The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Manisha Awekar

Drama Others

3  

Manisha Awekar

Drama Others

खरं नातं

खरं नातं

7 mins
720

   "दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा" अशा आनंदाच्या सणालाच विशालचा अमेरिकेहून "हँपी दसरा" म्हणून फोन आला व त्यापाठोपाठच त्याने" आगं आई आम्ही चौघेही ह्या वेळी दिवाळीला पुण्याला येत आहोत" असे सांगितल्याने वनिताताई इणि विजय दोघेही खूष झाले. दोन वर्षांनी मुलगा सून नातू नात सगळे भेटणार म्हटल्यावर त्यांना आनंदाचे भरते आले.

"आता या वर्षी सगळे फराळाचे जिन्नस मी घरी करणार. विशालला चकली आणि करंजी आवडते. वैशालीला अनारसा आणि लाडू". वनिताताईंच्या उत्साहाला उधाण आले होते. नवे पडदे,नवे बेडशीटस,अभ्रे यांनी घर सजून गेले. विजयनी रविवारात जाऊन चारी खोल्यांना स्वतंत्र आकाशकंदिल आणले. नातू आणि नात यांची खरेदी तरगाडगीळांच्या सुवर्ण-चांदी दालनात झाली.

   या पूर्वीच्या दिवाळीला दोघेच घरी असल्याने फारसे काही करायचा उत्साह नसे. विजयना डायबेटिस व वनिताताईंना ब्लडप्रेशर असल्याने फराळाचे खाणे वर्ज्यच होते कोणी खाणारे असेल तर करायचा उत्साह रहाणार ना!!शेजारची रोहिणी म्हणायची "काका काकू आमच्याकडेच फराळाला या ना!! तुमचे खाणे किती कमी !!कशाला करायचा घाट घालता काकू?" झाले काकूंचा असलेला उत्साहही विरघळून जायचा. तसा प्रत्येक सण येई व जाई. दोघेही गप्प गप्प मिटून मिटूनच असत. एक पंधरा मिनीटे स्काइपवर बोलणे होई नाही म्हणायला पण त्यत त्यंच्या अमेरिकेतल्या घरी सणाचा मागमूसही नसे. वैशाली नोकरी करणारी. त्यांची रोजची जायची अंतरेच एवढी लांब लांब होती कीसणाचे घरी काही खास सेलिब्रेशन नसायचे. तयार आम्रखंड किंवा गुलाबजाम असे गोड काहीतरी आहे असे .

   " आता अनिका आणि अनिल केवढे मोठे झाले असतील . त्यांच्याशी खेळायचेय मला. खूप गोष्टी सांगायच्यात. गाणी म्हणून दाखवायचीत. बडबडगीते तरी एरव्ही कोणाला म्हणून दाखवू मी? विशालला तव्यावरची पुरणपोळी करुन घालायचीय. वैशालीसाठी कस्टर्ड फ्रुटसँलड करायचेय!!" किती किती बेत चालले होते वनिताचे. विजयही मनातून खूप सुखावले प्रत्येक गोष्ट सांगितली की लगेचच आणली असे चाललेले. आपल्या दोन बेडरुम फ्लँटमधे त्यांना काही कमी पडणार नाही याची काळजी घेत होते . रुम फ्रेशनर टॉयलेट फ्रेशनर यांची जाहिरात बघितली की लगेच हजर !!" माझ्याशी पण गप्पा मारायला वेळ ठेव बरं का वनिता नातवंडांना!!नाहीतर तूच बसशील गप्पा मारत आणि गाणी म्हणून दाखवत" विजय चेष्टेने वनिताला म्हणाले. वनिताही सुखावली . आजकाल चेष्टा गप्पा हसणे खेळणे अभावानेच!! दिवस उगवे मूकपणे आणि मावळेही तसाच. ते उदास झाले की रामचंद्र -रोहिणी त्यांच्याशी गप्पा मारायला येत. मग जुन्याआठवणींना उजाळा येई. त्यांचे काही क्षण हसरे होऊन जात आसत.

