!

शहराकडचे लोक मदत मागायला आले, तुमच्या शेतातल्या घरात म्हात्यार्याला आणू का, तोपण लवकर बरा होईल! 

गावकर्यातील काही शिकलेले, सामाजिक जाणिव असलेले पुढे आले व शेतातल्या झोपडी वजा घरांमध्ये शहरातील लोकांसाठी आयसोलेशन सेंटर बनवले. ५० खोल्या वेगवेगळ्या शेतातील घरात तयार झाल्या, बाया जेवण बणवने, मास्क बणवत गेल्या व त्यातुन पैसा मिळत गेला! 

सूर्यदेवाला नमस्कार करत दिवसाची सुरूवात होत होती रोज.

पुढेपण करत रहणार व गावकर्यांचीकी एकी नेहमी राहो ही सूर्यदेवाला प्रार्थना करतांना सांगायचे! सूर्यदेवा असाच रोज आम्हाला तुझ्या किरणांतून डी३ व्हिटामिनचा खुराक देत रहा! तुझे आभार मानावे तेवढे कमीच!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract