खुंटिस हवलदार मेखेस जमादार
खुंटिस हवलदार मेखेस जमादार
खुंटीस हवालदार
मेखेस जमादार
ही एक अस्सल ग्रामीण म्हण आहे. यामध्ये एकट्याने करण्याचे काम असते ,पण तिथे देखील अनेक व्यक्ती नेमल्या जातात .
किंवा विनाकारण अनेक लोकांची गर्दी त्या ठिकाणी असणे, यालाच आपण खोगीर भरती ,किवा बाजार बुणग्यांची भरती असेही म्हटले जाते.
यामध्ये जेव्हा जेव्हा सैन्य कुठे जाईल, तेव्हा खुंट्या आणि मेख दोन्ही गोष्टी असतात .
खुंट्या म्हणजे जेवढी जनावरे दावणीला असतात तेवढ्या खुंट्या. साधारण वीस पंचवीस घोड्यांची एक पागा असेल तर,,एक मनुष्य ती सांभाळू शकतो.
पण खुंटीस हवालदार ,आणि मेखेस शिलेदार नेमले जातात मग कोणाचा कोणाला मिळत नाही आणि कामाची देखील टोलवाटोलवी होते .
एका खुंटीचा एक शिलेदार म्हणजे एका खुंटीला असणारे जनावर, व त्याचा एक मालक.
पूर्वी बहुदा युद्धामध्ये घोडे स्वतःचे असायचे, आणि तो आपल्या घोड्यासहित फौजेमध्ये भरती व्हायचा.
दहा शिले दारांवरती एक हवालदार, आणि दहा हवालदारांवरती एक जमादार. अशी प्रत्यक्षामधली नेमणूक असते
खुंट्यांना मोठी जनावरे बांधली जातात ,त्याला दावण हा शब्द देखील आहे. खुंटी म्हणजे एक सिंगल ठोकलेले लाकूड, दावण म्हणजे पूर्ण आडवच्या आडव एक मोठ लाकूड ठेवलेला असतं आणि खुंटी आणि दावणीला धरून जनावर बांधलं जातं. आणि मेघ म्हणजे लोखंडी खिळा किंवा रिकीब सदृश्य वस्तू, ज्यामध्ये बकऱ्या, छोटी वासरे बांधू शकतात.
जिथे एका माणसाचे काम आहे तेथे खुंटीगणिक हवालदार आणि मेखेगणिक जमादार
याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वी आपल्याकडे आंतरराष्ट्रीय खेळासाठी खेळाडू म्हणून अनेक लोकांची फौज पाठवली जायची पण त्यातले अनेक नुसतीच खोगीर भरती असायची .काहीच कामाचे नसायचे ,आणि कोणत्याही खेळामध्ये पहिल्या दहात सुद्धा नसायचे.