"आता या वर्षी सगळे फराळाचे जिन्नस मी घरी करणार. विशालला चकली आणि करंजी आवडते. वैशालीला अनारसा आणि लाडू". वनिताताईंच्या उत्साहाला उधाण आले होते. नवे पडदे,नवे बेडशीटस,अभ्रे यांनी घर सजून गेले. विजयनी रविवारात जाऊन चारी खोल्यांना स्वतंत्र आकाशकंदिल आणले. नातू आणि नात यांची खरेदी तरगाडगीळांच्या सुवर्ण-चांदी दालनात झाली.

   या पूर्वीच्या दिवाळीला दोघेच घरी असल्याने फारसे काही करायचा उत्साह नसे. विजयना डायबेटिस व वनिताताईंना ब्लडप्रेशर असल्याने फराळाचे खाणे वर्ज्यच होते कोणी खाणारे असेल तर करायचा उत्साह रहाणार ना!!शेजारची रोहिणी म्हणायची "काका काकू आमच्याकडेच फराळाला या ना!! तुमचे खाणे किती कमी !!कशाला करायचा घाट घालता काकू?" झाले काकूंचा असलेला उत्साहही विरघळून जायचा. तसा प्रत्येक सण येई व जाई. दोघेही गप्प गप्प मिटून मिटूनच असत. एक पंधरा मिनीटे स्काइपवर बोलणे होई नाही म्हणायला पण त्यत त्यंच्या अमेरिकेतल्या घरी सणाचा मागमूसही नसे. वैशाली नोकरी करणारी. त्यांची रोजची जायची अंतरेच एवढी लांब लांब होती कीसणाचे घरी काही खास सेलिब्रेशन नसायचे. तयार आम्रखंड किंवा गुलाबजाम असे गोड काहीतरी आहे असे .

   " आता अनिका आणि अनिल केवढे मोठे झाले असतील . त्यांच्याशी खेळायचेय मला. खूप गोष्टी सांगायच्यात. गाणी म्हणून दाखवायचीत. बडबडगीते तरी एरव्ही कोणाला म्हणून दाखवू मी? विशालला तव्यावरची पुरणपोळी करुन घालायचीय. वैशालीसाठी कस्टर्ड फ्रुटसँलड करायचेय!!" किती किती बेत चालले होते वनिताचे. विजयही मनातून खूप सुखावले प्रत्येक गोष्ट सांगितली की लगेचच आणली असे चाललेले. आपल्या दोन बेडरुम फ्लँटमधे त्यांना काही कमी पडणार नाही याची काळजी घेत होते . रुम फ्रेशनर टॉयलेट फ्रेशनर यांची जाहिरात बघितली की लगेच हजर !!" माझ्याशी पण गप्पा मारायला वेळ ठेव बरं का वनिता नातवंडांना!!नाहीतर तूच बसशील गप्पा मारत आणि गाणी म्हणून दाखवत" विजय चेष्टेने वनिताला म्हणाले. वनिताही सुखावली . आजकाल चेष्टा गप्पा हसणे खेळणे अभावानेच!! दिवस उगवे मूकपणे आणि मावळेही तसाच. ते उदास झाले की रामचंद्र -रोहिणी त्यांच्याशी गप्पा मारायला येत. मग जुन्याआठवणींना उजाळा येई. त्यांचे काही क्षण हसरे होऊन जात आसत. " घर कसे छान दिसायला हवे,मुलांना आल्यावर" म्हणून विजयनी त्यातच रंगाचेही काम काढले. ते सर्व आवरता आवरता कोजागिरी पौर्णिमा उलटली. आता सर्व किराणा सामान आले. नवीन वस्तूंची खरेदी अजून चालूच होती. रामचंद्र -रोहिणी यांनाही त्यांच्या हास्यविनोदात भाग घ्यायला आवडे. खूप दिवसांनी काका काकू हसताखेळताना बघून त्यांनाही बरे वाटत होते नाहीतर कितीही गप्पा मारा,दोघे खुलता खुलत नसत.

     "अगं आज रमा एकादशी,सर्व खोल्यांमधे आकाशकंदिल लावतो" विजयनी सर्व खोल्यांमधे वेगवेगळ्या रंगाचे आकाशकंदिल लावले. सर्व घर रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी उजळून निघाले. रात्री विशालचा फोन आला. त्यांनी whatsapp वर घराचे फोटो टाकलेले सांगितले . कुठेकुठे ट्रीपला जायचे,कायकाय पदार्थ करायचे नातवंडांशी खेळायचे बेत सांगितले .

    दुस-या दिवशी सकाळी विशालचा फोन म्हटल्यावर विजय चपापलेच!! "कालच तर संध्याकाळी हा माझ्याशी बोलला,आता काय परत" आसे म्हणून त्यांनी "हँलो"म्हटले . विशालचा आवाज जडावलेला!!

"बाबा मला कालच येथे नवीन प्रोजेक्ट मिळाला. मी ज्याची आतुरतेने वाट बघत होतो ते काम माझ्या मँनेजरने मला काल दिले व सुट्टी कँन्सल कर असेही सांगितले . असा चान्स तुला परत मिळणार नाही म्हणून मला नाईलाजास्तव येणे कँन्सल करावे लागत आहे. खरे तर कालच संध्याकाळी समजले होते पण तुमच्या दोघांच्या उत्साहाचा भर इतका होता की मी नाही सांगू शकलो . मला माफ करा प्लीज आई बाबा " असे जड " हे काय,मला फोन नाही का द्यायचा? अहो वैशालीचा आवडीचा रंग विचारायचा होता"विनीता थोडी रुसूनच म्हणाली . 

    "अगं सगळेच रंग आता संपलेत आपल्यासाठी !! ही रंगांची उधळण,दीपोत्सव आता कुणाबरोबर करणार आपण ? विशालने भारतात येणे कँन्सल केलेय" विजयचे शब्द ऐकताच विनीता एकदम थिजूनच गेली. हा आघात इतका जबरदस्त होता की डोळ्यांत एक टिपूसही येत नव्हता . सगळे अश्रु गोठले होते. संवेदना बधीर झाल्या होत्या सगळे होत्याचे नव्हते झाले होते.

   मदतीसाठी आलेली रोहिणीही दारात थबकून गेली. बिचारी धक्क्याने हबकून गेलीन. असे काही ऐकायला मिळेल हे कोणाच्या मनीध्यानीही नव्हते . तरी तिने प्रसंगावधान राखून दोघांना पाणी दिले. चहा करुन दोन बिस्किटे खायला लावली. तिने रामचंद्रला ताबडतोब यायला सांगितले . त्याने सही करुन नुकतीच कामाला सुरवात केलेली . साहेब जरा का कूच करत होतेसोडायला. त्याने तडकाफडकी रजेचा अर्ज भरला. "साहेब जरा तातडीचे काम आहे. उद्या सगळे सविस्तर सांगतो"असे म्हणून लगेच घरी आला .

    रामचंद्रला भेटताच दोघांचाही शोक एकदम अनावर झाला. त्याच्या गळ्यात पडून दोघेही मनसोक्त रडले. "आम्हांला भेटण्यापेक्षा ह्याला अॉफिसचे काम मिळणारी संधी पुढचे प्रमोशन जास्त महत्वाचे वाटले आम्ही काय काय मनोराज्ये केली होती!! सर्व धुळीला मिळालीरे!!"त्यांचा दुःखावेग बघून रामचंद्रही गहिवरला. अशी कशी ही मुले?सातासमुद्रापलीकडे गेल्यावरआईवडिलांच्या बाबतीत इतकी कशी बोथट होतात? पण क्षणात तो सावरला. हा क्षण विचार करण्याचा नव्हता,कृतीचा होता. बोलून त्याने फोन ठेवला.

" हे काय,मला फोन नाही का द्यायचा? अहो वैशालीचा आवडीचा रंग विचारायचा होता"विनीता थोडी रुसूनच म्हणाली . 

    "अगं सगळेच रंग आता संपलेत आपल्यासाठी !!ही रंगांची उधळण,दीपोत्सव आता कुणाबरोबर करणार आपण ? विशालने भारतात येणे कँन्सल केलेय" विजयचे शब्द ऐकताच विनीता एकदम थिजूनच गेली. हा आघात इतका ळृजबरदस्त होता की डोळ्यांत एक टिपूसही येत नव्हता . सगळे अश्रु गोठले होते. संवेदना बधीर झाल्या होत्या सगळे होत्याचे नव्हते झाले होते.

   मदतीसाठी आलेली रोहिणीही दारात थबकून गेली. बिचारी धक्क्याने हबकून गेलीन. असे काही ऐकायला मिळेल हे कोणाच्या मनीध्यानीही नव्हते . तरी तिने प्रसंगावधान राखून दोघांना पाणी दिले. चहा करुन दोन बिस्किटे खायला लावली. तिने रामचंद्रला ताबडतोब यायला सांगितले . त्याने सही करुन नुकतीच कामाला सुरवात केलेली . साहेब जरा का कूच करत होतेसोडायला. त्याने तडकाफडकी रजेचा अर्ज भरला. "साहेब जरा तातडीचे काम आहे. उद्या सगळे सविस्तर सांगतो"असे म्हणून लगेच घरी आला .

    रामचंद्रला भेटताच दोघांचाही शोक एकदम अनावर झाला. त्याच्या गळ्यात पडून दोघेही मनसोक्त रडले. "आम्हांला भेटण्यापेक्षा ह्याला अॉफिसचे काम मिळणारी संधी पुढचे प्रमोशन जास्त महत्वाचे वाटले आम्ही काय काय मनोराज्ये केली होती!! सर्व धुळीला मिळालीरे!!"त्यांचा दुःखावेग बघून रामचंद्रही गहिवरला. अशी कशी ही मुले? सातासमुद्रापलीकडे गेल्यावरआईवडिलांच्या बाबतीत इतकी कशी बोथट होतात? पण क्षणात तो सावरला. हा क्षण विचार करण्याचा नव्हता,कृतीचा होता.

त्याने झटकन् दोघांचे हात आपल्या हातात घेतले. "कबूल आहे , तुमचा मुलगा, सून नातवंडे येणार नाही असे अचानक कळल्यावर तुम्हांला वाईट वाटणे अगदी साहजिक आहे पण आपण काय करणार त्याला? त्यांचा निर्णय आहे तो आपल्यालाही स्विकारावाच लागणार आहे. काका काकू हे सगळे इथेच ठेवा. कुठल्याच कटू,दुःखी आठवणी मनात नकोत. तुम्ही दोघेही ह्या दिवाळीला माझ्या घरी चला. मी आणि रोहिणी तुम्हांला मुलगा-सूनेप्रमाणेच आहोत. मी तर अनाथाश्रमात वाढलेला. रोहिणीही मामा-मामींकडे वाढलेली. आम्हांला आई-वडीलांची माया प्रेम माहितच नाही. आमच्या मुलांनीही कधी आजी-आजोबा पाहिलेच नाहीत. तेव्हा प्लीज नाही म्हणू नका" असे म्हणून त्याने आणि रोहिणीने त्यांना घरी नेले. त्या साध्या स्वच्छ घरात आनंद, दीपांचे तेज, प्रकाश ओसंडून वहात होते त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांच्या मनातले मळभ कुठल्याकुठे दूर पळाले. छान, आनंदात मजेत हसतखेळत दिवाळी झाली. 

    निघताना काका-काकूंचा गळा दाटून आला. शब्द गहिवरले. रामचंद्र -रोहिणीला जवळ घेऊन काका म्हणाले " रक्ताच्या नात्यापेक्षाही किती घट्ट नाते आहे आपले!! आमच्या भावना जाणल्यात तुम्ही दोघांनी !! काय लागतं म्हातारपणी? यापेक्षा काही नाही . यापेक्षा काही नाही रे बाळांनो!!............. पुढचे शब्दआश्रुंमधे मिसळून गेले.

.............................................

Rate this content
Log in

Similar marathi story from Drama